.
केळ आवडणारं भूत - तेल्या (सत्य घटना )
नमस्कार मित्रांनो मी किशोर....
आज मी तुम्हांला जी कथा सांगणार आहे ती सांगली जिल्ह्यातील, तालुका जत, बसर्गी ह्या खेड्यात घडली आहे. बसर्गी ह्या खेड्यात आमची लहानशी शेतीवाडी आहे, आमच्या शेताला लागूनच एक ओढा आहे आणि ओढ्याच्या वरच्या बाजूला एक बाभळीचे झाड आहे आणि त्या ठिकाणीच सुमारे ४० वर्षांपूर्वी एक मोठं बाभळीचे झाड होते. असे बोलतात की त्या झाडाला फास लावून एका माणसाने आत्महत्या केली होती परंतु मरणापूर्वी एक डझन केळी आणून झाडाखाली बसून ती केळी खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याला सर्वजण तेली असे म्हणायचे, असे म्हणतात की आज ही त्याचा आत्म्याला शांती मिळाली नाही आणि म्हणून तो आत्मा नेहमी त्याभागात भटकत असतो.
तिथेच एक प्रसंग माझ्यासोबत असा घडला की तो आठवला की आज ही माझ्या अंगावर काटा उभा राहतो. त्याचे असे झाले की मी सातवीला असताना, आमची गुरे ढोरे असल्यानं आम्ही भाऊ त्याना चरायला घेऊन जात असत परंतु एक दिवस आम्ही बाहेर म्हणजेच शाळेत गेल्यामुळे तसेच माझे आई वडीलाना शेतामध्ये काम असल्यामुळे गुरे चारण्यासाठी माझ्या आजीला त्याठिकाणी जावे लागले. असेच गुरे चरत असताना खूप दुपारी झाल्याने माझी आजी थोडावेळ विश्रांतीसाठी त्याच झाडाखाली विसावली होती. नक्की आठवत नाही परंतु तो दिवस पौर्णिमा कीवा अमावास्येचा असावा. थोडावेळ विश्रांती घेऊन झाल्यावर जशी उन्हे कलु लागली तशी गुरे घेऊन घरी आली, बघताबघता संध्याकाळ झाल्यामुळे, आई जेवण बनवू पर्यंत आज्जी थोडी थकवा आल्याने बाहेर सोफ्या वर झोपली होती, जसे आई आणि बहिणी ची ऑर्डर आली तसे आम्ही जेवायला आतल्या खोलीत जायचं म्हणूं आज्जीला जेवायला उठवायला गेलो असता आम्ही पाहिले की आज्जी काहीतरी विचित्रच वागत, बोलत होती जे पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. आजीचे अंग थरथर कापू लागले होते आणि आज्जी कन्नड मध्ये काहीतरी बडबडू लागली होती, मला कन्नड त्यावेळी जास्त येत न्हवतं म्हणून मग मी माझ्या बाबाना बोलावलं, आता बाबा आणि आज्जी चं कन्नड मध्ये बोलणे चालू झाले, आज्जीच्या शरीरामध्ये तेल्या भुताचा आत्मा ने दुपारीच प्रवेश केला होता आणि तेल्या हा कन्नड बोलणार माणूस होता, त्याचा आत्मा पण आता आमच्या सर्वांबरोबर कन्नड मध्ये बोलू लागला होता, तेल्या खूप वर्षापासून भटकत होता त्याला अजून स्वर्गात किंवा नरकात जागा मिळाली न्हवती, म्हणून तो आत्मा अजून भटकत होता, आमच्या आज्जी आजोबांच्या बरोबरीचा तेल्या पण घरगुती वादातून त्याने आत्महत्त्या करून घेतली होती, माझ्या आज्जीच्या तोंडातून त्याच्या मातृभाषेतून म्हणजे कन्नड मधून तो त्याच्या अपुऱ्या इच्छा पुरी करायला विनवण्या करीत होता, माझे काका ,बाबा हे आत्म्याशी बोलत होते , वाद घालत होते, अजून तू का भटकतोय असे विचारत होते तर तो म्हणत होता की मला अजून देवाने वरती घेतले नाही , अजून मे भटकतोय मे खूप दिवसापासून उपाशी आहे मला केळी खायची खूप इच्छा झाली आहे , असे सांगू लागला इतक्यात माझ्या आजोबांनी त्याला कन्नड मध्ये सुनावले की " तू केळ खायला सोकला आहेस" त्यावर तेल्या ने माझ्या आजोबाला दोन शिव्या हासडल्या तसा माझा आजोबा गप्प बसले, आज आज्जीच्या अंगामध्ये दहा हत्तीचं बळ आलं होतं , तिच्या अंगात एवढी ताकत पूर्वी केंव्हाच न्हवती , उधळलेल्या बैल एवढी टाकत तिच्या अंगात अली होती , आमच्या घरात देवाचा धूप होता तो लावल्यावर तरी त्याचा खूप तिरस्कार करत होती ,सारखं धूप विझविण्यासाठी तेल्या भूत विनवणी करत होते , पण शेवटी एकया अटीवर भूत पळून जायला तयार झालं ते म्हणजे त्याची आवडती केळी , जेंव्हा आम्ही त्याला सांगितलं की बाबा रे तुला केळी टाकतो मग ते भूत जातो जातो म्हणून निघून गेले, आजीबाई च्या अंगावर चार थेंब पाणी शिंपडल्यावर आमची आज्जी पूर्ववत झाली आणि मराठी बोलू लागली आणि आम्ही सर्वांनी सुटकेच्या निश्वास घेतला. धन्यवाद....
( मी पट्टी चा लेखक नाहीय जमेल तसे लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न)