🔹भाग चारची लिंक 👆👆👆
संतोष सोबत काही वेळ फोनवर बोलल्यानंतर तो या केसमध्ये माझी मदत करण्यासाठी तयार झाला..
“ठिक आहे रोहन सर, आज चार वाजता ‘रोशनी बार अँड रेस्टॉरंट’ मध्ये तुम्ही मला भेटायला या..तेथे आपण यावर चर्चा करू” त्याने मला आश्वासन दिले…
मी ऑफिसमधील आवराआवर केली,आणी थोड्यावेळाने बाहेर पडलो..भोसलेंना फोन करून साक्षीदार मिळाल्याचे सांगितले..पण दूसर्या महत्वाच्या कामामुळे मी येऊ शकत नाही तु एकटाच जाऊन भेटून ये, असे त्यांनी सांगितले...रोशनी बार आमच्या ऑफिसपासून खूप दूर असल्याने मी लवकरच निघालो आणी रिक्षाने बारच्या गेटपर्यंत पोहोचलो.

‘रोशनी बार’ हा शहरातल्या पॉश एरियामधला सर्वात मोठा बार होता..समोर पार्किंग व गार्डन, पहिल्या मजल्यावर बार, दुसर्या मजल्यावर रेस्टॉरंट,आणी तिसर्या मजल्यावर लॉजिंग होते.. शेवटचा चौथा मजला बहुतेक रिकामाच होता🏥
गार्डनमध्ये पोहोचतात तेथे मला संतोष भेटला..माझ्याशी हात मिळवून तो मला आतमध्ये घेऊन गेला..आतमध्ये अंधूक प्रकाश होता..काही अंतरावरच्या वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये काही कस्टमर दारु-सिगारेटचा आस्वाद घेत होते..आताशी चारच वाजलेले असल्याने कस्टमर कमीच होती..आम्ही दोघे सगळ्यांपासून काही अंतरावर असणार्या गोल टेबलच्या जवळ जाऊन बसलो..

संतोष हा मागच्याच आठवड्यात रात्रीच्या वेळी एकटा कारने प्रवास करत असताना एका सुंदर मुलीच्या जाळ्यात अडकला होता असे त्याने सांगितले..
“मग पुढे काय झाल..किती पैसे मागितले त्या प्रकरणातून सुटकेसाठी तुझ्याकडे” मी विचारले.
“पैसे नाही मागितले.. त्या प्रकरणातून सुटण्यासाठी मला एक काम देण्यात आलेले आहे” संतोषने सांगितले.
“कोणते काम?”
“तुम्हांला या ठिकाणी बोलावून घेण्याचे काम” संतोष शांतपणे म्हणाला..

माझ्या मनात शंका दाटून येऊ लागली..आणी मी तेथून निघून जाण्यासाठी खुर्चीवरुन उठलोच होतो तेवढ्यात काळे कपडे घातलेले, धष्टपुष्ट शरीरयष्टीचे आणी मग्रूर चेहर्याचे दोन माणसे त्या टेबलजवळ आले...त्यातल्या एकाने मोठा धारधार सुरा माझ्या पाठीला लावला आणी म्हणाला,🗡️
“चुपचाप आमच्यासोबत चलायच..एकही प्रश्न विचारायचा नाही”
माझी छाती धडधडु लागली होती..ते दोन पहेलवान मला आणी संतोषला अंधूक प्रकाशातुन वाट काढत जिन्याच्या जवळ घेऊन आले..जिना चढुन वरच्या मजल्याकडे घेऊन जात असताना,
माझी छाती धडधडु लागली होती..ते दोन पहेलवान मला आणी संतोषला अंधूक प्रकाशातुन वाट काढत जिन्याच्या जवळ घेऊन आले..जिना चढुन वरच्या मजल्याकडे घेऊन जात असताना,
“जगनशेठ सोबत पंगा घेऊन तु खूप मोठी चूक केलीयस शास्री” त्यांच्यातला एकजण म्हणाला.
हे जगनशेठ म्हणजे काय प्रकरण आहे हे मला समजत नव्हते. काहीवेळातच आम्ही शेवटच्या चौथ्या मजल्यावरच्या एका भव्य हॉलमध्ये पोहोचले..खूपच चकचकाट होता तेथे..अनेक महागड्या वस्तु आणी पेंटींग्सने भरलेला होता तो हॉल.🌌
तेथे समोर एका मोठ्या आरामखुर्चीवर जाडजूड अंगाचा जगनशेठ बसलेला होता..त्याच्या बाजूला आणखी दोन तगडे पहेलवान उभे होते..साधारणपणे पंचेचाळीसच्या आसपास वय असेल जगनशेठचे, अंगावरचे पांढरेशुभ्र कडक कपडे त्याला पुढारी लूक देत होते..गळ्यात मोठी सोन्याची चैन आणी हाताच्या पाची बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या त्याचे ऐश्वर्य दर्शवत होत्या..मला तेथे आणलेले पाहताच तो जागेवरून ऊठला.. आणी माझ्याजवळ येत डोळे मोठे करत, दातओठ खात बोलू लागला,😠

“एक दिडदमडीचा पत्रकार, तु माझा धंदा बंद करणार?? तुला काय वाटल कुठल्यातरी चिंधी गँगचे काम असेल हे...हा जगनशेठचा बिझनेस आहे... समासारख्या पन्नास मुली कामाला आहेत माझ्याकडे..वेगवेगळ्या शहरात दररोज नवनवीन बकरे शोधत असतात त्या... महिन्याला करोड रूपये छापतो मी ह्या धंद्यातुन..पोलीसांना लाखो रूपये लाच देऊन मँनेज करतो... तुलापण खूपवेळा समजवला, पण तु ऐकायलाच तयार नव्हता, स्वतःला काय पिक्चरचा हिरो समझतोस काय रे भ**”
जगनशेठने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली..माझा चष्मा दूर उडून पडला होता..👓
जगनशेठने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली..माझा चष्मा दूर उडून पडला होता..👓
जगनशेठने इशारा करताच दोन पहेलवानांनी माझी धूलाई करण्यास चालू केली..मी एकटा त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हतो..संतोष फक्त हतबलपणे पाहत बाजुलाच ऊभा होता..
“रंगा...ह्या शास्रीचा गेम करून रात्री म्युनसिपाल्टीच्या गटारीत फेकून दे” जगनशेठने त्याच्या माणसाला आदेश दिला.
“रंगा...ह्या शास्रीचा गेम करून रात्री म्युनसिपाल्टीच्या गटारीत फेकून दे” जगनशेठने त्याच्या माणसाला आदेश दिला.
लगेच दोन तगड्या गुंडानी माझे दोन्ही हात घट्ट पकडून मला उभे केले..रंगा नावाचा खतरनाक गुंड हातात धारदार चमकणारे मोठे हत्यार घेऊन माझ्याकडे येऊ लागला..🗡️
मला मरण समोर दिसू लागले..रंगाने माझ्या जवळ येऊन हत्यार उगारलेच होते कि...
तेवढ्यात…. एक मजबुत बुटांची लाथ रंगाच्या पेकाटात बसली आणी तो हातातल्या हत्यारासहित खाली कोसळला..मी चमकुन त्या दिशेला पाहिले..’इन्स्पेक्टर भोसले’ अगदी वेळेवर तेथे पोहोचले होते..त्यांच्यासोबत इतर पाच सहा पोलीस देखील होते..
रंगा त्याचे हत्यार घेऊन पुन्हा ऊभा राहिला..पण भोसलेंनी चपळाईने रिवॉल्वर त्याच्यावर रोखून धरल्याने त्याला पुढे काहीच हालचाल करता आली नाही..🔫

“अटक करा ह्या सगळ्यांना” भोसलेंनी पोलीसांना ओरडून सांगितले..लगेचच पोलीसांनी सगळ्यांच्या मुसक्या बांधल्या..
भोसलेंनी मला सावरले आणी म्हणाले,
भोसलेंनी मला सावरले आणी म्हणाले,
“स्वॉरी शास्री..थोडासा उशीर झाला यायला..मी तुला सांगत होतो ना ‘समा व तिचा मानलेला काका’ हे दिपकच्या प्रकरणातील फक्त कळसुत्री बाहुल्या आहेत म्हणुन...पण त्यांचा पडद्यामागचा सुत्रधार नेमका कोण आहे हे मला समजत नव्हते... आज दूपारी फोनवर तु ‘रोशनी बार’ मध्ये तुला बोलावले आहे असे सांगितले आणी माझी संशयाची सुई गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 'रोशनी बारचे मालक जगनशेठ'कडे वळली... पण त्याचे पॉलीटिकल नेटवर्क खूप स्ट्राँग असल्याने कुठल्याही पुराव्याशिवाय मी जगनशेठला हात देखील लावू शकत नव्हतो.. खरेतर आज तीन वाजल्यापासुनच माझा एक पोलीस अधिकारी साध्या कपड्यांवर या बारमध्ये कस्टमर बनुन आलेला होता जो येथल्या सर्व बारिकसारिक घडामोडी माझ्यापर्यंत पोहोचवत होता..आणी आम्ही सर्वजण बारपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या आमच्या व्हँनमध्ये योग्य वेळेची वाट पाहत होतो..तुला जेव्हा दोन काळ्या कपड्यातील पहेलवान जबरदस्तीने जिन्याने वर घेऊन गेलेले आम्हाला समजले तेव्हा लगेच आम्ही येथे पोहोचलो..”🚌
भोसलेंनी एका हाताने जगनशेठची मान पकडली ..जगनशेठ सुटण्याची धडपड करत होता पण भोसलेंच्या मजबूत पकडीपुढे त्याचे काही चालले नाही..भोसलेंनी माझ्याकडे पाहुन म्हणले,
“आज जर मी तुझ्यासोबतच येथे आलो असतो तर जगनशेठने पोलीस खात्यातील व्यक्ती सोबत पाहुन तुला मारण्याचा प्लँन पुढे ढकलला असता आणी आज मला त्याला रंगेहात पकडता आले नसते...या हॉलमधील सगळा प्रसंग माझ्या माणसाने मोबाईलवर रेकॉर्ड केलेला आहे..आता जगनशेठ माझ्या तावडीतून सुटणार नाही”

मी खाली पडलेला माझ्या चष्मा उचलून साफ करून डोळ्यांवर चढवला..आणी ओठातून येणारे रक्त पुसता पुसता भोसलेंना म्हणले,
“पण साहेब, माझी एक विनंती आहे..जगनशेठला त्या शेवटच्या आठ नंबर लॉकअपमध्येच ठेवा” भोसलेंनी होकारार्थी मान डोलावली...जगनशेठला शिक्षा मिळाल्याशिवाय दिपकच्या आत्म्याला त्या काळकोठडीतुन मुक्ती मिळणार नव्हती🚹
◆◆◆◆◆◆◆◆◆

या घटनेनंतर आता एक आठवडा उलटून गेला होता..माझ्या मारहाणीच्या जखमा आता बर्या झाल्या होत्या..
दरम्यान आठवड्याभरात भोसलेंनी कसून चौकशी करून जगनशेठच्या पुर्ण रँकेटचा पर्दाफाश केला होता..जगनशेठच्या गँगमध्ये काम करणार्या समा व तिच्यासारख्या काही मुली व टोळीतील इतर सदस्य जेलमध्ये गेले होते..काही जण फरारी झाले होते आणी पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते....रँकेट उघडकीस आल्याने संतोष आणी इतरही काही पिडीत तरुण तपासात पोलीसांना सहकार्य करत होते..जगनशेठकडून हफ्ता घेऊन त्याच्या काळ्या कारनाम्यात सक्रिय सहभागी असणार्या समर्थनगर चौकीच्या दोन पोलीसानांही निलंबित करण्यात आलेले होते..
इन्सपेक्टर भोसलेंचे हे धडाडीचे कार्य समाजासमोर यावे म्हणुन मी लवकरच ‘लोकदर्पण’ मध्ये त्यांच्यावर एक विशेष लेख लिहुन प्रसिद्ध होतो..📰
त्यामुळेच त्यांच्या तपासाची पुर्ण माहिती घेण्यासाठी मी आज त्यांच्याकडे जायला निघालो.

पोलीस स्टेशनच्या आत जाताच तेथे मला एका महिला पोलीस अधिकार्यासोबत ‘सुनैना’ बोलत बसलेली दिसली..दिपकच्या केस संदर्भात काही माहिती घेण्यासाठी तिला बोलावण्यात आलेले होते..लालसर गुलाबी रंगाच्या साडीत ती आज छान दिसत होती..मला पाहताच तिने हसून ओळख पण दिली..दोनक्षण मी तिच्याकडे पाहतच राहिलो.👩
नंतर भोसलेंकडे जाऊन त्यांनी केलेल्या तपासाची पुर्ण माहिती व डिटेल्स घेतली..त्यानंतर भोसले आणी मी जगनशेठला डांबून ठेवलेल्या आठ नंबर लॉकअपमसमोर आलो..जगनशेठ आता ओळखुपण येत नव्हता..गेल्या आठवडाभरात त्याचा पुर्ण रूबाब उतरला होता...जेलमधील साधे कपडे, विस्कटलेले केस आणी जागरणाने सुजलेले डोळे..भोसलेंना पाहताच तो लगबगीने उठला आणी गयावया करत म्हणाला,
“ओ साहेब वाटल तर फासावर लटकवा पण या काळकोठडीमध्ये ठेऊ नका..अहो रोज रात्री एक पांढरी चादर पांघरलेला कोणीतरी तरुण कुठूनतरी या खोलीमध्ये येतो आणी मला रात्रभर झोपू देत नाही... सकाळ होताच तो कुठे गायब होतो काय माहिती..चार रात्री झाल्या..पण एक मिनीटपण झोपू शकलो नाही मी”
जगनशेठचे बोलणे ऐकताच भोसले आणी मी एकमेकांकडे पाहून हसलो.
जगनशेठचे बोलणे ऐकताच भोसले आणी मी एकमेकांकडे पाहून हसलो.
त्यानंतर भोसलेंचा निरोप घेऊन मी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलो..बाहेर ‘सुनैना’ रिक्षाची वाट पाहत थांबलेली होती.. दिपकला खर्या अर्थाने न्याय मिळवून दिल्याबद्दल तिने माझे आभार मानले..आणी जाताजाता घरून चहा घेऊन जाण्याची विनंती केली..आम्ही दोघे रिक्षातुन तिच्या घरी गेलो..मी बाहेरील रुममध्ये खुर्चीवर बसलो ती आतील खोलीत चहा बनवण्यासाठी गेली..ती चहा बनवत असताना मी बाहेर माझ्या मनातील गोष्ट तिला सांगण्यासाठी तयारी करत होतो..थोड्याचवेळात ती पुर्ण भरलेला चहाचा कप घेऊन आली..☕️
मी चहाचा कप हातात घेताना तिच्याकडे पाहत म्हणालो..“सुनैना”
तिने चमकुन माझ्याकडे पाहिले.
मी चहाचा कप हातात घेताना तिच्याकडे पाहत म्हणालो..“सुनैना”
तिने चमकुन माझ्याकडे पाहिले.
“साधारणपणे दोन आठवड्यापुर्वीची गोष्ट आहे..खूप दिवसानंतर मला एका चांगल्या मुलीचे स्थळ आले होते..मुलगी सुशिक्षित होती जॉबलाही होती, पण मी त्या मुलीला नकार दिला..माझ्या आईला हा माझा मुर्खपणा वाटला..तिच पण बरोबरच आहे म्हणा, गेल्या वर्षी दोन तीन मुलींनी मला लग्नासाठी नकार दिलेला असतानाही यावर्षी मी स्वताहून या मुलीला नकार दिला होता ना..पण मी असे केले कारण, ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच तुला माझी जीवनसाथी बनवण्याची माझी ईच्छा झाली होती.. कदाचित दिपकचीपण तिच ईच्छा असावी नाहितर त्याने मला तुझी समजुत काढण्यासाठी येथे कशाला पाठवले असते...पण तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मला माहित नाही, कदाचित दिपकच्या आकस्मात म्रुत्युचे दुख: तुझ्या मनात अजूनही ताजे असल्याने तु अजून काही दिवस किंवा काही महिने माझ्या प्रस्तावावर विचार करू शकणार नाहीस हे मला माहित आहे. त्यामुळे आज मी तुझे मत विचारनार नाही..पण फक्त ऐवढेच सांगेन कि, जोपर्यंत माझ्यापर्यंत तुझा होकार किंवा नकार दोन्हीपैकी काहितरी येत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचारपण करणार नाही..”💑
सुनैनाच्या हातचा मधूर चहा संपवून मी उठून माझी बँग खांद्यावर लटकवली आणी निघालो..जरी तिने त्यावेळी माझ्या प्रस्तावाचे उत्तर शब्दरूपाने दिले नसले तरी पण तिच्या चेहर्यावरुन व नजरेतुन मला माझे उत्तर मिळाले होते..जाता जाता मी सहज आतल्या खोलीत नजर टाकली.. गँसवर गरम करण्यासाठी ठेवलेले दूध उतू चाललेले मला दिसले, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यामध्ये ती एवढी गुंतली होती कि, दुध कधी उकळले हे तिला समजलेच नव्हते..हे पाहून गालातल्या गालात हसत मी तिच्या घरातून बाहेर पडलो..आणी चालत चालत मेनरोडवर जाऊन रिक्षाची वाट पाहु लागलो.🚶
समाप्त. 🚹🚹📰📰👓👓👩👩
©लेखक- Dnyanesh W.
©लेखक- Dnyanesh W.