कथेच्या आधीच्या भागाची लिंक वर दिली आहे👆👆
कथा : #घुंगरु भाग ७ वा
लेखक : #अनुप_देशमाने
सीमा : आई पण रात्र किती झाली आहे, एवढ्या रात्री कसे जाईल ती....आणि तिला काय झालं तर कोण जबाबदार असणार, नको ही त्या वाड्यात जाणार नाहीच आणि हे घुंगरु आण हिकडे मी फेकून देते आताच्या आता.... म्हणत सीमा ने त्या घुंगराला हाथ लावला, हाथ लावताच क्षणी विजेच्या झटका बसून माणूस दूर लोटून पडावा अशी सीमा दूर फेकली गेली, सगळे आश्चर्य चकित झाले... सीमाला थोडं फार खरचटले गेले पण ती मात्र खूप घाबरली आता... ते घुंगरु स्मिता च्या हातात असून देखील तिला काही होत नाही हे पाहून ती देखील चकित झाली...
आजी : देवाने स्मिताला सगुणाच्या मुक्ती साठी पाठवले आहे आणि हे कार्य स्मिताने आताच्या आता पार पाडावे..??
स्मिता : आजी बोल आता मी काय करू तू जे बोलशील ते मी करते...
आजी : अंगावर लाल साडी घालून ये बाहेर लगेच....
तशी स्मिता आत गेली आणि थोड्या वेळाने लाल साडी घालून बाहेर आली...स्मिता : आता पुढे काय करू आजी...??
आजी : आता आहे ह्या साडी वर तू न्हानीत जाऊन डोक्यावरून अंघोळ करून ये....
सगळे कुतुहुलने आजीच्या बोलण्याकडे आणि स्मिता च्या कृती कडे बघू लागले....स्मिता न्हाणी मध्ये स्नान करू लागली..
आजी : विक्रांत देवघरात जाऊन कुंकवाचा करंडा घेऊन ये आणि ताटात पूर्ण कुंकू टाकून अंगणात ठेव...
स्मिता बाहेर आली, तिची साडी , तिचे केस, तिच अंग पूर्ण पणे ओलेचिंब होते... रात्रीची वेळ असल्यामुळे तिचे शरीर थंडीमुळे कुडकूडू लागले होते....
आजी : स्मिता बाळ, मला माफ कर पण हे तुलाच करावे लागणार आहे... तुला काही होणार नाही आई जगदंबा तुझ्या पाठीशी सदैव असेल... आता त्या ताटातील कुंकू घेऊन तुझ्या पूर्ण कपाळावर लावून घे....जशी स्मिताने कुंकूला हाथ लावला तसा वारा जोरात वाहू लागला, प्रचंड वेगात वारा वाहत असल्यामुळे, गावातील प्रत्येक मंदिरातील घंटा जोर जोरात वाजू लागल्या... झाडांच्या पानांचा आवाज वाढला... गावातील मोक्कार कुत्रे जोर जोरात भुंकू लागली.... भयंकर , काहीतरी निश्चित वाईट होनार आहे याची प्रचिती आता सर्वाना आली होती, गावातील गावकरी मंडळी देखील बाहेर आली, हे नेहमीच असे होत असल्यामुळे, काहींनी गोड तेलाचे दिवे घेऊन सगुणाबाई च्या वाड्या समोर ठेवू लागले, एक क्षणात सर्व गाव जागा झाला होता, देवाचा धावा करू लागला होता... पण काही केल्या वारा काही थांबेना गेला होता....हिकडं स्मिता ने आपले कपाळ पूर्ण कुंकूने माखून घेतले, आता ती एक जोड #घुंगरु स्वतःच्या पायात घालू लागली, जसा तिने पायात #घुंगरु चढविला तशी आकाशात जोराची वीज कडकडली, आजी उठली आणि वाड्याच्या बाहेर येऊन थांबली, सगळे आजीच्या सोबत बाहेर आले.... रात्रीचे 3 वाजत आले होते...
आज्जी : स्मिता बाळ...चल चालत त्या वाड्या कडे...!!
स्मिता चालत जाऊ लागली आणि घरचे बाकीचे तिच्या पाठीमाघे जाऊ लागले..
छम छम छम छम छम छम
घुंगरु वाजत होते, रात्रीच्या एवढ्या वातावरण मध्ये त्याचा आवाज आता मोठ्याने येऊ लागला होता..जशी स्मिता त्या वाड्याजवळ आली तशी गावातील काही लोकांनी सगुणाबाई आली म्हणून पळ काढला, तर काहीजण तशेच उभे राहिले... आता स्मिता वाड्याच्या अगदी समोर येऊन उभी राहिली होती...जशी स्मिता वाड्याच्या समोर येऊन उभी राहिली तसा वारा अचानक पणे शांत झाला, आता तेथे भयाण शांतता पसरली होती, जीव मुठीत घेऊन गावकरी सगळं बघत होते...
आजी : स्मिता पाय हलवून घुंगराचा आवाज दे...!!
तसे स्मिता ने एक पाय हलवून घुंगराचा आवाज केला...
छुम छुम छुम छमक छुम
बापरे तो स्मिता काय आवाज केला आणि वर्षानुवर्षे बंद असलेला सगुणाबाईच्या वाड्याचा दरवाजा धाडकण उघडला गेला....स्मिता घाबरली, गावातील आणि घरातील देखील घाबरले...
वाड्यातून आवाज आला.... "छुम छुम छन छनन छुम छुम छन छनन.."
स्मिता ने देखील तसाच आवाज काढून दुजोरा दिला...
"आत ये, तुझीच वाट बघतेय मी... कधी पासून डाव रंगत ठेवला आहे, जो आज पूर्ण करायचा आहे...ये आत"
बापरे कोण बोललं, केवढा मोठा आणि भयानक आवाज तो, ज्याच्या त्याच्या तोंडून हेच वाक्य कानी पडू लागले, स्मिता कसलाही विचार न करता तिने वाड्यात प्रवेश केला, वाड्यात स्मिता चा प्रवेश होताच, वाड्याचे द्वार बंद जोरात आदळून बंद झाले...
पुन्हा एकदा शांतता पसरली.... सगळ्यांचे डोळे आता त्या वाड्यावर खिळले होते... सीमा तर चक्कर येऊन पडली.....
काही वेळाने वाड्यातून, विना, तबला आणि घुंगराचा आवाज जोरात येऊ लागला... सगुणाबाई ची मैफिल पुन्हा चालू झाली होती...जोरजोरात ते आवाज ऐकू येऊ लागले होते...स्मिता काय करत असेल याचा एकच विचार गावातील आणि घरातील सगळी मंडळी करत होती....
पाटील....पाटील....माझ्या पोरीला तू जिवंत माझ्या समोर पुरले, माझ्यावर बळजबरी केली तू एवढं लक्षात ठेव मी अखंड सौभाग्यवती आहे जिवंत आणि मेल्यानंतर ही, माझ्या पोरीला उपाशी ठेवून मी तुझी मैफिल सजवली होती, माझी पोरगी तुझ्या डोळ्यात सलू लागली होती तर मला सांगायचं होत तू, तुझ्या मित्रांना सोबत घेऊन माझ्या मुलीच्या जीवावर उठलास, कोवळा जीव तिचा किती तरफडला असेल जेव्हा तू तिला जिवंत असताना पुरला... पण शेवटी काय झालं काय मिळालं तुला, शेती पैसा अडका गेला तुझा, गावातील एकजण तरी खुश झाले का...तुझा मित्र रामा अळ्या पडून मेला, त्यानेच माझ्या मुलीचा आवाज आवळला होता ना... अजून खूप जण आहेत गावात ज्यांचा हिशोब मला करायचा आहे त्याशिवाय मी हे गाव सोडून जाऊ शकत नाही....
सगळे गावातील लोक तो चित्र विचित्र आवाज ऐकून धावा धाव करू लागले... सीमा ला चक्कर अली होती म्हणून तिला तिला घरी घेऊन गेले होते.... फक्त आजी आता त्या वाड्याच्या बाहेर थांबली होती....
आजी : सगुना सोड आता हे सगळ... मुक्ती घे आता तू, तुझ्या घुंगराला स्पर्श करणारी व्यक्ती तुझ्या समोर आहे तिला नमन करून करून मुक्ती घे सगुना....
सगुना : तू आलीस, माझ्या मुळे तुला तुझ्यास नवऱ्याने मारले होते, वाईट वाटले होते मला, पण आताच मुक्ती नाही घेणार मी...
आजी : तू अखंड सौभाग्यवती आहेस सगुना एवढं माझं भाग्य नाही आता की मी तुला तुझ्या पुढ्यात येऊन तुला कुंकू लावेल, माझंच सौभाग्य मला सोडून गेले मी तुला कुंकू लावू शकत नाही...
आता आवाज शांत झाला, वाड्याचा दरवाजा उघडला गेला विस्कटलेल्या केसात, रांगत स्मिता बाहेर आली... तिची अवस्था बघून आजी थोडी घाबरली पण क्षणात स्वतःला सावरून तिने स्मिता ला स्मिता अशी हाक द्यायच्या ऐवजी सगुना... तुझ्या मुली सारखीच आहे ती तिला सोड तू.... तुला मुक्ती मिळण्यासाठी हाच एक मार्ग आहे तू नको त्रास देऊ तिला....स्मिता डोळे मोठे करून आणि जीभ बाहेर काढून बोलू लागली... "माझी मुक्ती होणारच नाही , नकोय मला मुक्ती मी हिला सोडणार नाही आता... हिने माझ्या घुंगराला स्पर्श केला आहे आता हिला माझ्या तालावर नाचावे लागणारच..."
(पुढील भाग हा कथेचा शेवटचा भाग असणार आहे त्यामुळे हा पार्ट येथेच थांबवत आहे, काही चुकल्यास क्षमस्व)
#अनुप_देशमाने