🔹भाग तीनची लिंक 👆👆👆
हवालदाराच्या बोलण्यामुळे इन्स्पेक्टर भोसलेपण काहिसे गंभीर झाले,
मी पण भोसलेंना विनंती केली,
“दिपक हा पुर्णपणे निर्दोष होता असे मी म्हणणार नाही..पण ज्या कारणासाठी त्याला शिक्षा झाली तो प्रसंग मुद्दामहून घडवून आणलेला होता..सर्व काही एका प्लॅनिंगप्रमाणे झालेले होते आणी त्यामुळेच या प्रकरणामध्ये ती समा नावाची मुलगी आणी तिचे साथीदार दिपकपेक्षा जास्त दोषी आहेत..तरी या प्रकरणातील संबंधिताविरोधात माझी तक्रार नोंद करून घ्यावी तसेच आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालायला हवे असे मला वाटते साहेब, ...त्याचबरोबर या केससंदर्भात मी ‘लोकदर्पण’ मध्ये एक लेख छापणार असून त्यासाठी दिपकच्या केसच्या सर्व डिटेल्स तुम्ही मला द्या”

माझी विनंती ऐकून भोसले काही वेळ विचार करून नंतर म्हणाले,
“आपल्या शहरामध्ये अनेक छोट्या छोट्या पोलीस चौक्या आहेत..प्रत्येक चौकीमधील अधिकारी आपापल्या हद्दीमध्ये घडणाऱ्या केसेसचा तपास करत असतात..आणी तो तपास पुर्ण झाल्यानंतर त्या केसची फाईल शहरातील मुख्य स्टेशन म्हणुन आपल्या येथे जमा करत असतात..मला वाटतेय दिपकच्या केसची फाईल ही आमच्याकडे ‘समर्थनगर’ चौकितुन आलेली होती. समर्थनगर चौकीचे जेल पुर्णपणे भरलेले असल्याने दिपकला आपल्या स्टेशनच्या जेलमध्ये पाठवण्यात आलेले होते... पण येथे आल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याने आमच्याकडून त्याची फाईल कायमची क्लोज करण्यात आलेली आहे.”🕹️

दरम्यान हवालदाराने फाईलींच्या गठ्यांमधून दिपकची फाईल शोधून आमच्या समोर ठेवली होती..भोसलेंनी हातातील चहाचा कप बाजूला ठेवला आणी थोडावेळ ती फाईल काळजीपूर्वक चेक केली आणी नंतर म्हणाले,
“प्रकरण एकुणच गंभीर व संशयास्पद आहे..खर तर अशाप्रकारे केसच्या डिटेल्स आमच्या डिपार्टमेंट शिवाय इतरांना देणे आमच्या प्रोटोकॉलच्या बाहेर आहे..तरीपण प्रसंगचा असा आहे मी नकार देऊ शकत नाही, दिपकला जर खर्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर ते काम आपल्या दोघांनाही मिळूनच करावे लागेल शास्री… समा व तिच्या टोळीविरोधातली तुझी तक्रार मी नोंद करून घेतो आणी दिपकची फाईल पुन्हा ओपन करून तपासाला सुरूवात करतो...तुला पण ज्या काही डिटेल्स हव्या आहेत त्या ह्या फाईलमधून घे, त्याचबरोबर माझा फोन नंबरपण जवळ ठेव..जेव्हा कधी तुला गरज भासेल तेव्हा बिनधास्त कॉल कर ”
मी त्या फाईलमधील मला आवश्यक वाटणारी सर्व माहिती माझ्या डायरीमध्ये लिहुन काढत असताना भोसलेंना विचारले,✍️
“पण साहेब, अशा प्रकरणांमध्ये आपले कायदे हे फक्त महिलांच्या बाजूचे असल्यासारखेच वाटतात..कोणत्याही महिलेने फक्त आरोप जरी लावला तरी व्यवस्था लगेचच संबधित पुरूषाला गुन्हेगार म्हणुनच पाहते...तो आरोप खरा कि खोटा याची शहानिशा पण नंतर केली जाते..हे तुम्हाला चूकीचे नाही का वाटत?”

भोसलेंच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटले,
“ आपले कायदे हे महिलांच्या जास्त फेवरमध्ये आहेत असा आरोप बरेचजण करत असतात , पण फक्त दिपकसारख्या काही घटनांवरून आपण ह्या सगळ्या कायद्यांची समिक्षा नाही करू शकत..त्यासाठी आपल्याला समाजात घडणार्या सर्व घटनांचा एकत्रित अभ्यास करावा लागेल, तु आमच्यासोबत पाच सहा महिने काम केले तरी सर्व समजून जाशील..जेव्हा अवघ्या तीन महिन्यापुर्वी लग्न झालेल्या एखाद्या नवविवाहितेला जेवणामध्ये मीठ जास्त झाले या शुल्लक कारणावरून जिवंत जाळल्याची घटना आम्ही पाहतो किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या व स्वताच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणार्या मुलीच्या तोंडावर एखादा टपोरी एकतर्फी प्रेमातुन भर रस्त्यावर अँसिड फेकुन तिला कायमचे विद्रूप बनवलेले आम्ही पाहतो ना तेव्हा तुमच्या सारख्यांना महिलांच्या फेवरमध्ये वाटणारे हे सर्व कायदे प्रत्यक्षात किती तुटपुंजे व हतबल आहेत याची जाणीव आम्हाला होत असते...राहिला प्रश्न दिपकच्या केसचा तर अशा केसमध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग व फिर्यादी आणी आरोपी दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी या सगळ्यांचा सारासार विचार करणे पोलीसांसाठी आवश्यक असते” 🛂
भोसलेंनी स्पष्टीकरण दिले.

दिपकच्या केससंबधी मला लागणारे डिटेल्स फाईलमधून माझ्या डायरीमध्ये लिहून घेऊन मी इन्सपेक्टर साहेबांचा निरोप घेतला..जाता जाता सहज त्या जेलमधील आठ नंबर लॉकअपच्या बाहेर जाऊन क्षणभर आत डोकावून पाहिले.. ज्या कोपर्यात मी दिपकसोबत एक संपूर्ण रात्र काढली होती तो रिकामा कोपरा काळजाला छेद देऊन गेला.
दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये पुर्ण दिवसभर खपून व माझे सर्व कौशल्य पणास लावून दिपकच्या केसवर एक सनसनाटी पण वास्तववादी लेख लिहून काढला..📝
समा व तिचे साथीदार, स्वतःला तिचा काका म्हणवणारा व्यक्ती, तसेच दिपकवर केस दाखल करणारा ‘समर्थनगर’ चौकीतील पोलीस या सर्वांचा नावासहित उल्लेख त्यात केलेला होता..
या गुरुवारच्या लोकदर्पणच्या अंकात आता तो लेख छापण्यासाठी फक्त आमच्या संपादक साहेबांच्या गळी उतरवायचा बाकी होता..पण ते काम माझ्यासाठी अजिबात अवघड नव्हते..
अखेर ठरवल्याप्रमाणे ‘लोकदर्पण’ मध्ये तो लेख प्रसिद्ध झाला..लेखाच्या शेवटी ठळक अक्षरामध्ये माझे नाव आणी मोबाईल नंबर सुद्धा टाकलेला होता..त्या लेखासंबंधी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटणार होत्या, पण त्या सर्वांना उत्तरे देण्यासाठी मी आता सज्ज होतो..समा व तिची लूटारू गँग छोटीशी होती का माझ्या अपेक्षेपेक्षा मोठी ...त्यांची पोहोच नेमकी कुठपर्यंत होती याचीच फक्त मला उत्सुकता होती.👤
◆◆◆◆◆◆◆

तो लेख प्रसिद्ध होऊन आता तीन दिवस उलटून गेले होते...गेल्या तीन दिवसात माझ्या मोबाईलवर शेकडो वाचकांचे कॉल येऊन गेले होते..कोणी कौतुक करत होते तर कोणी वेगवेगळ्या शंकाकुशंका विचारत होते मी त्या सर्वांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत होतो….📱
त्याचबरोबर संबंधित लुटारू टोळीचा भांडाफोड झाल्याने अनेक वेगवेगळ्या गुंडांकडून मला त्यांच्याविरोधातील केस मागे घेण्यासाठी कधी भरपूर पैशाचे अमिष दाखवण्यात येत होते तर कधी जिवे मारण्याच्या, उध्वस्त करण्याच्या धमक्या पण येत होत्या..मी शक्यतो त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचो पण कोणी जास्तच त्रास देत असेल तर त्याचा नंबर इ. भोसलेंकडे देत होतो..
भोसले खास पोलिसी शैलीत त्याचा समाचार घेत होते,
तसेच अधेमधे मलापण जरा जपूनच राहण्याचा सल्ला पण देत होते..

पण हाडाचा लेखक व पत्रकार असल्याने मरणाची भिती मला आजवर कधी वाटलीच नाही आणी यापुढेही वाटणार नव्हती..खरेतर दिपकला न्याय मिळवून देण्यापलीकडे मला ना पैशाचे महत्व होते ना स्वतःच्या जीवाचे..तसेही सच्चा लेखकाचा जीव त्याच्या लेखणीमध्ये असतो असे म्हणतात..त्यामुळे म्रुत्युनंतरही मी या जगातच राहणार होतो..माझ्या लेखणीतून..मी कागदावर उतवलेल्या माझ्या विचारांमधून..✍️
आज दूपारी ऑफिसमध्ये असतानाच गेले तीन दिवस ज्या कॉलची मी आवर्जून वाट पाहत होतो तो कॉल आला..
एक तरुण होता तो..काहिशा बावरलेल्या आवाजात बोलत होता,

“हँलो रोहन सर..मी संतोष बोलतोय, सर तुमचा ‘लोकदर्पण’ मधील लेख वाचला, त्यामध्ये तुम्ही दिपकचा जो अनूभव सांगितला आहे नेमका तसाच प्रसंग माझ्यासोबत व माझ्या एका मित्रासोबत सुद्धा घडलेला आहे पण बदनामीच्या व पोलिस केसच्या भितीने आम्ही त्या संबधित व्यक्तींना त्यांनी मागितलेली भरमसाठ रक्कम देऊन त्यावेळी स्वताची सुटका करून घेतली होती”
त्याचे बोलणे ऐकून माझा चेहरा उजळला होता.🤓

“ओके संतोष..या केसमध्ये मला तुझी व तुझ्या मित्राची थोडी गरज लागेल..पण तुमचे नाव कुठेही लिक होणार नाही याची गँरेंटी मी तुम्हाला देतो”
अशाप्रकारे त्याला तयार करण्याचा प्रयत्न मी करू लागलो..संतोष व त्याच्यासारख्या पिडीत तरुणांची या प्रकरणामध्ये आम्हांला मोलाची मदत होणार होती.
क्रमश..
(उर्वरित कथा पुढील शेवटच्या भागात)
◆◆◆◆◆◆◆
(उर्वरित कथा पुढील शेवटच्या भागात)
◆◆◆◆◆◆◆