🔸भाग आठची लिंक 👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_29.html
🔸#मनोरूग्ण - भाग नऊ (अंतिम)🔸
सागरचे बोलणे ऐकून अनंत मुळापासून हादरला होता.. त्याची नजर समोर काही अंतरावरील फुटपाथवर झोपलेल्या गरीब माणसे आणी मुलांवर होती..इकडे त्याची कार आपोआप काही अंतर मागे सरकून एकदमच वेगाने फुटपाथच्या दिशेने वळली होती, अनियंत्रित कार वेगाने त्या झोपलेल्या लोकांकडे जात असताना अनंत भेदरलेल्या नजरेने समोर पाहत होता, त्याला आता पुढील भविष्य दिसू लागले होते..फक्त स्वताचा जीव पणाला लावायचा असता तर त्याने एवढा विचार केलाच नसता, पण येथे आठ ते दहा जीवांचा प्रश्न होता, त्यामुळे आता त्याच्यासमोर दूसरा कोणताही पर्याय उरलेलाच नव्हता..कार आता फुटपाथच्या वर चढण्याच्या मार्गावरच होती की,..🚘
"स्टॉप.! स्टॉप.! मला मंजूर आहे" अनंत डोळ्यांवर हात ठेवून मोठ्याने ओरडता क्षणीच टायर रोडवर घासल्याचा मोठा आवाज होऊन त्याची कार रोडवर घसरत फुटपाथला जाऊन टेकली..
टायरच्या घर्षणाचा मोठा आवाज झाल्याने अर्धवट पांघरूणे घेऊन झोपलेले लोक ताडकन उठून बसले, काहीजण घाबरल्याने उठून दूर पळून गेले.
"अबे ऐ, पिके गाडी चला रेला है क्या?"
झोपलेल्यांपैकी एकजण अंथरुणावरून उठून म्हणाला.. आणी अनंतने डोळे झाकून एक दीर्घ सुस्कारा सोडला.. त्याने त्याची कार थोडी रिव्हर्स घेऊन पुन्हा मुख्य मार्गाला लावली.
"आजवर प्रामाणिकपणे जपलेल्या तत्वांना, आणी वकीलीपेशा स्वीकारत असताना घेतलेल्या शपथेला तिलांजली देऊन मी तुझ्या सांगण्याप्रमाणे केस लढवण्यास तयार आहे सागर, पण माझी पण एक अट आहे.. यापूढे तु, संतोष आणी रेश्मा या तुझ्या गुन्हेगारांना सोडून एकाही तिसर्या निर्दोष व्यक्तीला त्रास द्यायचा नाहीस, असे मला वचन दे"
अनंत आता थोडी हिंमत दाखवून बोलत होता.
"तसा पण मी कंटाळून गेलोय विनाकारण लोकांना मारून आणी त्रास देऊन, त्यामध्ये आता मला पहिल्यासारखा आनंदपण मिळत नाहीये, तु खरं बोललास वकील, हा माझा मुळ स्वभाव नाहीये कदाचित.. पण तुला माझ्याबद्दल जे जे काही समजलेले आहे ना, ते तु फक्त तुझ्यापुरतेच मर्यादित ठेव. नाहीतर तुझी अवस्था संतोषपेक्षाही जास्त वाईट करील एवढे ध्यानात असुदे"
सागरने अनंतला धमकी दिली.😨
"आणी समजा संतोषने इतर कोणाला तुझ्याबद्दल सांगितले तर?"
"हा..हा.! बिनधास्त सांगू दे की, वेड्यावर कोण विश्वास ठेवणार?"
मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्ते ट्रँफिकमुक्त होते, त्यामुळे काही वेळातच अनंतची कार येरवड्याला आली, सागर जेलरोड वर उतरून जेलच्या दिशेने गेला आणी अनंत आपल्या घरी जाऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही केल्या त्याला आज झोप लागत नव्हती.
दूसर्या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान अनंत त्याच्या ऑफिस मध्ये गेला, शरीरामध्ये थकवा जाणवत होता आणी डोके दूखत होते..गणेश सोफ्यावर पेपर वाचत बसला होता, शमा वेगवेगळ्या फाईल्समध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्स लावण्यात व्यस्त होती, तर मोनाली बंद कॉम्प्युटर समोर मोबाईलमध्ये चँटिंग करण्यात मग्न होती, मोनालीकडे नेहमी दूर्लक्ष करणार्या अनंतला आज मात्र तीचा खूप राग आला..त्याने तिच्या जवळ जात तिचा मोबाईल खेचून घेतला आणी जोराने खाली फ्लोअर वर आदळला..
"पाहावे तेव्हा चँटिंग करत बसतेस, ऑफीस आहे का घर?? आं.!.तुझे काम कोण करणार येथे??"😡
अनंत मोठ्याने ओरडत होता..त्याचे हे वागणे मोनालीसाठी अनपेक्षित होते..ती डोळे वासून पाहू लागली.
"ओ..सर, माझे काम कसे करायचे ते मला समजते..येथे तुमची असिस्टंट म्हणुन काम करतेय मी, तुमची नोकर नाही, परवाच शहा सरांचा कॉल येऊन गेला, तुमच्यापेक्षा जास्त पेमेंट देणार आहेत ते..गरज नाही मला या जॉबची" मोनालीपण चिडली होती.
"शटअप..! अँण्ड गेटगाऊट नाऊ" अनंतने मोनालीला बाहेरचा रस्ता दाखवला..गणेश आणी शमा आ वासून त्यांचे भांडण पाहत होते..मोनाली झटक्यात जागेवरून ऊठली, टेबलवरची तिची पर्स उचलली..अनंतने खाली आदळल्याने डिस्प्ले फुटलेला तिचा मोबाईल घेतला आणी तरातरा ऑफीसच्या बाहेर निघून गेली.📱
"गण्या ! तु आणी शमा, दोघांनीपण फक्त एवढाच आठवडा ऑफीसला यायचं आणी नंतर दूसरा जॉब पाहायचा, कळलं का? काही गरज नाही मला कोणाची येथे" असे बोलून अनंत रागाने त्याच्या केबिनमध्ये शिरला आणी चेअरवर डोके गच्च धरून बसला..पाच दहा मिनीटानंतर जरा डोके शांत झाल्यानंतर त्याने मोबाईल काढून किल्लेदार सरांना कॉल लावला.
"हँलो सर..काल रात्री मी तुमच्या बोलण्यावर खूप विचार केला, संतोषच्या केसची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज पुन्हा तुमच्या बंगल्यावर भेटायला येत आहे..पण सर, ही माझी शेवटचीच केस असेल, या केसनंतर मी वकीलीपेशा सोडत आहे"
अनंतचे बोलणे ऐकून किल्लेदारांचा चेहरा उजळला.
"जशी तुझी ईच्छा, मग पुढे काय प्लँनिंग आहे"
"इतक्यात काही ठरवले नाही..पण येथे राहिल असे वाटत नाहीये मला"
"ओके , फॉरेन कंट्रीमध्ये कुठे शिफ्ट व्हायचे असेल तुला तर सांग, मी तुझी मदत करू शकतो"🛩️
" नंतर विचार करून सांगतो सर"
एवढे बोलून अनंतने फोन कट केला, त्यानंतर त्याने स्वतः दिवसभर खपून आणी शमाची थोडीफार मदत घेऊन संतोषची केसफाईल तयार केली, रात्री किल्लेदारांची भेट घेऊन केसची पुढील दिशा आणी पुरावे कसे गोळा करायचे यावर डिस्कशन केले..पुढील दोन तीन दिवसातच केससाठी लागणारे पुरावे आणी डॉक्युमेंट्स गोळा करुन फाईलला जोडले आणी शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल केले..
त्यांतरच्या महिनाभरात कोर्टाच्या चार तारखा झाल्या,
संतोष हा मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याचा हॉस्पिटलकडुन चेंज केलेला रिपोर्ट अनंतने कोर्टात दाखल केला, तसेच त्याला फाशी देण्यात येऊ नये यासाठी जोरदार युक्तीवाद पण केला.
२० फेब्रुवारी २०१२.⏲️
शिवाजीनगर हायकोर्टात आज अकरा वाजता कोर्टाच्या अंतिम निकालाची तारिख होती..काळा कोट चढवलेला अँड. अनंत त्याचा शेवटचा युक्तिवाद संपवून खाली बसलेला असतो..आरोपी संतोष एका बाजूला कटघर्यात मुकाटपणे ऊभा असतो.. न्यायमुर्ती सावंत सरांनी टेबलवरचा चष्मा डोळ्यांवर चढवला आणी सुमारे दहा मिनीटे सर्व निकालपत्र पुन्हा एकदा डोळ्याखालून घातले.. समोर कुजबूज करणार्या लोकांना शांत बसवून कोर्टाचा अंतिम निकाल सुनावला..
"आरोपी संतोष हा मानसिक रुग्ण असल्याचे मेडीकल रिपोर्ट, आणी सादर केलेल्या इतर पुराव्यांवरुन सिद्ध होत आहे.. त्याचबरोबर बस अपघाताची घटना अत्यंत दूर्दैवी आणी दुर्मीळ प्रकारातील गुन्हा असला तरीही हा गुन्हा आरोपीने जाणीवपूर्वक केलेला नसल्याने त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असा अँड. अनंत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात येत आहे..त्यामुळे न्यायालय आरोपी संतोषला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. त्याचबरोबर त्याच्यावरील मानसिक उपचारासाठी त्याची रवानगी येरवडा मेंटल हॉस्पीटल आणी जेलमध्ये करण्यात यावी असा निर्णय न्यायालय देत आहे.. आरोपीची मानसिक स्थिती सुधारल्यानंतरच पुढे कोर्टाचे कामकाज चालवून शिक्षेत बदल करण्या संदर्भात सुनावणी केली जाईल..कोर्टाचे आजचे कामकाज येथेच थांबवण्यात येत आहे"🔨
अनंत यांनी मांडलेले सर्व मुद्दे न्यायालयाने मान्य केल्याने इतर सहकारी वकील त्याचे अभिनंदन करू लागले, पण आज पहिल्यांदाच केसचा निकाल लागल्यानंतर अनंत कोणाच्याही नजरेला नजर मिळवू शकत नव्हता..अगदी कटघरात मुकाट्याने उभ्या असणार्या आरोपी संतोषच्याही..
अनंतने न्यायालयाच्या आवाराच्या बाहेर पडुन अंगावरील काळा कोट उतरवला आणी त्याच्या कारमध्ये जाऊन बसला, शेजारील सिटवर त्याची डायरी पडलेली दिसत होती,📒 ज्यामध्ये त्याने संतोषच्या केससंदर्भातील सर्व बारिक सारिक डिटेल्स लिहलेले होते, त्याने एकक्षण डायरीकडे पाहिले आणी दूसर्याक्षणी ती डायरी उचलून कारच्या खिडकीतुन बाहेर कचराकुंडीत फेकून दिली.
▪️▪️▪️▪️▪️▪️
संध्याकाळी सहाच्या सुमारास येरवडा मेंटल हॉस्पीटलच्या संलग्न असणार्या जेलचा लोखंडी दरवाजा उघडण्यात आला, हातामध्ये लोखंडी बेड्या घातलेल्या संतोषला दोन्ही बाजूंनी दोन पोलीस हवालदारांनी दंडाला धरून आतमध्ये आणले, त्यांच्यामागोमाग इन्स्पेक्टर घोरपडे आणी जेल निरीक्षक मोरेसाहेब चालत येत होते.
"मोर्या..हे तुझं गिराहिक , गेले दोन महिने मी सांभाळलयं, आणी आता आजपासुन तुझ्या ताब्यात देतोय, आता तो आणी तु, हितून पुढ तुमचं काय ते बघून घ्या" मोठ्याने हास्यविनोद करत घोरपडे संतोषचा ताबा मोरेंकडे देत होते..
"आधीच हित माझ्या डोक्याला ताप कमी हाये का घोरपडे..म्हणुन नवनवीन गिराईक मला आणुन देतोस तु?" मोरे घोरपडेला म्हणाले.
संतोषच्या कानावर मागील दोन पोलीस अधिकार्यांमधला संवाद पडत होता आणी त्याची नजर त्या अरूंद बोळाच्या दोन्ही बाजूला असणार्या मजबुत लोखंडी सळ्यांचे दरवाजे बसवलेल्या दगडी खोल्यांवरून फिरत होती.. खोल्यांच्या आतमधील मनोरुग्ण कैद्यांवर फिरत होती..आतमधील काही कैदी उत्सुकतेने आलेल्या नवीन पाहुण्याकडे पाहत होते तर काहीजण पाहून चित्रविचित्र हावभाव करत होते..काहीजण स्वताशीच बोलताना दिसत होते तर काहीजण विनाकारण हसत रडत होते.. अशा वातावरणात तर वेडा नसणारा सामान्य मनुष्यही काही दिवसांमध्ये खरोखर वेडा होईल हे मात्र संतोषला बरोबर जाणवले होते.😟
थोडावेळ चालल्यानंतर एका बंद लॉकअपचे कुलूप मोरेंनी उघडले, नंतर दोन हवालदारांनी संतोषच्या हातातील हातकडी खोलून काढून घेतली आणी त्याला त्या अंधार्या खोलीमध्ये ढकलून दिले. लोखंडी सळ्यांचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. थोडावेळ तिथेच थांबून आलेले सर्वजण हळूहळू बाहेर निघून गेले..
आता एकट्याच राहिलेल्या संतोषची नजर त्या रिकाम्या खोलीमध्ये सैरभैर फिरू लागली..त्या खोलीच्या एका अंधार्या कोपर्यामध्ये संतोषची नजर जाताक्षणीच त्याचे सर्वांग भितीने शहारले..त्या बंद दगडी खोलीत तो एकटाच नव्हता तर अजून कोणीतरी होते..विद्रुप, जळालेल्या चेहर्याचे... त्या अंधारात त्याचे भितीदायक लालभडक डोळे आणी चमकदार पांढरे दातच तेवढे चमकताना दिसत होते..😵
#समाप्त..
🗿📕🚗🖊️🚘🚬
(सदर कथानक काल्पनिक व मनोरंजनात्मक असून कथेमध्ये कोणत्याही दूर्घटनेचे किंवा आरोपीचे समर्थन केलेले नाही)
© लेखक - Dnyanesh W.