गुणांक्का ( पार्ट 5)
( ह्या आधीच्या सर्व पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
दुपार पासून आपला मोठा मुलगा घरी आला नाही हे पाहून नामा ची आई त्याला संध्याकाळी हुडकायाला बाहेर पडली . रात्र होत आली आहे नक्की खेळण्याच्या नादात घरी आला नाही . असा विचार करत नामा ची आई त्याला हाका मारू लागली . त्याच्या सगळ्या ओळखीच्या मित्रांच्या कडे ती जाऊन आली , पण तिच्या मुलाला दुपार पासून कुणीच पहिले न्हवत. आता मात्र तीला टेन्शन आल , आधीच नवरा गेला त्याच दुःख आणि त्यात मुलगा सापडत न्हवता . ती धाय मोकलून रडू लागली . सारा गाव जमा झाला . तरी गावातील लोक तिच्या मुलाला सर्व ठिकाणी हुडकु लागले . कुणाच्या हाती काहीच लागलं नाही . रडत रडत नामाची बायको स्वतः च्या घरी गेली . पारा वर लोकांची चर्चा चालू झाली .
"कुठं गेलं असलं र नामा च पोरग ? त्या हडळी न तर नेलं नसेल ना ? "
" अरे असं कस शक्य हाय ? ते पोरग कशाला नदी ओलांडून तिकडे जाईल ? त्याला काय नाव वाल्हवयाला येती का पोहायला येत ."
"अरे पण मग पोरग गेलं कुठं ?"
'मला वाटतंय नदीत बुडाल असलं . खेळायला गेलं असेल नदी किनारी , आन पडलं असेल पाण्यात . त्याला पवायला भी येत न्हवत."
"होय र , जवळच कुठं बुडाला असलं तर उद्या प्रेत फुगून येईल . नसल तर प्रेत पुढच्या गावात वाहून गेलं असणार . "
"आपण एक काम करू उद्या परत सगळं गाव हुडकू , गावला तर ठिक नाय तर नदीत बुडाला . नदी वर पण जाऊ . नदीत कुठं गावतय का बघू पोरग . नाय गावला तर प्रेत पुढ गेलं असणार ."
"व्हय . प्रेत काय एकच ठिकाणी राहणार हाय व्हय . पुढच्या गावात भी मिळेल कशा वरून ? आणि पुढ गेलं असलं तर ?"
"एक काम करू आधी पूर्ण गावात हुडकू . नदी वर पण हुडकू . सापडला तर बर . नाय तर अवघड हाय ."
नामा आणि त्याच्या मुला बद्दल हळहळ व्यक्त करत प्रत्येक जण स्वतःच्या घरी गेला . दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन सारा गाव परत पिंजून काढला . नदी वर पण हूडकला पण नामा चा मोठा मुलगा काही सापडला नाही . लोक हताश होऊन परतले . नामा चा मुलगा नदीत बुडाला . असा निष्कर्ष काढून लोक गावात परतले . नामा च्या कुटंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला होता .
कालय तस्मै नमः . काळ कधीच कुणासाठी थांबत नाही . लोकांना पण नामा च्या कुटुंबा वर जे संकट आलं जी वाईट वेळ आली त्या बद्दल वाईट वाटत होते . प्रत्येक जण सांत्वन करून गेला . आणि आपापल्या कामाला लागला .
भीमाच्या बायकोचे दिवस आता भरत आले होते . गावात ग्रामदेवींची यात्रा भरत असे. ह्या वर्षी त्या विशिष्ट योगा वर येणारी ती अमावस्या पण आली होती . देवीचा यात्रेचा मानाचा दिवस आणि अमावस्या एकच दिवशी आली होती . गावात ग्रामदैवतेची मोठी यात्रा भरत . सर्व जण जत्रेला जात . देवीचा यात्रेचा मानाच्या दिवशी गावात दुपार व संध्याकाळी गावजेवण असे. त्या दिवशी गावातील सर्व जण देवळाच्या तेथे असत .
आज गुणांक्का जरा उशिरा भीमा कडे आली . खूप दिवसांनी गुणांक्का खूप तरतरीत दिसत होती . असं वाटत होती की आजारातुन पूर्ण बरी झाली आहे. ती त्या गावात राहायला आल्या पासून आज पहिल्यांदा एवढी प्रसन्न आणि फ्रेश दिसत होती . भीमा ला म्हणाली "पोरा माझ्या अंदाजान रखमा अमावसेच्या दिवशी बाळंत होईल . ती बाळंत झाली कि तीला तिच्या मामा कडे धाडून दे . मी केल असत बाळ बाळंतीनीच पण काल माझ लहान पोरग सांगत होत त्याला मोठया पोराच पत्र आलंय त्याची तब्बेत ठीक नाय . मी आताच जाणार होते पण मी गेले तर रखमाच अवघड होईल म्हणून थांबले . हिला मोकळी करते आणि मी निघते . माझं पोरग आणि मी जातो मोठ्या पोरां कडे . त्याला बर वाटल की परत येते गावात आणि मग तु रखमाला परत आन . मग मी बघीन तीच समंध . तो पर्यंत पोरगी माहेरला भी जाऊन येईल . तीला भी बर वाटेल . "
"ठीक हाय गुणांक्का . तु म्हणशील तस . गुणांक्का लई छान दिसत हायस बघ . तब्येत चांगली होत हाई तुझी . काळजी घे स्वतःची . आम्हाला भी कोण हाय तुझ्या विना . कोण कुठची तु पण किती माया लावलीस आम्हाला . माझ्या पोराच्या लग्नाच्या वरातीत नाचायचं हाय तुला . तुला भरपूर आयुष्य लाभुदे ." भीमा म्हणाला .
"गुणांक्का माझं आणि माझ्या पोराचं तूच केल असतंस तर लई बर वाटल असत पण तुझ् पोरग पण तिकडे आजारी हाय . तू जा तुझ्या पोरांकडे . पण हिकडं परत आलं की फक्त माझ्या पोराचं आणि माझं लाड करायचं . आणि तू गावाला जाऊन परत आलीस की आमच्याच घरी राहायचं . आमी नाय तुला त्या नदीपलीकडच्या घरात पाठवणार . बाळाची आज्जी बाळा बरोबर इथेच राहिल." रखमाने सांगितलं . तीला गुणांक्का मध्ये स्वतःची आई दिसत होती .
क्रमश ...
गुणांक्का (पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
गुणांक्का ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html
गुणांक्का ( पार्ट 4 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4_12.html3/