भाग एकची लिंक 👇👇
#सोनगावचा_मास्तर - भाग दोन.
रघुचे असे विचित्र वागणे, मळकटलेले कपडे घालून शाळेत येणे, कधीही कोणताही गृहपाठ न करणे श्रीधरच्या नजरेत खूपत होते..कधीकधी त्याला रघुची दया यायची तर कधी कधी रागही यायचा..श्रीधरचा खाक्याच तसा होता, तो जेवढा जीव तोडून मुलांना शिकवायचा तेवढाच हक्काने रागवायचा देखील..मनोरंजनाच्या वेळी मनोरंजन आणी अभ्यासाच्या वेळेत अभ्यासच असे त्याचे मत होते..पुर्ण शाळेला ह्या नवीन शिस्तप्रिय शिक्षकांविषयी आदरयुक्त भिती वाटत होती, पण रघुला कोणत्याही गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता.. शिकवताना कधी कोणता प्रश्न विचारला तरी त्याला मागचे पुढचे काहीही लक्षात राहताना दिसत नव्हते..
त्यादिवशी मात्र श्रीधरचा पारा थोडा जास्तच चढला होता, दोन मिनीटापुर्वी शिकवलेल्या धड्यामधल्या एका अगदी सोप्या प्रश्नाचे उत्तर त्याने रघुला विचारले पण तो काहीही न बोलता गुपचूप मान खाली घालून बसला होता..श्रीधर रागात त्याच्या बेंचजवळ गेला, 😠
"अरे बावळ्या, ऐवढ्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही तुला, डोक्यात काही आहे का रिकामच आहे? तिसरीचा मुलगाही अशा प्रश्नाचे उत्तर देईल.. सहावी पर्यंत कसा काय आलास तु?" श्रीधरने आवाज चढवुन विचारले.
रघुच्या चेहर्यावरचे नेहमीचे हावभाव थोडे बदलले, त्याने मान वर करून डोळे किलकिले करत पाहिले आणी अगदी शांतपणे म्हणाला,
"मास्तर, मी शांत बसतो म्हणजे मला काही येत नाही अस तुम्ही समजू नका..काल गणिताच्या तासाला तुम्ही वर्गाला जे गणित शिकवले होते त्याचे तुमचे उत्तर चूकलेले होते"
"मास्तर, मी शांत बसतो म्हणजे मला काही येत नाही अस तुम्ही समजू नका..काल गणिताच्या तासाला तुम्ही वर्गाला जे गणित शिकवले होते त्याचे तुमचे उत्तर चूकलेले होते"
रघूचे बोलणे ऐकून श्रीधरला धक्का बसला कारण रघु जे बोलत होता ते खरे होते, श्रीधरने घरी गेल्यानंतर उजळणी करताना पुन्हा एकदा ते गणीत सोडवले होते तेव्हा आपण वर्गात चुकीचे उत्तर शिकवले हे त्याच्या ध्यानात आले होते आणी हि चूक तो स्वत: वर्गामध्ये गणिताच्या तासाला दूरूस्त करून सांगणार ही होता पण त्याआधीच रघूने त्याची चूक वर्गासमोर मांडली होती.
"हो, बरोबर आहे तुझं, गणिताच्या तासाच्या वेळी मी पुन्हा एकदा कालचे गणित नव्याने शिकवणार आहे, पण वर्गात कोणालाही न समजलेली ती चूक तुला कशी काय समजली रघु??" श्रीधरने आश्चर्याने विचारले.
पण रघू त्यावर काहीही न बोलता पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला.
पण रघू त्यावर काहीही न बोलता पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला.
शाळा सुटल्यानंतर श्रीधरने वर्ग मॉनिटर मंजिरीला थोडावेळ वर्गातच थांबायला सांगितले, सगळे मुले गेल्यानंतर त्याने एकटया मंजिरीला गाठून रघूविषयी माहिती विचारली, तेव्हा तिने जे काही सांगितले ते श्रीधरसाठी विचार करण्याजोगे होते.
साधारणपणे वर्षभरापूर्वी रघू हा आजच्या सारखा नव्हता, तर शाळेतील एक सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा... अभ्यासात, खेळात, आणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तो नेहमीच अव्वल असायचा..सर्व शिक्षकांचा आवडता विध्यार्थी म्हणून ओळखला जायचा, पण गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू त्याच्या स्वभावात आणी शरीरामध्ये बदल होत गेला तसातसा तो सर्वांपासून वेगळा राहायला लागला..आणी आपोआपच अभ्यासात आणी बाकी गोष्टींमध्ये मागे मागे पडत गेला.🧍
अशी महत्त्वाची माहिती श्रीधरला मंजिरीकडून मिळाली होती..त्याने थोडावेळ विचार केला आणी नंतर मंजिरीला सांगितले,
"ठिक आहे मंजिरी एक काम कर, आता घरी जाता जाता रघुच्या घरी जावून त्याच्या पालकांना निरोप दे की, त्यांना मी उद्या शाळेत बोलावले आहे म्हणून"
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
"ठिक आहे मंजिरी एक काम कर, आता घरी जाता जाता रघुच्या घरी जावून त्याच्या पालकांना निरोप दे की, त्यांना मी उद्या शाळेत बोलावले आहे म्हणून"
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
दूसर्या दिवशी सकाळी शाळा भरल्यानंतर तासाभराने एक मध्यमवयीन बाई शिक्षकांच्या खोलीमध्ये बसलेल्या श्रीधरला भेटण्यास आली, ती रघूची आई होती..श्रीधर ने तिला बसण्यास सांगितले..
"रघुचे वडील पण तुमच्या सोबत आले असते तर बरे झाले असते, मला त्यांना काही वैयक्तिक प्रश्र्न विचारायचे होते."
"रघुचे वडील पण तुमच्या सोबत आले असते तर बरे झाले असते, मला त्यांना काही वैयक्तिक प्रश्र्न विचारायचे होते."
"तुम्हाला काय इचारायचे ते मलाच इचारा मास्तर, त्याचे वडील तीन वर्षांपुर्वीच देवाघरी गेलेत"
रघुच्या आईने सांगितले.
रघुच्या आईने सांगितले.
"अरेरे, वाईट झाले..तसं तुम्हाला शाळेमध्ये बोलावण्याचे काही विशेष कारण नाही, तुमचा रघू तसा हुशार आहे पण आजकाल त्याचे अभ्यासात फारसे लक्ष दिसत नाहीये..त्याचे राहणीमान, कपडे आणी वागण्याचा परिणाम शाळेतील इतर मुलांवर पण होतोय..बाकीच्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहिती असतीलच..तर मगं मला असे विचारायचे होते की, रघू लहानपणापासूनच असा आहे की नंतर काही अपघात वगैरे.."
श्रीधरने हळू आवाजात विचारले, पण त्याचे प्रश्र्न ऐकून रघुच्या आईच्या डोळ्यात पाणी आले..
श्रीधरने हळू आवाजात विचारले, पण त्याचे प्रश्र्न ऐकून रघुच्या आईच्या डोळ्यात पाणी आले..
"आता तुम्हाला काय सांगू मास्तर? एक वर्षापुर्वी त्याच्यासारखा मुलगा अख्या गावात नव्हता ओ..नेहमी पहिला नंबर असायचा त्याचा..देसाई मास्तरांचा तर लई जीव होता त्याच्यावर.. एवढा की, शाळा सुटल्यानंतर बी आणी कधीकधी शाळेला सुट्टी असतानाही तो त्यांच्यासोबतच असायचा..मागल्या वर्षी दिवाळीच्या सुट्या लागल्या आणी तो देसाई मास्तरांचे गाव बघायचे म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला गेला होता..पण आठवड्याभरा नंतर जेव्हा तो एकटाच परत आला..त्या दिवसापासून तो गप्प गप्प राहायला लागला, कोणासोबतच बोलत नव्हता की खेळत नव्हता, काही विचारले तरी सांगत नव्हता.. का कुणास ठाऊक पण हळूहळू त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेला..हात आणी तोंड वाकडं झालं, दिवसेंदिवस जास्तच खंगत चाललंय हो पोरगं..काय करावं काही कळत नाही ..त्यान अभ्यास नाय केला तरी जाऊद्या, त्यो नापास झाला तरी होऊद्या, कसाबी राहुद्या, पण तुम्ही त्याला काही बोलू नका मास्तर.. तेवढं एकच पोरगं आहे मला"
लुगड्याच्या पदराने डोळे पुसत ती बोलत होती..😢
श्रीधरला रघुविषयी नवनवीन माहिती मिळत होती, ज्यामध्ये त्याची उत्सुकता जास्त वाढत चालली होती..
लुगड्याच्या पदराने डोळे पुसत ती बोलत होती..😢
श्रीधरला रघुविषयी नवनवीन माहिती मिळत होती, ज्यामध्ये त्याची उत्सुकता जास्त वाढत चालली होती..
"हंम्म, असं असेल तर तुम्ही काळजी करु नका ताई, मी असेपर्यंत तुमचा रघू कोणत्याही परिक्षेत नापास होणार नाही, तुम्ही जाऊ शकता आता" श्रीधरने रघूच्या आईला निरोप दिला..
दूपारच्या सुट्टी मध्ये सर्व शिक्षक एकत्र डबा खात असताना श्रीधरने शाळेचे सर्वात अनुभवी पाटील गुरुजीं आणी इतर शिक्षकांकडे देसाई मास्तरविषयी चौकशी केली..
देसाई विषयी सर्वांचे मत भिन्न होते..कोणाला तो चांगला वाटत होता तर कोणाला वाईट, पण सध्या तो कोठे आहेत याविषयी पक्की खबर कोणाकडेच नव्हती..
श्रीधरने अनेकांना देसाईच्या सध्याच्या परीस्थितीविषयी विचारणा केली.. कोणी म्हणले, त्याला शहरातल्या मोठ्या शाळेत नोकरी मिळाली म्हणून तो सोनगावला परत आला नाही, तर कोणी म्हणले, तो शिक्षकी पेशाला कंटाळला होता त्यामुळे गावाकडेच राहुन शेती करू लागला..सगळ्यांकडे वेगवेगळी ऐकीव माहिती होती.

त्या संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर श्रीधर काहीवेळ गावातल्या मोठ्या कडूलिंबाच्या झाडाखालच्या पारावर जाऊन बसला, तेथे गावातील दोन तीन वयोवृद्ध मंडळी दररोज बिडी, सुपारी साठी एकत्रित येत असत, त्यांच्यासोबत श्रीधरचे चांगले जमत होते..आजपण त्यांच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन काही वेळ घालवून नंतर अंधार पडल्यावर तो घरी गेला.. पाहतो तर काय, घराच्या बाहेरच्या ओट्यावर शेवंता त्याची वाट पाहत बसलेली होती..🙎
"आज एवढ्या लवकरच आलीस डबा घेऊन " श्रीधर तिला पाहून म्हणाला.
"हम्म. तेवढी काळजी हाये मला तुमची"
"बरं झालं कोणीतरी आहे माझी काळजी करणार"
"बरं मास्तर, पाच रुपये द्या की जरा, काम होत मला पैशाचं"
"बरं झालं कोणीतरी आहे माझी काळजी करणार"
"बरं मास्तर, पाच रुपये द्या की जरा, काम होत मला पैशाचं"
"पाच रुपये? नाहीत गं माझ्याकडे"
श्रीधरने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण फक्त नाही म्हणल्यान शेवंता थोडीच ऐकणार होती , तिने श्रीधरच्या पॅन्टच्या खिशात हात घालून पाचच्या तीन नोटा बाहेर काढल्या आणी त्यातली एक नोट साडीच्या पदराखाली चोळीमध्ये लपवून बाकी दोन परत खिशात ठेवल्या..

"अगं शेवंता, पगार नाही झालेला अजून, खर्च वाढत चाललाय,नवीन कपडे शिवायला टाकलेत, परत सरपंचालाही ह्या घराच, जेवणाच काहितरी द्यावच लागेल, माझ्याकडे ऐवढेच पैसे आहेत, दे बघू ते पैसे परत"
श्रीधर थोडा चिडला होता.
श्रीधर थोडा चिडला होता.
"या बया, एवढा कंजूसपणा, आण मी तुमच्यासाठी एवढं करते, त्याच काहीच नाही का तुम्हाला.."
"तसं नाहीये शेवंता पण..बरं ठिके असु दे..पण माझ्याआधी येथे जे देसाई गुरुजी राहायचे त्यांच्याकडूनच पण तु असेच पैसे घ्यायचीस ना?"
"त्यो? त्यो तर पन्नास रूपये द्यायलाबी माग पुढं बघत नव्हता"
"एवढे पैसे? पण तुला का द्यायचा?"
"आता काय आमचं समदंच इस्कटून सांगू का तुम्हाला?"😉
हळुवार पणे डोळा मारत शेवंता म्हणाली.. आणी श्रीधर काय समजायचे ते समजून गेला.
हळुवार पणे डोळा मारत शेवंता म्हणाली.. आणी श्रीधर काय समजायचे ते समजून गेला.
"अच्छा म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे शिकवणारा देसाई गुरुजी असे पण दिवे पाजळत होता तर..चला ठिक आहे, पण जर तुम्हा दोघांचे सुत जूळलेले होते, हो ना? मग तुला तर नक्कीच माहिती असेल तो सध्या कुठे आहे तो"
"मेला त्यो"
"काय ? तुला कोणी सांगितले?" आश्र्चर्यचकित होऊन श्रीधरने विचारले.
"काय ? तुला कोणी सांगितले?" आश्र्चर्यचकित होऊन श्रीधरने विचारले.
"आता एवढा जीव लावला त्याला मी, एवढं पिरेम केलं, पण तरीबी त्यो एकदा गावाकड गेलेला परत सोनगावाला आलाच नाही, म्हणजे माझ्यासाठी मेलाच की.. तशीपण गावाकड एक लग्नाची बायको आहे त्याला, मग माझी आठवण कशाला येईल.. " शेवंता थोडी भावनिक होऊन म्हणाली.
"बरं, त्याच ठिक आहे, पण तुझ्याबद्दल पण बरंच काही ऐकलंय मी, लग्नानंतर सहा महिन्यातच तु तुझ्या नवर्याला सोडून आली होतीस म्हणे..तुम्ही आजकालच्या पोरी पण अशा का वागतात मला समजत नाही.. असं दूसर्यांच्या घरी काम करण्यापेक्षा, ह्याला त्याला पैसे मागण्यापेक्षा, स्वताचा संसारच व्यवस्थित केला असता तर.."
श्रीधरने शेवंताच्या दूखर्या नसावर बोट ठेवले होते..तिचा चेहरा आता रडवेला झाला होता..
श्रीधरने शेवंताच्या दूखर्या नसावर बोट ठेवले होते..तिचा चेहरा आता रडवेला झाला होता..
"सगळेजण मलाच बोलतात, तु का नांदली नाहीस नवर्याच्या घरी म्हणून..पण जो नवरा काहीही काम न करता रांत्रदिवस घरात बसून शिव्या देत असन..दारू पिऊन मारत असलं.. मला बाहेर कामावर धाडून पैसे हिसकावून घेत असलं, त्याच्यासोबत कशी राहणार मी, सांगा ना तुम्ही?? म्हणून आले मी सहा महिन्यांत परत माहेरी कायमची..😠
आणी नसेल द्यायचे हे पैसे तर नका देऊ, राहुद्या हे तुम्हालाच"
आणी नसेल द्यायचे हे पैसे तर नका देऊ, राहुद्या हे तुम्हालाच"
रागावलेल्या शेवंताने चोळीतले पैसे काढले आणी श्रीधरच्या हातावर ठेवत परत जावू लागली.
"अगं राहुदे गं, माझ्याकडे आहेत आणखी पैसे, उलटं तुला लागलेच तर आणखी देईन मी, ठेव हे तुला"
श्रीधरने पाच रूपये पुन्हा तिच्या हातात दिले आणी तिची समजूत काढली, देसाई मास्तरांबद्दल श्रीधरला शेवंता कडून आणखी माहिती काही हवी होती म्हणून त्याने तिला पुढे विचारले..
"गाव कोणतं आहे ग देसाई मास्तरच?

#क्रमश..