करणी....
घातापत...
नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला स्वतः पाहिलेले आणि ऐकलेले काही अनुभव कथन करणार आहे. हे अनुभव कदाचित भीतीदायक नसतीलही परंतु हे भुताखेतांशी आणि करणी ह्या प्रकाराशी निगडित आहेत असे मला वाटतेय. परंतु ह्यातून मला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची नसून ह्या मध्ये आलेल्या कथानकाचा आणि पात्रांचे कोणाशी साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
मला ज्योतिष ह्या विषयाची आवड असल्याने अनेकांना उपाय सांगताना मी घरात पाळीव प्राणी पाळायचे सल्ले देतो. कारण की माझ्यामते पाळीव प्राण्यांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते त्यामुळे आपल्यावर आलेले संकट ते दूर करतात.
साधारणतः ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या एक काकांचा खायच्या पानाच्या शेतीचा व्यवसाय आहे. त्यांची पाने पाकिस्तान ला निर्यात होतात. त्यावेळी त्यांचा व्यवसाय खूप तेजीत चालला होता कारण की पानांचा दर्जा हा उत्तम प्रतीचा होता. शेतीचे चांगले ज्ञान असल्या कारणाने पीक पण उत्तम यायचे आणि इतरांच्या प्रमाणात पानांचा भाव कमी आणि आकार मोठा असल्याने मागणी खूप होती. हल्ली माणसा माणसांमध्ये खूप असूया निर्माण झालेली आहे. जर कोणाचं काही चांगलं झालं की लोकांना ते पाहवत नाही मग काहीतरी बाहेरचे उपद्व्याप करून कोणाला कस जेरीस आणता येईल ते लोक पहात असतात. स्वतःला काही करायचे नसते आणि कोणी करत असेल तर त्यालाही करू न देता त्रास देणे ही हल्लीची प्रवृत्ती झाली आहे.
काकांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाळले होते. एक दिवस शेतात काम करत असताना अचानक काका जोरात ओरडले आणि खाली पडले. त्यांच्या तोंडातून फेस निघत होता. आजूबाजूची माणसे जमा झाली त्यांचा मुलगा धावत आला आणि त्यांना तपासून पाहिले असता त्यांच्या पायावर सापाने दंश झाल्यासारखी खूण होती. परंतु आजूबाजूला सापासरख्या काहीच खुणा नव्हत्या किंवा कोणीही सापाला पाहिले नव्हते. लगेच त्यांच्या मुलाने जखम झालेल्या जागेवर जरासे कापले व विष वाहून जाण्यासाठी जरासे रक्त जाऊ दिले आणि पायाला घट्ट पट्टा बांधला आणि तातडीने त्यांना नजीकच्या हॉस्पिटल ला घेऊन गेले.
काकांची शुद्ध हरपली होती. डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही ह्यांना आणायला खुप उशीर केलात ही केस गेल्यात जमा आहे. जरी अंगात धुगधुगी होती तरी विष पूर्ण शरीरात भिनले होते आणि काकांची नाडी हळूहळू क्षीण होत चालली होती. डॉक्टर म्हणाले की इथे काहीही होऊ शकत नाही तुम्ही ह्यांना ताबोडतोब मुंबईला हलवा. त्यांच्या मुलाने तंबोडतोब त्यांना मुंबईला हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. काकांचा मुलगा आणि आणखी एकदोन जण मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या घरी काकू आणि त्यांचा दुसरा छोटा मुलगा एकटाच असल्याने त्यांना सोबत म्हणून माझ्या आईने मला तिकडे जायला सांगितलं.
काकू इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होत्या. त्यांना झाला प्रकार माहीत होतं पण काकांच्या जीवाला काहीच धोका नाही असे त्यांना संगीतले होते. मी आतल्या खोलीत बसलो होतो इतक्यात रात्री साधारणतः १ वाजेच्या सुमारास काकूंच्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून मी धावत माजघरात जाऊन बघितले तेव्हा काकू त्यांच्याकडे असलेल्या फिश टॅन्क कडे भयचकित नजरेने पहात होत्या. त्यांना तसे पाहताना पाहून मीही तिकडे पाहिले असता मला असे दिसले की फिशटॅन्क मधले मासे एक एक करून शरीराला आचके देऊन तडफडत मरत आहेत. एक एक मासा मरत होता आणि खाली तळाशी जात होता आणि फुगून परत वर येत होता परत खाली जात होता. जेव्हा शेवटचा सोनेरी रंगाचा मासा जेव्हा मरून तळाशी गेला तेव्हा दोनच मिनिटे झाली असतील नसतील की मुंबईहून काकांच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणाला की...
बाबा आता आऊट ऑफ डेंजर आहेत असे जस्ट डॉक्टर म्हणाले. तो म्हणाला की पाहिले त्यांना जेजे ला ऍडमिट केलेले पण तिकडे पण डॉक्टरांनी हात वर केले आणि म्हणाले की आम्ही काही करू शकणार नाही तुम्ही ह्यांना कूपर ला घेऊन जा. कूपर हॉस्पिटल हे अकॅसिडेंट केसेस साठी प्रसिद्ध आहे तिकडे मिनिटा मिनिटाला माणसे येत असतात आणि मरत असतात. त्यांना कूपर ला आणले तेव्हा तेही केस घेण्यास तयार नव्हते तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी ऍडमिट करून घेतले. काकांना ICU मध्ये ठेवले होते आणि अगदीच काही वेळापूर्वी म्हणजे मी तुला फोन करायच्या ५ मिनिटे अगोदर अचानक बाबा आचके देऊ लागले. तंबोडतोब डॉक्टर आले त्यावेळी त्या ECG स्क्रीन वरच्या रेषा मंदावत चालल्या होत्या एक क्षणाला त्या सरळ झाल्या तेव्हा डॉक्टर म्हणाले की I M Sorry आणि अचानक बाबांनी परत मोठा आचका दिला आणि परत स्क्रीन वर रेषा वर खाली होऊ लागल्या. हे सर्व काही २ ते ३ मिनिटांत घडले होते.
डॉक्टर म्हणाले this is miracle say thanks to god. त्यांची प्रकृती आता स्तिर आहे. त्यानंतर लगेच मी तुला फोन केला, अस काकांचा मुलगा काकूंना म्हणाला. मला त्यावेळी त्यांचं फोनवर काय बोलणे झाले ते कळले नाही परंतु काकूंच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहून मी काय समजायचे ते समजलो. त्यानंतर काकूंनी पण त्याला इथे घडलेला प्रकार सांगितला त्याचे त्यालाही आश्चर्य वाटले असावे. त्यानंतर ४ दिवसांनी काकांना डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांनी सांगितलेली स्टोरी अशी होती...
मी ICU ला असताना मला खूप ग्लानी आली होती. आजूबाजूच्या हालचाली मला जाणवत होत्या, दिसत होत्या परंतु मला उठता येत नव्हते की बोलता येत नव्हते. अचानक मला असे दिसले की सगळीकडे मिट्ट काळोख पसरला आहे आणि त्या काळोखात दूरवर कुठेतरी लांब एक प्रकाशाची तिरीप येत होती. तितक्यात एक अक्राळविकराळ दिसणाऱ्या आकाराने मला सांगितले की तू काय वाचत नाहीस.. असे म्हणून मला फरफटत घेऊन जाऊ लागला त्यावेळी मला दिसले की मी माझ्या शरीरापासून लांब लांब जात होतो आणि माझ्या शरीराभोवती डॉक्टर आणि इतर सर्व जण जमून मला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्या आकाळविकराळ आकाराने मला सोडले आणि म्हणाला की आज तू त्या माशांमुळे वाचलास आणि असे म्हणून तो दातओठ खात निघून गेला. त्यावेळी त्याच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नव्हता पण आज कळतोय. तर मित्रांनो हा असा प्रसंग होता. त्यानंतर त्यांनी शोध घेतल्यावर कळले की काकांवर कोणितरी करणी केली होती. तो साप वगैरे चावणे हा त्याचाच भाग होता. धन्यवाद...