🙏फितूर आभाळ🙏
भाग::--चौथा
वस्तीतल्या रामा पोवाराच्या वाडग्यातील ढालक्याखाली झाकलेल्या लाल कलगीच्या कोंबड्यांनी बांग दिली तशी दुलबानं कुस बदलवली.किसनाबाच्या घरी झोपलेल्या दुलबाला आपल्या गोकुळाची वाताहत आठवता आठवता रात कशी गेली कळलंच नाही.सोनेवाडीच्या पूर्वेला तांबडी आभा फुटण्याच्या बेतात होती.त्यामुळं ढालीतल्या कोंबडयांनी आळीपाळीनं 'कुकुsssच कू' चा एकच गिल्ला उडवत प्राची अवतरत असल्याची वर्दी दिली.त्या आवाजात
रातभराच्या पावसानं पुराच्या पाण्यानं तट्ट फुगलेल्या तापी मायेच्या प्रवाहाची गाज ही मिसळत होती.बऱ्याच महिन्यांनी दुलबाला अशी प्रसन्न पहाट अनुभवाला येत होती. जवळच गाईच्या दुधाच्या धारेचा चरवीतला लयबद्ध आवाज येत होता.वासरूही खुंटीला धक्के देत हंबरत असावं.तोच विठ्ठल मंदिरातून भक्तीगिते लाऊडस्पिकर वर सुरू होताच सारे आवाज त्या आवाजात विरले.
सकाळी सकाळीच दुलबा नदीकडं चालून फेरफटका मारून येतांना आपल्या घराकडनं जाऊन आला.दिड दोन वर्षाचं बिन धन्याचं घर मोडकळीस आल्यागत दिसताच अंगावर पावसाची झड झेलत दुलबा तेथेच थबकला.घरातून संता व जनीचा भास दुलबास झाला.भरलं गोकुळ इतक्या लवकर उध्वस्त व्हावं यानं दुलबा गहिवरला.या गोकुळास सावरायला कोण कृष्ण येईल? बाजी?
'बाजी'च्या यादेनं दुलबाच्या डोळ्यातून तापीच वाहू लागली.बाला व सुमी उठली असेल या विचारानं भानावर येत दुलबा किसनाबाकडं परतू लागला.
दुपार पर्यंत साऱ्या सोनेवाडीत दुलबा नातवासोबत गावात परतल्याचं कळताच सारी विठ्ठल मंदिरात जमली.सारं कळताच धना, हणमंत यावर जो तो थुंकू लागला व लाखोली वाहू लागला.
उद्या परवाच साऱ्यांनी मिळून दुलबाचं घरं साफ करु,किरकोळ डागडुजी करू.राहिल दुलबा नातवासोबत गावातच. सारे मिळून आपण खाऊ घालू!सारे बोलू लागली.गावावर मायेची पखरण घालणाऱ्या विठोबाच्या भक्तावर ही वेळ आली तर आपण अशा वक्ताला उभं राहिलंच पाहिजे.त्या आधी किसनाबानं माझा दुलबा मला जड नाही.तो आता माझ्याकडंच राहिल.असं ठणकावून सांगितलं पण अनुभवानं तोंड पोळलेल्या दुलबास गावकऱ्यांचं म्हणणं पटलं.त्यांनी किसनाबास समजावत स्वत:च्या घरात राहण्याचा निर्णय घेतला.दुसऱ्या दिवशी घराची डागडुजी करण्याचं ठरवत दुलबास धीर देत सारी परतली.आपण गावात नातवांना आणुन योग्यच केलं याची दुलबास खात्री पटली.आपण आहोत तो पावेतो नातवाची सोय करणं त्यांना निकडीचं वाटू लागलं.कारण पिकलं पान केव्हा गळून पळेल याचा भरवसा नाही व बाजी केव्हा परतेन तो पावेतो लेकरं जगली पाहिजेत.
दुलबा सोनेवाडीत पोहोचला व गावातली चर्चा संध्याकाळ पावेतो हणमंतरावाकडं पोहोचलीच.सापाची पिल्लं बिळात घुसण्या आधीच बिळ उध्वस्त केलं तर..!त्यानं रंजनला कळवलं.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच दोन जेसेबी टोरोरोsss.... भर्र्रर्रsssss.. करत सोनेवाडीत दुलबाच्या अंगणात पोहोचली व कोंबड्यांनी बांग देण्याआधीच कामाला लागली.उजेड पडताच रंजन, मिना, राधा ही आली. दुपार पर्यंत दुलबाचं घर जमीन दोस्त करत इमला ट्रक्टरमध्ये घालत वखारीत रवाना केला.येणाऱ्या जाणाऱ्यांना 'धना इथं दुलबासाठी स्लॅबचं घर बांधतोय'असं सांगण्यात आलं.पण दुलबा ,बाला व सुमीकडं ढुंकायलाही कुणी गेलं नाही.गावकऱ्यांआधी दुलबा काय ते समजला.तो रात्रभर धाय मोकलून रडला.डोक्यावरचं छत ही गेलं आता काय करावं. किसना जरी आपल्याला आसरा देईल पण आपल्या नंतर नातवांचं करेलही.पण कोठपर्यंत त्याला त्रास द्यायचा? जिथं सख्ख्या धनानं रक्तानं पाठीत खंजर खुपसला तिथं कुणावर कितपत विश्वास ठेवावा?दुलबापुढं नातवाचं भविष्य आ वासून इंगळ्यागत डसू लागलं. तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत विचार करू लागला.त्याच अवस्थेत पावसाच्या झडीसोबत आलेल्या जोरदार वाऱ्यांनं विठ्ठलाच्या मंदिरातील घंटा हालत वाजत असाव्यात व त्यांचा घणघण आवाज त्या रात्रीच्या ओल्या पाणकाळी शांततेचा भंग करू लागला.तो आवाज ऐकताच झोपल्या झोपल्याच दुलबाचे दोन्ही हात जोडले गेले."बा अनंता! विठ्ठला! पुरी हयात तुझ्या सेवेत कसुर गेली नाही !सांभाळ रे माझ्या लेकरांना!किती अनाथ मुलांना मी तुज्या पायात आणलं व सांभाळ केला."
घंटेचा आवाज वाढतच होता.तोच या विचारासरशी दुलबा खाडकन खाटेवर उठून बसला.त्याला अंधारातही एक आशेचा किरण दिसला.त्या सरशी दुलबानं तेथूनच विठ्ठलाचा आशिर्वाद घेतला व मनोमन काही पक्कं ठरवलं.त्यानंतर दुलबा निद्रादेवीच्या बाहुपाशात लीन झाला.
सकाळी दुलबानं किसनाबाला मंदिरात साऱ्या गावाला बोलवायला लावलं.किसनाबास कळेना की दुलबा काय करतोय.
सारी सोनेवाडी विठ्ठल मंदिरात जमा झाली.
"भावांनो आपणास ठाऊकच आहे माझी परिस्थती.मला माझी चिंता नाही.पण संता - जनीच्या या दोन कच्च्या बच्च्याची चिंता आहे.जाणारे जीव या दोन कोवळ्या पिलांना माझ्या फाटक्या झोळीत टाकून कोण देशी निघून गेली हे त्या जात्या जिवांनाच माहीत. माझं बाजी पोर राहिलं असतं तर मलाही घोर नसता पण आता...?"
"बा! काहो असं बोलता!आता धना बांधून देणार आहे ना पक्कं घर?" शांताईचा सेना काकुळतीनं विचारता झाला.
"घर!..पक्कं घर...!सेना डोक्यावरनं छत काढणारे सारीच घर देतात यावरचा माझा विश्वास आता उठला पोरा!"दुलबा भावशून्य हासू आणत सांगू लागला.
"भावांनो आजपर्यंत तुम्ही साऱ्यांनी या विठ्ठल मंदिरात राहणाऱ्या किती तरी अनाथ पोरांना घरचं अन्न वाढत पोसलं.तशीच माझ्यावर कृपा करा मी व माझी ही दोन्ही नातवंड आजपासून मंदिरात राहतो आम्हास वार लावून द्या व माझ्या या लेकरांना पदरात घ्या.....मी हात जोडतो..."
हे शब्द ऐकताच "दुलब्या अखेर या जिवाच्या मैतराला परकं केलंच ना?"किसनाबा अगतिकतेनं संतापत गदागदा रडू लागला.
दुलबाच्या डोळ्यात आसवं दाटल्यानं व ह्रदयात दु:खातिरेकानं त्याला कोणीच दिसेना.
"नाही किसना !पण तू ..मी किती दिवस जगणार? शिवाय या लेकरांना सख्ख्या काकानं धुतकारल्यावर तुझ्याकडनं मी कोणत्या अधिकारानं अपेक्षा करू? घर होतं म्हणून निदान त्या आशेनंच मी तुझ्या भरोशावर यांना मरणाच्या वाटेवरून परत आणलं होतं.पण आता घर ही गेलं.माझं ऐक त्यांना सारं गाव माधुकरी देईल.मंदिरात राहतील व शिकतील लेकरं गावच्या शाळेत"
"दुलब्या तुझी नातवंडं ती माझी नाहीत का?हे दोन जीव पोसण्याइतपत माझी ऐपत आहे रे!" किसनाबा कळवळून बोलू लागला.
"किसना ऐक माझं.मंदिरात राहतील सारं गाव पाहीन लेकराकडं ! शिवाय हे सारं तुझ्याच देखरेखीत ! मी हात जोडतो"
सारे लोक विष्षण्णतेनं दुलबाकडं पाहत होते.एक वेळ साऱ्या गावाला पोसण्याची धमक ठेवणारा आख्ख्या गावाचा दुलबा आज नातवासाठी लाचार होतांना पाहणं त्यांना क्लेशदायक वाटत होतं.दुलबानं किसनाबाला समज घालत पोरांच्या संरक्षणाची जबाबदारी साऱ्या गावानं घेतली म्हणजे रंजन हणम्या पासुन त्याचं संरक्षण होईल हे पटवून देत मनवलं.
साऱ्या गावकऱ्यांनी राजीखुशीनं दुलबास समजू न देता पोरांची सारी जबाबदारी उचलतांना दुलबाचा स्वाभिमान दुखावणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.
दुलबा ,बाला व सुमी त्याच दिवसापासून मंदिराच्या आवारात बांधलेल्या खोलीत मुक्कामाला आली.
दुलबानं नातवास देवाची आरतीची ,पुजेची तयारी कशी करावी ते शिकवायला सुरुवात केली.मंदिराची स्वच्छता कशी राखावी हे ही शिकवू लागला.पण दुपारी कमरेला पंचा गुंडाळत अंगावर उपरणं घेत थाळा घेण्यासाठी बालाला तयार करतांना दुलबा आभाळ टराटरा फाटावं तसा हंबरू लागला.आजपर्यंत आपण किती अनाथ मुलांना पोसलं व आज आपल्या या नातवावरच ताट धरत सोनेवाडीत थाळा मागण्यासाठी आपण पाठवावं यानं दुलबा कोलमडला.
"संता,जनी माफ करा रे पोरांनो या पापी बापास!तुमच्या लेकरांना मी नाही पोसू शकलो!"
बाला बाबाच्या डोळ्यातील आसवं पुसत ताट घेऊन तो मंदिराबाहेर पडू लागला. तोच असं काही होईल याची जाणीव असल्यानं मंदिराकडंच येणाऱ्या किसनाबानं बालाला त्या अवस्थेत पाहताच वर उचलत छातीला घट्ट आवळलं.
"दुलब्या फेडलीस ना तू तुझी हौस?या नादान लेकरास या अवस्थेत पाहतांना तुझ्या काळजाला भोकं कशी पडली नाहीत?" किसनाबा संताप करू लागला.
"किसना मी गेल्यानंतर त्याला केव्हाना केव्हा हे करावंच लागेल पोटासाठी!मग सवय तर व्हायला हवी ना?"
"बरं मग ठिक आहे!होऊ दे तुझ्या मनासारखं!".
किसनाबानं बालाच्या अंगावरील उपरणं आपल्या अंगावर घेत बालाच्या हातातील ताट एका हातात घेत सोनेवाडीत गेला.बालाला व किसनाबास पाहताच सारेलोक हळहळू लागले.
"माकडांनो आता कशाला हळहळता!काल कोणीच विरोध न करता तयार झाला ना?मग वाढा या बालास थाळा!हा तोच बाला,ज्याच्या आजोबानं पंढरीचं दैवत तुमच्या गावात आणलं.त्या दैवताच्या राऊळात कित्येक अनाथांना पोसलं! तुम्ही विसरला असाल पण मी नाही"
किसनाबाला संतापतांना पाहताच लोकांना आपली चूक कळली.त्या दिवसांपासून वेळेच्या आधी थाळे मंदिरात आपोआप पोहोचू लागले.
आठ दहा दिवसांत दुलबानं बाला व सुमीस सारी तयारी स्वत: करायला लावत मंदिराचं आटोपत शाळेत जाण्याची सवय लावली.जणू काही दुलबास भविष्याचे वेध अचूक समजले असावेत.
गावात पंधरा वीस दिवस होत नाही तोच सकाळी सकाळीच आरतीच्या वेळेस दुलबाच्या छातीत कळा येऊ लागल्या.दुलबा काय ते समजला.त्यानं लगेच किसनाबास बोलवायला लावलं.बाला व सुमी कालवा कालव करू लागली.
किसनाबा येताच दुलबाच्या छातीतल्या कळा अधिकच वाढल्या.
"किसन्या!माझ्या ना..त..वां..ना सांभांळा! आणि ..आणि.."

किसनाबानं परिस्थितीचं गांभिर्य ओळखलं.दुलबाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं.बाला व सुमीस जवळ बसवलं.
"दुलब्या...तुला काहीच होणार नाही...ऐक माझं"
"नाही किसन्या मी राहत नाही आता पण एक वचन दे. माझ्या चितेला अग्नीडाग बा.....जी.....बा..लालाच देवू दे.त्या धना अधमाची सावली पण नको...नी माझ्या लेकरांना बाजीकडं सोपव.येईल माझा बाजी!मरणाची बाजी जिंकूनही येईल तो!निदान माझ्यासाठी नाही पण या लेकरासाठी त्याला यावंच लागेल.....!"
"बाबा....बा..बा..."बाला व सुमी आजोबाला बिलगत हंबरडा फोडू लागली.
दुलबानं बाला व सुमीचा हात. किसनाकडं दिला नी....राऊळातल्या विठ्ठलाकडं एकटक पाहत मनातल्या मनात "याच साठी केला होता अट्टाहास,शेवटचा दिस गोड व्हा....वा.."म्हणत किसनाबाच्या मांडीवरची मान ढिलावली.
बाला सुमीला लोक बाजूला करू लागताच बाला सुमी जिवाच्या आकांतानं हंबरू लागली.तो कोवळा लाचार आकांत पाहून सोनेवाडीतल्या लोकांच्या आसवांचा पूर तापीत विसावला.
किसनाबानं आपल्या मैतरास छातीशी घटट लावत "बाजी दुश्मना माझ्या मित्रासाठी तरी ये रे!"म्हणत हंबरडा फोडला.सोनेवाडीत रडणारी हलगीचा आवाज जळगावात धनापर्यंत पोहोचण्याआधीच किसनाबानं सारी तयारी केली.पण तरी धापा टाकत धना , राधा आलीच.
धनानं रूमाल बांधून डोक्यावर घेत मडकं उचलण्यासाठी जाऊ लागताच किसनाबानं बालाला कडेवर घेत मडकं उचललं नी सजलेल्या माठातून दुलबा गावदरवाज्यातून बाहेर पडला...
धनानं पाणी व अग्नीडाग देण्यासाठी धूडघूस घातला पण किसनाबा व गावकऱ्यांनी त्याला धूतकारत बाला किसनाबा पाठोपाठ साऱ्या सोनेवाडीनं पाणी देत अग्नीडाग दिला.मविश्वतिर्थाजवळच असलेल्या मळ्यातील जुन्या आंब्याच्या झाड पावसाळी कुंद हवेतही जोर जोरानं वाऱ्यानं झिंझोळावं तसं झिंझोळतांना साऱ्या लोकांनी पाहिलं. ते पाहून किसनाबास बाजी पाठोपाठ संताची आठवण आली.तो रडतच मनात म्हणू लागला,
"संता-जनी लेकांनो!दुलबा गेला तरी या किसनाच्या कुडीत जीव आहे तो पर्यंत बाला व सुमीला सांभाळीन!"
आब्यांच्या झाडाची हालचाल मंदावली.

सारी सोनेवाडी जडावल्या अंत:करणानं माघारी परतली.
क्रमश:....
✒वासुदेव पाटील.