🔹🔹 #काळकोठडी 🚹🔹🔹
“बस एक धक्का और दो..जालिम सरकार हटा दो”
“सी एम मुर्दाबाद….*** पार्टी मुर्दाबाद”
“भारत माता कि जय”
“सी एम मुर्दाबाद….*** पार्टी मुर्दाबाद”
“भारत माता कि जय”
शहरातील त्या मैदानावर मोठ्या गर्दीमध्ये मुख्यमंत्री साहेबांची सभा सुरू होती..आणी मैदाना बाहेर मी आणी आमच्या संघटनेचे काही कार्यकर्ते काळे झेंडे फडकवत मोठमोठ्याने घोषणाबाजी करत होतो..🗣️
आमच्या संघटनेचे क्रांतिकारी धोरणे मला गेली अनेक वर्षांपासून आकर्षित करत आलेले होते..पण अशाप्रकारे आंदोलनात सहभागी होण्याची माझी ही पहिलीच वेळ होती, आणी त्यामुळे मी फार उत्साही पण होतो..बर्याच दिवसांपासून अशा एखाद्या आंदोलनात शांतीपुर्वक सहभागी होण्यासाठी मी प्लँनिग करत होतो, पण माझ्या प्रेस पत्रकाराच्या जॉबमुळे मला अशी संधी मिळत नव्हती..अखेर आज आमच्या संघटनेने सरकारी ध्येयधोरणांना विरोध म्हणुन मुख्यमंत्र्यांच्या होणार्या जाहीर सभेबाहेर आंदोलन करण्याचे ठरवलेले मला समजले आणी मी थेट एकदिवसीय सुट्टी काढून आंदोलनात सहभागी झालो.

पण मैदानाबाहेरचे आंदोलन चालू असतानाच आमचे काही अतिउत्साही कार्यकर्ते हे मैदानात सभेसाठी जमलेल्या लोकांच्या मध्ये पण मिसळलेले होते याची मला कल्पना नव्हती..कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना अचानक काही कार्यकर्त्यांनी उभे राहून मुख्यमंत्र्यांच्या दिशेने टोमॅटो,अंडी फेकून मारायला सुरुवात केली आणी मोठा गोंधळ उडाला..मुख्यमंत्र्यांचे समर्थकपण आक्रमक झाले..दोन्हीबाजूने हाणामारी आणी दगडफेक सुरु झाली..सभेच्या बंदोबस्तासाठी सज्ज असणार्या पोलीसांनी गोंधळ घालणार्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला.🏃
आमच्या संघटनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलीसांना न जुमानता मैदानाबाहेरील गाड्यांच्या काचा फोडायला सुरुवात केली..सगळीकडेच एकच गोंधळ, आरडाओरडा आणी पळापळ सुरू झाली..मैदावरील लोक सैरावैरा पळू लागल्याने चेंगराचेंगरी होत होती...काही क्षणातच बदललेले हे सगळे वातावरण माझ्यासाठी धक्कादायक होते..मी झटकन काळा झेंडा खाली फेकून दिला आणी लवकर सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागलो..इतक्यात एका पोलीसाचे मजबूत दांडके रपकन माझ्या पाठीवर बसले..वेदनेने कळवळत मी खाली बसून माझा जमीनीवर पडलेला चष्मा शोधू लागलो.👓
चष्याशिवाय मला व्यवस्थित दिसतच नव्हते ना..नशीब चष्मा फुटता फुटता वाचला होता पण पोलीसांच्या तावडीतून मी नाही वाचू शकलो..आमच्या संघटनेच्या गोंधळ घालणार्या इतर वीस-बावीस सापडलेल्या कार्यकर्त्यांसहित मलाही पोलीसांनी गाडीत कोबंले आणी पोलीस स्टेशनला घेऊन गेले.🚌

पोलीस स्टेशनमधील वातावरण अजूनच भितीदायक होते..करारी चेहर्याचे ‘इन्स्पेक्टर भोसले’ दरडावून एकेकाची माहिती विचारत होते ..एक हवालदार सर्वांचे जबाब नोंदवून घेत होता..
पण माझ्याव्यतिरिक्त तेथे उपस्थित असणार्या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावरून त्यांना या वातावरणाची फारशी भिती वाटत नसल्याचे माझ्या लक्षात आले...विचारलेल्या प्रश्नांना ते बिनधास्त उत्तरे देत होते ..बहुतेक त्यांना सवय असावी अशा प्रकारांची..
पण मला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यामुळे माझी क्रांतीची नशा मात्र पुर्ण उतरली होती..आता माझ्यावर कोणकोणते आरोप दाखल केले जातील हा विचार करुनच माझी छाती धडधड करत होती.

“जे जे विचारेल ते खर खर सागांयच..नाहीतर सरकारी मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरणी दंगलखोर म्हणुन चार्टशिट बनवील तुझी..😡
बोल नाव काय आहे तुझे? कोणी पैसे दिले होते तुला मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्यासाठी?? बोल लवकर!” माझा नंबर आल्यानंतर इ. भोसलेंनी दरडावून विचारले.
बोल नाव काय आहे तुझे? कोणी पैसे दिले होते तुला मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्यासाठी?? बोल लवकर!” माझा नंबर आल्यानंतर इ. भोसलेंनी दरडावून विचारले.
“मी..मी रोहन शास्री..पत्रकार, लेखक आहे साहेब..पण मी हिंसक आंदोलनाचा समर्थक नाही..मी या आंदोलनात सहभागी झालो होतो ते फक्त अहिंसक मार्गाने सरकारचा निषेध करण्यासाठी, मला जाउद्या साहेब मी परत अशा कोणत्याच आंदोलनात सहभागी होणार नाही..माझ्या घरी माझी आई एकटीच आहे” माझी विनयशील बोलणे व विनवणी ऐकून इ. भोसले माझ्याकडे करडया नजरेने न्याहाळू लागले.
माझ्या अंगावरील कपडे.. खांद्यावर एका बाजूला लटकलेली एकाबंदाची बँग, आणी जाड भिंगाचा चष्मा हा माझा पेहराव पाहुन मी प्रोफेशनल आंदोलक नाही याची त्यांनाही जाणीव झाली असावी.
“ह्या शास्रीला शेवटच्या आठ नंबर लॉकअपमध्ये ठेवा उद्या त्याचा जबाब नोंदवून डिसचार्ज द्या...आणी बाकीच्यां सगळ्यांची चार्टशिट दाखल करून रिमांड मध्ये घ्या..”👉
इ. भोसलेंनी आपल्या स्टाफला सुचना दिल्या.
इ. भोसलेंनी आपल्या स्टाफला सुचना दिल्या.
ताबडतोब पोलीसांनी बाकीच्या आंदोलकांना कोठडीत डांबले..
आणी मी आजच डिसचार्ज मिळण्यासाठी गयावया करत असतानाही एका रांगड्या हवालदाराने मला ओढत ओढत शेवटच्या आठ नंबर लॉकअपजवळ नेऊन लोखंडी सळ्यांचा दरवाजा उघडून अशरश: आत ढकलून दिले..
आणी मी आजच डिसचार्ज मिळण्यासाठी गयावया करत असतानाही एका रांगड्या हवालदाराने मला ओढत ओढत शेवटच्या आठ नंबर लॉकअपजवळ नेऊन लोखंडी सळ्यांचा दरवाजा उघडून अशरश: आत ढकलून दिले..
त्या कोठडीच्या आतमध्ये फारच अंधार होता..आणी कसलातरी कुबट वास येत होता..
“ओ साहेब..येथे खूपच अंधार आहे हो..काहीच दिसत नाहीये..कमीतकमी लाईट तरी लावा”
मी बाहेरून कुलूप लावून निघून चाललेल्या हवालदाराला म्हणले.
“ओ साहेब..येथे खूपच अंधार आहे हो..काहीच दिसत नाहीये..कमीतकमी लाईट तरी लावा”
मी बाहेरून कुलूप लावून निघून चाललेल्या हवालदाराला म्हणले.
“बलप जळालाय तिथला..कोपर्यातली घोंगडी-चादर घेऊन झोप गुमान..एक रात अंधारात रायलास तर मरणार नाय तु ***च्या”
हवालदार जाता जाता बोलून गेला.👮
हवालदार जाता जाता बोलून गेला.👮
शेवटी निर्माण झालेल्या परिस्थितीशी निमुटपणे जूळवून घेण्याचा मी निर्णय घेतला..आणी हताशपणे खाली बसलो..काही अंतरावर रिमांडमधील कैद्यांची चाललेली चौकशी आणी पोलीसांच्या दमदाटीचा, मारहाणीचा अस्पष्ट आवाज मला ऐकू येत होता..तरी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मी उद्याच या सगळ्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडणार होतो.. थोड्या वेळाने बाहेरून येणारे सगळे आवाजही बंद झाले..
ही संपूर्ण रात्र मला एकट्यालाच त्या काळकोठडीमध्ये काढायची होती..दरवाजाच्या लोखंडी सळ्यांच्या बाहेरून येणाऱ्या किंचीतशा उजेडामुळे आणी डोळ्यांना आता अंधाराची सवय झाल्यामुळे मला आता त्या मोठ्या खोलीमध्ये अंधूक अंधूक दिसायला लागले होते.
शेजारच्या खडबडीत दिसणार्या भिंतीवरून हात फिरवताच माझ्या अंगावर शहारा आला...कोठडी, कारागृह, जेल इ. नावांनी ओळखली जाणारी ती खोली..आजवर कित्येक जणांचे असंख्य स्पप्ने इथेच विरून गेले असतील..पण ते सगळेच लोक खरोखर गुन्हेगार असतील का? का काही जणांवर परिस्थितीमुळे गुन्हेगाराचा शिक्का बसत असेल?🚹
पण हे लोक कसे काय एकाच खोलीत आयूष्यातील अनेक महत्वाची वर्षे घालवत असतील काय माहित..मी तर महिनाभर सूद्धा राहू शकणार नाही..वर्षांचीतर गोष्टच दूर राहिली..
निराशा,एकटेपणा आणी नकारात्मकता भरून राहिलेली असते अशा कोठडींच्या खोलीमध्ये..आणी ती मला जाणवतपण होती.

काही वेळाने माझ्या जागेवरुन उठून अंधार्या कोपर्यामध्ये ठेवलेले अंथरूण घेण्यासाठी गेलो असता तेथे अजून एक व्यक्ती अंगाभोवती सफेद चादर लपेटून गुडघ्यांमध्ये मान घालून बसलेला मला दिसला..थंडीत कुडकडल्याने त्याचे अंग थरथर कापत होते..
चला, म्हणजे मी समजत होतो त्याप्रमाणे त्या काळकोठडीत मी एकटाच नव्हतो तर मला अजून एक जोडीदार होता हे पाहून मला काहिसे हायसे वाटले..नाहीतरी एक रात्र वेळ घालवण्यासाठी मला कोणीतरी हवेच होते.👤
क्रमशः..
◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆