https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_68.html
कथेच्या आधीच्या भागाची लिंक वर दिली आहे👆
केवढा स्पष्ट हा घुंगराचा आवाज, म्हणत स्मिता जागेवरून उठली.... भयाण शांततेत थक्क करणारा तो भीतीदायक असा घुंगराचा आवाज आणि त्याला साथ देनारा तो कर्कश्य असा रात किड्याचा आवाज, अंगावर सर्रकन काटा उभा रहावा आणि तो आवाज चक्क आपल्या पाठी मागून च येत असल्याचा भास व्हावा...
स्मिता ने माघे वळून पाहिले तर कोणी नव्हते, आवाजाच्या दिशेने तिने कान मग्न केले, आवाज वर माळवदावरून येत असल्याचा भास तिला झाला, रात्री एकटी काय करणार म्हणून तिने दबक्या पावलाने समीर ला गाठल आणि हलवून जागे केले, समीर उठताच तिने त्याच्या तोंडावर हाथ ठेवला आणि हाथाने इशारे करून त्याला आवाज ऐकण्यास सांगितले...
"छम छम छम, छुम छम छम, छाम छुम छुम"
बापरे काय भयाण तो आवाज कानी पडताच, दोघांनीही कानावर हाथ ठेवत झोपी गेले... सकाळ झाली समीर आणि स्मिता नेहमी प्रमाणे उशिराच उठले...रेणुका ने समीर साठी बेड टी नेली, पण तिच्या पैंजनच्या छुम छुम चा आवाजाने समीर ने उडीच मारली, "काढ ते पायातले, खूप भयंकर आहे ते" म्हणत समीर ओरडू लागला, सगळे जमा झाले , काय झालं समीर, काय झालं समीर म्हणत सगळे समीर जवळ आले...
समीर काही केल्या बोलना, तेवढ्यात आजी बोलली, "काय नाय झालं त्याला, काल आवाज ऐकला असेल त्याने #सगुनाबाईचा त्यामुळेच तो घाबरला गेलाय"
सगुणाबाई कोण सगुणाबाई, परत एकदा गोंधळ काय आहे ह्या घुंगराच रहस्य कोण ती सगुणाबाई, नेमकं काय चालले आहे कळेना म्हणून स्मिता स्वतःच स्वतःवर चिडली, तोंड धूत असताना तिने रागात समीर कडे नजर फिरलवी,
समीर : माझ्याकडे का रागाने बघत आहेस, मी काय केले??
स्मिता : गधड्या काल तुला उठवले तर तू मलाच भीती घालून झोपवले, कोणीतरी सोबत असावे म्हणून तुला उठवले होते मी...
समीर : हो पण केवढा भयानक तो घुंगराचा आवाज होता, कानात कोणी गरम तेल टाकले की काय असे वाटत होते, जेवढा त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू वाटत होते तेवढाच त्या वेगाने तो आवाज कानी पडू लागला होता, काही क्षण तर असे वाटले की कोणीतरी जवळ येत आहे...... बस अजून ही भीती वाटत आहे स्मिता... लवकर झोपत जाऊ ग रोज आपण..??
स्मिता : काय रे मी मुलगी असून घाबरली का सांग, तुला उठवले नसते तर तुला आवाज ऐकू आला नसता आणि दुसऱ्या दिवशी मलाच वेड्यात काढले असते तू.....
समीर : बर पुढचा प्लॅन काय आहे सांग करूया आपण...
स्मिता : #वाडा
समीर : वाडा , आता वाडा काय मध्ये...
स्मिता : तो वाडा, भाकरीचा तुकडा उतरवून टाकलेला वाडा, त्या वाड्यात जायचं आपण...
समीर : बहुतेक तू जन्मताच डोक्यावर पडली आहे वाटत , तुझ्या तू एकटीच जा , मी येणार नाही त्या भयंकर वाड्यात...
स्मिता : अरे सकाळ सकाळ जाऊया, हवे तर तू माझ्या माघे चाल, मी पुढे राहते मग तर झालं... काय आहे ना समीर मला एकटीला नाही सोडणार घरचे त्यामुळे...
खूप मोठा प्रश्न समीर समोर उभा राहिला होता,पण बहिणीवर असलेले प्रेम त्याला होकार देण्यास सांगत होते, त्याने स्मिता ला होकार दिला... घरी येऊन सर्व आवरले, थोडा नाष्टा केला आणि काकुला सांगितले की, आम्ही गावात फिरून येतो... काकूंनी देखील होकार दिला... पण जाताना आजीने हटकले..
आजी : "त्या वाड्या च्या उलट जायचं आणि सुलट यायचं बरं का..???"
स्मिता : " आजी काय आहे नेमकं त्या वाड्यात आल्यापासून पाहते आहे मी, उलट यायचं, सुलट जायचं, तुकडा ओवाळून टाकायचा, काय सांग ना मला"
आजी : "येळ आली की सगळं सांगेन पोरी, पण आता जावा आणि लवकर या "
स्मिता आणी समिर होकारार्थी मान हलवून घरा बाहेर पडले... बाहेर घरातून आणलेला टफी बांधलेला होता, सोबत त्याला ही घेऊन जावे या विचाराने स्मिता ने त्याला ही सोबत घेतले....
स्मिता ....समीर आणि टफी आता जेथे चालले होते ते एक भयानक, भयंकर, विचित्र असे काहीसे होते, असे गावातील लोक सांगत होते आणि ह्यांनी ऐकले होते...पण आज काही केल्या ह्या सर्वांचा परदा पाश करण्याचा हेतूने समीर आणि स्मिता निघाले.... वाड्याच्या जवळ येताच समीर उलट दिशेने निघाला असता स्मिता ने त्याला रोखले,
समीर : वेडी आहेस का, आजी काय म्हणली होती विसरली का....??
स्मिता : मी नाही विसरले पण आपण ह्या वाड्यात जाणार आहोत त्यामुळे सरळ च जावे लागणार आहे ना वाड्यात.....कळलं..!!
समीर : बर , ठीक आहे... कोणी बघत नाही ना याची दक्षता घे आणि कर आत प्रवेश... मी ही आलो तुझ्या पाठोपाठ तुझ्या माघे....
स्मिता ने हिकडं तिकडं बघत अखेरीस त्या वाड्यात प्रवेश केला....टफी ला घेऊन, समीर ने ही पाठोपाठ तिच्या माघे पवेश केला.... अंगणात झाडांच्या पानांचा नुसता ढीग गोळा झाला होता, काही कचरा कुजला गेल्या मुळे त्याचा असह्य असा कुबट वास येत होता...वाड्याच्या हद्दीत प्रवेश केला मात्र तो भला मोठा दरवाजा उघडायचा कसा... आत प्रवेश करायचा कसा... हा प्रश्न स्मिता ला पडला... समीर ची नजर फिरत फिरत वर गेली तेव्हा त्याच्या नजरेस पडले की, झाडाची एक फांदी वरील माळवदाकडे जाते आहे आणि फांदीची उंची ही जास्त नाही दिसताच त्याने स्मिता ला बोलावले.... स्मिताने क्षणाचा विचार न करता, फांदीवरून त्या माळवदावर उतरली.... आता टफी ला वर चढवण्याचे प्रयत्न करू लागले पण काही केल्या टफी वर येत नव्हता, त्यामुळे त्याला खालीच ठेवले आणि समीर स्वता वर चढला...स्मिता आणि समीर आता वाड्याच्या वरील भागात होते, त्यांनी आत प्रवेश करताच, त्यांच्या पायात बेड्या पडाव्या अशा पद्धतीत ते कोळीजाळ्यात अडकले गेले, कित्येक वर्षे झाले असतील वाडा असाच बंधीस्थ अवस्थेत होता, काळा कुट्ट अंधार असल्याने स्मिता ने मोबाईल ची टॉर्च ऑन केली त्या उजेडात स्मिता आणि समीर चालू लागले, भिंतीवर काढलेले सुबक नक्षीदार चित्र, जेथे स्त्री देहाचं वर्णन अत्यंत सुबक पद्धतीत रेखाटले होते, पुढे भिंतीवर पाहिले असता एक लहान मुलगी हातात रिकामे ताट घेऊन आईची वाट पहात आहे आणि तिची आई आपल्या नृत्या मध्ये दंग झालेली आहे, हृदयाला चटका लागेल असे ते चित्र पाहून स्मिता आणि समीर च्या पापण्यात आसवांची गर्दी निर्माण झाली, हळू हळू सर्व झालेला मनातील गोंधळ आता हळुवार पणे सुटत चालला होता, एक एक करत स्मिता ने प्रत्येक चित्राचे फोटो काढुन घेतले... आता हे दोघे वाड्याच्या मधोमध खाली आले होते, सकाळची वेळ होती तरीही वाड्यात असे भासत होते की खूप रात्र झाली आहे, समीर आणि स्मिता एकमेकांच्या जवळच थांबले होते, अचानक स्मिता ची नजर एक चकाकत्या वस्तू कडे गेली, आपल्याला खजिना सापडला ह्या भ्रमात ती त्याकडे आकर्षित झाली... हळूहळू ती त्या वस्तू जवळ आली आणि तिने पाहिले तर..... एका मलमल च्या लाल रंगाच्या कपड्यात नर्तिकेचे घुंगरुची जोड दिसली, आता मात्र त्यांना कळले की जो आवाज काल रात्री आला होता तो ह्याच घुंगराचा होता, स्मिता ने हाथ सरसावत त्या घुंगराला स्पर्श केला, स्पर्श होताच जोरात वीज कडाडली, वारा जोरात वाहू लागला जणू तो आता पुढे काही तरी विपरीत होणार आहे याची प्रचिती देत होता, समीर ने प्रसंगावधान साधून स्मिता ला बाहेत पडण्यास सांगितले पण स्मिता ची नजर त्या घुंगरावर खिळली होती, तिने ते कपड्यातील घुंगरु उचलून तेथून पळत सुटली, कसा बसा मार्ग काढत ते दोघे झाडाच्या फांदीपर्यत पोहचले खाली टफी तसाच उभा होता, समीर ने आधी स्मिता ला खाली उतरवले, समीर ही खाली उतरला, पण टफी आता स्मिता कडे बघून भुंकू लागला होता, तिच्या हातातील तो लाल फडक्यातील वस्तू कडे बघून तो गुरगुरु लागला होता, पण स्मिता ने त्याच्या कडे दुर्लक्ष करत तेथून पळत सुटली पण पळता पळता तिचा तोल गेला आणि ती पडली, तिच्या हातातील ते घुंगराची जोड देखील खाली पडली, हुशारीने तिने परत उठून त्या घुंगराच्या जोडी कडे वळली, एक उचलली पण दुसरी उचलता क्षणी तिला जाणवले, की कोणीतरी अमानवीय शक्ती वाड्याच्या खिडकीतून चित्र विचित्र चेहरा करून तिच्या कडे रोख धरून पहात आहे... स्मिताने उचललेली एकच घुंगरु घेऊन तेथून पळत सुटली...... पण गडबडी मध्ये त्यांनी आजीने सांगितले होते ते सर्व विसरून घरी आले होते.....
क्रमशः
#अनुप_देशमाने