धावजीबा आज अचानक न सांगता लेकीच्या गावास निघून गेल्यानं चंदरला दुपारीही मळ्यातच थांबावं लागलं.दिवसा ऊस तोडणी करणारे मजुर मळ्यावर पाणी भरायला हमखास येत.कारण नाल्यापल्याड इरिगेसनच पाणी असल्यानं शिवाऱ्यातल्या जवळपास सर्वच विहीरी बंद होत्या व सामंताच्या मळ्यातील विहीरीचं पाणी गोड असल्याचं सालोसाल येणाऱ्या उसतोडणी मजुरांना माहीत असल्यानं पिण्याचं पाणी येथुनच नेत.अनकाई टेकाडावरचे काठेवाडी बायाही कायम येथेच येत.चंदरचं पुर्वापार गाव असलं तरी तालुक्याला राहणं व त्यात शिक्षणा निमीत्तानं बाहेर म्हणुन गावाशी आताच नव्याने ओळख होत होती.मळा घेतल्यावरही मेडीकलवरच थांबत असल्यानं पुर्वी मळ्यात ही वडीलच थांबत.
माघी पाडव्याचा चांद कालपेक्षा उशीरा उगत होता.थंडीही मळ्यात पाय पसरू लागली.लोडशेडींग आजपासुन बदलल्यानं रात्री बारालाच लाईट येणार होती.चंदरनं आपला प्रोग्राम आटोपत मेसचा डबा खाल्ला.पाणी भरणाऱ्याची गर्दी बरीच कमी झाली होती.त्यानं मोबाईल वर बाराची बेल लावत झोप काढायचं ठरवलं.चांद वरवर चढत होता तशी थंडी ओली होत साऱ्या शिवाराला भिजवण्याचा घाट घालत होती तर वारा बोरीच्या झाडाशी झिम्मा खेळत टपाटप बोराची पथारी गवतात, गव्हात मांडत होता.
गवतातले डास कानाजवळ येत भुणभुण करत होते.अकराच्या सुमारास नाल्याकडच्या उसाच्या फडाकडनं कालसारखाच टिटव्याचा कल्लोळ उठला.गावाकडनं कुत्र्यानं काढलेला बेसुर हेल ही त्या आवाजात तवंग उठवत गेला.तोच उसाच्या बांधाकडनं छन छन कड कड आवाज विहीरीकडची धाव जवळ करू लागला. आता चंदर सावध झाला.बोरीच्या झाडावर गदरलेली बोरं खाण्यासाठी आलेलं कुठलं तरी पाखरू विचित्र आवाज करत दंगा करत विरीरीवरच्या आभाळात घिरट्या घेऊ लागलं. पाण्याच्या थाळण्यावर हंडे ठेवल्याचा आवाज आला नी चंदरनं शाल बाजुला करतमोबाईल स्टाॅर्च सुरू करून उठत
"कोण?"पृच्छा रू लागला.
"मी झिनी!, काठेवाड! एवढे हंडे इथं राहू द्या की.मी पांडू राऊताच्या चक्कीवर दळायळा चालली!दळून आणल्यावर पाणी भरुन नेईनं हंडे!"
डोक्यावर पोतडी(गोणी)घेतलेली बाई हंडे थाळण्यावर ठेवत म्हणाली.
चंदरचं तिच्या बोलण्याकडं लक्षच नव्हतं.तो 'झिनी' हे नाव ऐकताच विचारात गडला होता.
"झिनी?"
"होय झिनीच"
"गोकुळ दुग्धालय,.."
"होय ते माझे वडिल"चंदरचं बोलणं मध्येच तोडत झिनी म्हणाली.
आता चंदर उठत थाळण्याकडं सरकत "झिने अगं मी चंदर!ओळखलं का मला?मी तुमच्या दुग्धालयावर..…."
"होय ओळखलं,कसं विसरेन ! पण आता मला घाई आहे दळायला व तेथून परतायला उशीर होईल.घरचे बोलतील.नंतर बोलू"चंदरचं बोलणं मध्येच तोडत झिनी म्हणाली.
"अगं पण तू इथं कशी?निदान ते तरी सांग"चंदर धक्क्यातून सावरत विचारू लागला.
"इथंच अनकाई टेकाडावर आमचा कबिला आहे.मला आता उशीर होतोय जाऊ द्या आता भेट होईलच,सारं निवांत सांगेन"म्हणत झिनी गावाकडं चालती झाली.
इतक्या वर्षात झिनी भेटली पण तरी जास्त न बोलता चालली याचं चंदरला आश्चर्य वाटलं.
चांदाच्या उजेडात मात्र झिनी त्याला आधीच्या झिनीपेक्षा खूपच सुंदर दिसली.तिचं नखशिखांत बदललेलं साडीतलं रूप तितक्या वेळेतही त्याला भूरळ घालू लागलं.पण त्याला कळेना जिल्ह्याला राहणारी झिनी इकडं खेड्यात व ती रानात कशी?तिनं कबीला इथंच सांगितला म्हणजे लग्नच इथंच झालेलं असावं.शेवटी विचार करून करून त्याच्या डोक्यास मुंग्या येऊ लागल्या.काल रात्री पण हीच असावी.आता तर रोज भेटू असं ती म्हणाली.त्याच्या मनात आनंदाच्या ऊर्मी दाटून आल्या.तो झिनी परत येण्याची वाट पाहू लागला.त्यातच अंगातली भिनू लागली व तो घोरू लागला.

=======================
डाॅ. सामंताच्या वाड्यावर जेवण आटोपल्यावर पांडू राऊतानं बावणेबारा वाजताच वसंता व दिना शिंदेची रजा घेत उठू लागला.
कारण बाराला लाईट आली म्हणजे चक्की सुरु करुन दिवसभराची तटलेली दळणं दळावीच लागणार होती.कुत्री भुंकत होती त्यांना हाकलत तो गाव आखरीस असलेल्या खळ्यात आला.पुढचं झापं उघडंच होतं.त्याची चाहूल लागताच पाळलेली 'चंदी' कुत्री लाडाला येत चुईमुई मुईचुई आवाज करत पायात घुटमळू लागली.म्हशी,पारडू, गाई, बैलं, वासरू कान टवकारत काही उठली, तर काही बसल्या जागी रवंथ करत रेकू, हंबरू लागले.खळ्याच्या बाहेर पडलेल्या चक्कीच्या जुन्या जात्याच्या लाल चाळ्या(दगडा)वर बसलेला सेना धनगरानं आधीच उठत चक्कीच्या वाड्याची कडी उघडली.पांडू चाचपळत मध्ये घुसणार तोच लाईट आली उंदीर, घुसा बिळात पळाल्या व पिवळ्या बल्बाच्या उजेडात एल आकाराच्या कडप्पाच्या दगडावर ठेवलेल्या दळणाच्या पाट्या पाहून पांडुला आज दिवस उजाडेपर्यंत उभं रहावं लागेल याची जाणीव झाली.त्यानं स्टार्टरचा खटका उचलताच घन्नssss खटपट खटपट करत धुरडा उठवत चक्की सुरु झाली.त्यानं पायानं खालचं चाक व वरचं चाक हातानं लावत जातं लावलं व पहिलीच पाटी उचलत झब्ब्यात टाकली.सेना धनगरास सर्व पाट्या एकमेकावर ठेवावयास लावत दळणं पुढं सरकावयाला लावत दळणाचा पसारा शिस्तीत लावावयाला लावला.त्या बदल्यात त्याचं आधी दळून देत त्याला मोकळं केलं.उधारीच्या खात्याची वही झटकत तिच्यानंच खुर्ची झटकत तो बसला.गर्दी कितीही असली तरी सहसा रात्री कुणी थांबत नसत .सकाळी मग पहाटपासुन पिठ नेणारे गर्दी करत.
एकेक दळण निघत होतं तसं शांततेत चक्कीच्या आवाजाची तिव्रता थंडीत वाढू लागली. तोच खळ्यातील चक्कीच्या शेडसमोरील गोठ्यात चंदी कुत्री जोरजोरात भुंकू लागली तर गुरं अंग झटकत उठून कान टवकारत कावरीबावरी होऊन पाहू लागली. पांडूनं पट्ट्यानं चक्कीच्या गोल डिब्ब्याला दोन तीन दणके देत बाहेर आला.तोच चंदी बाहेरच्या दिशेकडं पाहत जिवाचा आकांत करत भुंकू लागली.पांडूनं "चंदी चूप, का भुंकते?काय दिसतंय चूप!"ओरडत शांत केलं.तरी चंदी हुई चुई चु चु हुं करत बाहेर पाहतच होती.पांडुनं मग गुरांना ऊसाची हिरवी पात(बांडी)टाकत बाजुलाच लघुशंका करत चक्कीत परतत सरलेलं दळण टाकलं.तोच दरवाज्यात त्याला डोक्यावर दळणाची पोती धरलेली बाई आत येतांना दिसली.दळण दळायला रात्री अपरात्री माणसं येत,पण एकच्या वेळेला बाई सहसा येत नसे. बाई गावातली नव्हती.तो चक्रावला.
"जी दळण दळायचंय!दळून देणार ना?" बाईनं विचारलं.
"हा!दळून देतो,ठेव मागे.कुठून आलीस?"
"जी आम्ही ऊस तोडणारे.आजच आमची टोळी अनकाई टेकाडावर उतरलीय.व सकाळी लगेच ऊस तोडायला जाणार, म्हणुन उशिरा आली",पोती खाली ठेवत बाई बोलली.
अनकाई टेकाड्याचं नाव ऐकताच पांडुला चार वर्षापुर्वीचा प्रसंग आठवत अंगावर काटा उभा राहिला.
"जी धान्य पाखडायचं बाकी आहे,सुप देता का?लगेच इथल्या इथं दळण करते!"बाईनं तिरकं पाहत लाडीकपणे विचारलं.पांडुनं उठत सूप, खाली पारलेचा डबा व पालाचं तुकडं दिलं.बाई पांडु दिसेल अशा बेतानं समोर बसुनच दळण करू लागली.
पांडू दळण टाकत बाईकडं सारखा टकामका पाहू लागला.विस- बाविशीच्या वयातली बाई पोटुशी दिसत होती.अप्रतिम लावण्य पिवळ्या प्रकाशाला खिजवत होतं.पांडू सारखा बावरा होत होता.बाई मधुनच वर मान करत पांडुकडं पाही.त्यानं पांडू आणखीच बावरा होई.त्यानं पाखराचा अंदाज बांधण्याआधीच पाखरु जाळ्यात सहज येऊ पाहत होतं.तितक्यात दरवाज्यातून एक कुत्रं पडलेलं पिठ खायला घुसलं.पांडूनं मोका उठवत त्याला हातातल्या पट्ट्यानं हाकलत दरवाजा आतून लावला.ते पाहून बाई काही मना करण्याऐवजी छद्मी हासली.दळण होताच तिनं डबा सरळ पुढं आणुन ठेवला.एरवी दुसरं गिऱ्हाईक असतं तर पांडू त्यावर खेकसत मागं दळण ठेवायला लावलं असतं.पण ही वेळ,हे दळण, हे पाखरू ..याची बातच न्यारी होती.बाई समोरच उभी राहत दळणावर बोटानं रेघोट्या मारत पांडूकडं पाहू लागली.
"गाव कोणतं तुझं?" पांडूनं सलगी करायला सुरुवात केली.
"जी फुरसुंगी!कन्नड घाटात" नजर रोखत बाई उत्तरली.
"मग इतक्या लांब ऊस तोडायला?" नजरेत नजर गुंतवत पांडु विचारू लागला.
"पोटासाठी यावचं लागतं.तसं दरवर्षी आम्ही नवसारीकडं जातो या वर्षी पहिल्यांदाच इकडं"
"चला त्या निमीत्तानं भेटलात तरी"लाळ घोटत पांडू हात पुढे करत बोलला.
"मग टाका ना लवकर दळण" बाईनंही हात पुढं सरकवला.
पांडुनं दळण टाकलं व बाहेर कुणी आहे का याचा दरवाजा उघडून कानोसा घेतला. दरवाजा पुन्हा लावला.
परत आला तर बाई खाली बसून डबा गोल गोल करत पिठ सावरत होती.पांडू पुढं सरकला व बाईचा हात धरणार तोच फणा काढून नागिणीनं फुत्कार मारावा तसा बाईनं...झिनीनं पवित्रा घेतला.
पांडुनं बदललेलं रूप क्षणात ओळखलं.
" झिनी तू?"
"होय पांड्या कुत्र्या मी झिनीच"
पांडू क्षणात मागं सरकला."झिनी त्याला पकडण्यासाठी मागे धावली.पाडू तितक्या जागेत तावडीत सापडलेल्या कुत्र्यासारखा धावू लागला.आधी तो दाराकडं पळाला पण दार उघडेना.पांडू धडपडत दार उघडू लागला.तोच झिनीनं त्याचं नरडं पकडत दाबलं.चार भावाच्या मोठ्या कुटुंबातल्या गबरू उंदरानं दूध ,तूप, मांस लहानपणापासुनच खूप चेपलेलं म्हणुन अंगात रेड्याची ताकत.पण झिनीच्या हातात ते लाथा झटकू लागलं. श्वास रोखला जाऊ लागला.तोच खाली जागा ओली होऊ लागली.झिनीनं झटक्यात सोडताच तो उंदरासारखा इकडंतिकडं धापा टाकत पळू लागला.झिनी व त्याच्यात तितक्यात जागेत आट्यापाट्या सुरू झाल्या तो दळणाचा पसारा फैलवत पळू लागला.आता चक्कीतलं दळण संपल्यानं ती घरघर करत आवाज करू लागली.झिनीनं दळण टाकत आवाज कमी केला.पाडू आता मीटर ची पेटी ठोकलेल्या खांबाआड घुसून झिनीकडं भयभीत नजरेनं पाहत "झिनी चुकलो आम्ही! माफ कर पण मला जिवंत सोड"
"कुत्र्या! गरवार पोरीला तीन तीन लांडग्यांनी लचके तोडत लूटतांना मजा येत होती तुम्हाला!नी आता ही कसा लाळ टपकवत होता बाई पाहून.नी तुला सोडू?"झिनी चवताळून म्हणाली.झिनीनं पुढे सरकत त्याच्या मुस्काटात लाथ घालत बाहेर काढू लागली.पण तो खांबाला धरत तसाच मार खात होता.तोच झिनीनं मिटर मधली बल्बची जिवंत वायर बाहेर काढली.पांडू जिवंत वायर पाहताच जोरानं राडा करत बाहेर निघू लागला नी त्या गडबडीत अंधारात चक्कीच्या पट्ट्यात अडकून पुलीत घुसला.क्षणात फाउंडेशन च्या पत्र्यात हात कापले गेले पट्टा तुटला मोटार घुंन्न करत रिकामी फिरू लागली. झिनीनं झोरात आकांत करत "मेल्या मला नासवून मारतांना हासत होते ना! मग आता रडत रडत मर! कारण हसत हसत केलेली पापे रडत रडत फेडाविच लागतात"म्हणत तिनं वायर त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये अडकवताच झोराचा झटका देत कुत्रं पायाच्या टाचा घासून घासून मेलं.झिनी मळ्यात परतली.हंडे घेत जाऊ लागताच गव्हात पाणी भरणारा चंदर धावतच विहीरीवर आला पण तो पावेतो ती उसाच्या फडातून नाल्याकडं तुरकली होती.त्यानं पाठलाग करत नाला पार केला पण तरी त्याला गुंगारा देत ती मिरचीच्या शेतात बुजगावण्याजवळ परतली.पुर्वेला नदीकडनं मियाॅव मियाॅव म्याव करत मोरानं केका घुमवला नी दहिवराचा चिलमन बाजुला सारत केशरी ,तांबडी आभा फुटू लागली.तुराटखेड्यात लवकर दळण घ्यायला आलेल्या दिवाण्याच्या म्हातारीनं एकच गिल्ला करत खळ्यात सारं तुराटखेडं गोळा केलं. ठाणे अंमलदार दिनू शिंदे,डाॅ.वसंता डोळे चोळतच आले.पाडूच्या चोळामोळा व शिजलेल्या कलेवराला पाहताच सुन्न होऊन खाली कोसळू लागले.लोक घोळक्या घोळक्यात 'जास्त दारूनंच पडतांना शाॅक लागून पट्ट्यात फेकला व पुलीत अडकला असावा' बोलू लागले.पांडूचे तिन्ही भाऊ छाती पिटू लागले व आकांत करत
"दिनू,वसंता काय झालं रे पांडुला?" विचारू लागले.पण दिना शिंदेला उद्या काय घडणार हे कुठं माहीत होतं!

क्रमशः
✒ वासुदेव पाटील.