झिनी
भाग::-- चौथा
रात्री पुन्हा जोरदार गारासहीत बेमोसमी पाऊस बरसू लागला.वादळ, विजा, मेघाचा घनघोफ घुमू लागला.अनकाई- कनकाई डोंगराकडनं तीव्र प्रकाशाचा लोट चाटून गेला नी सारं शिवार दणाणलं.गारांनी मिरच्यांनी लगडलेल्या डहाळ्या जमिनदोस्त होऊ लागल्या.बोरांचा, पानाचा पथारा जमिनीवर पडत पाण्यात वाहू लागला तर काही वादळात उडू लागला.पण चंदरला होणाऱ्या नुकसानीपेक्षा व राऊत ,शिंदेच्या जाण्याच्या दु:खापेक्षाही आज झिनी पावसाची मळ्यात येईल की नाही याचीच जास्त काळजी वाटत होती.आज ती आली म्हणजे तिला सारं विचारायचंच या निर्धारानं तो वादळी बेमोसमी पावसातही मळ्यातील झोपडीत वाट पाहत बसला होता.आज त्यानं घेतलीच नव्हती.कारण दोन दिवसात गावात झालेल्या मौतीनं अड्ड्याकडं जाणं त्याला शिस्तीचं वाटलं नाही.
अकरा -साडे अकराला आकाश खुललं व घडीचा स्च्छ धुतलेला नितळ चांद दिसू लागला.तशी ऊसाच्या फडाकडनं छनछन कडकड घुमली.चंदर बाहेर आला.थंड वाऱ्याची जोरदार लहर त्याच्या अंगात दौडली.नाल्याकडनं टिटिव टिटिव आवाजाची कर्कशता घुमताच झिनी ओल्या वाटेवरनं येतांना दिसू लागली.त्याची धडधड वाढली.
झिनी ओलेत्या वस्त्रात चांदाच्या फिकत आभेत रमणीय वाटत होती.
"इतक्या पावसातही आलीस?"चंदरला ती आल्याची खुशी वाटूनही काहीतरी विचारून त्यानं बोलण्यास सुरवात केलीस.
"गावात जायचं होतं वसंता डाॅक्टराकडं!"
"अगं आज जाऊनही ते भेटणार नाही तुला!कारण गावात काल व आजही मौत झालीय"
"माहितीय मला पण तरी जाणं भागच होतं. पण त्या धावजीबानं काहीतरी गडबड करु ठेवलीय" झिनी विरुद्ध दिशेला तोंड फिरवत दात ओठ खाऊ लागली.
"झिनी! ये झोपडीत ,किती तरी कालखंडानंतर भेटतोय आपण !परवा ही घाईत निघून गेली.सांग ना तू इथं कशी आलीस ?"
"चंदर साऱ्या आयुष्याचा फालुदा झालाय बघ!काय सांगू तुला?"
"अगं पण शहरात राहणारी नी या आड रानात कशी?"
"अरे आडरानात म्हणजे लग्न झालंय माझं लाखाशी!पण चंदर लग्न होऊनही...,"झिनी काहीतरी टाळत होती.
लग्न म्हणताच चंदरला एकदम भकासपणाची जाणीव झाली.
त्यानं झिनीचा हात हातात घेण्यासाठी आपला हात पुढे केला तोच चटका बसावा त्या वेगानं झिनी झोपडीच्या कुडाकडं मागं सरकत "चंदर नको ,खाक होशील!"म्हणाली
"झिनी!ऐक , सविस्तर तरी सांग."
झिनीच्या डोळ्यात धारा वगळू लागल्या. तिला कुठून सुरूवात करावी व कुठपर्यत बया करावं हे कळेना.
.
.
.
शांत..

स्तब्ध
.
.
.
झिनीनं सुरुवात केली.
बापानं दुध प्यायला येणाऱ्या पोराकडं पोर झुकतेय हे लक्षात येताच अल्लड पोरीला समजावण्याचा प्रयत्न केला पण झिनी जरी काही बोलेना तरी पोराचं आकर्षण ही कमी होईना.म्हणुन बापानं तडकाफडकी काही निर्णय घेतला.त्याच्या डेअरीवर लाखा नावाचा अनकाई टेकाडावरचा मुलगा दुध पोहोचवायला येई.काठेवाडमध्ये बापाचा चांगला जम.पण पुर्वापार व्यवसाय म्हणुन लाखा दोन-तीनशे गाई सांभाळत दुधाचा व्यवसाय करी.मुलगा सुस्वरुप व हुशार.बापानं याच्याशी झिनीचं लगोलग लग्न लावून दिलं.
झिनीनं भरपूर कालवाकालव व विरोध केला.बापाचा मारही खाल्ला पण व्यर्थ.झिनी लग्न करून अनकाई टेकाडावर आली.
लाखा लग्नाच्या एक वर्ष आधी आजारी पडला होता.जवळपास एक महिना.वाचणार की नाही अशी गत तेव्हा आई-बापांनी त्यास कुलदैवत देवीवर नेत "देवीमाता पोरगा वाचू दे संसार फुलू दे लग्नानंतर कोऱ्या जोडप्यासहित दर्शनाला यात्रेत पाठवू"असा नवस बोलले व औषधोपचार ही केले.लाखा सुधरला .लग्नानंतर देवीची यात्रा अजुन चार महिना होती.म्हणून लाखास त्याबाबत जाणीव करून देत पथ्य बाळगण्यास सांगितले.लग्नानंतर झिनी या आडरानात आली पण उघड्यावरच्या या भटक्या जिन्याची तिला अजिबात सवय नसल्यानं पाणी, गाई- गुरांचा वास, डास यानं आठ दिवसात ती आजारी पडली.
लाखानं तिला आपल्या फटफटीनं तुराटवाडीतल्या वसंता डाॅक्टराकडं नेलं.
वसंता नी लाखाचे जवळचे संबंध होते.कारण डाॅक्टराच्या शेतात लागणारं खत लाखाकडून पुरवलं जाई.तसेच शेतीकामास लागणारे गोऱ्हे ही लाखाकडुनच विकत घेतले जात.दुध घेतलं जाई.बदल्यात सामंताच्या मळ्यातलं पिण्याचं पाणी रात्री पहाटे केव्हाही भरण्यास लाखा व इतर काठेवाडींना सुट होती.तसेच साऱ्या जंगलात ऊस तोडल्यावर वा केळ्याचा पाडा पडल्यावर गुरांना चराई करता येई.म्हणुन लाखा व डाॅक्टर यांच्यात घरोब्याचे संबंध होते.
झिनीला दवाखान्यात सध्याकाळी लाखानं नेताच दोघांना राहत्या घरून आधी जेवण झालं मग वसंतानं झिनीला दवाखान्यात सलाईन लावली.लाखास दूध द्यायला जायची घाई असल्यानं त्यास जायला लावलं.सलाईन मध्ये कसली कसली इंजेक्शनं मिसळली गेली तशी नव्या नवेली नवरीस -झिनीस झोप दाटली.दोनेक तासांनी सुध आली तेव्हा अस्ताव्यस्त केस व कपडे सावरत झिनी उठली.तोच लाखा आला .परततांना वसंतानं "वहिनीस विषमज्वर झालाय .चार पाच दिवस सलाईन द्यावी लागेल लाखा.दररोज याच वेळी आण.दिवसा गर्दी असते"सांगत भरल्या तृप्त मनानं निरोप दिला.झिनीची झोप होऊनही अंग ठणकू लागलं.रस्त्यात लाखा तिला डाॅक्टर व माझे संबंध किती चांगले आहेत याबाबत वाडा येईपर्यत गोडवे गात होता.झिनी लागणाऱ्या दचक्या बरोबर पुढे सरकताच देवीचा नवस आठवून लाखा अंतर राखत होता.यात्रेत नवस फेडे पर्यंत कोरं झोडपं राहण्यासाठी.पण पुढचे चार दिवस वसंताची ट्रिटमेंट मात्र तशीच सुरू राहिली.जी लाखालाच काय पण झिनीला देखील समजली नाही.चार दिवसात तब्येतीत उतार न मिळाल्याने लाखानं झिनीला तिच्या माहेरी नेलं व चांगल्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवलं. विषमज्वर व मलेरिया नं पुर्ण बरी व्हायला झिनीला पंधरा वीस दिवस गेले.त्यानंतर आराम करत दिड एक महिन्यात झिनी परतली.
झिनी येताच डाॅक्टरच्या आता अनकाई टेकाड्यावर दुध घेण्यासाठी, खत घेण्यासाठी तर उगाच लाखाला भेटण्यासाठी वारंवार फेऱ्या होऊ लागल्या.ही बाब त्याचे मित्र पांडू व शिंदेलाही समजली.ते ही झिनीला व तिचं सौंदर्य पाहण्यासाठी वसंता सोबत घिरट्या घालू लागले.निष्पाप झिनीला वसंताची नियत कळायला बरेच दिवस लागलेत.निसर्गानं आपलं दान देण्याचं कर्तव्य चोख बजावलं.झिनीला उलट्या होऊ लागल्या.दुपारी एक दोन म्हाताऱ्या वगळता सारी गुरामागं गेलीली.नेमका त्याच वेळी वसंता गाडीला बॅग अडकवत पराटखेड्याकडनं परतत वाड्यात आला.उलट्या करणाऱ्या झिनीला म्हतारीने त्यास दाखवलं त्यानं तपासणी करत "वहिणी आनंदाची बातमी लाखास लवकर कळवा "म्हणत इंजेक्शन भरलं व एका हातात घेत दुसऱ्या हातानं..
झिनीला वसंताचे शब्द झिणझिण्या आणत असतांनाच वासनांध स्पर्शाची जाणीव झाली.क्षणात ती वाघिणीगत चवताळत वसंताची घाणेरडी नजर ओळखताच तिनं हातातलं इंजेक्शन झटक्यात आपल्या हातात घेत गुराच्या डाॅक्टरानं बैलाच्या ढोपरावर सुई मारावी तशीच क्षणात वसंताच्या कमरेत इंजेक्शन खचकन मारत वसंता कळ येऊन बोंबलत नाही तोच दोन चार मुस्काटात लगावत कनातीतून बाहेर आली.
वसंतानं इंजेक्शनची सुई काढत कमर व गालफडं गुपचुप चोळत नाटकी हसू आणत बाहेर येत म्हतारीला वहिणीस दिवस गेल्याची बातमी देऊन खाल मानेनं गाडीला कशीबशी किक मारत निघून गेला.
झिनीला वसंताचं कृत्य व त्यानंतर दिवस गेल्याची बातमी ऐकून छातीत धस्स झालं.लाखानं कधी हात लावला नाही.चंदरनं तर कधीच नाही.ना आपण कुठं शेण खाल्लं मग हे कसं?यानं तिच्या मेंदूला झिणझिण्या आल्या.
संध्याकाळी म्हातारीनं सांगताच सारेजण लाखास तुच्छतेनं पाहू लागले.निदान यात्रेपावेतोही लाखानं पथ्य पाळलं नाही म्हणून त्यास कोसू लागले.पण त्यानं मौन पाळत रात्री झिनीला फैलावर घेतलं.
"झिनी सांग कुणाचं पाप हे?"
रागानं गच्ची आवळत तो गरजला.
झिनीनं डोळे वर चढवत दोन्ही हातानं हाताची पकड सोडवत "लाखा,तुझीच काय पण माझ्या आई-वडिलांची आण घेऊन सांगतेय मी घाण खाणारी अवलाद नाही,पण माझं मलाच कळत नाही की नेमकं काय घडलंय"
झिनीनं जीव तोडून सांगितलं पण लाखाचा विश्र्वास बसला नाही .त्यानं तिला जोराची लाथ घालत रागात बाहेर पडला.अंधारात तो किती तरी वेळ मुसमुसत रडला.पण त्यानं सारा दोष आपल्यावर घेत 'आपला संयम सुटला,आपण देवीचा नवस फेडेपर्यंत थांबलो नाही'असं दर्शवत चार चौघात झिनीची इज्जत वाचवली.पण झिनीला मात्र कायमचं दूर केलं.
त्या दिवसापासून तो झिनीला गुराचं आवरणं, सामंताच्या मळ्यातून रात्री पहाटे केव्हाही पाणी आणणं तर कधी तुराटवाडीत गुरांच दांड भरडण्यासाठी चक्कीवर पाठवणं अशी कष्टाची कामं सोपवत त्रास देऊ लागला.जेणेकरून ही माहेरी जाईल व आपण मोकळं.पण झिनीनं ही जिद्द बांधली आपण पाप केलं नाही तर मग हा दाग घेऊन नाहीच जायचं माहेरी.
लाखा वेड्यागणच राहू लागला.काम करणं ही बंद केलं .वाड्यावरच्या लोकांना खात्री झाली की देवीनंच याला पापाची शिक्षा दिली असावी व झिनीलाही मिळेलच.
इकडे वसंता झिनी एकटी कसी सापडेल याचा प्लॅन पांडू व दिना शिंदेला लावून आखू लागला.
मळ्यात रात्री झिनी पाणी भरायला केव्हा येते हे वसंतानं पाळत ठेवून जाणून घेतलं.पांडू दिनाला सोबत घेत कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी शिकार करायचं ठरवलं.मळ्यात दुध लाखाकडूनच आणलं.धावजीबाला आज मळ्यातून घरी पाठवत सुट्टी दिली.तिघांनी दुध तापवत ठेवलं.पुनवेचा चांद आकाशात चांदणचुरा पेरत चढू लागला तसे हे ही तर्र झाले.दूध तर तापतच होते.दहा अकराच्या सुमारास पोटूशी झिनी डोक्यावर कमरेवर हंडे घेऊन आली.कोकरू येतंय याचा सुगावा लागताच जाळ मालवत यांनी दुधाचं पातेलं आडोशाला ठेवत तिन्ही लांडग्यांनी ऊसाच्या फडात दबा धरला. तीन लांडग्यांनी मिळून एका कोकरूची हारीनं निर्दय पणे शिकार केली.लचके तोडले.झिनी आरडा ओरडा करु लागताच तोंड बांधण्यात आलं.
"अरे या कोकरूस माहित नसेल पण दवाखान्यातच गुंगीचं औषध देऊन चार दिवस पारध केलीय मी पांडू!"वसंता बाजुला होत सांगत होता.सुध हरपायला आलेल्या झिनीला हे ऐकताच पोटातलं पाप कुणाचं हे समजलं.
आडोशाला ठेवलेल्या दुधात चांद पुर्णाकृती दिसेपर्यंत लांडग्यांचं ओरबाडणं सुरूच होतं.कोकरू अखेरचा दम टाकू लागताच लांडगे शुद्धीवर आले.त्या ही स्थितीत झिनी उठली व उसाच्या फडातून सरकत वाड्याकडं परतू लागली.लांडगे आता पातेल्यातलं दूध पित थोडा वेळ बसले.
झिनी निसटली.तिला आपल्यावरचं लागलेलं लांच्छन लाखास सांगूनच हा देह ठेवायचा होता.
दूध पिऊन लांडगे परतताच त्यांना जागेवर कोकरू दिसेना.ते घाबरले.ही जर परतली तर वाड्यात बातमी पसरेल म्हणून त्यांनी फडात शोधायला सुरुवात केली.
एव्हाना काही झालं तरी परतायला उशीर का म्हणून लाखा तिकडनं नाल्या पर्यंत झिनीचा तपास करायला येतच होता.चांदण्यात लाखा दिसताच झिनीनं हंबरडा फोडत लाखास "लाखा, घाण मी नाही खाल्ली रे!पण तुझ्या या हरामी मित्रानं ......,"सारं बया करत ती हाफू लागली.
लाखानं सारं ऐकताच झिनीला छातीशी लावत तो ढसाढसा रडू लागला.पण क्षणात अंगार फुलावा त्या प्रमाणं हाताला सोटा सावरत त्यानं झिनीला तेथेच बसवत मळ्याकडं दौड धरली.
झिनी त्याला परत फिरवू लागली पण तो पावेतो तो निघून ही गेला.
तोच ऊसाच्या फडातून दुसऱ्या बांधाकडनं हे तिन्ही लांडगे झिनीजवळ आले.झिनी मोठ्या कष्टानं उठत पळण्याचा प्रयत्न करू लागली पण
पण..
पांडू व दिनानं पोठावरच काठ्या टाकत झिनीचा श्वास तुटेपर्यंत बेदम मारलं.
मळ्यात हे न दिसताच लाखा परतू लागला.तोच फडातून अचानक हल्ला झाला.एकीकडं तीन मदमस्त लांडगे तर दुसरीकडे लाखा एकटा तरी लाखानं त्यांची डोस्की फोडत तिघांना मारूतीगत लाल केलं.पण वर्मावर मार बसताच लाखानं ही लोळण घेतली .मग बराच वेळ मार बरसतच होता.
नंतर त्यांनी त्याला उचलत नाल्या पल्याड खोल खड्डा करत पुरला.व नंतर झिनीला उचलत वसंताच्या मळ्यात व सराफाच्या मळ्यात जो सामाईक बांध होता त्यात एक नाल्याची वहन होती.त्यातून यांच्या शेतातली माती व खत सराफाच्या मळ्यात वाहून जाई म्हणुन सिमेंट चा बंधारा बांधण्याचं काम चालू होतं.त्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात टाकत झिनीला पुरलं.
पहाटे तिन्ही लांडगे टेकाडावरच्या वाड्यात परतत त्या लोकांना झिनी तिच्या माहेराकडच्या कुणा माणसाबरोबर सापडली म्हणुन लाखानं तिला जागीच तोडली.तो माणुस पळून गेला असं लाखाला वाटलं पण अंधारातून त्यानं परतत लाखालाही उडवलं.दोन्ही प्रेतं पुरलीत.आम्ही मळ्यात कोजागरीसाठी थांबलो होतो उसाच्या फडात लपुन सारं पाहिलं.
वाड्यातली माणसं बिथरली.त्यांना यांनी उलटसुलट सांगत जास्त घाबरवलं.शेवटी सकाळ होताच त्यांनी तालुक्यातून गाड्या आणत सामान भरलं व काठेवाडात प्रयाण केलं.बाकी माणसांनी गाई हाकलत नेल्या.उगाच पोलीसाचा ससेमिरा नको.झिनी व लाखा देवीच्या कोपाने वा त्यांच्या पापानं गेलेत असा समज करून मूग गिळत निघून गेले.तर झिनीच्या वडिलांनी हे चंदरचंच काम असावं समजत तो ही काठेवाडात निघून गेला.
झिनीनं बया करताच चंदरच्या डोळ्यात अश्रूंसोबत आग वाहू लागली.
पांडू व दिनाला देवानं बरोबर शिक्षा दिली असं त्याला वाटलं पण ते झिनीलाच ठाऊक होतं.
वसंता आता तुला मी ही सोडणार नाही चंदर गरजला.झिनीला तेच हवं होतं.चंदरची मदत.धावजीबानं गोंधळ करून ठेवला होता . नाही तर तिनंच वसंताचा एव्हाणा बार भरला असता.

अनकाई कनकाई डोंगराकडनं सरकलेल्या विजेच्या लोडानं तिचं काम सोपं केलं होतं .आता चंदर तिच्या सोबतच राहणार होता.
क्रमश:.......
✒वासुदेव पाटील.