https://marathighoststories.blogspot.com/2019/10/blog-post.html
आधीच्या भागाची लिंक वर आहे👆👆
लेखक : #अनुप_देशमाने
सीमा स्मिता सोबत झोपली खरी पण स्मिता चे शरीर थर थर करत होते, काहीतरी विपरीत घडले आहे याचे प्रचिती आता सीमा ला आली, आईच काळीज शेवटी तिचे, तिने स्मिताच्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि तिला बोलली...
सीमा : बाळा काय झाले एवढी का घाबरली तू...??
स्मिता : ती सगुणाबाई आलीय आपल्या वाड्यात..!!
सीमा : कोण सगुणाबाई बाळा..??
स्मिता : आग तीच ती त्या वाड्यातील...!!
सीमा : सांग तरी मला कोणता वाडा आणि कोण सगुणाबाई..??
स्मिता आता झोपी गेली होती... ती निरुत्तर झाली होती...पोरगी झोपली म्हणून सीमा पण झोपण्याच्या तयारीला लागली...
"छुम छुम छाम छमक"
घुंगराचा आवाज आला म्हणून सीमा उठली, तसा आवाज कमी झाला, कोणाच्यातरी पैंजनाचा आवाज आला असेल म्हणून सीमा परत झोपी लागू लागली, पण परत तोच आवाज आला आणि तो ही खूप जवळ... सीमा उठली इतरत्र शोधू लागली पण आवाज नेमका कुठून येत आहे हे तिला कळेना म्हणून तिने उठून खोलीतील लाईट लावली आणि शोधू लागली... तिने हळूच स्मिता ला हलवून उठवले आणि बोलली स्मिता तुला आवाज आला का ग घुंगराचा.... स्मिता झोपेतच, "आई झोप ती सगुणाबाई च्या घुंगराचा आवाज आहे"
सीमा भलतीच घाबरली, तिला दरदरून घाम फुटला.. हा तिला आलेला पहिलाच अनुभव होता, ती स्मिता जवळ जाऊन परत झोपी गेली, आता बॅग मधून घुंगराचा आवाज येत आहे हे तिच्या लक्षात आले... घाबरत का होईना सीमा ने उठून पाहिले असता, स्मिता ची बॅग हलत होती, बॅग मध्ये काहीतरी आहे ज्याला बाहेर यायचे आहे हे तिच्या निदर्शनास आले, पण घुंगराचा आवाज का येतोय बॅग मधून हे काही तिला कळेना, तिने स्मिता ला आता जोरात हलवून उठवले, घरातील इतर लोकांना देखील सीमा ने आवाज दिला, सगळे आता त्या खोलीत येऊन थांबले,
स्मिता ला कळले आता, की तिने जे काही केले ते आता सर्वना कळणार, पण ती काही बोलली नाही, समीर आणि स्मिता एक मेकांना चिटकून उभारले होते, विक्रांत देखील चक्रावून गेला, की घुंगराचा आवाज बॅग मधून कसा येत आहे, सगळे त्या बॅग कडे बघत बसले, आणि ती बॅग एखाद्या माणसाचा जीव जात असताना जशी तरफड असते तशी ती बॅग हलू दुलु लागली, घरातील गोंधळ ऐकून आजी त्या खोलीत आली, तीने पाहिले आणि तिचे डोळेच पांढरे झाले,
आजी : "हे सगुणाबाई चेच घुंगरु आहेत"
विक्रांत : " आई गप उगी, सारख तुझं हेच चाललेलं असते, एखादी मांजर गेली असेल बॅग मध्ये आणि स्मिता च्या पैंजण असेल बॅग मध्ये त्याचा आवाज येत आहे"
आजी : " शांत रहा सगळे...!!"
सर्वाना शांत करून आजी बॅग जवळ गेली आणि खाली बसली....
आजी : "सगुना, ये सगुना ... किती तरफड करशील ग, घे ग मुक्ती आता, किती त्रास करून घेणार आहेस तू, आठवत तुला नवरात्री असताना तू माझ्या घरी आलेली हळदी कुंकू ला, तेव्हा आमच्या ह्यांनी मला किती मारले होते तुझ्या समोर आठवत ना, एवढ मारून देखील मी तुला हळदी कुंकू लावले होते ना, कारण तू अशी स्त्री होती की जी अखंड सौभाग्यवती होती, लोक तुला वाईट नजरेने बघत होते पण माझ्या मनात तुझ्या बद्दल कधीच तिरस्कार नव्हता...."
आजी बोलत असताना बॅग शांत पडली होती, आवाज कमी झाला होता, एवढ्यात एक काळी सावलीने खोलीत प्रवेश केला, सगळे घाबरले आजी सोडून...ती सावली येऊन आजी समोर थांबली,
आजी : " सगुना बैस खाली, मला सांग ह्या पोरीच्या बॅग मध्ये कसे तुझे घुंगरु"
प्रचंड प्रमाणात हृदयाचे ठोके वाढावे असा काहीसा आवाज आला, सगळे घाबरले त्यातल्या त्यात स्मिता तर रडू लागली, तिला कळून चुकले की आपण खूप मोठी चूक केली....
आजीने बॅग उघडली, बॅग मधून लाल मलमल च्या कपड्यात असलेले घुंगरु सर्वांच्या निदर्शनास आणले, तशी सावली गायब झाली... आजी : "हे घ्या ही आहेत सगुणाबाई चे घुंगरु, पण एक जोड आहे आता हे कोणी आणि कसे येथे आले हे कळेना कारण हे खूप भयंकर आहे, ज्यांनी कोणी केले असेल त्याला खूप मोठी क्षिक्षा होणार"
अभि : स्मिता बाळा तुझ्या बॅग मध्ये कसे आले हे, सांगशील का
स्मिता : मला नाही माहिती बाबा..!!
सीमा : खोटे नको बोलू बाळा, मघाशी तूच नाव घेतले झोपेत की ते सगुणाबाई चे घुंगरु आहेत...!!
स्मिता : मला काही नाही आठवत मी काय बोलले ते...!!
समीर : मी सांगतो सगळे..!!
आजी : समीर गप बस काही नको बोलू..? सगळे झोपा आता उद्या बोलू आपण सगळे न्याहरी च्या वेळी..!!
अभि : पण आई समीर सांगतो बोलला ना आपल्याला सगळं.. मग सांगू दे ना ..??
आजी : तुला मराठी कळत नसेल तर बाहेर जाऊन झोप, अजूनही मी जिवंत आहे माझं ऐकायचं नसेल तर बाहेर झोप कळलं ..??
सगळे आजीच्या आवाजाने शांत झाले आणि निमूटपणे आपल्या आपल्या रूम कडे जाऊ लागले, तेवढ्यात आजीने समीर ला हाक मारली आणि त्याला आपल्या रूम मध्ये झोपण्यास बोलवलं....
आजी : समीर... मला सांग आता काय झालं होतं ते..??
समीर : काही नाही आजी उद्या बघू या..!!
आजी : मला सांग नाहीतर खूप विपरीत होईल बाळा..!!
समीर : आजी...??? आम्ही त्या वाड्यात गेलो होतो...!!
आजी : काय सांगतोस...पुढे..??
समीर : त्या वाड्यातील एका रूम मधील असलेले घुंगरु स्मिता ने आणले, त्यावेळेस टफी खूप भुंकत होता, तरी पण तिने हे आणले घरी आणि तिच्या बॅग मध्ये ठेवले.... आणि त्याच दिवशी टफी पण गेला...!!
आजी : काय बघितले त्या वाड्यात..??
समीर : त्या वाड्यात असलेली सुबक पेंटिंग पाहिली आणि त्याचे फोटो देखील काढले आहेत स्मिता ने..!!
आजी : अरे बापरे... समीर झोप तू आता लवकर आणि कोणी उठवलं तरी उठू नकोस जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत...!!
सगळे शांत झोपले होते... त्या बॅग मधील घुंगरु हालचाल करत होते...सकाळ झाली, सगळे न्याहरी साठी एकत्र जमा झाले.....
विक्रांत : आई सांग आता सगळे जमा झाले आहेत...
आजी : स्मिता तू जे घुंगरु त्या वाड्यातुन आणले आहे ना तेच घुंगरु घालून तुला त्या वाड्यात जावे लागणार नाहीतर तुला हा त्रास तुझ्या घरी देखील होणार आहे.... सगुणाबाई ला आवडत नव्हतं तिच्या घुंगराला कोणी हाथ लावलेले... आणि तू चक्क तिचे घुंगरु पळवून आणले आहेस...
स्मिता : आजी बरोबर आहे कारण जेव्हा मी घुंगरु आणत होते तेव्हा त्या वाड्यात एक विद्रुप आकाराची आकृती मला दिसली होती....
आजी: तीच आहे सगुना, तिला आता मुक्ती हवी आहे... त्यासाठी स्मिता तुला हे कार्य करावे लागणार...!!
सीमा : आई काहीही काय बोलत आहात, कोण सगुणाबाई आणि त्या वाड्यात स्मिता ने घुंगरु घालून का जायचं ..??
आजी : सुनबाई जमत असेल तर कराच, कारण स्मिता च्या आयुष्याच्या प्रश्न आहे..??
सगळे होकार दिले, पण स्मिता काही केल्या हो बोलना।....
शेवटी कशी बशी हो बोलली ... आणि त्याच रात्री तिने जायचं ठवरल....
क्रमशः
घुंगरु भाग ६ व्वा....
घुंगरु भाग ६ व्वा....