आज दिवसभर आभाळ मेंढी अभ्रानं झाकोळलेलं होतं.सर्वत्र झगार(पावसाची अंधारी)दाटलेली होती.मेघातून खळ्या गाळणं सुरुच होतं.बेमोसमी पावसाचं वातावरण माघात तुराटवाडीकरांना अनबक वाटत होतं. हे आभाळ सर्व रबीच्या पिकांचं नुकसान करेल असा विचार करत असतांनाच लोकांना पांडू राऊत गेल्याचं दुःख आभाळ करतंय असं वाटत होतं.सकाळी दहालाच चोळामोळा होऊन शाॅकनं शिजलेलं पांडुचं कलेवर नाल्याच्या काठी दहन करण्यात आलं. दिना शिंदे ,वसंत सामंत सोबतच आसवं गाळत परतू लागले. साऱ्या लोकासमवेत चंदरही परतला व प्रेतयात्रेकरिता आलेल्या वडिलांना पोहोचवण्यासाठी तालुक्याला घरी इच्छा नसतांनाही जावं लागलं.त्याला झिनीला भेटण्याची चुटबुट लागली होती.आई व वडीलांनी आज त्याला मळ्यात परतू दिलंच नाही. पांडूच्या मौतीनं गावात भितीमय वातावरण झालं होतं तर रात्री मळ्यात झिनी येईल म्हणून तो परतण्याची घाई करत होता.
दिना शिंदे घरी आल्याबरोबर पेग चढवत झोपी गेला.सायंकाळी तो आज डाॅ. वसंताकडं फिरकलाच नाही.संध्याकाळी पुन्हा अंघोळ करून तो न जेवताच चौकीवर गेला.
चौकीवर रघू मिसाळ,सिदप्पा जगताप हजर होताच.त्यांना त्याने खंबा व कोंबड्याची सोय करावयास लावली.कधीही ऊसाच्या कारखान्यातील मळीपासून बनणारी देशी, तर कधी मव्हाची कॅन,तर कधी व्हिस्की,ब्रॅन्डी, बीयर उपलब्ध केली जाई.चौकीच्या पुढं कनकाई डोंगराच्या घाटावर कनव्हाय पाॅईंट होता .तेथून घाट चढला की आठ-दहा किमीवर दुसऱ्या राज्याची सिमा लागे .परंतू याच रस्त्यानं ऊसाच्या ट्रक,भाकड गुराच्या गाड्या,गावठी मद्य तर कधी रानातील ऐवजाची वाहतूक चाले .म्हणुन दिना शिंदेचं चांगलच फावत असे.त्याची डाॅ. वसंत सामंत व इतर अनेक मोठ्या राजकीय, सामाजिक,हस्तीत कायम उठबस चाले.
चौकीवरच त्यानं बराच वेळ पित पांडूबाबत विचार करत घालवला.तिकडं कोंबडं फटकारलं गेलं.जेवण आटपून
सिदप्पा, व मिसाळला घेत महिंद्रा जिप नं गस्तीला घाटाच्या कनव्हाय पाॅईंटकडं एखादं बकरं मिळतं का म्हणुन तो निघाला.जीप चौकीपासुन उत्तरेला घाटाकडं निघाली.तेथून दोन अडिच किमीवर पराटखेड्याचा फाटा फुटे तर सरळ पुढे जाऊन घाट लागे.अजुनही टपोरे थेंब अधुन मधुन पडतच होते.हवेत गारवा होता.चांद आज मेघाआडच होता.मिसाळ गाडी चालवत होता.तुराटखेड्याची वस्ती मागे पडताच सुनावा लागला.मध्येच एखादा ऊसाचा ट्रक येई.गाडी घाट जवळ करु लागली.तोच गाडीच्या उजेडात रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर बाई चालत असल्याचं लक्षात येताचं शिंदेनं मिसाळला इशारा करत गाडी उभी करायला लावली.कचकच करकर आवाज करत गाडी उभी राहिली.गाडीच्या उजेडात विशी -बाविशीतली पोटूशी सुंदर बाईला पाहताच शिंदेला थंडीतही झिंग वाटली.
"कोण गं तू?आणि या बेवक्ती कुठं चालली",शिंदेनं दरडावून विचारलं.
"मी रख्मा!ऊस तोडणीला आलोत जी!अनकाई टेकाडावर तांडा पडलाय आमचा!तुराटखेड्यात गेली होती"
ऊस तोडणीचा सिझन असल्याने रानात अनेक तांडे मुक्कामाला असतात हे शिंदेला ठाऊक होतं.कधी दळण दळणं,बाजार करणं, तर कधी गाडी भरून ते मुक्कामाच्या ठिकाणी परतत पण एकटी बाई इतक्या उशिरा सहसा नाही.
"ते ठिक पण कशाला गेली होती गावात ?इतका उशीर का?सोबत कुणीच कसं नाही?"शिंदेनं पोलिशी खाक्यानं सरबत्ती सुरू केली.
"जी दिस गेलेत!बरं नव्हतं गावातल्या डाॅक्टराकडं गेली होती.त्यांनी सलाईन चढवली गुंगी आली झोप लागली.मग बराच उशीर झाला."
शिंदे आता गाडीतनं खाली उतरत हात झटकत बाईकडं बारकाईनं पाहू लागला.
"डाॅ.सामंताकडं गेली होती का?,सोबत कोण होतं?"
"जी.डाॅक्टर वसंत सामंत असंच नाव होतं.आमचे घरचे सोबत होते पण सलाईनला उशीर होईल म्हणून डाॅक्टरांनीच त्यांना तो पावेतो तुमची इतर कामं करून दोनेक तासांनी या असं सांगत त्यांना पाठवून दिलं बाहेर.मग मला जाग आली तेव्हा सलाईन संपली होती व घरचे ही इतर कामं आवरत परतली होती.मग निघालो पण त्यांनी तु चाल पुढं मी येतोच मागणं असं सांगत दारूच्या गुत्त्यावर बसुन गेले.येतीलच आता ते.तो पावेतो मी हळूहळू येथपावेतो आली.जर का एखादं वाहन आलं की मी जाईन पराटवाडीकडंन टेकाडावर." बाई शिंदेच्या नजरेत नजर टाकत उत्तरली.
साला वसंतानं पांडु मरायला काही तास होत नाही तोच या बाईची 'झिनीसारखीच गत केली.काय लोचट माणूस आहे हा.हिला वाटतंय आपल्याला सलाईनची गुंगी आली पण त्यानं हिला गुंगीचं औषध देऊन हिच्या दादल्याला बाहेर पिटाळलं..."
त्यानं पुन्हा बाईकडं हेतूपुर्वक पाहताच पुसटशा उजेडातही वसंताला ही दोष देऊन उपयोग नाही हे मनोमन ताडलं.बाई त्याच्याकडंच पाहत होती.
"तुराटवाडीहून जवळचा रस्ता सोडून फेऱ्याच्या रस्त्यानं का जातेय" आता रघू मिसाळानं गाडीतूनच दरडावत विचारलं.
"जी त्या रस्त्यानं फडातून जनावराची भिती वाटते जी!शिवाय हा फेऱ्याचा असला तरी सुरक्षित व वाहन भेटेल म्हणून"बाईनं शिंदेवरची नजर स्थीर ठेवत रघूकडं न पाहताच सांगितलं.
"ठिक आहे पुढं फाट्यावर तुझा नवरा येईपर्यंत थांब मगच जा.एकटी नको जाऊ"सांगत मिसाळाला गाडी स्टार्ट करायला लावली पण गाडीत बसतांनाही त्याला वसंताचा हेवा वाटला.
घाटावरील कनव्हाय पाॅईंटवर शिंदेनं आणखी रिचवली.थोडं थांबल्यावर त्यानं मनात काही गणित जमवत सिदप्पाला व मिसाळाला जास्तीची पाजत तिथंच प्यायला बसवलं.त्यानं गाडी स्टार्ट करत "हेल्यांनो किती प्याल !प्या मी चाललो गस्तीला"म्हणत गाडी चौकीकडं हाणली.
पण चौकीच्या रस्त्यावर पराटखेडे फाट्यावरच त्यानं गणित आखल्याप्रमाणं म्हणा वा बाईचं नशीब थोर म्हणा तिच रख्मा त्याला उभी दिसली.
"गाडी थांबवत "काय गं तू अजून गेलीच नाही का?नी तुझा नवरा अजून आलाच नाही का?"
"कसं जाणार!तूम्हीच तर म्हणाले होते की एकटी जाऊ नको,नवऱ्याची वाट पहा, नी आमच्या माणसाचं कसं असतं साहेब की एकदा गुत्त्यात बसले की त्यांना पोरंसोरं,बाई ,संसार साऱ्यांची याद पडते"
शिंदेला तिच्याकडं पाहून इतकी सुंदर बाई नी रानावनात ऊस तोडतेय!काय नशीबाचा खेळ असतो.
"चल बस गाडीत मी पोहोचवतो तुला"
रख्माला मनोमन' आपण टाकलेले दाणे टिपण्यासाठी पाखरू पुढं सरसावलंय'याची जाणीव झाली.म्हणून शिंदेनं मागे बसायची खुण करूनही ती ड्रायव्हर सीट जवळ पुढेच बसली.
शिंदेनं फाट्यावर गाडी वळवत पराटखेड्याकडं न वळवता घाटाकडंच नेली.
"साहेब फाटा मागं चाललाय नी आपण गाडी कुठं नेताय?"रखमा वरवरचं आश्चर्य व भिती दाखवत विचारू लागली.
"घाबरू नको हा रस्ता कनकाई डोंगरावरनं पराटखेड्यावरून अनकाई टेकाडावरच जातो.फेऱ्याचा आहे पण माझी गस्त पण होईल व तुला पोहोचवणं पण"शिंदे रख्माकडं पाहत म्हणाला.
"जी कुठूनही चला पण लवकर पोहोचवा"रख्मा सीटवरनं जवळ सरकत म्हणाली.
घाटातल्या कनव्हाय पाॅईंटच्या अलिकडनं कनकाई डोगरात वरच्या निर्जन जंगलात जाणारी एक आडवळणाचा कच्चा रस्ता होता.त्याकडं शिंदे गाडी नेऊ लागला.आता बारा वाजायला आले असतील.नभातलं मेंढी आभाळ आता विरत होतं व थोडी कोर कमी चांद आकाशात आपला रुपेरी प्रकाश सांडू लागला.तशा घडा घडानं चांदण्या नभाला लगडू लागल्या.डोंगराच्या पोटा पोटानं कोरलेला रस्ता गाडीला वर वर नेत होता.आजुबाजूला पक्व होऊन पिवळं झालेलं रोशा गवत वाऱ्यावर लाटेप्रणानं डुलत होतं.वरती डोंगरावर सागाची झाडं तर खालच्या अंगाला मध्ये मध्ये मव्हाची व आंब्यांची झाडं ओल्या अंगानं कुडकुडत शांत उभी होती.आता शिंदेचा हात गियरवरनं रखमाकडं सरकत होता तर रखमा ही मंद हसत त्याच्याकडं पाहत सरकत होती.
"किती सुंदर वातावरण आहे!"रखमा म्हणाली.शिंदेला तेच हवं होतं
वरती पठार लागताच शिंदेनं गाडी उभी केली.
"साहेब रस्ता चुकलात वाटतं?"रख्मानं विचारलं.
कारण मिळताच"तसंच वाटतं!पण तू घाबरू नको इथून जरी गाडी पुढं जाणार नाही पण पायवाटेनं थोडं उतरलं की आलंच तुमचं ठिकाण",शिंदे म्हणाला व तिचा हात पकडत तिला खाली उतरवलं.
पकडलेला हात तसाच ठेवत ती त्याच्या सोबत चालत पायवाटेनं उतरू लागली.
"असंच चालत रहावं आपल्यासोबत या चांदणचुऱ्यात!"रखमा आपला श्वास वाढवत म्हणाली.
"काय गं तुझ्या बोलण्यावरून व दिसण्यावरून तू ऊस तोडणारी मजूर वाटत नाही!"
"मग?"
रख्मा थांबत हसत विचारती झाली नी शिंदेचा दारूच्या झिंगेतला संयम खचू लागला त्यानं तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.
त्याला थांबवत " पुढं मोहोळ आंबा आहे.निवांत त्याच्या खाली बसू." रख्मा म्हणाली.
"का गं तुला कसं माहीत मोहोळ आंबा?"दारूत असला तरी शिंदेला प्रश्न पडलाच.
"साहेब आम्ही रानोमाळ फिरणारी माणसं,ज्या गावात जातो तिथली सारी माहिती भटकतांना आपोआप कळत, समजत जाते"रख्मानं त्याचा हात घट्ट दाबत आंब्याची वाट धरली.
मोठा विस्तारलेल्या या जुन्या झाडावर कायम आग्या मोहोळाची गाड्याच्या चाकाच्या आकाराची दोन तीन पोळे कायम असायची.मधमाश्याच्या भितीनं सहसा कुणी या आंब्याजवळ दिवसा येतंच नसे.
शिंद्याला आता थंडीनं दारुची किक बसायला सुरुवात झाली होती.गाडीतली बिनतारी संदेशयंत्रणावरचे संदेश ही त्याला समजत नव्हते व तो आंब्याकडं आल्यावर अंतरामुळं ते ऐकू येणं ही बंद झालं.
वातावरणात थोड्याशा पावसानं व उंचावरच्या ठिकाणामुळं जोराची थंडी व धुकं उतरू लागलं.तसा शिंदे रखमाला चिकटू लागला.
"थंडी वाजते हो. आधी काही तरी पेटून जाळ करा"रखमा लाडात येत म्हणाली.
"अगं वरती मोहोळाची पोळी आहेत.जाळ केल्यानं उठलेत तर ?"शिंदे त्या ही अवस्थेत थोडी सुध सांभाळत बोलला.
"हवं तर आब्यांच्या झाडापासून दूर करा जाळ"रखमानं आता त्याला जवळच ओढलं होतं.
त्यानं हा ना म्हणत काड्या व पालापाचोळा गोळा करायला सुरवात केली. दिवस भराच्या पावसाच्या टपोऱ्या थेंबानं पाचोळाही ओला होता.म्हणुन आंब्याच्या खालचा पालापाचोळा व काड्या गोळा करून झाडापासून लांब अंतरावर नेला पण तरी वासनांध शिंदेला वारा काय करणार होता हे कळतच नव्हतं.
खिशातनं लाईटर काढतांना पडलेला मोबाईल रख्मानं न कळू देता बंद करून दूर गवतात भिरकावला. लाईटरनं शेकोटीनं पेट घेतला तसा शिंदेचा आतील जाळ ही चेतू लागला पण रख्माचा सूडाग्नी त्याहून जोरात पेटला.शेकोटीनं जोराचा धुराचा गराडा करत वाऱ्यानं धूर आंब्याच्या झाडाकडं वेगानं वाहू लागला.तशा आंब्याच्या झाडावरील मोहोळातील मधमाशा भणाणल्या.त्या वेगानं शिंदेकडं झपाटल्या. एक, दोन, दहा, शंभर, हजारो मधमाशा क्षणात शिंदेच्या मदणाने पेटलेल्या शरिराचा चावा घेऊ लागल्या.रख्मा लाल होत त्याला गच्च मिठी मारत "मेल्या कुत्र्या दिन्या ओळखलं का मला?पोटुशा पोटावर पोलीशी दंडुक्यानं मारत होतास ना तू!लांडग्यांनो सारी आग शांत करूनही ,लचके तोडून ही माझ्या पोटावर किती वार केलेत रे तुम्ही?"
या बोलण्यानं शिंदे शुद्धीवर येत क्षणात धुंदी उतरवत विचारू लागला.
"कोण झिनी तू?"
"कुत्र्या, हो .मी झिनीच!"
मधमाशांना हाकलत सैरावैरा लोळणाऱ्या शिंदेला मधमाशांच्या चाव्यापेक्षा 'झिनीचा हा डंख जिव्हारी लागत होता.
तो इकडे तिकडे पळू लागला.पण झिनीनं -पारध्यानं सशाचं मानगुट पकडावं तसंच त्याचं मानगुट पकडत त्याला हवेत उचलून धरला.धूराचा गराडा वाढला तशा साऱ्या मधमाशा तूटून पडल्या.तो हवेत कपडे फाडत लाथा झटकू लागला.
"मेल्या पांडू कुत्र्याच्या मौतीनं ही तुला सुध आली नाही.वसंताच्या सलाईनचं नाव काढताच झिनी आठवली तरी तू जाळ्यात अडकला.मर आता."
हजारो डंखांनी तो विव्हळत फाटलेल्या खिशात मोबाईल शोधू लागला. तो न मिळताच गाडीकडं जाता यावं म्हणुन केविलवाणा प्रयत्न करू लागला पण झिनीची हाताची पकड ढिली झालीच नाही.
पहाटे पहाटे साऱ्या गांधीलमाशा, मधमाशा आपले काटे शिंदेच्या कपडे फाटलेल्या शरिरात सोडत पसार झाल्या झिनीनं त्याला आंब्याखाली आणत काठीनं पोळं फोडलं तसं मधाची धार खाली शिद्याच्या शरिरावर पडली.उशिरानं रानातलं अस्वल फिरत फिरत वासानं आलं.पण त्यानं मधासोबत त्राण शिल्लक असलेल्या शिंदेच्या हालचालीनं चवताळत हाताच्या पंज्यानं ओरबाडत नाक कान तोडले,डोळे फोडले नी झुंजूमुंजू होताच रानात पळालं पण त्या आधीच झिनी चंदर नसलेल्या मळ्यात मिरचीतल्या बुजगावण्यात विसावली.पुढे डाॅ. वसंताचचे उपचार घ्यायला तिला जायचं असल्यानं.
सकाळी सकाळीच मिसाळ व जगतापांनी शिंदेला बिनतारी संदेश वरून व नंतर मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ झाल्यानं ते मिळालं त्या वाहनानं चौकीत व नंतर गावात परतले.घरी पण तपासाअंती शिंदे न मिळाल्याने पुलीस यंत्रणा व घरचे चक्रावले. दुपार पर्यंत फिर फिर फिरल्यावर कनकाई डोंगरावर जीप मिळाली व नंतर मोहोळ आंब्याखाली शिंदेचं मधमाशांनी चावलेलं व नंतर अस्वलाने फाडलेलं कलेवर...
लगातार दोन दिवसात दोन घटनांनी तुराटवाडी सुन्न झाली.पण तरी साऱ्यांना अपघातच दिसत असल्यानं पोलीसात जाण्याचा प्रश्नच नव्हता.
चंदर सायंकाळी आला व शिंदेंची प्रेतयात्रा आटोपत सरळ मळ्यात परतला व कालचक्रात कोण कधी व कसा जाईल हे कुणीच सांगू शकत नाही असा शाश्वत विचार करत रात्र केव्हा होईल व झिनी केव्हा येईल याची आतुरतेने वाट पाहू लागला.
पण....
वसंता....?
त्याला पांडू व शिंदे दोन दिवसात अचानक गेल्यानं शंका आली पण आपणच प्रकरण उकरलं तर आपणच उघडं पडू म्हणुन शांत बसायचं ठरवूनही जिवाला शांतता लागत नव्हती...

क्रमश:
✒ वासुदेव पाटील.