पाणेरी...-Marathi online Stories
काही दिवसांपूर्वी आमच्या भागात झालेल्या एका भीषण अपघातामुळे ह्या जागेबाबत माझ्या एक मित्राने मला सांगितलेला अनुभव आठवला. तो जसाच्या तसा त्याच्याच शब्दांत........साधारणतः ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे एक काका आणि काकू त्यांच्या गावाहून एक समारंभ आटोपून कारने त्यांच्या घरी म्हणजे पालघर येथे येत होते. त्यांच्या गावाहून पालघर साधारणतः १२ किलोमीटर असावे. त्यांचे गाव एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि पालघर ह्या दोघांच्या मध्ये येते, त्यांच्या गावाचा वडा खूप प्रसिद्ध असल्याने त्या गावचे नाव सांगायची गरज नाही. ही दोन्ही गावे निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे आहेत. नारळाच्या, पोफळीच्या मोठमोठ्या बागा असल्याने तेथे पार्टी, समारंभ इत्यादी करण्यासाठी बाहेरगावाहून लोक येत असतात परंतु बागांचे प्रमाण जास्त असल्याने पालघरला परत येई पर्यंत रस्त्यात अनेक ठिकाणी तुरळक घरांची वस्ती आहे. त्यादिवशी पौर्णिमा होती त्यामुळे टिपूस चांदणे पडले असल्याने जरी अंधार असला तरीही सर्वकाही स्पष्ट दिसत होते. त्यादिवशी समारंभ संपायला जरासा उशिरच झाला होता. गावाकडे सर्व लोक साधारणतः ८ वाजताच झोपी जातात आणि त्यात रात्रीचा १ म्हणजे तर कहरच झाला........रात्रीचा १ वाजून गेला होता सगळीकडे शांतता पसरली होती. घरातले नाही नाही म्हणत असताना पालघर तसे जवळच असल्याने काकाकाकू कोणाचेही न ऐकता आपल्या गाडीने पालघरच्या दीशेने यायला निघाले होते. आता त्यांचे गाव मागेपडून गावाच्या रस्त्याच्या शेवटच्या स्ट्रीट लाईट पण मागे पडल्या होत्या. सगळीकडे सामसूम होती आणि रस्त्यावर एखादा माणूस तर सोडाच पण चिटपाखरूही कुठे दिसत नव्हते. खराब रस्ता आणि रस्त्यावर मध्ये मध्ये स्ट्रीट लाईट चा अभाव ह्यामुळे गाडी खूपच मंदगतीने चालवावी लागत होती. त्यांच्या गावाची हद्द संपून आता पालघर ची हद्द सुरू झाली होती.
तेवढ्यात अचानक समोर दूरवर कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे असे काकूंना दिसले तसे त्या काकांना म्हणाल्या की ते बघा कोणीतरी गाडीला हात दाखवत आहे. गाडी जराशी अजून जवळ आली तेव्हा असे दिसले की रस्त्यावर बांधलेल्या एका मोरीच्या कठड्यावर उभी राहून एक नऊवारी सारखी साडी नेसलेली बाई जिच्या भांगेत मळवट भरला होता, गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होती. काकांना खूप आश्चर्य वाटले की इतक्या रात्री ही बाई इकडे कशी आली असेल, कारण त्या अंधारलेल्या आणि निर्जन स्थळी इतक्या रात्री एखादे माणूस भेटणे हे जरा अशक्यच वाटत होते........काकू सारख्या म्हणत होत्या की कोणीतरी अडली नाडलेली बाई दिसत आहे बघातरी तिला काय हवंय, गाडीत मागे बसायला जागा आहे, येत असेल तर घ्या तिला गाडीत, अशा निर्जन स्थळी बाई माणसाला एकटिला सोडने बरे नाही, काकूंची सारखी बडबड चालूच होती मात्र काकांच्या मनात सारख्या कुशंका येत होत्या की इतक्या निर्जन स्थळी जिथे आजूबाजूला ओसाड जमिनिशिवाय कोणीच, काहिच दिसत नाहीय, एखादे घर दिसत नाहीय अशा ठिकाणी ही बाई काय करत असावी, विचारांच्या तंद्रीत असतानाच काकांनी गाडीला ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यवस्तीत न लागल्याने गाडी त्या बाईच्या समोर न थांबता तिच्या जराशी पुढे जाऊन थांबली म्हणून काका गाडीला रिव्हर्स गियर टाकून गाडी मागे घेउ लागले इतक्यात त्यांचे लक्ष गाडीच्या साइड मिरर मध्ये गेले ज्यात ती बाई दिसत होती. तिला पाहून काही कळायच्या आतच गाडीच्या ब्रेक चा मोठा आवाज होऊन गाडी जागीच थांबली असता अनपेक्षितपणे आलेल्या ब्रेकच्या मोठ्या आवाजामुळे काकू पण भानावर आला आणि काय झाले म्हणून काकांना विचारू लागल्या, परंतु आता काका काहीच ऐकून घ्यायाच्या मनस्तीतीत नसल्याने त्यांनी परत गाडीचा पुढील गियर टाकला आणि गाडी टॉप स्पीड ला पळवायला सुरुवात केली. काकूंना काहीच समजले नाही की काकांनी असे का केले असावे परंतु काकांची अवस्था पाहून त्या जास्त काहीच बोलल्या नाहीत. .......काकांनी गाडी कशीबशी घरी आणली आणि बिछान्यावर अंग टाकले, काकूंनी घाबरून पाहिले तर काकांचे अंग खूपच गरम लागत होते म्हणून त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टर ला फोन करून त्वरित बोलावून घेतले असता काकांना १०३° ताप असल्याचे आढळून आले तसेच काकांची शुद्ध हरपली होती म्हणून त्यांना लगेच हॉस्पिटल ला हलवायचा सल्ला दिला. त्यानंतर ३ दिवस काका बेशुद्धावस्थेतच होते. ३ दिवसानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा स्वतःला हॉस्पिटल ला पाहून त्यांना खूपच बरे वाटले आणि त्यांनी संगीतले की गाडी रिव्हर्स घेत असताना अचानक माझी नजर गाडीच्या साईड मिरर मध्ये गेली असता मला असे दिसले की गाडी थांबवण्यासाठी हात करणाऱ्या बाईचे धडच नव्हते फक्त मुंडकेच दिसत होते, परंतु असे पाहिले तर मात्र पूर्ण शरीर दिसत होते. ते ऐकून काकूंच्याही पायाखालची जमीनच सरकल्या सारखी झाली आणि त्या मटकन खाली बसल्या. काही दिवसांनी काकांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला. बोलण्याच्या भरात ही गोष्ट मला समजली. ही गोष्ट घडण्यापूर्वी मला भुताखेतांवर अजिबातच विश्वास नव्हता. कोणी मला भूत दिसले असे सांगितले की मी त्या व्यक्तीची थट्टा मस्करी करत असे. काकांच्या बाबतीत घडलेला हा अनुभव ऐकून मला विश्वासच बसला नाही आणि मी काकांना म्हटले की तुम्हाला भास झाला असेल जगात भूत बित काही नसते. इतके होऊनही मी काकांवर विश्वास ठेवत नाही हे ऐकून ते खूप वैतागले आणि रागाच्या भरात मला म्हणाले की, तुला जर विश्वास नसेल तर तू स्वतः जाऊन खात्री करून घे. मग काय मी पण ते आव्हान स्वीकारले आणि त्यांना म्हटले की आता तुमच्या समोर त्या भुताला आणीन तेव्हाच परत येईन. थोड्यावेळाने काका भानावर आले आणि मला त्यांनी तिकडे न जाण्याचा सल्ला दिला परंतु मी काहीच न ऐकण्याच्या मानस्तीतीत असल्याने घरातून तडक बाहेर पडलो ते थेट माझ्या मित्राकडे आलो आणि त्याला पाणेरी ला माझ्यासोबत येण्यासाठी विचारले असता तो मला वेड्यात काढून म्हणाला की मला इतक्यात मरायचे नाही त्यामुळे मी तिकडे येणार नाही. शेवटी निराश होऊन मी तिकडे एकट्यानेच जाण्याचा निर्णय घेतला. .......
दोन दिवसानंतर अमावस्या होती. अमावास्येला भुते दिसतात अशा प्रकारच्या अफवा मी कोणा कोणा कडुन ऐकल्या होत्या. म्हणून त्याचदिवशी त्या जागेवर जाण्याचा निर्णय मी घेतला होता आणि त्याबाबतची तयारी केली होती. समजा मला काही झालेच तर इतक्या इतक्या वेळेला जर का माझा फोन नाही आला तर तुम्ही मला शोधत त्या जागेवर यायचे असे मी माझ्या एका मित्राला बजावले होते. त्यादिवशी रात्री मी १२ वाजण्याची वाट पहात होतो. परंतु त्या दिवशी वेळ जशीकाही पुढे सरकतच नव्हती. माझं लक्ष सारख सारख भिंतीवरच्या घड्याळाकडे जात होते. त्याजागेवर पोहीचायला १५ मिनिटे पुरेशी होती म्हणून मी बरोबर पावणेबाराला घरून निघणार होतो. वेळ जाता जात नव्हती म्हणून मी थोडावेळ डोळे बंद करून सोफ्यावर बसलो होतो. पाहता पाहता मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. त्यानंतर मला नीटसे आठवत नाही की मी कधी उठलो आणि गाडी घेऊन निघालो. रात्रीचे १२ वाजून गेले होते मी वाघूळसार च्या गणपती मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. तिथे पोहोचेपर्यंत काहीच वाटले नाही आणि आज गाडीपण एकदम मस्त चालत होती. थोड्याच वेळात मी त्या जागेवर येऊन पोहोचलो जिथे कोणाकोणाला भूत दिसले होते. आज मात्र त्या ठिकाणी निरव शांतता आणि गडद अंधाराशिवाय दुसरे काहीच जाणवत नव्हते. मी गाडीतून बाहेर उतरलो आणि त्या जागेवरील मोरीजवळ काहीवेळ येऊन उभा राहीलो, काहीवेळ आजूबाजूला फेरफटका मारला परंतु काहीच घडले नाही. जरी मला तिथे काही दिसेल असे वाटत नव्हते तरीही त्या ठिकाणच्या निरव आणि गूढ अशा शांततेमुळे मला मनातून जरास चरकल्यासारखं वाटत होतं आणि त्यामागे कारणही तसेच होते. ते कारण म्हणजे त्या जागेविषयी महिती काढत असताना मला माझ्या एका मित्राच्या मित्राने त्याला त्या जागेवर आलेला अनुभव कथन केला होता. तो असा होता की, एक दिवस तो त्या भागातून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रिक्षा भाडे घेऊन येत असताना मी आता जिकडे उभा होतो त्याच जागेवर एक बाई रस्त्याच्या एकदम मध्यभागी उभी राहून त्याच्या रिक्षाच्या आडवी होऊन रिक्षा थांबवण्यासाठी हातवारे करत होती. परंतु, त्यावेळी त्याला काहितरी संशय आल्याने त्याने रिक्षा न थांबवता जोरात पळवली असता, हा रिक्षा काही थांबवत नाही असे पाहून ती बाई आकाराने उंच उंच होऊ लागली, तरीही त्याने धीर धरून रिक्षा तिच्या बाजूने काढून जोरदार पळवली असता त्याला असे दिसले की ती बाई रिक्षाच्याच वेगाने त्यांच्या मागे मागे धावत येत होती.
परंतु सुदैवाने गणपतीच्या देवळाची हद्द आल्यामुळे तिने त्यांचा पिच्छा सोडला होता आणि जोरात हसून ती माघारी फिरली होती. त्यावेळचा तो प्रसंग कसा घडला असेल हे मनात येऊ लागल्याने मला जराशी भीती वाटू लागली होती परंतु इतकावेळ थांबूनपण काहीच न दिसल्याने शेवटी कंटाळून आणि लोकांच्या अफवांवर मनातून स्वतःशीच हसून आणि मनातली सर्व भीती झटकून मी परत गाडीकडे वळून गाडीचे दार उघडणार इतक्यातच मागून वाचवा वाचवा असा कोणीतरी स्त्रीचा घाबरलेला आवाज माझ्या कानावर पडला तसे मी चमकून मान मागे वळवुन पाहिले असता मला दिसले की एक साडी नेसलेली बाई माझ्याच दिशेने धावत धावत येत होती आणि काळ्या रंगाचे दोन मोठे कुत्रे तिचा पाठलाग करत, तिच्यावर भुंकत येत होते. कुत्रे जरा जास्तच खतरनाक वाटत असल्याने मलाही क्षणभर त्यांची भीती वाटून माझे पूर्ण लक्ष त्या कुत्र्यांकडेच लागले आणि म्हणून त्या स्त्रीकडे मी नीट न पाहता त्या कुत्र्यांना घाबरवण्यासाठी नेमके काय करावे ह्याचा विचार करत असतानाच अचानक मला जाणवले की त्या स्त्रीने कदाचित खूप घाबरल्यामुळे असावे, म्हणून मागून येऊन मला घट्ट मिठी मारली आणि झालेल्या त्या अनपेक्षित प्रकाराने क्षणभर गोंधळून जाऊन मला काहीच समजले नाही, मी पूर्णपणे ब्लॅंक झालो होतो तरीही स्वतःला सावरत त्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी एक मोठा दगड हातात घेण्याचे नाटक करू लागलो तसे ते कुत्रे पळून गेले. कुत्रे निघून गेले होते तरी त्या बाईचा स्पर्श मला पाठीला जाणवतच होता.
खरेतर मी खूपच गोंधळून गेलो होतो आणि एक स्त्रीने अशी मिठी मारल्याने मला किंचितशी लाज पण वाटत होती, तिच्या श्वासाची खालीवर होणारी लय स्पष्टपणे माझ्या कानांत घुमत होती, म्हणून मी शहारून तिच्याकडे न पाहताच गाडीच्या दरवाजा कडे पाहतच तिला म्हटले की अहो बाई ते कुत्रे केव्हाचेच निघून गेलेत आता घाबरण्याचे काहीच कारण नाही, त्यावर ती फक्तं हु! असे म्हणाली परंतु तिने माझी पाठ सोडली नाही, म्हणून मी तिच्याकडे परत न पाहताच परंतु गाडीचा दरवाजा उघडत तिला म्हणालो की तुम्ही राहता कुठे, हवे तर मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी, परंतु त्यावरही ती फक्त हु! असेच म्हणाली म्हणून शेवटी मी नाईलाजाने तिने मारलेली मागची मिठी सुटावी ह्या हेतूने तिला स्पर्श न करता माझ्याच अंगाला एक जोराचा झटका दिला तसा तिच्या हातांचा माझ्या अंगाला होणार स्पर्श मला जाणवेनासा झाल्याने तिची मिठी सुटली असावी असे वाटून मी तिच्याकडे वळून पाहिले असता तिकडे माझ्याशिवाय कोणीच नव्हते. मग ती श्वासांची लय, ते वाऱ्यावर उडणारे केस, तो आवाज, ते मागे लागलेले कुत्रे ते सर्व काय होते. ते सर्व आठवून मला असे वाटले की आजूबाजूचे सर्वकाही माझ्या अवतीभोवती फिरत होते आणि मी जमिनीवर कोसळलो होतो.
....कितीवेळ गेला असेल माहीत नाहीं पण कसल्यातरी आवाज आल्याने मला जाग आली, मी हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले तर मला असे दिसले की मी माझ्या घरीच सोफ्यावर बसलो होतो आणि मोठ्या आवाजात टीव्ही चालू होता, रात्रीचे पावणेबारा वाजून गेले होते आणि माझे अंग घामाने पूर्ण डबडबले होते. जरा भानावर आल्यावर मी स्वतःशीच म्हटले, म्हणजे, म्हणजे ते सर्व स्वप्न होते वा, मला हे कळल्यामुळे खूपच हायसे वाटले आणि स्वतःवरच हसायला आले कारण त्या सर्व विचारांमुळे माझ्या मनाने त्या सर्व गोष्टींचा देखावा माझ्यासमोर उभा केला होता. काही वेळाने मी ते स्वप्न विसरूनही गेलो. थोड्यावेळाने मी घड्याळ्याकडे पाहिले तेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले होते. ठरवल्याप्रमाणे मला बारा वाजयच्या आत त्या जागेवर जाऊन पोहोचायचे होते. म्हणून मी उठलो, सर्व सामान ब्याटरी इत्यादी बरोबर घेऊन कारने त्या जागेवर जाण्यासाठी निघालो. .......रात्रीचे १२ वाजून गेले होते मी वाघूळसार च्या गणपती मंदिरापर्यंत पोहोचलो होतो. तिथे पोहोचेपर्यंत काहीच वाटले नाही आणि आज गाडीपण एकदम मस्त चालत होती. थोड्याच वेळात मी त्या जागेवर येऊन पोहोचलो जिथे कोणाकोणाला भूत दिसले होते. आज मात्र त्या ठिकाणी निरव शांतता आणि गडद अंधाराशिवाय दुसरे काहीच जाणवत नव्हते. मी गाडीतून बाहेर उतरलो आणि त्या जागेवरील मोरीजवळ काहीवेळ येऊन उभा राहीलो, काहीवेळ आजूबाजूला फेरफटका मारला परंतु काहीच नाही. जरी काही दिसेल असे वाटत नव्हते तरीही त्या ठिकाणच्या निरव आणि गूढ अशा शांततेमुळे मला मनातून जरास चरकल्यासारखं वाटत होतं आणि त्यामागे कारणही तसेच होते. माझ्या एका मित्राच्या मित्राला त्याच जागेवर वाईट अनुभव आला होता. मी तो विचार मनातून काढून टाकला आणि काही घडते का ह्याची वाट पाहू लागलो. काही घडण्याची खूप वेळ वाट पाहिली परंतु इतकावेळ थांबूनपण काहीच न दिसल्याने शेवटी कंटाळून आणि लोकांच्या अफवांवर मनातून स्वतःशीच हसून आणि मनातली सर्व भीती झटकून मी परत गाडीकडे वळून गाडीचे दार उघडणार इतक्यातच मागून वाचवा वाचवा असा कोणीतरी स्त्रीचा घाबरलेला आवाज माझ्या कानावर पडला तसे मी चमकून मान मागे वळवुन पाहिले असता मला दिसले की एक साडी नेसलेली बाई माझ्याच दिशेने धावत धावत येत होती आणि काळ्या रंगाचे दोन मोठे कुत्रे तिचा पाठलाग करत असलेले मला दिसले, कुत्रे जरा जास्तच खतरनाक वाटत असल्याने मलाही क्षणभर त्यांची भीती वाटून माझे पूर्ण लक्ष त्या कुत्र्यांकडेच लागले आणि म्हणून त्या स्त्रीकडे मी नीट न पाहता त्या कुत्र्यांना घाबरण्यासाठी नेमके काय करावे ह्याचा विचार करत असतानाच अचानक मला जाणवले की त्या स्त्रीने घाबरून मागून येऊन मला घट्ट मिठी मारली होती. झालेल्या त्या अनपेक्षित प्रकाराने क्षणभर गोंधळून जाऊन मला काहीच समजले नाही, मी पूर्णपणे ब्लॅंक झालो होतो तरीही स्वतःला सावरत त्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी एक मोठा दगड हातात घेण्याचे नाटक करू लागलो तसे ते कुत्रे पळून गेले. कुत्रे निघून गेले होते तरी त्या बाईचा स्पर्श मला पाठीला जाणवतच होता. खरेतर मी खूपच गोंधळून गेलो होतो आणि एक स्त्रीने अशी मिठी मारल्याने मला किंचितशी लाज पण वाटत होती, तिच्या श्वासाची खालीवर होणारी लय स्पष्टपणे माझ्या कानांत घुमत होती, तिच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती म्हणून मी शहारून तिच्याकडे न पाहताच गाडीच्या दरवाजा कडे पाहतच तिला म्हटले की अहो बाई ते कुत्रे केव्हाचेच निघून गेलेत आता घाबरण्याचे काहीच कारण नाही, त्यावर ती फक्तं हु! असे म्हणाली परंतु तिने माझी पाठ सोडली नाही, म्हणून मी तिच्याकडे परत न पाहताच परंतु गाडीचा दरवाजा उघडत तिला म्हणालो की तुम्ही राहता कुठे, हवे तर मी सोडतो तुम्हाला घरी, परंतु त्यावरही ती फक्त हु! असेच म्हणाली. ......क्षणभर मला असे वाटले की हे सर्व आधीही माझ्याबाबतीत घडले आहे. पण कधी ते मला नीटसे आठवत नव्हते म्हणून शेवटी मी मेंदूवर जास्त ताण न देता नाईलाजाने तिने मारलेली मागची मिठी सुटावी ह्या हेतूने तिला स्पर्श न करता माझ्याच अंगाला एक जोराचा झटका दिला तसा तिच्या हातांचा माझ्या अंगाला होणार स्पर्श मला जाणवेनासा झाल्याने तिची मिठी सुटली असावी असे वाटून मी तिच्याकडे वळून पाहिले असता मला असे दिसले की एक नऊवारी साडी घातलेली, भांगेत मळवट भरलेली बाई माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे नीट निरखून पाहिले असता मला दिसले की तिच्या डोळ्यांच्या खोबणीत फक्त पांढरी बुब्बुळेच होती. त्या अनपेक्षित धक्क्याने तिला पाहून मी खूप घाबरलो, दोन पावले मागे सारलो, ते पाहून ती माझ्या दिशेने दोन पावले पुढे आली, मी परत मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु जसेकाही माझे पाय जखडले गेले होते त्यामुळे मी जागच्या जागी थिजलो होतो. ती एकदमच माझ्याजवळ आली, मला बिलगली, तिच्या अंगाला इक भयानक दर्प येत होता. ती एकदमच जवळ असल्याने आता तिच्या श्वासांच्या स्पदनांची लय मला स्पष्टपणे जाणवत होती आणि तिच्या हृदयाची धडधड आणि माझ्या हृदयाची धडधड एकरूप झाले आहेत असे मला वाटत होते. अचानक माझ्याकडे पाहून तिने तिचे तोंड उघडले असता मला त्यातिला अणुकूचीदार काळे काळे दात दिसून माझी बोबडीच वळली परंतु मी काहीच करू शकत न्हवतो, हळूहळू तिने तिचे तोंड माझ्या कानाजवळ आणले आणि विचत्र पुरुषी आवाजात मला म्हणाली, "ते स्वप्न होते परंतु हे स्वप्न नाही सत्य आहे, जगात भुते असतात". तिचा तो अवतार पाहून घाबरून मी माझे डोळे गच्च मिटून घेतले होते. अचानक कसल्यातरी आवाजाने मी भानावर आलो. पाहिले तर माझ्या फोन ची रिंग वाजत होती म्हणून मी फोन कडे पाहिले तर माझ्या आईचा फोन येऊन वाजून गेला होता. मी आजूबाजूला पाहिले परंतु निशब्द आणि गूढ अंधाराशिवाय तिकडे कोणीच नव्हते. परंतु भीतीमुळे मी काहीच विचार करायच्या मनस्थितीत राहिलो नव्हतो. त्याच विचारात मी गाडीत बसलो आणि आजूबाजूला काहीही न बघता जोराने गाडी घराकडे पळवू लागलो, गाडी गणपती मंदिराजवळ आली इतक्यात परत माझ्या कानावर तेच स्वर पडले की "हे स्वप्न नव्हते सत्य होते, जगात भुते असतात". त्या घटनेनंतर मला पूर्ण विश्वास पटला की जगात भुते असतात. कोणाला अनुभवायचे असेल तर आजही तुम्ही त्याजागेवर जाऊन पाहू शकता, तुम्हालाही त्या जागेचे नाव कायमचे लक्षात राहील "पाणेरी".धन्यवाद....