https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_95.html
कथेच्या आधीच्या भागाची लिंक वर आहे👆
कथा : #घुंगरु भाग ३ रा
लेखक : #अनुप_देशमाने
नेमकं विक्रांत काका नी काय लपवल आहे आपल्यापासून, ह्याचा विचार स्मिता आणि समीर करू लागले, पण सांगितल्या प्रमाणे एक शब्दही ते बोलले नाहीत...
मोठ वडाच झाड लागलं, तसे घर जवळ आले याची प्रचिती आता सगळ्यांना आली, कधी घरी जाते आणि आजीला मिठी मारते असे स्मिता झाले होते, भला मोठा वाडा त्याला भले मोठे दार, दगडाचा उंबरा असलेले वाडा एकदाचा डोळी पडला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदी प्रकारचे भाव आले,
विक्रांत : स्मिता.... समीर आठवलं का र आपला वाडा, सांगा बर कुठे हाय वाडा आपला...
स्मिता : काका ते बघ तो ब्राऊन कलर चा दरवाजा आहे ना तो आहे आपला वाडा...
विक्रांत : बरोबर, चला बाहेरच थांबा सगळे, मी हाक देतो आत..
विक्रांत : रसिका ये रसिका आम्ही आलो आहोत ये लवकर बाहेर...
विक्रांत ने आवाज देताच, रसिका , आजी, रेणुका आणि स्वाती बाहेर पळत आले...
ते सगळे आत उंबऱ्यात च उभारले, रसिका ने हातात एक पाणी तांब्या आणि तसाच भाकरीचा तुकडा आणला आणि सर्वांवर ओवाळून रस्त्याच्या पलीकडे नेऊन टाकला, सगळे आत आले, रेणुका ने सर्वाना पाणी दिले हात आणि पाय धुण्यास... स्मिता आणि समीर ने पटकन पाय धुतले आणि आधी पळत जाऊन आजीला मिठी मारली...
आजी : आर माझी पिलवांड किती वर्साने आलीती, आजीने तशाच सुरकूतलेल्या ओठांनी त्या दोघांचे मुके घेतले, वय झाले असले तरी चालता, बोलता मात्र स्पष्ट येत होते, एकही दात पडलेला नव्हता... फक्त वयाप्रमाणे अंगावर सुरकुत्या पडल्या होत्या,
रेणुका आणि स्वाती विक्रांत च्या दोन मुली, मोठी रेणुका जी 10 मध्ये होती लहान स्वाती 8 वी मध्ये होती, रसिका ने सर्वा साठी मस्त चहा ची मेजवानी सोबत शँकरपाळी दिली, सर्वांनी मस्त चहा ची पार्टी केली, स्वाती आणि रेणुका यांनी स्मिता च्या मोबाईल मधील फोटो बघत बसले, समीर आपल्या मोबाईल मध्ये गेम खेळण्यात गुंग झाला होता, बाकी मोठे मंडळी शेतीबद्दल बोलत होते, पाऊस ह्या वर्षी कमी असल्याने शेतात वेगळेच पीक घेतले होते हा विषय चालू होता, विषय चालू असतानाच मध्येच सीमा पुटपुटली..
सीमा : भाऊजी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रेणुका ची 10 वी झाली की आमच्या कडे पाठवा तिला पुढील शिक्षणासाठी, आम्ही करू तिचे शिक्षण पूर्ण बर का...
रसिका : अहो ताई कशाला तुम्हाला त्रास, येथे आहे पुढील शिक्षण घेण्यासाठी कॉलेज...
सीमा : अजिबात नाही, रेणुका माझ्याकडेच राहणार ह्यात काही बदल होणार नाही...
विक्रांत : बरं वहिनी तुम्ही म्हणाल तस, तुमच्याकडे राहू द्या..
आजी : नशीबवान हाय र मी पांडुरंगा ज्या मला एवढ्या चांगल्या सुना भेटल्या, बस काय नको आता मला... आणि आजी भावुक झाली...
अभि : ये आई वेडी आहेस का, रडतेस कशाला ग आम्ही आलो आणि तू रडतेस का, असे म्हणत अभि ने आजीला मिठी मारली...
रेणुका, स्वाती, स्मिता आणि समीर बाहेर निघाले फिरायला...
विक्रांत : ये पोराव कुठं निघालात
रेणुका : बापू आम्ही स्मिता ताई आणि समीर दादा ला आपले शेत दाखवण्यास चाललो आहोत...
अभि : हो बाळांनो जावा पण लवकर या बरं का,
विक्रांत : रेणू, जाताना वाड्याच्या उलट्या दिशेने जा आणि सुलट दिशेने या बर का,
रेणुका : हो बापू.. म्हणत सगळे पोर वाड्याच्या उलट्या दिशेने शेताकडे निघाले... शेतातील आंब्याचे झाडे, पेरूची झाडे, लहान लहान उगवलेले पिकांची रोप, जमीन सगळी च्या सगळी हिरवा शालू नेसलेल्या वधू सारखी दिसत होती, ह्याही वेळी सेल्फी काढण्याचा मोह काही स्मिता ला आवरला नाही, तिने सगळ्या झाडाजवळ, शेतात जाऊन सेल्फी काढले... चालून दमल्या नंतर सगळे जण चिंचेच्या झाडाखाली बसले...
समीर : स्वाती.. तुला स्विमिंग करता येत का ग??
स्वाती : हो दादा येत ना..!!
समीर : बघ स्मिता, किती लहान आहे ही, हिला येत स्विमिंग आणि तू घाबरतेस..!!
स्मिता : असू देत i hate water ok
रेणुका : खरच ताई तुला नाही येत पोहता???
स्मिता : हो नाही येत ग, मला भीती वाटते पाण्याची..!!
सगळे हसु लागले...तेवढ्यात समीर ने विषय बदलला..
समीर : बर स्वाती आणि रेणुका मला सांगा, तो स्टेशन वरून घरी येताना जो मोठा वाडा लागतो त्याच काय गुपित आहे रे..??
रेणुका : कोणता मोठा वाडा पण खूप मोठे वाडे आहेत गावात..??
स्मिता : आग तो वाडा जेथे आल्यानंतर तुझ्या बाबांनी आम्हाला एक शब्द ही बोलायला नको बोलले आणि भाकरी ठेवले तिकडे...
स्मिता चे हे वाक्य ऐकल्यानंतर रेणुका आणि स्वाती एकमेकीकडे बघू लागल्या... एक वेगळीच भीती त्यांच्या चेहऱ्यावर खेळू लागली..
रेणुका : दादा आणि ताई आपण त्या वाड्याबद्दल न बोललेलं बरेच..!!
समीर : आग पण का काय आहे त्या वाड्यात नेमकं..!! काही अघटित आहे का की विचित्र आहे...सांगा ना आम्हाला??
स्वाती : दादा आपण घरीच जाऊ आता मला भीती वाटते त्या वाड्या ची... मला धाप लागते त्याचा विषय जरी काढला तर..
स्मिता : नको ग घाबरू वेडी आम्ही आहोत ना, घाबरण्यासारख काही नसतं ह्या जगात आपल्या मनाचे खेळ असतात सर्व... वाटलंच तर उद्या आम्ही तुम्हाला त्या वाड्यात जाऊन दाखवू का, आम्ही नाही घाबरत असल्या गोष्टींना...
रेणुका : ताई बस कर ऐकेल ती...????
स्मिता : कोण ती ...???
स्वाती : कोणी नाही चला ना घरी लवकर..!!
समीर : ok ok चला रे बंद करा हा विषय...!!
सगळे परत सुलट दिशेने घरी जाऊ लागले, पण कोणी एकमेकांना बोलत नव्हते, स्वाती तर खूप घाबरली होती, समीर ने तिच्या हातात हात देऊन तिच्या सोबत चालू लागला... एकदाचे सर्वजण घरी परतले, सगळ्यांनी पाय धुतले, स्वाती घाबरलेली दिसताच विक्रांत ने रेणुका वर आवाज चढवला,
विक्रांत : रेणू...!!!! तू परत त्या वाड्याचा विषय काढलास ना हिच्या समोर..!! का तुला माहिती नाही का हिला भीती वाटते ते, मूर्ख कुणिकडची...!!
रागावलेल्या काकांच्या नजरेतून जाणवत होते की नक्कीच खूप मोठे गुपित दडले आहे त्या वाड्यात, नक्कीच काहितरी आहे... पण विचारायचं कोणाला ते पण कसे विचारायचं... काहीच कळत नव्हते स्मिता आणि समीर ला...
रात्रीचे 8 वाजले सगळे ओसरीवर जेवण्यास बसले, काकांचा मूड बघून स्मिता बोलली, "काका जेवण झाल्यावर आम्ही तुम्हाला बोललं तर चालेल का..??"
विक्रांत : "हो... का नाही..!! बोला ना पण जेवण झाल्यावर, आधी जेवण करा सगळे पोट भरून"
सगळे मस्त अंगत पंगत करन जेवायला बसले होते, आज आजीपन सर्वाना जेवण वाढत होती, मस्त मसालेदार भाजी, जाडजूड भाकरी सोबत तोंडी लावण्यास कांदा आणि लोणचे एकदम कसे गावरान तडकाच... सगळे बोटे चाटून पुसून जेवू लागले... घर आता भरल्यासारखे वाटू लागले होते.. सगळ्यांची जेवण झाली होती, आता रसिका आणि सीमा सर्व आवरून किचन मध्ये जेवण्यास बसल्या... तेवढ्यात शेजारील एक गृहस्थ येऊन विक्रांत ला हाक देऊ लागला, शेताकडे काम निघाले आहे आणि लागलीच जावे लागेल म्हणून विक्रांत लगेच निघाला त्याच्या सोबत जातो म्हणून अभि देखील त्याच्या सोबत गेला.... रेणुका आणि स्वाती त्यांच्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करू लागले... आता बाहेर अंगणात आजी, स्मिता आणि समीर बसले...
विषय कसा काढायचा, म्हणजे आजी कडून सर्व माहिती मिळेल याचा विचार स्मिता आणि समीर करू लागले...
स्मिता : काय रे समीर, तुला वाटत का ह्या जगात भूत असतात ते..???
समीर : काही नसते, सगळं खोटे आहे, भूत वगैरे काही नसते शांत बस तू..!!
स्मिता : पण मी म्हणते असतात..!!
समीर : गप ना काही पण बोलून डोक्याच दही नको ना करुस...!!
स्मिता : बघ आजी कसा बोलतो हा वेडा मला, मी फक्त प्रश्नच विचारला ह्याला..!!
आजी : असू दे नग रागाला येऊ तू पोरी..!!
स्मिता : मी नाही येत रागाला, मग तू...तू सांग आजी तुझा विश्वास आहे का भूत असतात ह्यावर..??
आजी (थोडावेळ घेऊन... हिकडं तिकडं बघून....उठली आणि वाड्याच्या दरवाज्याजवळ जाऊन बाहेर बघू लागली)
परत आजी स्मिता आणि समीर जवळ आली आणि बोलली..
आजी : पोरांनो, ह्या इशयावर आपण नग बोलायला... खूप वाईट अनुभव येत्यात गावात, आणि आता तर रात्र झाली हाय झोपा शांत आणि हा इचार आणू नका परत कळलं का..??
आजी बोलत होती खर पण तिच्या बोलण्यावरून तर हे जाणवत होते की नक्कीच ह्या गावात एक विशिष्ट अफवा पसरविण्यात आली आहे... पण पुढे काही न बोलता ते दोघेही ओसरीवर जाऊन आपले आपले मोबाईल काढून त्यात व्यस्त झाले... रसिका आणि सीमा ने जेवण उरकून घेतले आणि बाहेर येऊन झोपण्याची तयारी करू लागल्या... रात्रीचे 10 वाजले अजून विक्रांत आणि अभि अजून आले नव्हते म्हणून सीमा ने अभि ला कॉल केला तर तिला कळले की ते आज घरी येणार नसून शेतात झोपणार आहेत...
आज्जी : रसिका बाई झोपताना मोठे मीठ उंबऱ्यात ठेवून झोप ग ..!!
रसिका : होय होय ठेवते..!!
मोठे मीठ... आता ते कशाला अजून परत अजून डोक्याला ठोके देत स्मिता आणि समीर ला राग येऊ लागला...काय चाललंय कोणी सांगत ही नाही, पण काही जरी झाले तरी ह्या सर्व गोष्टींचा छडा लावायचा असे स्मिता आणि समीर ने ठरवले...
रात्रीचे 11:30 वाजले होते तरी देखील स्मिता आणि समीर जागेच होते, बाकीचे सगळे झोपी गेले होते, तेवढ्यात आजीला जाग आली आणि तिने पाहिले की हे दोघे जागे आहेत ते...
आजी : "अरे झोपाकी, आवाज आल्यावर झोपणार आहात का तुम्ही....??"
समीर : कसला आवाज आजी...!!
आजी : #घुंगराचा.. गाव झोपले की येतो र तो आवाज झोपा लवकर बर म्हणत आजी परत झोपी गेली....
आवाज येतो आणि तो ही घुंगराचा...तो ही एवढ्या रात्री, काय मजाक आहे यार, काय चाललंय नेमकं, आता तर बघूच कसा येतो ते आवाज म्हणत त्या दोघांनी झोपायचं सोंग घेतले....12 वाजून गेले तरी काही आवाज आला नाही... स्मिता लघुशंका साठी उठली आणि न्हाणी गाठली, स्मिता उठली म्हणून समीर पण उठला आणि तिच्या सोबत जागा राहिला... स्मिता आली आणि हळूच आवाजात पुटपुटली...काय रे आवाज आला का तुला, समीर: नाही आला आवाज वगैरे पण झोप मात्र अली आहे बघ...
स्मिता : "बर झोप तू मी जागीच आहे"
समीर गुड नाईट बोलून झोपी गेला, पण ही धाडसी स्मिता काहि केल्या झोपेना, रात्रीचे 1 वाजले होते... हळू हळू स्मिता चे डोळे झाकू लागले होते... तेवढ्यात....
"छम छम...छाम छम छम छम...छाम छाम" तीव्र आवाज कानी घुमला...
क्रमशः
#अनुप_देशमाने