गुणांक्का ( पार्ट 6)
( ह्या आधीच्या सर्व पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
रखमाचे दिवस भरत आले होते . गावाची यात्रा 4 दिवसावर येऊन ठेपली होती . सर्व गाव उत्साहात होता . यात्रेच्या तयारीत होता . देवी च मंदिर सजवण्याचे काम जोरात चालू होते . गावात वेगळ्याच प्रकारचा उत्साह व आनंद होता . भीमा पण खुप खुश होता . आता त्याच कुटुंब पूर्ण होणार होत . आपल्या मुलाचे सर्व हट्ट पुरवायचे , कुटुंबाच्या सुखा साठी दिवस रात्र राबायाचं असं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं . रखमा म्हणती त्या प्रमाणे गुणांक्काला पण आपल्या घरीच ठेवून घ्यायच . रखमाला व त्याला आई ची माया मिळेल आणि त्याच्या मुलाला पण आजी चे प्रेम मिळेल . ह्या यात्रेत गुणांक्का ला आणि रखमाला न सांगता मस्त साडी चोळी घेऊन द्यायची . त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो लाख मोलाचा असेल . अशी गोड स्वप्न भीमा रंगवत होता . जमलं तर तो रखमा साठी नवीन सोन्याचं मंगळसूत्र आणि मुला साठी सोन्याची चेन पण करणार होता . तीला कळून न देता . कधी एकदा देवीच्या यात्रेचा दिवस येईल असे त्याला झाले होते .
लवकर बाहेर पडायचं असं ठरवून पण शिरपा ला उशीर झालाच . तो त्याच्या आई साठी खोतवाडी वरून औषध आणणार होता . त्याने घरी व गावात सगळ्यांना सांगून ठेवलं होत तो खोतवाडी ला जाणार आहे ते आणि देवीच्या यात्रेच्या दिवशी परत येणार आहे . गावातील आणखी बऱ्याच लोकांनी त्याला औषधं आणायला पैसे दिले होते .सगळं गाव देवीच्या यात्रेच्या तयारीत होते . गावातून बाहेर पडणार तोच त्याला गुणांक्का ची आठवण आली . तो परत गावात आला . नदी किनारी जाऊ लागला . नदी च्या वाटेवर कुणीच न्हवत . नदी काठावरून गुणांक्का ला हाका मारू लागला . पण तीच घर आत असल्याने आणि तिच्या वयोमनाने तीला ऐकू आलं नसणार हे शिरपाने जाणले . नावेत बसून गुणांक्काच्या घरी जावे का नाही या बद्दल त्याचे मन साशंक होते .
गुणांक्का एवढे दिवस एकटी तिथे राहते तीला कधीच काही झाले नाही . आपल्याच मनात भीती आहे . गुणांक्काची आधीच तब्येत ठीक नसते , तीच पोटच पोरग पण तिची काळजी घेत नाही , नवरा पण नाही , दुसरं पोरग लांबच्या गावात , त्या बिचारी ला तर कोण आहे आपल्या शिवाय . नई तरी गुणांक्का आपल्या आई प्रमाणे आहे , किती माया करते आपल्यावर असं स्वतःच्या मनाला समजावंत शिरपा नावेत बसला . नाव पलीकडच्या काठावर आली . शिरपा गुणांक्का ला हाका मारत तिच्या घराकड जाऊ लागला . त्याच्या मनात थोडी धाकधुक होती .
शिरपा नदीपलीकडे आला . परत त्याने त्या नदीच्या काठावरून तीला हाक मारली . पण परत काहीच प्रतिसाद आला नाही .पण मनाचा हीय्या करून तो तिच्या घराकडे जाऊ लागला . तिच्या घराच्या वाटेवर असताना त्याला त्या झाडीत काही आवाज आला . तो घाबरत त्या झाडीकडे जाऊ लागला आणि अचानक त्याच्या वर पाठीमागून कोणी तरी झडप घातली . शिरपा ची किंचाळी नदीच्या पलीकडेच विरून गेली .
दुसऱ्या दिवशी सकाळी भीमा ने रखमाला म्हणाला
" शिरपा खोतवाडीला गेलाय औषध आणायला , लवकर येऊ दे म्हणजे गुणांक्काला तिच्या पोरांकडे आणि तुला आन आपल्या बाळाला तुझ्या मामा कडे सोडायची व्यवस्था करता येईल . कारण मी पडलो पुरुष माणूस , मला कस काय जमणार बाळंतीनीच . बाळाची आन बाळाच्या आई ची लई काळजी घ्यायला लागते असं गुणांक्का सांगत होती , त्या साठी घरात बाई माणूस लागती आणि गुणांक्का पण नाही इथे . तू मामा कडे जा . गुणांक्का गावात परत आली की मी तुला माहेरून घेऊन येतो . आता जरा जाऊन बैलगाडी ची जुळवा जुळव करून येतो ."
" शिरपा खोतवाडीला गेलाय औषध आणायला , लवकर येऊ दे म्हणजे गुणांक्काला तिच्या पोरांकडे आणि तुला आन आपल्या बाळाला तुझ्या मामा कडे सोडायची व्यवस्था करता येईल . कारण मी पडलो पुरुष माणूस , मला कस काय जमणार बाळंतीनीच . बाळाची आन बाळाच्या आई ची लई काळजी घ्यायला लागते असं गुणांक्का सांगत होती , त्या साठी घरात बाई माणूस लागती आणि गुणांक्का पण नाही इथे . तू मामा कडे जा . गुणांक्का गावात परत आली की मी तुला माहेरून घेऊन येतो . आता जरा जाऊन बैलगाडी ची जुळवा जुळव करून येतो ."
रखमा आपल्या पोटावरून हात फिरावंत बोलली "मी जास्त दिस तिथे राहणार नाय . माझ्या बाळाला त्याच्या बा बरोबर खेळायचं हाय , सगळी कडे फिरायचं हाय . आमाला लवकर घ्यायला यायचं . " भीमा प्रेमाने आपल्या बायको कडे पाहू लागला .
गुणांक्का आली भीमा ला बोलली " पोरां मी अमावसेच्या रात्री निघतो माझं पोरग पुढच्या गावात येतंय बैलगाडी घेऊन . तू मला पुढच्या गावा पर्यंत सोड तिथून मी आन माझं पोरग जातो . तिकडच आवरलं की परत गावी येते आणि मग तू रखमाला आन ."
भीमा म्हणाला " ठीक आहे तुला रातच्याला सोडतो आणि सकाळी हिला तिच्या मामाकड सोडतो . तू वापस आलीस की हिला घेऊन येतो . " पण गुणांक्का आताच सांगतो तू वापस आलीस की आमच्या बरोबर इथेच राहायचं . तुझ्या पोराला काय सांगायचं ते माझं मी बघतो . "
भीमा न बैलगाडी ची व्यवस्था करून ठेवली . आणि शेजारी सांगून ठेवलं तो त्याच्या बायकोला तिच्या माहेरी सोडायला जाणार आहे आणि 2-3 दिवस तिथंच राहणार आहे .
आज अमावस्या . तो विशिष्ट योग . देवींची यात्रा . सगळे योग जुळवून आल्या सारखे . गुणांक्का सकाळ पासून भीमा च्या घरी . आज रखमाला सकाळ पासून पोटातून कळा येत होत्या . गुणांक्काच्या मते रखमा तिनीसांज पर्यंत मोकळी होईल . संध्याकाळी गुणांक्काने भीमा ला बाहेर पाठवले .
क्रमश....
गुणांक्का (पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
गुणांक्का ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html
गुणांक्का ( पार्ट 4 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4_12.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
गुणांक्का ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html
गुणांक्का ( पार्ट 4 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4_12.html
गुणांक्का ( पार्ट 5 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/5_12.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/5_12.html