मार्ग भुताचा
लेखिका -संगिता नवनाळे
सत्यघटना
नमस्कार वाचकहो ! 🙏खुप दिवसानी मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक सत्यघटना सादर करतेय ! भुत आहे किंवा नाही यावर लोकांचे विरोधाभासी मत आहे . जर देव आहे तर भुतही आहे या मताची मी आहे .मला स्वतःला इयत्ता दुसरीपासुन दहावी पर्यत भुताने झपाटलेल.सगळ्या धजातीधर्माचे उतारे ..डाॕक्टरी उपचार यांनीही या भुतापुढे हात टेकलेले..पण शेवटी माझी शिवशंकरावरील अतुट श्रध्दा कामी आली आणि शिवलीलामृत अकरावा अध्याय आणि शिवस्तुती यांनी मला तारल.🙏
आता मी भुतांना अजिबात घाबरत नाही .उलट भुतच मला हा विचार करुन घाबरतात की न जाणो कधी ही किलबील आपला शोध घेते अन आम्हाला तिच्या कथेत घुसडुन आमचे हाल हाल करुन मारते काय माहित !🙄🤣 असो .
आता मी भुतांना अजिबात घाबरत नाही .उलट भुतच मला हा विचार करुन घाबरतात की न जाणो कधी ही किलबील आपला शोध घेते अन आम्हाला तिच्या कथेत घुसडुन आमचे हाल हाल करुन मारते काय माहित !🙄🤣 असो .
तर अगदी परवाच्या चंद्रग्रहणादिवशीच घडलेली ही घटना ! माझ्या नंणदेची दुर्दैवाने अकालीच विधवा झालेली मुलगी .जिच्या पदरात दोन मुली आहेत .सध्या ती माहेरीच राहते.नवर्याला चांगली सरकारी नोकरी असुनही तो दारुमुळे वारला.तो ही एकुलता एक होता .थोडीफार इस्टेट होती पण नवर्याच्या दोन लग्न झालेल्या बहिणीनी स्वताची गडगंज इस्टेट असुनही वहिनीच्या मागे इस्टेटीसाठी कोर्ट कचेरी लावलेली.माहेरी आई आणि आजारी वडील.त्यामुळे नवर्याच्या पेंशनचे ..कोर्ट कचेरीची बँकेची कामे हिलाच पहावी लागायची.
अशीच ती परवा बँकेच्या कामासाठी म्हणुन सांगलीहुन निपाणीला अॕक्टीव्हा वरुन गेली.सोबत तिची वीस वर्षाची मुलगी होती.निपाणीत तिच्या दोन मावशी रहातात.त्यांच्याकडे थांबुन तीने दिवसभरात बँकेचे काम केले . संध्याकाळी सातच्या दरम्यान तिने तिथुन निघण्याची घाई केली .तिला निपाणीतच आजची रात्र रहाण्याची तिच्या मावशीने अन मावस भावांनी विनंती केली.पण तिने कोल्हापूरातील फुलेवाडीतील बहिणीकडे जातेय म्हणुन कोल्हापूरला आली.बहिणीला भेटुन दोघीमायलेकी तिच्याही राहण्याच्या आग्रहाला बळी न पडता तिथुनही सव्वानऊ वाजता निघाल्या.
अशीच ती परवा बँकेच्या कामासाठी म्हणुन सांगलीहुन निपाणीला अॕक्टीव्हा वरुन गेली.सोबत तिची वीस वर्षाची मुलगी होती.निपाणीत तिच्या दोन मावशी रहातात.त्यांच्याकडे थांबुन तीने दिवसभरात बँकेचे काम केले . संध्याकाळी सातच्या दरम्यान तिने तिथुन निघण्याची घाई केली .तिला निपाणीतच आजची रात्र रहाण्याची तिच्या मावशीने अन मावस भावांनी विनंती केली.पण तिने कोल्हापूरातील फुलेवाडीतील बहिणीकडे जातेय म्हणुन कोल्हापूरला आली.बहिणीला भेटुन दोघीमायलेकी तिच्याही राहण्याच्या आग्रहाला बळी न पडता तिथुनही सव्वानऊ वाजता निघाल्या.
मुलगी स्वरा अॕक्टीव्हा चालवत होती .रस्त्यावर अगदी जेमतेमच गाड्या धावत होत्या.आज चंद्रग्रहण आहे हे ती साफ विसरुन गेलेली .त्यातच तिने पांढराशुभ्र चुडीदार आणि त्यावर काळी ओढणी घातलेली.असे कपडे घालुन ती दोन्हिकडे पाय टाकुन मुलीच्या मागे बसलेली . जाता जाता कोंडिंग्रे फाट्याचे वळण जवळ आले.गाडीचा वेग अगदीच कमी होता.जसजसे वळण जवळ आले तसे संपदाने (माझ्या नंणदेच्या मुलीचे नांव)पाहिले की रस्त्याच्या बाजुने एक अगदीच काटकुळा उंच भयानक चेहऱ्याचा मुलगा दात ओठ खात येतोय.त्याच्या दिसण्यावरुन तो एक भुत आहे हे संपदाने ओळखले.ती गाडी चालवणार्या मुलीला काही सांगणार इतक्यात त्या भुताने समोरुन गाडीला वळसा घालत पाठीमागे बसलेल्या संपदाच्या डोक्यात अमानुषपणे हात घालत तिच्या केसांना पकडले .संपदा मोठ्यांने किंचाळली .इकडे तिची मुलगी स्वरा घाबरुन गाडी थांबवायच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजुला फेकली गेली ,पण तिला खरचटण्या पलिकडे काहीच झाले नाही .इकडे ते भुत संपदाच्या केसात हात घालुन तिला गाडीसकट गरगर फिरवायला लागले .स्वराला ते भुत दिसत नव्हते पण आपली आई गाडीसकट गोल फिरतीय हे पाहुन ती खुप घाबरली .
इतक्यात त्याच मार्गाने जयसिंगपुरला जाणारी एक फोर व्हीलर आली .तिचा प्रकाश पडताच ते भुत संपदाला सोडुन गेले.आरडाओरड्याने लगेच रस्त्यावर माणसेही जमली .तेथीलच आजुबाजुच्या रहिवाश्यांनी संपदा आणि मुलीला धीर देत सांगितले या मार्गावर अनेकजण असेच अॕक्सिंडंट होऊन वारलेत ,तुम्ही नशिबाने वाचलात.नंतर त्याच जयसिंगपुरला जाणाऱ्या भल्या माणसाने रक्तबंबाळ होऊन सोलवटलेल्या संपदाला स्वतःच्या फोर व्हिलरमधुन नेऊन तातडीने हाॕस्पिटल गाठले.
एक दिवस अॕडमिट राहुन संपदा घरी परतली.तिच्या जखमा जसजश्या भरत गेल्या तस जखमेच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची खुण जखमेवरच उमटली.एक मांत्रीकाला बोलवुन माझ्या नंणदेने उताराही टाकलाय.मी ही तिला भेटायला जाणार होते पण तोपर्यंत पाऊस चालु झाला आणि माझ्या नंदेच घर महापुरात बुडाल .वेळीच त्यांनी गांव सोडल आणि तासगावच्या मुलीकडे जांऊन राहिलेत.पाहु आता संपदाची अन माझी कधी भेट होते ते ? हे तिन मला संगळ फोनवर सांगितलय.
अस म्हणतात की भुतं ही नेहमी एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठरलेल्या मार्गाने जात असतात .पण जर आपण त्यांच्या आडवे गेलो तर ते आपल्याला सोडत नाहीत . मी जे सांगितलय ते अगदी सत्य आहे.🙏कृपया भुत नाही म्हणनार्यांनी माझ्यावर कमेंटमधे प्रश्नांचा भडिमार करु नये.🙄🙄नाहीतर अशा लोकांच्या मागे मी अखंड भुतावळ गोळा करुन सोडेन काय ? 🤣🤣आता कळल मला भुत आहेत म्हणजे आहेत .पण त्यांचा शोध घ्यायला मला रात्रीच ग्रहण पाहुन बाहेर पडाव लागणार . 🏃♀🏃♀कधी आहे रे ते ग्रहण ?🧐🧐 बघतेच ऐकेका भुताला ! 🙄🙄🤣🤣🤣🤣🤣
समाप्त