☠️ नरबळी☠️
ई.स. 1880 साल, कलकत्ता, बंगाल.
कलकत्ता..ब्रिटिश साम्राजातील एक महत्वाचे शहर म्हणुन उदयास आलेले होते. तेथिल एका सरकारी निवासस्थानामध्ये स्टिफन व नरिमन काँफीचे घोट घेत चर्चा करत बसले होतेे
"नरबळी???🤔
हा.. हा..हा…हा.."..
ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेले उच्चपदस्थ अधिकारी गव्हर्नमेंट इंजिनिअर स्टिफनचे हसणे थांबतच नव्हते.

“हे बघ नरिमन, माझा विश्वास फक्त सायन्सवर आहे अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर नाही”.
“ओके सर, मी फक्त माझे मत सांगीतले, बंगालमध्ये अशी अंधश्रद्धा मानणारे खुपजण आहेत”
स्टिफनच्या हाताखाली काम करणारा भारतीय इंजिनिअर नरिमन उत्तरला.
त्यानंतर थोडावेळ कामासंबधी चर्चा करून नरिमन स्टिफनच्या सरकारी निवासस्थानातुन बाहेर पडुन घरी गेला.

पण इकडे स्टिफनला आज झोप लागत नव्हती. गेल्या दोन वर्षाचा घटनाक्रम त्याच्या नजरेसमोरून भरभर सरकला...
कलकत्ता शहराला पुर्व बंगाल आणी ब्रम्हदेशासोबत जोडणारा जमीनी मार्ग खूपच खडतर आणी वेळखाऊ होता.
त्यामुळे हा रस्ता पर्यायी मार्गाला जोडण्यासाठी कलकत्ता पासून सहा-सात कोसावर हुगळी नदीच्या पात्रात साधारणपणे पन्नास फूट उंचीचा प्रचंड पुल तयार करण्याचा महत्वकांक्षी निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला होता.🌅

त्यासाठीच दोन वर्षांपूर्वी जागतिक किर्तीचे इंजिनिअर ग्रँड स्टिफन यांची त्या कामासाठी नियुक्ती केली होती. दुर्गम भागांमध्ये स्थापत्यशास्त्र विकसित करण्यामध्ये स्टिफनचा हातखंडा होता. पण गेल्यावर्षी त्याच्या नेतृत्वात पूर्ण वर्षभर दहा ते बारा देशी-विदेशी इंजिनिअर आणी शेकडो कामगार राबुन तयार केलेला पुल पावसाळ्यामध्ये वाहुन गेला आणी स्टिफनच्या नवलौकिकाला मोठा धक्का बसला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टिफनची चांगलीच कानउघडणी केली.🗣️💂

खुप विचार करूनही आपल्या कामामध्ये नक्की काय चुक झाली हेच स्टिफनच्या ध्यानात येत नव्हते.
त्यानंतर चालु वर्षी पुन्हा एकदा पुलाचे काम सुरु करायचे होते, पावसाळ्याला अजुन बराच अवधी होता, पण गेल्यावर्षीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो जातीने लक्ष ठेऊन होता.

त्यासंबंधात काही सुचना करण्यासाठी त्याने नरिमनला बोलावले होते, तेव्हा नरिमनने स्टिफनसमोर बंगाल प्रातांत फार पुर्वीपासून एखादी मोठी वास्तु बांधण्यापूर्वी ती टिकावी म्हणुन नरबळी देण्याची परंपरा चालत आलेली असल्याची सांगीतले.
आधी स्टिफनने ते हसण्यावारी घेतले पण नंतर तो गंभीरपणे याविषयी विचार करू लागला. 😶

कारण,
जरी तो जगासमोर विज्ञानवादी बनून वावरत असला तरीपण मनातल्या मनात अलौकिक शक्तीवर काही प्रमाणात त्याचाही विश्वास होताच.

कुठल्याही भागात एखादी परंपरा अनेक वर्षापासून चालू असते तेव्हा नक्कीच त्यामागे काहितरी विशिष्ट कारण
असतेच...
तसेपण आपण पुर्ण जीव ओतून पुलाचे काम पुर्ण करत आहोत...आणी ह्यावेळेस मी कुठलीही कमतरता पडु देणार नाही…
नरबळी चे प्रकार खरे असू किंवा खोटे असू याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही...मला फक्त हा पुल उभा करायचा आहे…
यानंतर शेकडो वर्षे या पुलाचे अस्तित्व राहणार आहे..
आणी त्याच्यासोबतच माझ्या नावाचेही…
जो पाहिल तो म्हणेल...इंजिनिअर स्टिफनने हा सुंदर पुल बांधलेला आहे..

दुसर्या दिवशी त्याने नरिमनला पुन्हा बोलावून घेतले, आणी पुलाचे काम सुरु करण्याआधी नरबळी देण्यास संमती दर्शवली. हि घटना कुठेही उघड होऊ नये यासाठी हे सर्व काम अंत्यंत गुप्तपणे पार पाडण्याचे त्यांनी ठरवले.
नरिमननकडे कामाला असणाऱ्या कामगार गोपालचा बळी देण्याचा निर्णय त्याने घेतला.
😔😔
*************

गोपाल..साधारणपणे विसेेक वर्षाचा भोळाभाबडा आसामी तरुण...
सावी या तरुणीसोबत नुकतेच त्याचे लग्न झाले होते...पुलाचे काम सुरू होणार हे ऐकुन इतर काही कामगारांसोबत तो आसामहुन मजूरीचे काम करण्यासाठी सावीसह तिथे आला होता...नेहमी हसतमुख राहणारा गोपाल हुगळी नदीकाठापासून काही अंतरावर मोकळ्या मैदानात बाकीच्या मजूरांसोबत पाले बांधून राहत होता..

त्या रात्री अमावस्या होती..नरिमनने बाजूच्या गावातून एका अघोरी मांत्रिकाला पाचारण केलेले होते,
मात्रिकांच्या सुचनेप्रमाणे स्टिफन व नरिमनने सर्व तयारी पुर्ण केली होती, दोन विश्वासु कामगारामार्फत गोपाल व त्याच्या पत्नीला कामगारांच्या वस्तीवरुन महत्वाचे काम असल्याचे सांगुन बोलावून घेतले होते.
🌑
आता रात्र वाढायला लागली होती मांत्रिक कसलीतरी पुजा मांडुन बसला होता स्टिफन व नरिमन लक्षपुर्वक पाहत होते. स्टिफनचे विश्वासू चार इंग्रज सैनिक गोपाल व सावीवर बंदुक रोखुन उभे होते. त्यांचे तोंड व हातपाय घट्ट बांधलेले होते..
आपल्यासोबत नक्की काय होणार याची त्यांना कल्पना आली होती.. दोघेही हावभावातुन जणू दयेची भिकच मागत होते.

मांत्रिकाने स्टिफनला इशारा केला आणी स्टिफनने सैनिकांना...
धाड..धाड..बंदुकामधून आवाज झाला.
पुलाच्या पायाऊभारणीसाठी खोदलेल्या मोठ्या खड्यात गोपाल आणी सावीला ढकलून देण्यात आले, रात्रीच्या काळोखातच चार कामगारांनी दगड, चुना व इतर सामुग्री टाकून तेवढा पायाचा खड्डा बांधुन काढला..

मांत्रिक, मजूर, व सैनिकांना भरपुर पैसे देऊन बातमी कुठेही बाहेर पडणार नसल्याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
************
ई.स 1885
नरबळीच्या घटनेला आज पाच वर्षे पुर्ण झाली होती. गेल्या पाच वर्षात स्टिफन ही घटना पुर्णपणे विसरुन गेला होता. हुगळीचा पुल ऊभारल्यानंतर चार वर्षे बर्मा, रंगुन मधील काही प्रोजेक्ट वर लक्ष ठेऊन गेल्या सहा महिन्यापासून कलकत्यापासुन वीस-बावीस कोसावरच्या गंगापुरमधील विश्रामग्रुहात मुक्काम करुन होता.

त्या दिवशी दुपारनंतर स्टिफनला अचानक कलकत्याच्या गव्हर्नरचे निमंत्रण घेऊन टांगेवाला गंगापुरात दाखल झाला.. स्टिफन घाईघाईत कोट, हँट आणी हाततली छोटी छडी घेऊन टांग्यात बसुन कलकत्याकडे निघाला.🕴️
टांगेवाला किचिंत हळूहळू चालल्यासारखा वाटत होता..नवीन असावा बहुतेक..

आता गव्हर्नरने आपल्याकडे काय काम काढले असावे असा विचार स्टिफनला पडला होता.
दरम्यान संध्याकाळ झाली होती आणी टांगा हुगळीच्या पुलाजवळ आला...त्यादिवशी जरा लवकरच अंधार पडल्यासारखे स्टिफनला वाटले, त्याने आकाशाकडे पाहिले त्या रात्री अमावस्या होती…🌑🌑

टांगेवाला निवांत गाणे गुणगुणत चालला होता.. गाणे बहुतेक आसामी भाषेतले असावे... त्याला कुठलिही घाई नव्हती..
टांगा पुलावर आला… हाच तो प्रचंड पुल..आधुनिक स्थापत्यशास्राचा चमत्कार.. त्या अधांरात त्या पुलाचे रुप काहीसे भीषणच वाटत होते..हवेतही जरासा गारवा पसरला होता…

पुलाला पाहिल्यावर स्टिफनला स्वताचाच अभिमान वाटला, पण फक्त काहीक्षणच... कारण दुसर्याक्षणी त्याला गोपालची आठवण आली..आणी त्याचसोबत आठवण आली नरिमनचीही..
स्टिफन रंगुनला असताना नरिमनने हुगळीच्या पुलावरून वाहत्या नदीमध्ये ऊडी मारल्याची बातमी त्याने ऐकली होती..त्यानंतर परत नरिमनचा कुठलाही ठावठिकाणा सापडला नव्हता… आणी आज रात्री आपण याच पुलावरून चाललो आहे…
आज हवेत जरा जास्तच गारवा जाणवत होता..
घोड्याच्या टापांचा टपटप आवाज आणी चाकाला बांधलेल्या घुंगराचा आवाज त्या भीषण शांततेचा भंग करत होता...आणी सोबतच हुगळीच्या जलप्रवाहाचा आवाज त्यात मिसळत होता,
त्या थंडीतही स्टिफनच्या गोर्या कपाळावर घाम जमा झाला..
हळुहळु चालवणार्या टांगेवाल्याला त्याने दटावले आणी लवकर चलण्यास सुनावले..

“येस सर”,
टांगेवाल्याने गाणे थांबवून मान वळवून मागे पाहुन म्हणले,
स्टिफनला चेहरा ओळखीचा वाटला त्याने आठवण्याचा प्रयत्न केला आणी जणू चारशे चाळीस व्होल्टेजचा करंट बसल्यासारखाच दचकला…😨

“ओह माय गाँड...गोपाल….हो….गोपालच...तु...तु जिंवत आहेस???”
टांगेवाल्याने काही ऊत्तर न देता घोड्याच्या पाठीवर जोरदार चाबूक ओढला, घोडा वार्याच्या वेगाने धावू लागला…
स्टिफनचे लक्ष समोर गेले, पाहतो तर काय पुलाच्या मधोमध भला मोठा खड्डा पडलेला होता...आणी टांगा त्या दिशेलाच जात होता..

“स्टाँप….स्टाँप”
स्टिफन मोठ्याने ओरडला…
टांगेवाल्याने फक्त मागे पाहत स्मितहास्य केले…
स्टिफनने कशीबशी वेगाने धावणाऱ्या टांग्यातुन बाहेर ऊडी मारली आणी धडपडुन टांगाच्या विरुद्ध दिशेला धाव घेतली..
पुलाचे अलीकडले टोक त्याला दिसत होते..त्यादिशेने तो धावत होता…
पण बराच वेळ पळुन सुद्धा पुलाच्या टोकापर्यंत तो जाऊ शकत नव्हता…

अचानक पळत असताना त्याच्या पायाला काहितरी धडकले आणी तो खाली कोसळला..
थोडेसे सावरुन त्यान अंधारात डोळे फाडुन पाहिलेेतर पुलामधुन एक भलामोठा,लांब लांब नखे असलेला,काळाकुट्ट हात , बाहेर पडत होता त्या हाताने स्टिफनचा पाय घट्ट धरुन ठेवला..
स्टिफनला जणू पायावर कोणीतरी जळता विस्तव ठेवल्यासारखे वाटत होते..

त्याच्या कानामध्ये घोड्याच्या टापांचा आणी घुगरांचा आवाज घुमू लागला...आवाज हळूहळू वाढत होता..स्टिफनने मान वळवून पाहिले...
घोडा आणी रिकामा टांगा भरधाव वेगाने त्याचेकडे येत होता..🎠
घोड्याचे डोळे आगीसारखे लालभडक झालेले होते..आणी त्याच्या दिशेनेच रोखलेले होते..
स्टिफनने जोर लावून आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला पण सोडवु शकला नाही.. घोडा आणी टांगा त्याला चिरडून पुढे गेला..

स्टिफनचे सर्वांग रक्ताने माखले..भयकंर जमखा झाल्या होत्या..घोड्याच्या टापांचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला तसा तो वेदना विसरून कसाबसा धडपडत उठला... आणी पुलाच्या कठड्यावरुन वेगाने वाहणार्या हुगळी नदीच्या प्रवाहामध्ये स्वताला झोकून दिले…
त्यानंतर स्टिफनचा कुठलाही ठावठिकाणा सापडला नाही..

दोन दिवसानंतर लंडन टाईम्स मध्ये स्टिफनने भारतामध्ये कलकत्याच्या जवळ नदीत ऊडी मारून आत्महत्या केल्याची बातमी छापुन आली होती.
तसेच त्याच्या कार्याची आठवण म्हणुन ब्रिटिश सरकारकडून हुगळीच्या पुलाला
“लेट. सर ग्रँड स्टिफन ब्रिज" असे नामकरण करण्यात आले...🌊🌊🌊

समाप्त.
(काल्पनिक)
(काल्पनिक)