गुणांक्का ( पार्ट 4)
( ह्या आधीच्या सर्व पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
नावेत बसून गुणांक्का भीमा बरोबर त्याच्या घराकडे जाऊ लागली .
नामा कसा हाय र ? तब्येत कशी हाय त्याची ? गुणांक्का न विचारलं .
अग नामा कालच वाराला . काल रातच्यालाच जाळून आलो बघ . नदी पल्याड स्मशानात आणलं , त्याला अग्नी दिला . जाताना तुझ्या कडे येणार होतो पण लई अंधार पडला होता ग म्हणून नाय आलो .
अरे अरे , वंगाळ झालं र , चांगल होत पोरग , चल आधी त्याच्या घरी जाऊन भेटून येऊ .
भीमा आणि गुणांक्का नामा च्या घरी आल्या . नामाची बायको आणि आई शून्यात नजर लावून बसल्या होत्या . नामा चा 2 वर्षाचा मुलगा तिथेच झोपला होता . गुणांक्का आली तस परत सगळ्यांच्या अश्रूचा बांध फुटला . नामा ची आई व बायको परत रडू लागल्या . त्यांच्या रडन्यान नामा छोटा चा मुलगा उठला . त्याला काहीच समजत न्हवत . गुणांक्कान त्याला मांडीवर घेतलं व ती रडू लागली . नामा चा 7 वर्षाचा मोठा मुलगा घराबाहेर गेला व अंगणात जाऊन बसला . त्याला पण समजत न्हवत . त्याला त्याचे मित्र दिसले .तो त्याच्या मित्रांच्यात खेळायला गेला .
"आमच्यासारखं पिकलेल पान न्यायचं सोडून असं सोन्या सारख्या माणसाला का नेलं ?" गुणांक्का हमसून हमसून बोलत होती . खूप दुःखी वातावरण झालं होत नामा च्या घरी . थोडया वेळ थांबून गुणांक्का तेथून उठली व भीमाच्या घरी गेली . तिची तब्बेत म्हणावी तशी ठीक न्हवती . पण ती रखमाच्या प्रेमा पोटी आली होती . गुणांक्का संध्याकाळ पर्यंत थांबली . संध्याकाळचे आवरून ती बाहेर पडली . अंधारून आल होत . तोच तीला शिरपा दिसला . शिरपा तीला पाहून तिच्या जवळ आला .
"कशी हाय तब्बेत ? वाटतंय का बर आता ? नक्की काय होतय गुणांक्का ? " शिरपा ने आपुलकी ने तिची चौकशी केली .
"अशक्तपणा जाणवतो र , वयाच्या मनान होणारच तस . पिकल पान गळणारच ." गुणांक्का बोलली .
" मरो तुझ् दुश्मन . अजून चिक्कार जगायचं हाय तुला . हे बघ मी थोड्या दिवसात खोतवाडी ला जाणार हाय . खोत वाडी लांब हाय पण मला असं कळलं हाय पण तिथे एक बाबा हाय तो लई चांगल औषध देतोया . मी माझ्या म्हातारी साठी आणायला जाणार हाय तेव्हा तुझ्या साठी भी आणतो ." शिरपा गुणांक्काला बोलला .
" किती कराल र माझ्या साठी . ह्या म्हातारीला किती जीव लावताय सा . मी तुमच्या नात्याची ना गोत्याची . जीव भरून येतो बघ तुमचं प्रेम बघून . तुम्ही सगळी जण एवढा जीव लावता आणि माझ्या पोटच पोरग मला विचारत नाय .कुठं बोंबलत फिरतंय कुणास ठाऊक ." गुणांक्का डोळ्यातील पाणी ठिगळ पडलेल्या पदराने पुसत बोलली .
" अग तुझं पोरग तुझी काळजी घेत नसल तर काय झालं मी हाय की . मी भी तुझ्या पोरांवानी हाय . कधी भी कसली भी मदत लागली तर सांग तुझं हे पोरग तुझ्या साठी अर्ध्या रात्रीच भी येईल . " शिरपा गुणांक्काला धीर देत बोलला . त्याच प्रेम बघून गुणांक्का चे डोळे परत पाण्याने भरून आले . गुणांक्कान त्याच्या पाठीवरून मायाने हात फिरवला.
रात्र झाली होती . नामा चा मोठा मुलगा खेळून घराकडे होता . गुणाक्का ला नामा चा मुलगा दिसला . तिने त्याला हाक मारली तो तिच्या कडे आला.
"पोरा लई वंगाळ झालं . असं व्हायला नको होत . जाऊदे तू एक काम कर उद्या कुणाला न सांगता माझ्या घरी ये . मी तुझ्या साठी जत्रन खेळणं आणलाया आणि खाऊ भी आणलंया . तू गुमान कुणाला न सांगता माझ्या घरी ये . तुझ्या आई आणि आज्जी ला भी सांगू नकोस आन तुझ्या मित्रांना भी सांगू नकोस . तू शहाणा मुलगा हाईस म्हणून मी फकस्त तुला गंमत देणार हाय ." गुणांक्का प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली .
आपल्यला खाऊ आणि खेळणं मिळणार हे ऐकून त्याच्या डोळ्यात चमक आली . तो आनंदात उड्या मारत घरी गेला . आपल्याला गुणाक्काने बोलावलं आहे हे तो घरी सांगणार न्हवता कारण मग ते खेळणं आणि खाऊ त्याच्या लहान भावाला द्यावं लागलं असत . उद्या दुपारी नदीकडे कोण नसतं तेव्हा आपण गुणाक्का कडे जायचं असं त्यांनी पक्क केल . आणि नवीन खेळण्याचा विचार करत झोपी गेला .
दुसऱ्या दिवशी सकाळी भीमा च्या घरा कडे जाताना गुणाक्का ला नामा चा मोठा मुलगा दिसला . तो तिची वाटच बघत बसला होता . ती दिसताच तो तिच्या कडे गेला .
दुपारचाला कुणाच लक्ष नसताना नदी कड जा . नावत लपून बस . मग आपण घरी जाऊ . मी तुला गंम्मत देते . आनंदाने नामाच्या मुलांन तीला मिठी मारली .गुणांक्कान प्रेमाने त्याच्या डोक्यात हात फिरवला . आणि ती भीमा च्या घराकडे निघाली .
कधी एकदा दुपार होती आणि आपण गुणाक्का च्या घरी जाऊन खेळणं व खाऊ घेऊन येतो असं नामाच्या मोठया मुलाला झालं होत .
गुणांक्का भीमा च्या घरचे दोन्ही वेळेची कामे येताना आवरून आली होती . ती आज संध्याकाळी गावात येणार न्हवती . नामा च्या मुलाला गुणाक्का भीमा च्या घरातून बाहेर पडताना दिसली .
लोक नदीकिनारी सहसा जात नसत. त्यामुळे नामा च्या मोठ्या मुलाला नदी कडे जाताना काहीच अडचण आली नाही . तो पळत नदी वर आला आणि नावेत जाऊन लपला . दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कुणी न्हवते . गुणांक्का नदी वर गेली . नावेत लपलेला नामा चा मुलगा तीला दिसला . त्याला डोळ्याने खुण करून त्याला नावेत तसेच लपयाला सांगितलं . नाव पलीकडे काठावर आली . गावातून कोणी नदी वर आले नाही ना याचा अंदाज गुणांक्का ने घेतला . कुणीही आपल्याला बघत नाही हे पाहून तिने नामा च्या मुलाला नावेतुन उतरायला सांगितलं आणि तिच्या घरा कडे जाण्याची वाट दाखवली . तो हरकुन तिच्या घरा कडे जाऊ लागला . आणि अचानक त्याला मागून कोणी तरी पकडलं .
क्रमश ....
गुणांक्का (पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html
गुणांक्का ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/3.html