"भास"-Marathi Real Horror Page story
आज पुन्हा सगळा दिवस कामात गेला, साधा जेवायला ही वेळ मिळाला नाही पण मला अजुन तरी कुठे भुक लागली आहे ? जाऊ दे खोलीवर पोहचल्यावर जेवते असा विचार करत वर्षाराणी बस मधुन उतरली.
आज ती खुप थकली होती. कधी एकदा खोलीत जाऊन झोपेन असे तिला झाले होते.
ती घाईघाईत जात होती तर समोरच्या आवाजाने ती मध्येच थांबली. समोरुन एक प्रेतयात्रा येत होती.
वर्षा तिथेच उभी होती ती घाबरली होती पण तिला काही सुचत नव्हते . . .
हळुहळु प्रेतयात्रा तिच्या जवळ येऊ लागली, वर्षा खुप घाबरली होती इतकी कि तिचे हात पाय कापु लागले होते. थोड्याचवेळात ती प्रेतयात्रा तिच्या जवळ आली आणि त्या प्रेताच्या तोंडावरचा कपडा उडाला.
तिने तो रक्ताने माखलेला, सुजलेला, मारलेले वळ उठलेल्या चेहरा पाहिला आणि ती जोरात किँचाळणार तोच तिला अनिकेत ने बाजुला ओढले "अगं लक्ष कुठे आहे तुझे ? अशी वाटेत का उभी होती ?" त्याने प्रश्नांचा भडीमार सुरु केला . .
पण वर्षा अजुन ही धक्क्यातच होती
ते पाहुन तो तिला मजेत म्हणाला काय माझ्याच विचारात असते का सारखं ?
यावर ती लटकेच हसली
ते दोघे जेवले आणि मग त्याने तिला खोलिवर सोडले
वर्षा आज तिथे एकटिच होती कारण तिच्या सगळ्या room mates 2 दिवसांसाठी फिरायला गेल्या होत्या.
अनिकेतलाही तिला तिथे एकटिला सोडणं बरं वाटत नव्हते पण तो तिला त्याच्या घराही नेऊ शकत नव्हता . .
वर्षा अनिकेत गेल्यावर झोपली तेँव्हा रात्रिचे 11 वाजले होते.
थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली.
मध्येच कसल्यातरी आवाजाने तिला जाग आली तिने अर्धवट डोळे उघडुन पाहिले तर तिला तिच्या room mates दार उघडुन खोलित येताना दिसल्या. तिला वाटले चला बरे झाले या सगळ्याजणी आजच आल्या, यांच्याशी सकाळी बोलु असा विचार करुन तिने डोळे मिटले आणि पुन्हा ती झोपी गेली.
थोड्यावेळानी तिला पुन्हा कसल्यातरी आवाजानी जाग आली आणि तिने अर्धवट डोळे उघडुन पाहिले कि तिच्या मैत्रिणी दार उघडुन बाहेर जात आहेत. तिला वाटलं काय कटकट आहे किती आवाज करतात या
तिला त्यांना खुप ओरडावेसे वाटत होते पण जाऊ दे आता सकाळी बोलु म्हणुन तिने ते सोडुन दिले.
ती पुन्हा झोपली.
थोड्याच वेळात तिला बाहेर कुणाच्या तरी रडण्याचे, ओरडण्याचे, किँचाळण्याचे आवाज येऊ लागले
तिने लक्ष देऊन ऐकले असता ते तिच्या मैत्रिणिँचे आवाज वाटले तिला वाटले हा भासच आहे त्यामुळे तिने दुर्लक्ष केले
काही वेळाने सगळे आवाज बंद झाले आणि दारावर एक थाप ऐकु आली वर्षाला वाटले या आता परत आल्या तितक्यात पुन्हा एक जोरादार थाप दारावर पडली वर्षा दार उघडायला उठणार इतक्यात दार जोरात ढकलले गेले आणि तुकडे होऊन खाली पडले
वर्षा जागच्या जागी हदरली
तितक्यात दारातुन एक खुप भयानक स्री आत आली, ते एक प्रेत होते तिचा पुर्ण चेहरा रक्ताने माखला होता, अंगावर जागोजागी मारहाणीच्या खुणा होत्या. वर्षाला तिला पाहिल्यासारखे वाटत होते पण आठवत नव्हते
ती स्त्री इतक्यात आत आली आणि वर्षाच्या दिशेने येऊ लागली
वर्षा जोरात ओरडु लागली पण तिथे तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हते
ती स्त्री तिच्या जवळ आली आणि तिने वर्षाला उचलुन समोरच्या भिँतीवर आपटले
वर्षा जिवाच्या आकांताने किँचाळली. ती स्त्री पुन्हा वर्षाच्या जवळ आली आणि तिने पुन्हा वर्षाला इथुन तिथे फेकायला सुरु केले
लहान बाळ जसे खेळणी फेकुन खेळते तसे ती वर्षासोबत खेळत होती.
अशातच वर्षा जमिनीवर आदळली गेली आणि तिच्या गळ्यातले आई महालक्ष्मीचे ताईत तिच्या हाताला लागले. ते तिने हातात धरताच ती स्त्री घाबरुन मागे झाली. ते पाहुन वर्षाने स्वता: ला सावरले आणि घाबरतच त्या स्त्रीला का मला त्रास देत आहेस म्हणुन विचारले
त्यावर ती स्त्री बोलली तु मला ओळखले नाही का ? मी तिच आहे जिचे प्रेत घेऊन जात असताना तु वाटेत ऊभी राहुन पाहत होती
यावर वर्षा म्हणाली पाहणे काही गुन्हा आहे का ?
यावर ती म्हणाली, नाही पण तुझ्या मित्राला तुझी इतकी काळजी करताना पाहुन मला तुझा खुप हेवा वाटला. मी माझ्या नवर्यावर इतके प्रेम करुन ही त्याने मला फक्त मारहाण केली, सिगारेटचे चटके दिले, उपाशी ठेवले आणि मरतानाही खुप छळले. मी आतापर्यँत खुप भोगले आहे पण आता मला सुख हवे आहे
वर्षाने विचारले पण याचा माझ्याशी काय संबंध ? तु माझ्याकडे आली ?
ती स्त्री जोरात हसली आणि म्हणाली यापुढे मी तुझे आयुष्य जगणार, अनिकेत सोबत मजेत राहणार आणि तु आता मरायचे. चल तयार हो मरायला असे म्हणुन ती वर्षाकडे येणार तोच वर्षाने आईचे ताईत तिच्यासमोर धरले
त्यासरशी ते भुत मागे झाले याचा फायदा घेत वर्षा खोलातुन बाहेर आली तोच तिला झटका लागला
बाहेर तिच्या सगळ्या मैत्रिणिंची प्रेते पडली होती . . . खुप वाईट पध्दतीने त्यांना मारण्यात आले होते
वर्षाला ते पाहुन खुप रडु आले ती लहान बाळा सारखी ओक्साबोक्सी रडु लागली.
आपल्या मैत्रिणिँना आपली गरज असताना आपण झोपा काढत होतो याचा तिला खुप राग येत होता पण आता काहिच करता येत नव्हते.
तिच्या या अवस्थेचा गैरफायदा त्या भुताने घेतला आणि तिच्या हाताला धरुन ओढु लागले.
वर्षाला आता काहिच करता येत नव्हते कारण ते ताईत हि आता कुठे तरी पडले होते
ती खुप रडत होती, अनिकेतची आठवण काढत होती पण तो तिथे तसा येणार ?
इतक्यात अनिकेत तिथे आला आणि त्याला पाहताच ती भुतीण आनंदाने उसळली आणि वर्षाला तिने दुरवर फेकुन देत अनिकेतकडे जाऊ लागली.
त्याला काय चालले आहे तेच कळत नव्हते तितक्यात वर्षा उठली आणि आईचे ताईत शोधु लागली इथे ती हडळ अनिकेतला आपल्या सोबत घेऊन जात होती. ते पाहुन ती सरळ अनिकेतकडे पळत जाऊ लागली आणि मध्येच ठेच लागुन पडली आणि तिथे तिला आईचे ताईत सापडले.
तिने ते घेतले आणि अनिकेतच्या अंगावर फेकले त्याचक्षणी हडळ त्याच्यापासुन दुर गेली आणि रागारागाने ओरडु लागली. तिने वर्षाच्या हाताला धरुन तिला ओढत न्यायला सुरुवात केली. तेँव्हा वर्षा जोरजोरात रडत आणि ओरडत होती
तितक्यात तिच्या अंगावर थंड पाणी पडले आणि ती दचकुन उठली
पाहते तर अनिकेत हातात पाण्याची बाटली घेऊन उभा होता आणि ती अजुनही आँफिस मध्येच होती.
आजुबाजुला पाहत शांत होत तिने एक दिर्घ श्वास घेतला आणि मनातच बोलली thank god भास होता !
ते दोघे आँफिस मधुन निघले. निघताना तिचे लक्ष नकळत हाताकडे गेले आणि तिला हातावर बोटांचे वळ दिसले अगदी कुणीतरी हात घट्ट पकडल्यासारखे !
ती एकदम घाबरली आणि गळ्याकडे हात लावुन पाहिला, आई महालक्ष्मीचे ताईत गळ्यातच होत पण त्याला थोडी माती लागली होती . . .
the end