पहिल्या भागाची लिंक👆👆👆
मी माझे अंथरूण व चादर उचलली आणी त्या व्यक्तीकडे पाहून मोठ्याने म्हणालो,
“खूपच थंडी पडलीय भाऊ आज नाही का?”
त्याने मान वर उचलून माझ्याकडे पाहिले..साधारणपणे तीसेक वर्षाचा तरुण होता तो..केस विस्कटलेले, दाढीचे खुंट वाढलेले आणी थंडीने हतबल झालेल्या अवस्थेत होता.🙇

“ आज नाही गेल्या दोन महिन्यांपासून जरा जास्तच थंडी वाजते मला.. ऐवढी की थंडीमुळे झोपही लागत नाही..पण तु कोण आहेस?” त्याने मला विचारले.
मी त्याच्या शेजारीच माझे अंथरुण टाकले आणी त्यावर बसत म्हणालो,
“मी रोहन शास्त्री ..’लोकदर्पण’ या प्रसिद्ध साप्ताहिकासाठी लेखक व पत्रकाराचे काम करतो..आज सरकारविरोधात आंदोलन केल्यामुळे मला एकदिवसीय पोलीस कोठडी मिळाली आहे..पण तु दोन महिन्यापासून येथेच आहेस का? किती शिक्षा झाली आहे तुला?”

“माझे नाव दिपक आहे..येथे तीन महिन्यापुर्वी आलो होतो..मला रेप केसमध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे” त्याने उत्तर दिले.
रेप केस म्हणताच माझे तोंड वाकडे झाले. 😏
“मग फिटली का हौस एकदाची? काय मिळत रे तुम्हाला असे करून..दहा- पंधरा मिनीटांसाठी स्वताचे आणी समोरच्या मुलीचेही सर्व आयुष्य बरबाद करता तुम्ही लोक..पण तुम्ही तरी काय करणार म्हणा..तुमच्यासारख्या शंभरपैकी फक्त दहाच लोकांना शिक्षा होत असते..बाकीचे नव्वद टक्के प्रकरणे कधी पोलीसांपर्यत पोहोचतच नाहीत..त्यामुळे तुम्हालाही असे वाटते कि तुमचेही प्रकरण असेच झाकले जाईल आणी तुम्ही ते दुष्कर्म करून जाता..बरोबर का?”

माझे बोलणे तो शांतपणे ऐकत होता..कदाचित त्याला पण ते पटले असावे.
“खरे आहे तुझे रोहन..आपण नक्की काय चूक करत आहोत आणी भविष्यात त्याचा काय परिणाम होणार हे आपल्याला त्यावेळी समजतच नाही मलाही समजले नाही..नाहीतर मी कशाला त्या दुष्टचक्रात अडकलो असतो”😥
दिपकच्या बोलण्यात पश्चाताप दिसून येत होता.

“कोण होती पण ती मुलगी?” मी उत्सुकतेने विचारले.
“ ‘समा’ नाव होत तिच..निदान मलातरी तिने हेच नाव सांगीतले होते..तीन महिन्यापुर्वीची गोष्ट आहे ही..त्या दिवशी मी संध्याकाळी आमची कंपनी सुटल्यानंतर काही मित्रांसोबत बसून भरपुर ड्रिंक घेतली होती..तशी नेहमीच घ्यायचो मी..🍷
माझी पत्नी ‘सुनैना’ गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच आमचे लग्न झाल्यापासून मला दारूपासून दूर राहण्याची विनंती करत आलेली होती पण मी तिला कधी जुमानले नाही..त्यादिवशी पण खूप वेळ मित्रांसोबत घालवल्यानंतर रात्रीच्या दहाच्या आसपास मी माझ्या घराकडे बाईकवर निघालो..कंपनी ते घर हे जवळपास पंधरा किलोमिटर चे अंतर आहे.. त्या रात्री रहदारी पण किरकोळ होती..मी माझ्या घराकडे येत असताना वाटेत एका स्टॉपवर मला ‘समा’ भेटली, 🙋मला हात करून तिने थांबवले आणी त्याच मार्गावरील पुढील एक ठिकाणावर सोडण्याची विनंती केली..तिला बाईकवर बसवून लिफ्ट दिल्यानंतर वाटेत ति गोड बोलून माझ्याविषयी चौकशी करत होती..तसेच स्वताविषयीही माहिती सांगत होती..तिची सावत्र आई व वडील तिला खूप त्रास देतात असे तिने सांगीतले आणी घरी वादविवाद झाल्याने ती रात्री घरातून बाहेर पडली होती आणी तिला आता तिच्या काकांच्या घरी जायचे होते..तसेच मी तिला काकांच्या गावी सोडावे अशी विनंतीपण करत होती..तिच्या काकाचे घर ज्या एरियामध्ये होते तो एरिया माझ्या घरापासूनही आणखी पुढे दहा किमी अंतरावर होता.

पण तिचे बोलणे, वागणे मला धुंद करत असल्याने मी फारसा विचार न करता त्या रात्री तिने सांगितलेल्या ठिकाणी तिला घेऊन गेलो..तेथे गेल्यानंतर तिने तिचा मोबाईल स्वीच ऑफ झालेला असल्याचे सांगितले, तिला काकांचा नंबर पाठपण नव्हता आणी तिच्या काकांनी नूकतेच घर चेंज केलेले असल्याने तिला नवीन घर माहिती नाही असेपण तिने सांगितले..
खरतर मी दारुच्या नशेत असल्याने आणी तिच्या सौदर्यांला भुललेलो असल्याने ती जे काही सांगेल तेच खर मानत होतो.👨
रात्र वाढीस लागलेली होती..दूकाने बंद होऊन , रस्त्यावरील वर्दळ संपत चाललेली होती..आता पुढे काय करावे असा प्रश्न मला पडलेला होता,शेवटी त्यावर तोडगा पण तिनेच काढला..
समा म्हणाली, आता रात्री इकडेतिकडे भटकण्यापेक्षा आपण दोघेही कुठेतरी एखाद्या लॉजवर मुक्काम करू..सकाळी तुम्ही तुमच्या घरी जा आणी मी माझ्या काकांच्या घरी जाईल..मी क्षणिक मोहामध्ये अडकून माझी विवेकबुद्धी गहाण ठेवून तिच्यासोबत लॉजमधील एका रुमवर मुक्काम केला आणी जे घडायला नको होते ते घडले..उतावळा मासा बरोबर जाळ्यात अडकला होता.🎣

खरेतर समा हि कोणी सामान्य मुलगी नसून एका लूटारू टोळीची सदस्य होती ..तिने रात्री केव्हातरी गुपचूप तिच्या इतर सदस्यांना मेसेज करून त्या लॉजचे नाव व पत्ता सांगितला होता..दुसर्या दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठायच्या आत स्वताला तिचे नातेवाईक म्हणवणारे काही माणसे आणी एक पोलीस त्या लॉजवर दाखल झाले..खरेतर तो पोलीस सुद्धा त्या टोळीचाच एक सदस्य होता...माझी सर्व नशा एका झटक्यात उतरली होती ..रंगेहात पकडलो गेलो असल्याने मी कोणता बहाणाही करू शकत नव्हतो..त्यातून कहर म्हणजे समा ही वीस वर्षाच्यापुढील तरूणी असूनही पोलीस स्टेशनमध्ये तिचे खोटे कागदपत्रे दाखवून तिला अठरा वर्षाच्या खालील म्हणजे अल्पवयीन दाखवण्यात आले..आणी माझ्यावर अपहरण व बलात्काराची केस टाकण्यात आली..समाच्या जबाबामध्ये तिने स्वताला पुर्णपणे निर्दोष दाखवले होते,आणी मी तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला असा स्पष्ट आरोप तिने केला होता..तपासणीमध्ये माझ्या रक्तात अल्कोहोल सापडल्याने माझ्या जबाबाला काही अर्थपण राहिला नव्हता..सर्वांच्या नजरेमध्ये मी एक समाजकंटक बनलेलो होतो.🤐
आता मात्र मी मोठ्याच संकटात सापडलो होतो..स्वताला ‘समाचा काका’ म्हणवणाऱ्या इसमाने ही स्ट्राँग पोलीस केस मागे घेण्यासाठी माझ्याकडे तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी केली..मी एका खाजगी कंपनीत सामान्य कामगार म्हणून कामास असल्याने माझी मिळकत तशी कमीच होती..त्याचबरोबर सततच्या व्यसनामुंळे आधीच माझ्यावर कर्ज झालेले होते त्यामुळे मी त्यांची पैशाची मागणी पुर्ण करण्यास असमर्थ होतो..तु किंवा तुझे नातेवाईक जेव्हा पैसे देतील तेव्हाच केस मागे घेऊ असे सुनावून मला तीन महिन्यापुर्वी या कोठडीमध्ये डांबण्यात आले होते...माझी पत्नी ‘सुनैना’ मला याच ठिकाणी येऊन भेटून गेली..नाही नाही ते बोलून गेली.. मला आता तुझ्यासोबत राहण्यास काहीच इंटरेस्ट नाही असेही सांगुन गेली..माझ्या नातेवाईकां मध्ये माझी प्रतिमा व्यसनी व्यक्तीची असल्याने कोणीही माझी मदत करायला तयार नव्हते..आणी त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मी या कोठडीमध्येच बंद आहे”🚹
दिपकची केस माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त इंटरेस्टींग होती..एक पत्रकार म्हणुन मी नेहमीच अशा केसेसच्या शोधात असतो..
“बापरे..फारच भयानक अनूभव आहे कि तुझा दिपक..करायला गेलास एक आणी झाले भलतेच..अशा अनोळखी मुलींपासून नेहमीच सावध राहायला पाहिजे रे ..आणी ह्या समासारख्या डेंजर मुलींचे किस्से ऐकले कि मला कधीकधी वाटते बरे झाले बाबा मी अजूनही अविवाहितच आहे ते”🤓

“अविवाहित? दिसायला तर ठिकठाक आहेस..जॉबलाही आहेस, निर्व्यसनी व हुशारपण वाटतोस..मग अजून लग्न का नाही केलेस तु?” दिपकने त्याची शंका विचारली.
“हो रे मित्रा..शिक्षण,करिअर आणी स्वताचे घर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडल्याने लग्न करायचे राहुनच गेले..काही वर्षापुर्वी स्वताहून स्थळे सांगुन येत होते..तेव्हा वरील कारणांमुळे मी नकार देत राहिलो..वयाची तिशी ओलांडल्यानंतर हळूहळू मुली सांगुन यायच्या कमी होत गेल्या..आणी आता तर पस्तीस वर्षाचा झालोय मी..आता तर मुलींकडून मिळणारे नकार संपायलाच तयार नाहीत..बघू चालू आहेत प्रयत्न, कोणीतरी भेटेलच मला”
मी माझे स्पष्टीकरण दिले.
मी माझे स्पष्टीकरण दिले.
दिपकने एकदा मला नीट निरखून पाहिले आणी म्हणाला,
“ मी आता जेलमधून बाहेर येईल असे मला वाटत नाही रोहन..माझ्या अशा स्वभाव आणी वागण्यांमुळे सुनैना पण माझ्यासोबत राहु ईच्छित नाही..तशी ती खुप चांगली मुलगी आहे...तसे म्हणायला आमच्या लग्नाला दोन वर्षे होऊन गेले तरी मी आजवर तिची एकही ईच्छा पुर्ण करू शकलो नाही...खर सांगायच तर आजपर्यंत मी कधी तिचा विचारच केला नाही बघ...पण आता असे वाटते कि मी तिच्यावर काहिसा अन्यायच केला..खरच तिला एखादा तुझ्यासारखा पती मिळायला हवा होता.💑
तुझी आणी तिची जोडी अगदी योग्य राहिली असती असे मला वाटते..पण या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत”

दिपकचे हे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते..
“ वेडा आहेस कारे दिपक? जे झाले ते सोडून दे..सुनैनाला मी समजावून सांगतो..सात वर्षे म्हणजे काही खूप मोठा काळ नाहीये.. बघता बघता निघून जाईल हा काळ..आणी सात वर्षे कशाला मी समजवून सांगितल्यावर नक्कीच सुनैना तुला सोडवण्यासाठी कुठूनतरी अडीच लाखांची सोय करेल..हवीतर मी पण माझ्यापरीने तिला काही पैशांची मदत करेल...डोंट वरी”
मी दिपकला समजवण्याचा प्रयत्न केला.

“बघ प्रयत्न करून तुला जमले तर...पण माझ्यामते आता फारच उशीर झालेला आहे, आता काही होउ शकेल असे मलातरी वाटत नाही” 😔
दिपक फारच निराश झाल्यासारखा वाटत होता..पण मी मात्र त्याच्यामध्ये उमेद जागवण्याची प्रयत्न करत होतो..
त्यानंतर अजून काही वेळ आम्ही बोलत होतो..आणी बोलता बोलताच मध्यरात्री केव्हातरी झोपी गेलो..

क्रमश..
◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆