नमस्कार वाचकहो🙏🙏
मी अनुप देशमाने संशय सम्पला आता घेऊन येत आहे एक प्रेम विरहाची भयकथा...
प्रेम ह्या विषयावर बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलण्यासारखे आहे. पण प्रेमात सर्वात महत्वाचं म्हणजे काय असत तर तो असतो त्याग.
आज अशीच एक प्रेमकथा घेऊन येत आहे राणी आणि रमण ची ती कथा असणार आहे दोन बिनधास्त_पंछी आणि हो त्यात भूत पण असणार आहे बर का...
कथा - बिनधास्त_पंछी भाग १ ला
लेखक - अनुप_देशमाने
लेखक - अनुप_देशमाने
"हमे तुमसे प्यार कितना
ये हम नाही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बीना
ये हम नाही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बीना
तुम्हें कोई और देखे,
तो जलता है दिल
बड़ी मुश्किलों से फिर,
सम्भलता है दिल
क्या क्या जतन करतें हैं,
तुम्हें क्या पता
ये दिल बेक़रार कितना,
ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुम से प्यार ..."
तो जलता है दिल
बड़ी मुश्किलों से फिर,
सम्भलता है दिल
क्या क्या जतन करतें हैं,
तुम्हें क्या पता
ये दिल बेक़रार कितना,
ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुम से प्यार ..."
सकाळ सकाळ FM वरती हे गाणे चालू होते, जोशी काका चाळीत घरा बाहेर उभारून चहा घेत घेत गाणे ऐकत होते. "काय रे जोश्या तुझं आपलं बर आहे बाबा पेन्शन येतीय घरी बसून असतो नुसता" चाळीतील मोरे म्हणाले.
दोघेही जवळ जवळ 60 वर्ष पार केलेले वयस्कर चाळीतील पण कधी ही कोणाबद्दल अपशब्द नाही काढले त्यांनी...पण फरक एवढाच होता की जोशी काका चा सौ ला 2 वर्ष झाले होते. ते एकटेच राहत होते घरात. येणाऱ्या पेन्शन वर ते आपली उदर निर्वाह करत होते. दोन मुले होती त्यांना पण ती त्यांचा कडे लक्ष देत नव्हती...
एक तरी मुलगी असावी आपल्या पदरी हे ते नेहमीच आपल्या सौ ला सांगत होते पण सौ त्यांना दोन मुलांकडे बघा, ह्यांना मोठे करू, चांगले संस्कार देऊ असा सल्ला देत होती. तस त्यांनी मुलांना खूप शिकवले ही मोठे केले, पण म्हणतात ना पंख फुटले की पक्षी आपल्या आपल्या जगात निघून जातात त्यांना आपल्या जन्मदात्याची कसलीही आठवण येत नाही.😢😢
पण जोशी काका ना समोर चाळीत राहणारी राणी खूप आवडायची, त्यांना ती मुली सारखी वाटायची तिलाच ते फक्त जास्त बोलायचे, बाकी कोणाला फारसे बोलत नसे. पण आज काही राणी दिसली नाही म्हणून जोशी काका थोडे बैचेन च वाटत होते...😢😢
राणी म्हणजे एकदम मस्त अशी सर्वांना बोलायची, प्रत्येकाचा सुख दुःखात आधी सामील होयची,खूप प्रेमळ, बिनधास्त पंछी अल्लड, मनमिळावू आणि खुप हळवी कोणी थोडं रागावले तरी मुसु मुसु रडणारी ही अशी राणी.. तिचा अशा स्वभावामुळे ती सर्वांना आवडत असे..
राणी कॉलेज ला जात असे. घरातील कामात देखील आई ला मदत करायची . राणी चा घरची परिस्थिती तशी जेम तेमच पण आहे ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा खूप मस्त लाईफ एन्जॉय करत होती..
राणी कॉलेज ला जात असे. घरातील कामात देखील आई ला मदत करायची . राणी चा घरची परिस्थिती तशी जेम तेमच पण आहे ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा खूप मस्त लाईफ एन्जॉय करत होती..
राणी चा स्वभावामुळे तिचा कॉलेज मधील तिचा ग्रुप देखील तसाच होता अल्लड,प्रेमळ आणि मनमिळावू...
राणी : दीपा आज रमण आला नाही का ग?
दीपा : नाही ग आज काही तो दिसला नाही.
राणी : बाकी चे सर्व कुठेत आपला ग्रुप?
दीपा : अग असतील कुठेतरी, चल आपण आत जाऊ म्हणत त्यांनी आत कॉलेज चा इमारतीत प्रवेश केला...
दीपा : नाही ग आज काही तो दिसला नाही.
राणी : बाकी चे सर्व कुठेत आपला ग्रुप?
दीपा : अग असतील कुठेतरी, चल आपण आत जाऊ म्हणत त्यांनी आत कॉलेज चा इमारतीत प्रवेश केला...
जशी चाळीत सर्वांची आवडती होती तशी राणी कॉलेज मध्ये देखील सर्वांची आवडती..किती तरी मुलांनी तिला प्रपोज मारून आपले नशीब अजमावले होते पण राणी ने त्यांना भैय्या, दादा म्हणून त्यांचा स्वप्नांचा पार अंत्यविधीच घातला होता. पण राणी चे कोणावर प्रेम नव्हते. पण रमण ला ती खूप जवळचा मित्र मानत होती. ती प्रत्येक गोष्ट रमण ला सांगत असे... राहणीमान इतके सोबर असायचे राणीचे की फॅन्सी ड्रेस घालून आलेल्या मुली सुध्दा तिचा कडे बघून जळत..
ये राणी!!! .... ये राणी राणी राणी म्हणत रमण तिचा जवळ आलाच शेवटी..
रमण : आज काम होत रे घरी म्हणून यायला उशीर झाला
राणी : तुला माहिती आहे आज कवीता चा वाढदिवस आहे म्हणून, त्याच प्लॅनिंग करायचं आहे ??
रमण : हो माहिती रे करूयात ना 1 लेक्चर सम्पले की..
दीपा : तू लेक्चर सोडून येणार का पण?
रमण : हो ग! येणार ना!! आपल्या ग्रुप मेम्बर चा बडे आहे म्हणल्यावर, मिळून साजरा करूयात , धमाल करूयात..
राणी: पुरे, चला आधी लेक्चर अटेंड करूयात.

सर्व जण क्लास मध्ये जातात....
आज रमा राणी जवळ बसली होती डेस्क वर..रमा ला रमण खूप आवडतं होता हे सर्व क्लास ला माहीत होतं..पण रमण ला ती आवडत नसे.
रमा : राणी,
राणी : हा बोल ग
रमा : माझ्या वतीने तू रमण ला बोलशील का ?
राणी : काय
रमा : अग तेच आपलं रोजच, तुझं ऐकेन ग तो
राणी : ये असले पोस्टमन ची काम, मी नाही रे बाबा करणार तुमचं तुमी बघून घ्या..
रमा : तूझ ऐकेल तो म्हणून बोलले ग. जाऊ दे आज कॉलेज सुटल्यावर बोलते त्याला शेवटचं..

राणी ला रमा चा आज रागच आला.. पण राग का आला, रमा काय चुकीच बोलली होती, तिने तिचा मनातले भाव फक्त बोलून दाखवले होते, मग राग का हा प्रश्न ती स्वतःच स्वतःला विचारत होती पण उत्तर काही मिळत नव्हते...
क्रमशः
#बिनधास्त_पंछी
#अनुप_देशमाने
#अनुप_देशमाने