🔹भाग दोनची लिंक👆👆👆
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच दिपकचा निरोप घेऊन मी त्या लॉकअपच्या बाहेर पडलो..
पोलीसांनी एका कागदावर माझा जबाब नोंदवून घेतला..तसेच पुर्ण नाव,पत्ता, नंबर लिहून घेऊन मला सोडून दिले..
पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर मी थेट घरी गेलो..काल रात्री घरी न आल्याने आई काळजी करत होती..तिला मी कालचा सर्व घटनाक्रम सांगितला..आईपण माझ्यावर थोडी रागावली.
“अरे रोह्या..हे आंदोलन वगैरे आपले काम आहे का?” तिने मला खडसावले.🙁

काल रात्रीचा थकवा जाणवत असल्याने चांगली दूपारपर्यंत झोप घेतली..आणी दूपारनंतर अंघोळ, जेवण वगैरे उरकून बँग अडकवून घराबाहेर पडलो आणी रिक्षाला हात करून दिपकने सांगितलेल्या पत्याप्रमाणे त्याच्या घराकडे निघालो..दिपकची रागावलेली पत्नी सुनैनाची समजूत काढण्याची जबाबदारी आता माझ्यावर होती..
एक लांबलचक गल्ली होती ती..रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एक-दोन मजल्यांचे छोटी छोटी घरे होती.. मी पत्ता विचारत विचारत थोड्यावेळाने अखेर दिपकच्या घराजवळ पोहोचलो...इतर घरांच्या रांगेत वन रूम किचन टाईप दोन खोल्यांचे एक दिपकचेही घर होते..बंद दारासमोर येऊन बेल वाजवताच आतुन सुनैनाने दार उघडले.

सामान्य मध्यमवर्गीय घरातील तरुण स्रीसारखीच दिसत होती ती, सुंदर आणी टापटीप...लाल रंगाची फुलांची नक्षी असलेली साडी नेसलेली होती.. व्यवस्थित विंचरलेल्या काळ्या केसांची लांब वेणी तिच्या चेहर्याला शोभणारी होती..दागिना म्हणून गळ्यात फक्त तेवढे एक मंगळसूत्रच दिसत होते..मला समोर पाहताच तिच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटले.👩
“नमस्कार..मी रोहन..तुमच्याकडे थोडेसे काम होते”
मी माझी ओळख सांगितली.
तिने मला घरात घेतले..खुर्चीवर बसल्यानंतर पिण्यासाठी पाणी आणुन दिले आणी येण्याचे कारण विचारले, त्यावर मी तिला काल जेलमध्ये घडलेला सर्व प्रसंग सांगण्यास सुरुवात केली..
ती माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती..बेजबाबदार आणी उथळ स्वभावाच्या दिपकपेक्षा सुनैना हि मला अधिक समजुतदार आणी संसारीक वाटत होती.

माझे बोलणे संपल्यानंतर अचानक तिच्या डोळ्यातून अश्रुंची धार सुरू झाली..
“सगळी चूक माझीच आहे हो..मीच त्यांना समजून घेऊ शकले नाही..रागाच्या भरात नाही नाही ते बोलून गेले..अशा संकटाच्या वेळी दूसरे कोणी दिली नाही तरी कमीतकमी मी तरी त्यांना साथ द्यायला हवी होती..मी साथ दिली असती तर कदाचित दिपक हे जग सोडून गेले नसते”😫

तिचे शेवटचे वाक्य ऐकून माझ्या छातीत धस्स झाले आणी हातातील पाण्याचा पेला खाली पडला..
“म्हणजे?...दिपक आता या जगात नाही?” मी आश्चर्यचकित होऊन विचारले.

“नाही..दोन महिन्यांपुर्वीच निराशेच्या भरात त्यांनी त्या कोठडीमध्ये स्वताला फाशी लावून आत्महत्या केली होती..पण त्यांचा आत्मा आजही त्या कोठडीतच असावा..म्हणुनच काल तुम्हाला ते दिसले होते आणी तुमच्यासोबत बोललेही होते”
हुंदके देत देत आणी पदराने डोळे पुसत सुनैना बोलत होती..
मला पुढे काय बोलावे हे समजतच नव्हते म्हणुन मी तिचे थोडेसे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणी त्या घराबाहेर आलो..
गल्लीतून चालत बाहेर पडुन रस्त्याला लागल्यावर एका रिक्षावाल्याला आवाज दिला.🚕

घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती..पण त्या रात्री मला लवकर झोपच लागत नव्हती..सारखे दिपकचे बोलणे आठवत होते.. आणी सोबतच सुनैनाचा दुखी चेहरापण..मला त्या काळकोठडीमध्ये भेटलेला दिपक हा जिवंत नसून त्याचा आत्मा होता हे आठवल्यानंतर मनात भितीपण दाटून येत होती.
दूसर्या दिवशी सकाळी सर्व आवराआवर करून ऑफिसला जायला निघालोच होतो कि आईने आवाज दिला,
“अरे काल देशपांडे तात्या येऊन गेले आपल्या घरी..तुझ्यासाठी एक स्थळ आणले आहे त्यांनी..मुलगी बी-कॉम शिकलेली असून जॉबला आहे सांगत होते..हे बघ फोटोपण देऊन गेलेत.

आईने हातात दिलेल्या फोटोवर मी एक नजर टाकली..
तशी बरी होती ती मुलगी..👸
पण होकार देण्याची ईच्छा झाली नाही.
तशी बरी होती ती मुलगी..👸
पण होकार देण्याची ईच्छा झाली नाही.
“नाही ग आई..पुढील दोन तीन महिनेतरी मी लग्नासाठी मुलगी पाहणार नाही..त्यानंतरच ठरवेल मी लग्न जमवण्याचे..देशपांडे तात्यांना पण सांगुन दे”
“बघ बाबा तुझी मर्जी..पण यावर्षीतरी उरकून टाक..तूझेही वय वाढत चाललेय आणी मलाही आता वयोमानानुसार जास्त काम जमत नाही”
आई तर मागेच लागली होती..पण मी तिला कसेबसे टाळत घराबाहेर पडलो आणी ‘लोकदर्पण’ च्या ऑफिसला आलो..

आमचे लोकदर्पण हे साप्ताहिक दर आठवड्याच्या गुरूवारी प्रकाशित होत असते..साप्ताहिकाला कोणत्या विशिष्ट विषयाचे किंवा वाचकवर्गाचे बंधन नव्हते..समाजातील सर्व स्तरातील अनेक लोक त्याचे नियमित वाचक होते.📰
ऑफिसमधील माझ्या केबिनमध्ये बसून मी दिपकच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावर एक सविस्तर, अभ्यासपुर्ण मोठा लेख लिहून तो येणार्या गुरुवारच्या अंकात छापण्याचा मी विचार करू लागलो..

दिपक हा जरी व्यसनी असला तरी मनाने फारसा वाईट नव्हता हे त्याच्यासोबत झालेल्या चर्चेतून मला उमगले होते..त्याचबरोबर त्याला मुद्दामहून रेप केसमध्ये अडकवणार्या टोळीने आजवर समाजातील अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले असावे आणी पुढेही करण्याची शक्यता होती...त्यामुळे त्यांनाही कुठेतरी आळा बसणे आवश्यक होताच..आणी त्यासाठीच दिपक आणी त्याच्या अनूभवावर आधारित एक सविस्तर व परिणामकारक लेख छापणे आवश्यक होते.
पण सदर लेख सत्य घटनेवर आधारित असल्याने तसेच जाग्रुत वाचकवर्गातून त्या लेखासंबंधी मला अनेक प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असल्याने दिपकच्या केसची संपुर्ण माहिती मिळवणे माझ्यासाठी गरजेचे होते..आणी ती महिती मला फक्त पोलीसच देऊ शकत होते त्यामुळे आज मी ऑफिसमधून सायंकाळच्या आधी वेळेपेक्षा लवकर बाहेर पडून पोलीस स्टेशनचा रस्ता पकडला.🚶

आजचे पोलीस स्टेशनमधील वातावरण परवाच्या मानाने खुपच वेगळे होते..आज सर्वकाही सुरूळीत चालू होते..’इन्सपेक्टर भोसले’ पण कोणासोबत तरी हास्यविनोद करून मोठ्याने हसत असलेले मला दिसले..मला दरवाजात उभा पाहताच त्यांनी खणखणीत आवाजात म्हणले,
“ अरे शास्री.. या बसा..आज न बोलवता कसे काय येणे केले?”

“आज जरा निवांत दिसताय साहेब”मी आत येऊन त्यांच्यासमोरच्या खुर्चीवर बसता बसता म्हणालो.
“गण्या..दोन स्पेशल चहा सांग रे..” ☕️☕️
भोसलेंनी कोणालातरी ऑर्डर दिली..त्या दिवशीचे भोसले आणी आजचे भोसले यामध्ये मला खुप अंतर दिसून येत होते..कदाचित त्यादिवशी मी आरोपी म्हणुन आलो होतो आणी आज एक सामान्य नागरिक म्हणुन हा फरक दिसत असावा..
त्यानंतर मी इ. भोसलेंना दिपकच्या आणी माझ्या भेटीबद्दल तसेच दिपकने सांगितलेला सर्व प्रसंग सविस्तर सांगितला..हे सर्व ऐकून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

“दोन महिन्यापुर्वी दिपक नावाच्या एका कैद्याने त्या शेवटच्या आठ नंबर लॉकअपमध्ये आत्महत्या केली होती हे खरे आहे.
पण आजवर तुझ्यासारखा अनुभव तेथे कोणाला आलेला नाही..तसेच आमच्या रेकॉर्ड प्रमाणे त्या रात्री त्या लॉकअपमध्ये तू एकटाच होतास त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवण्याशिवायही आमच्याकडे दूसरा पर्याय पण नाही” इ. भोसलेंनी माझ्यावर विश्वास दाखवला होता.

“कदाचित दिपकचा आत्मा त्याला न्याय मिळण्याच्या अपेक्षेनेच अजूनही त्या लॉकअपमध्ये घुटमळत असला पाहिजे”🚹
आमच्या शेजारी उभ्या असलेल्या हवालदाराने त्याचे मत सांगितले..

क्रमश..
◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆