संध्याकाळची वेळ होती...घरची पुरुष मंडळी शेतावरून येण्याची वेळ झाली....दारातली फुलं अचानक कोमेजून गेली होती....अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला होता...एखादं पोरं त्यांना हाकलण्यासाठी दगड भिरकवत होतं पण ती कुत्री अजून जास्तच वरडत व्हती....
"आर ये दिन्या हान की दगड त्या कुत्र्यासनी...कान उठवले बघ वरडून वरडून त्यांनी"
हौसाची सासू गरजली....पण त्या कुत्र्यांचे भुंकणे काही थांबत नव्हते.....शेवटी वैतागून कडेवरच्या पोराला घेऊन ती तारतार घरात शिरली....अंधार पडत होता....जेवणाची लगबग सुरू होणार होती...
"हौशे कणिक मळ बाई....लई वेळ झालाय"
सासूबाईंनी हौसाला चपतीसाठी कणिक मळण्याचा आदेश दिला......सासूबाई भाजी चिरु लागल्या ......हौसा गप्प होती..वाड्यात अचानक शांतता पसरली होती....आज जरा वातावरण वेगळंच बनलं होत...वर लावलेला नवीन cfl बल्ब मिनमीन करत होता....त्याला बघून सासूबाई काहीतरी पुटपुटत भाजी चिरत होती....एरव्ही दोघा सासवासुनेच्या गप्पा रंगत असायच्या....पण हौसा गप्प होती.....दुपारी तळ्यावरून पाणी भरून आल्यापासून एक शब्द काढला नव्हता तिने.....नेहमी हसत खेळत असणारी हौसा आज गप्प कशी असा सवाल सासूबाईंना पडला होता...हौसेने अख्खी परात भरून पीठ घेतलं आणि जोर जोरात मळू लागली....झपझप रागाने ठोसे त्या कणकेवर पडू लागले...कणकेचा भलामोठा गोळा बघून.....सासूबाईला जरा विचित्र वाटलं त्या जरा घाबरतच म्हणाल्या
" आग पोरी 6 माणसं जेवायची एवढं कणिक का मळते?"
सासूच्या प्रत्येक शब्दाला उत्तर असणारी हौसा एक शब्द बोली नाही नुसता घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र आवाज करत कणिक मळत होती....एखाद्या घुबडासारखा भयाण आवाज तिच्या तोंडून येत होता...हौसेचे केस मोकळे झाले आणि सासुकडे बघत ती गरगर मान फिरवू लागली....सासू कडे बघून त्या कणकेवर जोरात ठोसे मारू लागली....हौसा बेभान होऊन त्या कणकेवर ठोसे मारत होती तिच्या खोपऱ्याच्या धक्क्याने बाजूचा हंडा चेपला होता....त्यातून पाणी वाहत होतं....तिच्या तोंडून भयानक आवाज येऊ लागले त्यातच एक भयानक आवाज घुमला
"मरणार तुम्ही सगळे मरणार.....एकेकाला मुंडक्यातून उपटून टाकणार मी"
.सासूबाई आता घाबरल्या ती आता धावत धावत बाहेर बसलेल्या आपला मुलगा रामा आणि आपल्या नवऱ्याला बोलवून घेऊन आल्या...आणि तोपर्यंत समोरच दृश्य बघून सगळ्यांचा थरकाप उडाला...हौसा ते मळलेल कणिक बकाबक खात होतो......मोठमोठे कणकेचे गोळे तिच्या मोठ्या जबड्यात गायब होत होते......काही वेळातच तो भलामोठा कणकेचा गोळा निम्मा झाला....आपली बायको अस का करते हे रामाला समजत नव्हतं..तो हौसा जवळ हळू हळू जात होता त्याने तिला हात लावताच हौसाने त्याला जोरदार धक्का दिला...रामा दूरवर जाऊन पडला...इकडे सगळे घाबरले होते...अख्खा डबा कणिक हौसा ने खाऊन संपवली होती आणि ती जोरजोरात मान फिरवू लागली...आणि तिच्यातून एक पहाडी आवाज बाहेर पडला
"ही बाई मला आवडली हाय..मी हिला घेऊन जाणार"
सगळे अगदी लांब उभे होते...गावात वट असलेला तिचा सासरा आता जाणून चुकला होता की सूनबाईला भूत बाधा झाली आहे......हौसा अजून गरगर मान फिरवत होती.....जोरात हात खाली आपटत होती.....तिच्या हातातील बांगड्या फुटून त्याच्या काचा तिच्या हातात घुसत होत्या......हातातून रक्त वाहत होते....तिच्या रक्ताने खालची नवीन घातलेली टाईल्स लाल भडक झाली होती.....आणि त्या हात आपटण्याने फरशीला तडे जात होते.....रामाच्या जीवाची कालवाकालव होत होती..... हा सगळा प्रकार वेगळाच होता....आणि ह्यावर उपाय पण ह्याच गावात होता......सगळ्या पंचक्रोशीतील लोक असल्या बाधेवर उपाय म्हणून भगत बाबाकडे येत होते...."त्याच्या भांडाऱ्यात जादू हाय जादू" अस सांगत होते.....सासर्याची नजर आजूबाजूला फिरली....सासऱ्याने आता रामा ला भगत बाबा ला बोलवायला लावून दिल तसा रामा पटकन निघाला...इकडे हौसा गरगर मान फिरवत होती..हिला आवरायचं कसं?? ......मधूनच हौसा आपल्याच ओठावरून आपल्या शरीरावरुन हात फिरवत होती....आणि तिच्या तोंडातून तो भयाण आवाज यायचा
"मला ही बाई पाहिजे.....मी हिला घेऊन जाणार"
रामाच्या घराबाहेर बरीच गर्दी जमली होती.....रामाचे वडील धनाजी आप्पानी एकाला आवाज दिला ...करारी आवाज घुमला
"अरे बंडू जा लवकर तालमीतली पोर बोलवून आण" हिला आता बांधून घातलं पाहिजे"
रामाला पडलेला फटका बघून त्याचे वडील धनाजी आप्पानी त्या भुताचा अंदाज बांधला होता......बंड्या धावत धावत आला....तशी अंगाला माती लागलेली घामाने आणि मातीच्या चिखलाने रंगलेली तालमीतली 10-12 धिप्पाड पोर रामाच्या घरात आली.......हौसेचे ते भयाण रूप....हात आपटून फोडलेल्या टाईल्स....बघून ती पोरं पण जरा मागेच सरकली.....पण प्रत्येक धाडसी कामात पुढे असणारा ....अनेकांना आपल्या पहाडी ताकतीने आस्मान दाखवणारा...तगडा तालमीतला नंबर 1 पैलवान जग्गु पुढे उभा होता...हौसेने एका बोटाने आपल्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले...त्याला बघून हौसेचे मान फिरवणे बंद झाले...जग्गु ला बघून हौसा भयाण हसू लागली.....तिच्या दाताला चिटकलेली कणिक आणि तोंडातून पडणारी लाळ यामुळे ती अजून भयानक वाटत होती.....ती एक टक जग्गु कडे बघत होती
"इथं पण आलास रांxच्या...पण ह्यावेळी नाय...बघ तुझ्या सामोरंन घेऊन जातो कनी हिला"
जग्गु संतापला.....गावचे भूषण जग्गु पैलवानाला अपशब्द काढल्याने तालमीतली पोरं संतापली...तशी ती पोरं पुढं आली ...आणि हौसाला पकडू लागली....त्यांची पैलवानी पकड मजबूत होती पण हौसा ने हवेत कागद फेकवे तसे त्याना फेकणे चालू केलं... एक एक जण दूर फेकला जाऊ लागला...कोण भांड्याच्या रॅक वर कुणी गॅस शेगडीवर पडू लागला...हौसाचे भयानक रूप बघून प्रत्येकाला राम आठवला होता....काही जण मागच्या मागेच पळून घराला कडी लावून बसली.....त्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज येत होता....मागच्या गल्लीचा राजू भिंतीवर आपटल्यामुळे हात मोडून पडला होता......तो मदतीसाठी लोकांना बोलवत होता....पण मध्ये हौसा उभी होती....तिचा पदर खाली पडला होता.....एका धिप्पाड पैलवाना सारखी ती आपली छाती बडवत हळू हळू जग्गु च्या जवळ येऊ लागली होती जग्गु पार घाबरला होता .....पण गावात जी त्याची अब्रू होती ती सांभाळण्यासाठी तो तसाच थरथरत उभा होता.....त्या खोलीत भयाण शांतता होती फक्त हौसेच्या पैंजनाचा आवाज येत होता....सगळी पोर खाली अंग चोळत पडली होती...जग्गु थरथरत होता......हौसा पुढे आली आणि हसत हसत तिने आपल्या मांडीवर हात बडवायला सुरवात केली......एखादी तोफ वाजवी तसे ते शड्डू त्या खोलीत घुमू लागले......जग्गु पार गारच झाला होता.....हौसेने त्याला पकडलं आणि त्याच्या दोन्ही काखेत हाथ घालून वर उचलून खाली आपटलं...जग्गु खाली पडला ....खालच्या फरशीचा मार त्याच्या डोक्याला लागला होता....डोक्यातून रक्त वाहत होतं.....100 किलोचा पैलवान हौसेने बाहुली उचलून फेकवी तसा फेकला होता.....हौसा आता जोर जोरात हसू लागली...खाली पडलेलं एक धाडसी पोर तिला पकडण्यासाठी पुढं आलं की ती त्याला दूर फेकून देत होती......भयाण राक्षसी हसू आणि किंचाळीनी वाडा शहराला होता.....एकेकाचे थोबडे लालेलाल झाले होते.....कुणाच्या शरीरावर हिंस्र प्राण्याने हल्ला करावा तशी हौसेची नखे ओरबाडली होती....आता जग्गु मागे मागे सरकत होता......हौसा जवळ आली आणि भिंतीला टेकलेल्या जग्गुच्या छाताडावर पाय ठेवून म्हणाली
"काय रे जग्या जत्रत मला चितपट केलं हुतस नव्ह आता काय झालं हा.....लई अपमान केला हुता माझ्या बा न तुझ्यापाई....आता काय झालं रे रांxच्या??.
जग्गुला काय कळेना .....डोक्यातून वाहणार रक्त त्याच्या मानेवर आलं होतं......अरे हा आवाज तर ओळखीचा .....ह्याच आवाजानं कुणीतरी आव्हान दिलेलं त्याला आठवलं.......तो आवाज त्याच्या डोक्यात बसला होता तोच आवाज त्याने आज परत ऐकला होता......
"अरे ह्यो आवाज तर त्या भैरू पैलवानचा"
जग्गुने 4 वर्षांपूर्वी देवाच्या जत्रेच्या भैरूला कुस्तीत हरवलं होत .....भैरूचा बाप त्या गावचा नावाजलेला पैलवान होता.....बापाच्या हट्टापायी भैरूने नाईलाजाने पैलवानी स्वीकारली होती.....पण सगळीकडे भैरूची हार होत होती......त्याच्या बापाने सांगितलं होतं की "ह्यावेळची कुस्ती जर हारलास तर तोंड दाखवू नको" पण भैरू कुस्ती हारलाच आणि त्यानं हरल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केली होती........विषय संपला होता......पण परत तो गंभीर आवाज ऐकून ....आता मात्र जग्गु पार घाबरला होता...तो ओरडून ओरडून लोकांना सांगत होता.....हाताने मागे सरपटत सरपटत होता
"ह्यो भैरी पैलवान हाय..ह्यो भैरी पैलवान हाय..."
आता लोकं प्रचंड घाबरली हौसा कुणालाच ऐकेना...हौसा आता जग्गु च्या छातीवर बसून त्याचा गळा आवळू लागली...तोपर्यंत तिकडून भगत धावत आला..सोबत रामा सुद्धा होता...इकडे जग्गु तळमळत होता.......भगतने पिशवीतला भांडारा हौसाला लावला ...बिरोबच्या भांडाऱ्याने हौसा आता जागेवर कोसळली...तिच्या फक्त डोळ्यांची बुबुळे हलु लागली...आणि तिच्या तोंडातून घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र आवाज चालू होते...भगतने तिला उठून बसायला लावलं... तशी ती झटकन उठून बसली...
भगत आपल्या करारी आवाजत तिला म्हणाला...
भगत आपल्या करारी आवाजत तिला म्हणाला...
"बोल..बोल..कोण हाईस तू??काय पाहिजे तुला??ह्या लेकराला का पकडलंस..बोल"
हौसा एका विचित्र पुरुषी आवाजात बोलू लागली...मी भैरू हाय भैरू ...पैलवान हाय मी...ह्या ह्या जग्या मुळ माझा गावभर अपमान झाला..माझी चांदीची गदा गेली..घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र "
भगत आपल्या मिशीवर ताव मारत बोलला..
"आर भाड्या मग दिलास नव्ह जीव??आणि तू कसला सच्या पैलवान रे.....पैलवान पहाडी असतो.....असा जीव देत नाहीत बुळग्यावानी.....ह्या पोरीला काय पकडलं सोड हिला नाहीतर"
भगताच्या भांडाऱ्याने हौसाच्या अंगाची आग होत होती.....हौसाच्या आतील भैरूला सहन होत नव्हते...हौसा जरा जोरातच म्हणाली...
"आर काय करणार तुम्ही??ह्या बाईवर माझा जीव आलाय मी हिला आज राती घेऊन जाणार..घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र.....कुठला xxx मधी आला तर त्याचा मुडदा हितच पाडीन म्या"
भगताला आता राग आला...आपल्या गळ्यातील माळेला हात लावून तो बोलला
"आर पैलवान नव्ह तू.....बाई ला काय पकडतो..चल आता सोड नाहीतर तुझ्या बापापुढं उभं करतो तुला"
हौसा लालेलाल डोळा दाखवत म्हणाली
.."आर निघ मी नाही घाबरत कुणाला ...तू माझं काय सुद्धा वाकडं करू शकत न्हाईस"
अस बोलून हौसेने आपल्या हातावर समोरच्या चाकूने वार केले...पण त्या घावातून पाणी बाहेर पडत होते......एक सडलेल्या प्रेताचा वास सगळीकडे पसरला....तसा भगत पुढे आला आणि त्या घावावर भांडारा लावला...रामाकडे बघून जोरात बोलला...
"आर आन ती दोरी बांधा हिला....ह्यो आता आपल्या रुपात येत हाय....ही पोरगी आपल्या हाताबाहेर जाईल या लवकर"
पोरांनी दोरी आणली आणि...हौसेला घट्ट बांधलं आणि बैल गाडीत टाकलं .....रामा ....भगत आणि गावची पोर तिला घेऊन महारुद्र मारुती मंदिराकडे नेऊ लागली......भगताला शेवटचा उपाय तोच वाटत होता.....
त्या गावचं ग्रामदैवत म्हणजे महारुद्र मारुती...अतिशय पुरातन मंदिर म्हणून ह्या मंदिराची ख्याती होती...कुठलीही भूतबाधा झाली की इथे असणाऱ्या एका खांबाला ज्याला लोक "मारुतीची गदा" म्हणत त्याला बाधित व्यक्तीला मिठी मारायला लावली की भूतबाधा निघून जात असे...अश्या मंदिराकडे ही बैलजोडी चालली होती
त्या गावचं ग्रामदैवत म्हणजे महारुद्र मारुती...अतिशय पुरातन मंदिर म्हणून ह्या मंदिराची ख्याती होती...कुठलीही भूतबाधा झाली की इथे असणाऱ्या एका खांबाला ज्याला लोक "मारुतीची गदा" म्हणत त्याला बाधित व्यक्तीला मिठी मारायला लावली की भूतबाधा निघून जात असे...अश्या मंदिराकडे ही बैलजोडी चालली होती
भगत,रामा हौसे जवळ बसले होते...भगत जरा लांबच होता......त्याच्या तोंडात अविरत मारुती स्तोत्र चालू होते.....रामाच्या डोळ्यात पाणी होतं....आपल्या लाडक्या बायकोची ही अवस्था त्याला सहन होत नव्हती....हौसाने डोळे उघडले तशी हौसा रामाला आपल्या नेहमीच्या प्रेमळ आवाजात म्हणाली
"आव धनी जरा पाणी द्या की..तहान लागलीय ओ..."
होसेचा केविलवाणा चेहरा बघून रामाला दया आली आणि त्याने पाण्याची बाटली हौसेच्या तोंडाला लावली...तशी हौसा परत म्हणाली
"आव डोकं लई गरम झालंय ओ...""
रामाने भगताकडे बघितलं त्याला जरा डुलकी लागली व्हती...मारुती मंदिर अजून लांब हुत.... रामाने ती बाटली हौसेच्या डोक्यावर ओतली...आणि तिचे डोक्यावरून प्रेमळपणे हाथ फिरवू लागला.....अचानक घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र असा आवाज येऊ लागला...आणि परत तो भयाण आवाज बैलगाडीत घुमला
"आर येड्या तुझ्या बायकोला इसर आता ती माझी हाय""घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र
त्या भयाण आवाजाने भगताला जाग आली त्याने बघितलं की डोक्यावर ओतलेल्या पाण्याने भांडारा वाहून गेलाय...त्याची नजर पडताच हौसा हसत खिदळत तिथून पळून गेली
भगत रामाला बोलला
"आर मर्दा काय केलंस हे..आज आमोश्या हाय..आज रात्री तिला पकडून मारुती समोर आणलं पाहिजे नाहीतर त्यो हैवाण तिला घेऊन जाईल"
आता पोर आणि रामा हौसेला शोधत होती...बाहेर भयाण काळोख होता.......रामाच्या घरचं भय संपलं नव्हतं....आणि आता हा काळोख.....प्रत्येक जण चार चार जणांचा ग्रुप करून शोधाशोध करत होता...इकडून तिकडून ओरडण्याचा आवाज यायचे पण तिथे जाई पर्यंत....तो राक्षसी आवाज बंद होऊन तरुणांचा किंचाळीचे आवाज घुमयचे हौसा त्या पोरांना रक्तबंबाळ करून पळून जायची....सगळीकडे भीती होती.....सगळी पोरं भगताच्या आजूबाजूला होती कारण तोच त्यांचा रक्षक होता....
शेवटी पोर एकत्र जमली भगत सोबत होता...एका ठिकाणाहून बैलाचा हंबरडा ऐकू येत होता...पोर तिथं पोचली तर त्याची अवस्था वाईट बनली...हौसा अक्षरशः एक बैलाचे लचके तोडत होती...त्याच्या गरम रक्ताने आपली भूक भागवत होती.......पोरांनी तिला घेरलं...आणि पकडलं..दोघांतिघांना चावून तिने रक्तबंबाळ केलं होतं...तश्याच अवस्थेत भगतने परत भांडारा लावला...परत हौसा तळमळत शांत पडली...तिला परत रामाने उचलून गाडीत घातलं आणि बैलगाडी जोरात हाकू लागला
अखेर मारुतीचं मंदिर आलंच हौसेला देवळात आणण्याचा प्रयत्न होऊ लागला पण ती जोर जोरात ओरडू लागली
पोरांनी तशीच उचलून तिला देवळात आणली ..समोरचा प्रचंड आकाराचा हातात गदा घेतलेला महारुद्र बघून हौसेचे डोळे जळजळू लागले ..मारुतीला बघताच एक धूर तिच्या डोळ्यातून निघत होता
भगत करारी आवाजात बोलला..
शेवटी पोर एकत्र जमली भगत सोबत होता...एका ठिकाणाहून बैलाचा हंबरडा ऐकू येत होता...पोर तिथं पोचली तर त्याची अवस्था वाईट बनली...हौसा अक्षरशः एक बैलाचे लचके तोडत होती...त्याच्या गरम रक्ताने आपली भूक भागवत होती.......पोरांनी तिला घेरलं...आणि पकडलं..दोघांतिघांना चावून तिने रक्तबंबाळ केलं होतं...तश्याच अवस्थेत भगतने परत भांडारा लावला...परत हौसा तळमळत शांत पडली...तिला परत रामाने उचलून गाडीत घातलं आणि बैलगाडी जोरात हाकू लागला
अखेर मारुतीचं मंदिर आलंच हौसेला देवळात आणण्याचा प्रयत्न होऊ लागला पण ती जोर जोरात ओरडू लागली
पोरांनी तशीच उचलून तिला देवळात आणली ..समोरचा प्रचंड आकाराचा हातात गदा घेतलेला महारुद्र बघून हौसेचे डोळे जळजळू लागले ..मारुतीला बघताच एक धूर तिच्या डोळ्यातून निघत होता
भगत करारी आवाजात बोलला..
"बोल आलास ना बापासमोर...तुझ्यासारखी लई भुतं सम्पल्यात हित"
आणा रे फेका ह्याला त्या खांबावर
पोरांनि आणि रामाने हौसेला हाताला पकडून नेण्यास सुरवात केली...तशी ती गयावया करू लागली...रडू लागली...शेवटी तिला त्या पवित्र खांबाला चिटकवले ...तशी ती तडफडू लागली आणि एका मोठ्या किंचाळी ने खाली कोसळली....समोरची लोकं आणि समोरचा विशाल मारुती बघून हौसेच्या तोंडून एकच वाक्य आलं
पोरांनि आणि रामाने हौसेला हाताला पकडून नेण्यास सुरवात केली...तशी ती गयावया करू लागली...रडू लागली...शेवटी तिला त्या पवित्र खांबाला चिटकवले ...तशी ती तडफडू लागली आणि एका मोठ्या किंचाळी ने खाली कोसळली....समोरची लोकं आणि समोरचा विशाल मारुती बघून हौसेच्या तोंडून एकच वाक्य आलं
"मी हित कशी काय आले??"
तसा रामा झटकन पुढे आला आणि तिला जवळ घेऊन रडू लागला........(समाप्त)
शशांक_सुर्वे