ही एक सत्य घटना आहे.अगदी एक महीन्यापुर्वी माझ्यावर घडलेली.हा भास किंवा कल्पनाविलास नाही.
अद्भुत, अकल्पनीय
मी व माझे मिस्टर ३मार्च २०२० ला नागपूर पुणे गरीब रथ ट्रेन ने सायंकाळी सहा वाजता पुणेला वीसा काढण्यासाठी चाललो होतो.९वाजता जेवण झाल्यावर आम्ही आमच्या सीटवर झोपायला गेलो.आम्हाला साईड बर्थ मिळालेल्या होत्या.मिस्टरांना अप्पर व मला सर्वात खाली.गरीबरथ मध्ये साईड बर्थही तीन असतात आपल्याला माहीत आहे च.पुर्ण ट्रेन फुल होती.माझी साईड बर्थ असल्याने मला आजुबाजुच्या कंपार्टमेंट मधलही स्पष्ट दिसत होते.
रात्री मला झोपच लागली नाही.पण मी डोळे मिटून शांत पडली होती.तसही माझ्या पर्स मध्ये किमती वस्तु होत्या त्यामुळे काळजीनं मी जागीच होती तेवढ्यात माझे मिस्टर वाशरुम ला जाऊन आले.मी घड्याळ बघितली २वाजले होते.त्यानंतर अंदाजे वीस मिनिटांनी अचानक अगदी स्पष्ट आवाज येऊ लागला.ये.,ये...ये...
अगोदर मला वाटलं की ट्रेनचा आवाज असेल पण त्याचा
खडखड असा वेगळाच आवाज येत होता.मी सर्वत्र नजर फिरवली.सर्वजण अगदीं गाढ झोपेत होते.मग मी आवाज कुठन येतो ते बारकाईने निरीक्षण केले.तर आवाज ट्रेनच्या बाहेरुन वरच्या भागातुन येत होता.मी स्वामी समर्था चा जप करायला लागली मनात.अचानक बाहेरच आकाश किंचीत पहाट झाल्यासारखे उजाडलं.मी म्हटलं आपण उगाचच घाबरत होतो आतातर पहाट होत आहे.अगदी त्याच क्षणी एकदम दुपारी बारा वाजता जस ऊन पडतं ना.तस प्रखर ऊन पसरलं.आणि आश्र्चर्य म्हणजे ते समोरचे घर तेच होते जणुकाही ते ट्रेन सोबतच चालत होते.माझ्या मागच्या खिडकीतून अंधार दिसत होता. मग मी समजली काहीतरी घडतंय.हे नाॅर्मल नव्हत.
दुसऱ्या च मिनिटांत आकाश लालभडक झालं.नंतर पिवळं. तो ये..ये आवाज चालुच होता.त्यानंतर पुन्हा खिडकीबाहेर अंधार पसरला.आणि ट्रेनचा पण नेहमी सारखा आवाज येऊ लागला.त्यावेळला ट्रेन जंगलातुन जात होती.किर्र झाडी दिसत होती बाहेर.तो येये आवाज ही बंद झाला.सर्व शांत झालं होतं.
त्यानंतर मी अंदाजे अर्धा तासानंतर मी उठली आणि डिसप्ले मध्ये पाहीले ३वाजुन२० मिनीटे झाले होते.म्हणजे२;२०ते२:४० च्यामध्ये हे सर्व नाटक घडलं .
सर्वच अनाकलनीय होत.
काही जाणकारांच्या मते...हा चकव्याचा प्रकार होता.
आणि ट्रेन मध्ये असे प्रकार घडतात.

डाॅ.सौ.सुलेखा सरोदे.