एकतर्फी प्रेम (अंतिम भाग) -लेखक -संदीप पाटील
रोहितने तडक मामांना फोन लावून विरभद्रचा पत्ता मागितला. मामांना त्याने मित्राला हवा असल्याचे खोटे सांगितले.मामांजवळून पत्ता घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तो वीरभद्र राहत असलेल्या शहराच्या ठिकाणी आला.येतांना त्याने राधा व सुमितला काहीच कल्पना दिली नव्हती.काही मिनिटांतच तो वीरभद्र पॅलेस च्या समोर होता.वीरभद्र पॅलेसच्या आत शिरल्यावर त्याचे पाय नकळत आवारात असलेल्या भगवान महादेवाच्या मंदीराकडे वळले महादेवाचे दर्शन घेऊन त्याला प्रसन्न वाटले.भेटायला आलेल्या व्यक्तींच्या नोंदवहीत स्वतःच्या नावाची नोंद करून तो वाट पाहत बसला.त्याच्या नावाचा पुकारा झाल्यावर तो त्याला दाखविलेल्या खोलीत शिरला.समोरच्या व्यक्तीला पाहुन तो भारावून गेला.गोरा वर्ण,बलदंड शरीरयष्टी,धारदार नाक,भेदक व समोरच्याच्या मनाचा ठाव घेणारे डोळे असलेला युवक त्याच्यासमोर उभा होता.वीरभद्र होता तो.वीरभद्र ने रोहितची ओळख करून घेत त्याला येण्याचे कारण विचारले.रोहितने त्याला सर्व हकीकत सांगून मदत करण्याची विनंती.स्वतःला कर्तृत्व सिद्ध करण्याच्या महाविद्यालयीन वयात दोन जीव गेलेल्या व एका तरुणाला तुरुंगात खितपत ठेवणाऱ्या रोहितच्या प्रकरणात वीरभद्रला उत्सुकता निर्माण झाली.त्याने रोहितला त्याच्या खास खुर्चीत बसविले.त्याला संमोहित करून काही सापडते का पाहिले पण त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.रोहितचे रक्त त्याच्या विशिष्ट द्रावणात मिश्रण करून प्राशन केल्यावरही त्याला फारशी माहिती मिळाली नाही.आयुष्यात पहिल्यांदा वीरभद्र गोंधळात पडला होता.एखाद्या केसचा तपास घेण्याचे त्याचे दोन्ही हुकुमी शस्त्र वाया गेले होते.आपल्या चेहऱ्यावरील गोंधळ रोहितला न दाखविता तो रोहितला म्हणाला "तु काही खाऊन घे,तुझे जेवण झाल्यावर आपण तुझ्या शहराला जाऊ".
वीरभद्र ने रोहितसोबत निघायची तयारी सुरू केली.त्याच्या खास अगरबत्ती, त्रिशूल व परशु,अभिमंत्रित रुद्राक्ष व धागे एका बॅगेत भरले.रोहितला घेऊन तो स्वतःच्या गाडीने रोहितच्या शहरात त्याच्या रूमवर आला.रोहितने वीरभद्रची ओळख सुमितसोबत करून दिली.वीरभद्रने सुमितच्या काही चाचण्या घेतल्या पण निष्पन्न काहीच झाले नाही.शेवटी वीरभद्रने एक रुद्राक्ष रोहितच्या व एक सुमितच्या गळ्यात बांधला.त्यांच्या खोलीच्या चौफेर फिरत अभिमंत्रित रिंगण घातले,ते रिंगण ज्याला निदान आजपर्यंत तरी कुठलीही अमानवीय शक्ती पार करू शकली नव्हती.रोहितच्या रूमपासून जवळच त्याच्या रूम वर लक्ष ठेवल्या जाईल. प्रत्येक हालचाली नजरेत येतील अश्या ठिकाणी एकांतात असलेली खोली भाड्याने घेतली.दुसऱ्या दिवशी रोहित वीरभद्र ला घेऊन राधाच्या रूमवर गेला.त्याला राधाबद्दल सर्व सांगितले.वीरभद्र ने राधाला रुद्राक्ष देऊन गळ्यात बांधला.राधा रडत रडत वीरभद्रला म्हणाली "मला असे वाटते की पुढचा नंबर माझाच आहे,कारण आमच्या ग्रुपमध्ये मीच एकटी मुलगी बाकी आहे.वृषाली व चेतना नंतर".वीरभद्र ने तीला धीर देत म्हणाला की "मी असतांना कुणाला काहीच होऊ देणार नाही".काही दिवस शांततेत गेले.सर्व काही ठीक झाले असे वाटत असतांना एका रात्री भिंतीवरच्या घड्याळाचे बारा वाजल्याचे बारा ठोके दिल्यावर त्यांच्या आवाजाने रोहितच्या बाजूला झोपलेल्या सुमितने डोळे उघडले.चावी दिलेल्या यंत्रासारखा तो उठला,दरवाजा खोलून वडाच्या झाडाखाली आला.तिथे वृषाली बसलेली त्याला दिसली.तिचा इशारा झाल्याबरोबर सुमित पुढे आला.बाकड्याखाली ठेवलेली दोरी काढून वडाच्या फांदीला बांधुन फास तयार केला.बाकड्यावर चढून फास गळ्यात घालून उडी मारायच्या तयारीत असतांनाच वरची दोरी कशानेतरी कापल्या गेली.वीरभद्र चा परशु होता तो.आपल्या खोलीत साधना करीत असतांना त्याला रोहितच्या रूम जवळ हालचाल जाणवली,रुमजवळ येताच चित्र स्पष्ट झाले आणि त्याने त्वरेने हालचाल केली.सुमितला त्याने सावरले व रूममध्ये घेऊन आला,पण वडाच्या झाडाखाली आसपास एक वेगळाच सुगंध दरवळत होता जो त्याला वाटत होते की तो त्याच्या परिचयाचा आहे.
आयुष्यात पहिल्यांदाच वीरभद्र इतक्या चिंतेत व गोंधळात पडला होता.आयुष्यात प्रथमच त्याला कडवे आव्हान मिळाले होते किंबहुना त्याच्यावर मात झाली होती.त्याचे मंतरलेले रिंगण,रुद्राक्ष कुठल्यातरी शक्तीपूढे कवडीमोल ठरले होते.त्याच्या सरंक्षणात असलेल्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता. झालेल्या प्रकाराने सुमित व रोहित भेदरलेले होते.दुसऱ्या दिवशी रोहितच्या रूम वर सुमित,रोहित,वीरभद्र बसलेले असतांना राधापण तिथं
आली.रोहितने तीला बोलाविले होते.रोहितने तीला रात्रीचा प्रकार सांगितल्यावर ती काळजीत पडली.ती वीरभद्रला म्हणाली "आम्ही वृषालीचे काहीही वाईट केलेले नसतांना ती का आमच्या जीवावर उठली?आणि दुःख या गोष्टीचे वाटते की तुम्ही हजर असतांना ती आम्हाला मारायचा प्रयत्न करत आहे."वीरभद्रने तीला लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.वीरभद्र स्वतःच्या खोलीत आला,त्याने कुणाला तरी फोन लावून काही साहित्य मागविले.तसेच पोलीस स्टेशनला जाऊन आला.सुमितच्या प्रकरणाने तो अजूनही चौकस झाला होता.दुपारी राधा त्याला भेटायला त्याच्या खोलीवर आली, त्याला तीने हात जोडत,रडत वाचविण्याची विनंती केली. वीरभद्र ने राधाला दिलासा देऊन परत पाठविले.नंतर वीरभद्रने रोहितला बोलाविले त्याच्यासोबत बराच वेळ चर्चा करून,त्याला काही सुचना देऊन रूम वर परत पाठविले.दुसऱ्या दिवशी रोहितने सुमित व राधाला रूमवर बोलावुन आपण वीरभद्र सोबत दोन तीन दिवसांसाठी आपल्या समस्येवर काही उपाय शोधण्यासाठी जात असल्याचे तसेच कुणीही आपली जागा सोडून इतरत्र न जाण्याचे सांगितले.राधाने त्याला लवकर परत येण्याविषयी बोलली.
वीरभद्र व रोहितला जाऊन दोन दिवस झाले होते.त्या बंगल्यात सुमितला एकट्याला भीती वाटत होती.संध्याकाळपर्यंत राधा सोबत असल्यामुळे त्याला काहीच वाटले नाही पण संध्याकाळी ती परत निघून गेल्यावर रात्र त्याला खायला उठली होती.मनाला अनामिक हुरहूर वाटत होती.झोप लागत नव्हती.भीतीने सर्व दारे,खिडक्या बंद केल्या होत्या.घड्याळाने रात्री बाराचे ठोके दिले अन सुमितला कुणीतरी आवाज देत असल्याचे जाणवले.तो आवाज ऐकून सुमित भरावल्यासारखा उठला,दरवाजा उघडून बाहेर आला.मागच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होत होती.बाकड्यावर वृषाली बसलेली होती.तिच्या इशाऱ्यावर सुमितने झाडाच्या फांदीला फास बांधून तो गळ्यात टाकणार तोच वडाच्या आजूबाजूचा परिसर तीव्र प्रकाशाने उजळून निघाला.वडाच्या झाडांच्या सभोवताली पोलिसांचा गराडा पडला.वृषाली काहीच करू शकली नाही.वीरभद्र हसत हसत रोहितला घेऊन पोलिसांच्या गराड्यात येत वृषालीसमोर उभा राहिला आणि म्हणाला "वृषालीबाई उर्फ..बाजुला करा तो मुखवटा अन दाखवा आपले खरे रूप सर्वांना. कारण आता तुम्ही पळून जाऊ शकत नाही."हतबल होत वृषालीने मुखवटा काढला आणि सुमित व रोहितला भयंकर हादरा बसला. राधा होती ती.

राधा होती ती.राधा अशी वागेल याचा विचार स्वप्नातही सुमित अन रोहितने केला नव्हता.वीरभद्र राधाला म्हणाला "सांग आता सविस्तर सर्वांना, नाहीतर पोलीस तुझ तोंड उघडतीलच."राधा मटकन खाली बसली.तीने सांगायला सुरुवात केली "रोहित व मी दहावीपासूनचे मित्र.माझे रोहितवर तेव्हापासूनच प्रेम होते पण मी व्यक्त केलेच नाही.भीती वाटत होती रोहित नाराज होईल याची.पुढे अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यावर वृषाली माझ्या व रोहितच्या मध्ये आली.रोहित वृषालीवर प्रेम करत होता आणि त्या दोघांना पाहून माझा नुसता जळफळाट होत होता.रोहित फक्त माझाच आहे असे मी समजत होती.एवढ्यात वृषालीकरून रोहित व युवराज चे भांडण झाले.मी या परिस्थितीचा फायदा घेऊन युवराज च्या हाताने वृषालीचा मारले व सर्व आरोप युवराज वर आलेत."वीरभद्र राधाला म्हणाला "मग चेतनाला का मारले?सुमितला मारायचा प्रयत्न का केला?"राधा उत्तरली "वृषालीचा काटा काढल्यावर मी निश्चिंत झाले,युवराज कारागृहात होता,रोहित माझ्याजवळ होता आणि माझ्यावर कुणाचा संशय पण नव्हता.एकदा मी बाहेर गेली असता चेतनाने काही कारणाने माझी बॅग उघडली.त्यात तीला वृषालीचा गुलाबी ड्रेस,युवराज चे अजून काही सामान दिसले व तीला माझा संशय आला.ती सतत माझ्याकडे संशयित नजरेने पहायची म्हणून तिचा काटा काढावा लागला.चेतना सुमितवर प्रेम करत असल्यामुळे मला संशय होता की तीने सदर गोष्ट सुमितला सांगितली.मला भविष्यात अडचण नको म्हणून मी सुमितचा अडसर दूर करायचे ठरविले.त्या दिवशीच त्याचा नंबर होता पण वीरभद्र अचानक मध्ये आल्यामुळे तो वाचला.रोहित मला माफ कर रे पण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते".
राधाचे बोलणे संपल्यावर वीरभद्र म्हणाला जेव्हा मी रोहितला मदत करायला इथे आलो,माझ्या मंत्रसामर्थ्याचे कवच तुम्हा तिघांच्या मागे उभे केल्यावरही सुमितने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा मी सुध्दा हादरलो.माझी शक्ती कमी झाली की काय म्हणून मला पहिल्यांदाच माझ्या सामर्थ्यावर शंका आली पण मुळात तसे नव्हतेच.यंत्रसामर्थ्य,तंत्रशक्ती ही मृतात्मे,अमानवीय शक्तींविरोधात काम करते जिवंत माणसांच्या नाही.इथे वृषालीचा आत्मा नव्हताच,ही सर्व राधाची खेळी होती.सुमित पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला वाचवीत असतांना तिथं मला एक सुगंध आला जो माझ्या परिचयाचा होता पण आठवत नव्हते.दुसऱ्या दिवशी राधा रोहितच्या रूमवर आली असतांना माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो सुगंध राधाच्या परफ्युमचा आहे व मग मी राधावर लक्ष केंद्रित केले.तुम्हा सर्वांना सांगतो की काही व्यक्ती ह्या काही गोष्टी फार लवकर आत्मसात करतात,त्यात प्राविण्य मिळवितात. जस खेळाचे उदाहरण घ्या जे हॉकी उत्तम खेळतात ते बुद्धिबळ खेळू शकत नाहीत.राधाचे संमोहनातील प्राविण्य खरंच दाद देण्यासारखे आहे.तिने प्रथम संमोहनाचा प्रयोग युवराज वर करून त्याला वृषालीचा खून करण्याचे निर्देश दिले.वृषालीला राधानेच तिच्यासोबत महत्वाचे बोलायचे असे सांगून कॉलेज च्या गच्चीवर भेटायला सांगितले पण ती स्वतः मात्र तिथं गेलीच नाही.नियोजनानुसार तिथे युवराज गेला,पुढे काय घडले ते तुम्हाला माहीत आहेच.चेतनाला जेव्हा काही गोष्टींची शंका यायला सुरुवात झाली तेव्हाच राधा सावध झाली.सुमित गावाला गेलेला असतांना सायंकाळी ती रोहितला भेटायला त्याच्या रूमवर गेली,त्याला संमोहित करून त्याच्याकडून त्या रात्री वृषालीचे भुत उभे केले अन दुसऱ्या दिवशी कुणाला संशय येऊ नये म्हणून स्वतः त्याला भेटायला आली.तुमच्या कुणाच्याही एक गोष्ट लक्षात आलीच नाही की जेव्हा जेव्हा कुठलीही घटना घडली तेव्हा तेव्हा राधा त्या व्यक्तींना भेटून गेली होती.राहला चेतनाचा प्रश्न तर ती राधाच्याच रूमवर राहात असल्यामुळे तिला संमोहित करून मारणे सोपे होते.राधा आश्चर्यचकित होऊन वीरभद्र ला म्हणाली तुम्हाला हे सर्व कसे माहीत.
वीरभद्र राधाला म्हणाला "राधा,तुला एक म्हण माहीत असेलच अति तिथे माती नावाची.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे परिणाम वाईटच होतात.अग गरजेपेक्षा जास्त जेवलो तर अपचन होते,जास्त पाऊस आला तर महापूर येतो.जगावर सत्ता स्थापन करण्याची अति महत्वाकांक्षा असलेल्यांचे,पद व पैसे मिळविण्याची अति महत्वाकांक्षा असलेल्यांचे काय हाल होतात ते सर्व जगाने पाहिले आहे.जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिटलरला आत्महत्या करावी लागली,स्वराज्य जिंकण्यासाठी जीवतोड धावपळ करणाऱ्या औरंगजेबाला मराठी मातीतच दफन व्हावे लागले.तुझी माती तुझ्या रोहितवरील अतिप्रेम व अती आत्मविश्वासाने केली.प्रेम ही भावनाच अशी आहे की त्यात काळजी,परोपकार, त्याग सर्वच आले.पण तु मात्र रोहितवरील अतिप्रेमाणे आंधळी झालीस व स्वतःच्या जीवलग मित्रांच्या जीवावर उठलीस.तुला तुझ्या संमोहन शक्तीवरील अति आत्मविश्वास नडला.तु सर्वांना लीलया संमोहित करत होतीस,जेव्हा मी या प्रकरणात आलो तेव्हा तुला आठवते तु मला माझ्या खोलीवर भेटायला आली होतीस?त्या वेळेस तु माझ्यावर संमोहनाच्या प्रयोगाचा प्रयत्न केला,तो माझ्या लक्षात आला व मग मीच तुला उलट संमोहित करून तुझ्याकडुन सर्व माहिती काढून घेतली.आपल्या शक्तींवर विश्वास असावा पण अतिविश्वास नको.अग शक्ती मिळवायला जेवढी साधना करावी लागते त्यापेक्षा जास्त ती शक्ती वाढवायला,टिकवून ठेवायला करावी लागते.काम,क्रोध,मोह,मत्सर, लोभ यांच्यावर प्रभुत्व स्थापित करणाऱ्या माझ्यासारख्यावर तुझे कुठले संमोहन काम करेल?लोक अमानवीय शक्ती,प्रेतात्मे यांना वाईट समजता आणि कदाचित ते असतीलही वाईट पण त्यांचा वावर रात्रीच असतो अन तुझ्यासारख्या मानवातील अमानवीय शक्तींचा वावर दिवसरात्री असतो.मानवाने आपल्या कुठल्याही गोष्टींच्या अति हव्यासापोटी भुत, प्रेतात्मे यांना पण मागे सोडले आहे.आजच्या घडीला विचार करसाल तर सर्वांत वाईट प्राणी जर कुणी असेल तर तो मानवच आहे. "
वीरभद्र बोलायचे थांबला.पोलीस राधाला घेऊन गेले.सुमित व रोहित अजूनही धक्क्यातून बाहेर आले नव्हते.वीरभद्र त्यांना रूमवर घेऊन गेला.आपल्या खास अगरबत्ती काढून त्याने लावल्या.त्या अगरबतींचा सुवास नाकात जाताच नकारात्मक विचार,नैराश्य दूर होऊन दोघांनाही प्रसन्न वाटायला लागले.त्या दोघांनी वीरभद्र चे आभार मानले.वीरभद्र त्यांना म्हणाला "आभार तर मी पण तुमचे मानायला हवेत,या प्रकरणात मलापण खुप शिकायला मिळाले.लक्ष सर्व गोष्टींवर केंद्रित करायला हवे हा धडा मिळाला.तुम्हीपण झालेल विसरून जा.जवळचा माणुस गेल्याचे दुःख असतेच पण आयुष्यात सतत पुढे जावे लागते.नदी वाहायची थांबली तर तिचे डबके बनते आणि डबक्याची किंमत नसते".एवढे बोलून वीरभद्र तेथून निघाला पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी.