ते_चिंचेचे_झाड..
सोनगाव..डोंगर दर्यात वसलेले, एक निसर्गसौंदर्याने नटलेले साधारणपणे पाचशे, सहाशेे घरांचे छोटेसे गाव...हिरवीगार शेती, झाडे आणी गावाबाहेरचे पाण्याचे सुंदर तळे हि गावाची वैशिष्ट्ये..🌅
गावातल्या एकमेव सरकारी शाळेच्या सातवीच्या वर्गात आज मुख्यध्यापक सावंत गुरूजी मुलांना शिकवत होते..
गावातल्या एकमेव सरकारी शाळेच्या सातवीच्या वर्गात आज मुख्यध्यापक सावंत गुरूजी मुलांना शिकवत होते..
“हे बघा मुलांनो, आज आपण काय शिकलो तर खेड्यांचे होत असलेले शहरीकरण...तसे आपले सोनगाव हे आजपर्यंत शहरीकरणापासुन आणी एकंदरीतच विकासापासून दूर राहिलेले गाव आहे.., पण आता आपल्या गावाबाहेर तळ्याच्या काठी मोठी टाऊनशीप ऊभी राहणार असुन त्यामुळे आता लवकरच आपल्या परिसराचाही विकास होण्याची सुरुवात होणार आहे”🏘️
सावंत गुरूजींचे हे वाक्य वर्गातल्या मागील बेंचच्या रांगेत इतर मुलांच्या खोड्या काढत बसलेल्या गण्याच्या कानावर पडताच गण्या लगबगीने हात वर करून ऊभा राहिला..
सावंत गुरूजींना त्याने विचारले,
“मास्तर..मग त्या तळ्याकडल्या चिंचेच्या झाडाचे काय व्हणार?”
सावंत गुरूजींना त्याने विचारले,
“मास्तर..मग त्या तळ्याकडल्या चिंचेच्या झाडाचे काय व्हणार?”
“बघा आता..आर गण्या.. अख्ख तळच विकत घेतलय बिल्डरन आणी तुला चिंचेच्या झाडाच पडलय व्हय”
गुरूजींच्या या वाक्यावर वर्गातली सगळे मुले हासली पण गण्याचा चेहरा मात्र पडला..
शाळेची घंटा वाजताच गण्या बाकीच्या मुलांसोबत शाळेतून बाहेर पडला.
सायकलवर घराकडे निघालेल्या सावंत गुरूजीना थांबवून होणार्या टाऊनशीप विषयी माहिती विचारू लागला..
शाळेची घंटा वाजताच गण्या बाकीच्या मुलांसोबत शाळेतून बाहेर पडला.
सायकलवर घराकडे निघालेल्या सावंत गुरूजीना थांबवून होणार्या टाऊनशीप विषयी माहिती विचारू लागला..
“अरे गणा शहरीकरण होत असताना अनेक जून्या गोष्टी बदलत असतात, काही तर कायमच्या संपतही असतात..झालेले बदल स्वीकारणे ऐवढेच आपल्या हातात असते..आता तिथ काय काय होणार हे आताच मी पण नाही सांगू शकत ,पण तुला त्या चिंचेच्या झाडाच एवढ काय पडलय?”🤔
गण्याला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही..बाकीच्या मुलांसोबत तो चालत घराकडे निघाला पण आपल्या वस्तीवर न जाताना तळ्याच्या दिशेने चालू लागला..
गावाच्या बाहेर बारा महिने भरलेले स्वच्छ पाण्याचे ते मोठे तळे आणी त्या तळ्याच्या काठावरचे ते भलेमोठे चिंचेचे झाड..गावातली लोक त्याला “तळ्याची चिंच” म्हणत..आजूबाजूच्या पंचक्रोशीत चिंचेचे एवढे मोठे झाड नव्हते..गण्याला ते झाड खूप आवडायचे कारण फक्त तिथेच त्याला त्याचा जिवलग मित्र “शिवा” भेटायचा..👨

तळ्याकडे झपझप पाऊले टाकत असतानाच गण्याच्या डोक्यात फक्त शिवाच्याच आठवणी होत्या..
साधारण वर्षभरापुर्वी सोनगावात ‘गण्या-शिवा’ ही नावे कोणी वेगवेगळी घेतच नव्हते..कारण अख्या गावाला त्यांची जिवलग दोस्ती माहिती होती..
गण्याला जेव्हापासुन समजायला लागले होते तेव्हापासून मित्र-सखा म्हणुन त्याने फक्त शिवालाच पाहिले होते..

त्याच्याच घराशेजारी राहणारा, त्याच्याच वयाचा, समविचारी असा शिवा. दोघेही एकत्र शाळेत जायचे, एकाच बेंचवर बसायचे , एकत्र अभ्यास करायचे, एकत्रच खेळायचे.,👬
गण्या हा त्याच्या घरी असू नाहितर शिवाच्या घरी त्यांच्या कुटुबियांनीही कधी भेदभाव केला नाही त्यांच्यासाठी जसा शिवा तसाच गण्याही..
गण्या हा त्याच्या घरी असू नाहितर शिवाच्या घरी त्यांच्या कुटुबियांनीही कधी भेदभाव केला नाही त्यांच्यासाठी जसा शिवा तसाच गण्याही..
सुट्टीच्या दिवशी तर अजूनच मजा..शेतामध्ये, रानावनात भटकणे, आबा पाटलाच्या शेतातले आंबे चोरायला जाणे,तळ्याकाठी फिरायला जाणे..तळ्यावर गावातील मोठी मुले पोहत असतील तर त्यांच्यासोबत पाण्यात डुबक्या मारणे..नाहीतर तळ्याकाठच्या त्या मोठ्या चिंचेच्या झाडावर चढुन तासनतास बसून राहणे.. हा त्यांचा आवडता दिनक्रम असायचा..🌳
ते चिंचेचे झाड म्हणजे दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय बनले होते..
ते चिंचेचे झाड म्हणजे दोघांच्याही जिव्हाळ्याचा विषय बनले होते..
त्याचबरोबर रात्र झाली कि त्यांच्या घरासमोरच्या मारुतीच्या मंदीराबाहेर पारावर दामुनानाच्या गप्पा ऐकत ऐकत झोपी जाणे हा पण त्या दोघांचाही ठरलेल्या दिनक्रमचा भाग होता..👨❤️👨
“ मैत्री आपल्या दोघांची, जशी उधळण मुग्ध गंधाची...
सारवलेल्या अंगणात सजलेली जणू रांगोळी नवरंगाची..”
सारवलेल्या अंगणात सजलेली जणू रांगोळी नवरंगाची..”
पण गेल्यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र अघटित घडले..मामाच्या गावी जत्रेसाठी एक आठवडा गेलेला गण्या सोनगावात परत आला आणी घरी आल्याक्षणीच त्याला शिवा तीन चार दिवसांपासून दुखण्यामुळे अंथरुणावर खिळला असल्याची बातमी समजली..गण्या घाईघाईने शिवाच्या घरी गेला..शिवा खरोखरच खुप आजारी असल्यासारखा बाजावर झोपून होता..
त्याची आई वडील आणी काही गावकरीही बाजूने ऊभे होते..
त्याची आई वडील आणी काही गावकरीही बाजूने ऊभे होते..
“बर झाल आलास तु, तुझीच आठवण काढीत असतोय शिवा सारखा”
शिवाच्या आईने गण्याला पाहताच म्हणले.
शिवाच्या आईने गण्याला पाहताच म्हणले.
“कालच तालूक्याच्या दवाखान्यात नेऊन सलाईन लावून आणलय, सांगीतलेल गोळ्या-औषध पण दिलीत, डाक्टर म्हणले होते ह्या औषधाने बरा होईल शिवा..सकाळी तापपण कमी झालता..पण आता अख्ख अंगच तापान फणफणलय..काय कराव समजतच नाय..”🤕
शिवाचे वडील जमलेल्या गावकर्यांना सांगत होते..
शिवाचे वडील जमलेल्या गावकर्यांना सांगत होते..
“उद्या सकाळ परत न्यावा लागल त्याला दवाखान्यात तालूक्याला गाडी करून “
जमलेल्या पैकी एकजण म्हणाला.
जमलेल्या पैकी एकजण म्हणाला.
गण्याने एकदम पुढे होऊन शिवाचा गरम हात हातात घेतला..शिवाने आजारामुळे खोल गेलेले डोळे उघडत गण्याकडे पाहून कसेबसे स्मितहास्य केले..हासताना त्याला होत असलेला त्रास गण्याला जाणवला आणी चटकन त्याच्या डोळ्यात पाणी आल..
“काय झाल रे तुला शिवा..ऊठ चल आपल्याला खेळायला जायचय..तळ्याच्या चिंचेवर..लवकर बरा हो”
शिवाने होकारार्थी मान हलवली..
थोडावेळ तिथे थांबून गण्या घरी परत आला..शिवाच्या घरी जेवण करून आलोय असे खोटे सांगुन उपाशीच झोपी गेला..
थोडावेळ तिथे थांबून गण्या घरी परत आला..शिवाच्या घरी जेवण करून आलोय असे खोटे सांगुन उपाशीच झोपी गेला..
दुसर्या दिवशी सकाळीच शिवा गेल्याची बातमी गावात वार्यासारखी पसरली...सर्व नातेसंबंधी आणी गावकरी त्याच्या घराजवळ जमु लागली...गण्या मात्र बराचवेळ त्याच्या घरीच बसून होता..त्याची हिंमतच होत नव्हती शिवाच्या घराकडे जायची..तरीपण काहीवेळाने त्याच्या बाबांसोबत नाईलाजाने निघालाच..त्याच्या प्राणप्रिय मित्राच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी..मनावर दगड ठेऊन.😔
बाया बापुडे सर्वजण मोठमोठ्याने रडत रडत स्मशानाकडे चालले होते..शिवाच्या आईची तर अवस्थासुद्धा पाहवत नव्हती..पण गण्याच्या डोळ्यात मात्र अश्रूचा एक थेंबही नव्हता..कारण शिवा त्याला सोडून गेलाय हे त्याचे मन मान्यच करत नव्हत..
अगदी त्याच्या डोळ्यासमोर म्रुतदेहाला अग्नी दिला तरीपण..
अगदी त्याच्या डोळ्यासमोर म्रुतदेहाला अग्नी दिला तरीपण..
त्या रात्री तो एकटाच मारूती मंदीराच्या पारावर झोपायला गेला..दामुनाना आज लवकरच झोपायच्या तयारीत होते..
“ये गण्या, बर्याच दिसांनी आलास..मला वाटल आता येत नाही तू..शिवा नाही राहिला ना आता..लई वाईट झाल बघ”
“ये गण्या, बर्याच दिसांनी आलास..मला वाटल आता येत नाही तू..शिवा नाही राहिला ना आता..लई वाईट झाल बघ”
“नाही नाना, अस बोलू नगस..शिवा हाये अजून आपल्यातच..कुटबी जाणार नाय तो”
त्याच्या या उत्तरावर नेहमी बडबड करणारे दामुनाना आज मात्र शांतच बसले..
त्या रात्री मोकळ्या आकाशातील चमचमणार्या चांदण्या बघत असताना कधी झोप लागली हे गण्याला समजलच नाही.🌌
त्या रात्री मोकळ्या आकाशातील चमचमणार्या चांदण्या बघत असताना कधी झोप लागली हे गण्याला समजलच नाही.🌌
त्यानंतरचे दोन तिन दिवस गण्याचा रोजच्यासारखाच सामान्य व्यवहार पाहुन त्याच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटले..आणी त्याचबरोबर शिवाच्या नसल्याचा त्याच्या मनाला फारसा धक्का बसला नाही हे पाहून त्यांना आनंदही झाला..
पण त्यादिवशी दुपारी मंदीरात जाऊन येतो असे सांगुन गण्या घराबाहेर पडला तो थेट एकटाच गावाबाहेर तळ्याकाठी आला.
तळ्यावर आज गावातली मोठी मुले पोहायला नव्हते..कोणी सोबतीला असल्याशिवाय गण्या आणी शिवा कधीच पोहण्यासाठी तळ्यात उतरत नव्हते पण गण्या आज एकटाच तळ्यात उतरला..🌅
नेहमी काठावरच पोहणारा तो आज जास्त खोल पाण्यात पुढे पुढेच जात होता...अखेर जेव्हा खोल पाण्यात बुडून गंटागळ्या खाऊ लागला तेव्हाच तो भानावर आला..आणी कसाबत धडपडत पोहत किनाऱ्याकडे येऊन तळ्याच्या बाहेर पडला..

आपण खरोखरच आता एकटे झालो आहोत याची जाणीव त्याला झाली होती, त्याच विचारात तो चिंचेच्या झाडाखाली येऊन बसला..
“शिवा..कुठे गेलास रे तु? आता मी कोणासोबत राहणार..कोणासोबत खेळणार? परत कधी भेटशील रे ”
“शिवा..कुठे गेलास रे तु? आता मी कोणासोबत राहणार..कोणासोबत खेळणार? परत कधी भेटशील रे ”
अचानक पाठीमागून त्याच्या खांद्यावर दोन हात पडले..तो स्पर्श त्याच्या ओळखीचा होता..त्याने चमकुन मागे पाहिले आणी त्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही..तोच होता तो..त्याचा बालमित्र शिवा.😊
“अरे गणू रडतोस काय? तू बोलला होता ना त्यादिवशी चिंचेच्या झाडावर खेळायला जायच म्हणुन..मी कवापासून तुझी वाट पाहत होतो ईथे..पण तुच आला नाहीस..
कधीपण जेवा तु या झाडापाशी येऊन माझे नाव घेशील ना , मी लगेच हजर होईल बघ..पण त्यासाठी माझ्या फक्त दोनच अटी आहेत. पहिली म्हणजे त्यावेळी फक्त तु एकटाच असायला हवा आणी दुसरी म्हणजे तू कधीही, कोणाजवळही माझा ऊल्लेख करायचा नाही, जमेल ना”

गण्याचा चेहरा आनंदाने फुलला..त्यादिवसानंतर जेव्हा कधी गण्याला वेळ मिळेल तेव्हा तो चिंचेच्या झाडाजवळ जायचा..शिवाचे नाव घेतले कि शिवाही हजर व्हायचा..
दोघेही कधी झाडाखाली तर कधी झाडावर बसुन खूप खेळायचे..गप्पा मारायचे..मोठ्या आवाजात गाणी म्हणायचे..👨❤️👨
गण्या त्याला नेहमीच गावातल्या आणी शाळेतल्या गमतीजमती आणी बातम्या पण सांगायचा..शिवा पण अगदी मन लावून ऐकायचा..

आज शाळा सुटल्यानंतर तळ्याकडे घाईघाईने जात असताना गण्याला हा सर्व घटनाक्रम आठवत होता..
विचारात गुंगलेला तो कधी चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला त्यालाच समजले नाही..🌳
विचारात गुंगलेला तो कधी चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला त्यालाच समजले नाही..🌳
“अरे वा गणू..आज संध्याकाळी कसा काय आलास?”
शिवाने हसत विचारलेल्या प्रश्नावर गण्याने शाळेतली सर्व हकीकत आणी तळ्याच्या काठी लवकरच चालू होत असलेल्या टाऊनशीप विषयी माहिती सांगीतली..🏘️
तसेच तळ्याकाठची सर्व जमीन विकल्याने लवकरच या परिसरातील सर्व झाडे तोडली जाणार असे म्हणत आहेत हे पण सांगीतले..
हे सर्व ऐकून शिवाही गंभीर झाला..
काय बोलावे हे त्याला समजतच नव्हते..
काही वेळ विचार करून डोळ्यातले पाणी लपवत शिवा म्हणाला,

“जा तू आता घरी गणु..आणी विसरून जा मला ,परत ईकडे येऊ पण नकोस..आला तरी मी दिसणार नाही तुला..😥
पुढल्या वर्षी शहरातल्या शाळेत जा शिकायला..शिकून मोठा हो..मला जे जे करायला जमले नाही ते तु कर..यातच मला आनंद होईल असे समज”
पुढल्या वर्षी शहरातल्या शाळेत जा शिकायला..शिकून मोठा हो..मला जे जे करायला जमले नाही ते तु कर..यातच मला आनंद होईल असे समज”
गण्याने शिवाची शेवटची गळाभेट घेतली..दोघांनाही अश्रू अनावर झाले होते पण अंधार पडायला लागल्याने गण्याला घरी जाणे भागच होते..
जड अंतकरणाने गण्या हळूहळू घराकडे निघाला..
शर्टाच्या बाहीने डोळे पुसत तो सारखा सारखा मागे अंधारात धुसर होत चाललेले झाड आणी त्या झाडाखाली एकटक त्याच्यावर नजर लावून ऊभा असलेल्या शिवाकडे पाहत होता..😶
जड अंतकरणाने गण्या हळूहळू घराकडे निघाला..
शर्टाच्या बाहीने डोळे पुसत तो सारखा सारखा मागे अंधारात धुसर होत चाललेले झाड आणी त्या झाडाखाली एकटक त्याच्यावर नजर लावून ऊभा असलेल्या शिवाकडे पाहत होता..😶
ईश्वराच्या भेटीसाठी मैलोनमैल पायी चालणारा यात्रेकरूपण परतीच्या वाटेवर असताना दुरून मंदीराच्या कळसाकडे असाच पाहत असतो..
तसेही ते चिंचेचे झाड गण्याला एखाद्या मंदीरासारखेच होते आणी तिथे भेटणारा त्याचा मित्र तर त्याला कदाचित ईश्वरापेक्षाही प्रिय होता..
जो आता त्याला परत कधीही दिसणार नव्हता..
म्हणुनच तो सारखा मागे वळून पाहत होता..,🌳
ते चिंचेचे झाड अंधारात पुर्णपणे दिसेनासे होईपर्यंत..

समाप्त.🌳👬🌅
✍️लेखक- Dnyanesh W.
Very Very nice story.The end of story is heart touching.Many thanks to writer.
ReplyDelete