🙏🙏 भाग :-दोन 🙏🙏
डिकेसरांनी व सरला मॅडम ने जेवणानंतर रात्री आठ ला लॅब मध्ये येउन सांगाड्याला पिओपी नं डागडुजी केली.मागची फासडी तुटली होती व माकडहाडाच्या खालचा भागही. कवटीच्या वरच्या भागात ड्रिल करुन एक हुक अडकवला."सर कसं असतं माणसाच जिवन ! किती ऐट रुबाब ताठा दाखवतो माणुस जिवंतपणी ! नी मेल्यावर काहीच नाही हाडाचा सांगाडा.याचाही कदाचित जिवंतपणी कितीरुबाब असेल ना? पण आता नुसता बाहूलं म्हणुन उरलाय ना!म्हणुन माणसानं ताठानं न जगता जिवंतपणीच दुनियेस जितकं देता येईल तितकं देत रहावं." हे ऐकताच डिकेनंही" पण लोकं नुसतं बोलतात हो प्रैम देत नाही वा तसं वागत नाही याचं काय?"असा खोचक बाण मारला.सरला ही तयारच होती." घेणाऱ्यालाही समजायला तर हवं कि समोरचा किती उत्सुक आहे पण आपलीच झोळी आपण ...".अशा बऱ्याच गप्पा झाल्यावर दोघानाही कळुन चुकलं कि यापुढे आपणास बुरखा पांघरुन जगणं शक्यच नाही.
डिकेनं सांगांडा हुक नं भिंतीतल्या खुंटीवर अडकवला सरलानं सर्व खिडक्या लावल्या व लाईट बंद करुन दोघेही दरवाज्यातुन बाहेर निघतांना एकमेकांना ठेचाळले गेले.दोघांच्या शरिरातुन हवाहवासा वाटणारा तारुण्यसुलभ प्रवाह क्षणात सळसळत गेला. डिकेला पपईला पाणी द्यायचं असल्यानं तो मळ्यात निघुन गेला व सरला मॅडम ही वसतीगृहात येऊन पोरांचा अभ्यास घेऊ लागल्या व डिकेच्या गोड स्वप्नात रंगु लागल्या.अकरा वाजता माघ मासातल्या थंडीनं पोरं शाल लपेटुन पेंगुळली.सरला ही झोपण्याचा प्रयत्न करु लागली पण तिला आज डिकेच्या रमणीय विचारांनी व दरवाज्यातल्या ठेचाळल्यानंतरच्या हळुवार स्पर्शाच्या जाणिवेनं झोप येणं शक्यच नव्हतं.ती अंगावर शाल लपेटुन मैदानात आली. मैदानाच्या मद्यभागी असलेला लाईट प्रकाशत होता.तर थंडीही हळु हळु आपले हातपाय पसरत बोचरंपण दाखवायला लागली.तसा सरलाच्या मनात' डिके आता मळ्यातच आहे.सरळ जाऊन त्याला असल्या जिवघेण्या थंडित मस्त बिलगावं'असा विचार तरळला.त्याचं तिला मनातल्या मनात हसु आलं.बारा वाजले.सरला मैदानातच फेऱ्या मारत होती.तितक्यात अंगणातला लाईट विझला .पण तिचं लक्ष लॅबकडं जाताच तिला जोराचा धक्का बसला.कारण लॅबची खिडकी उघडी होती व तिच्यातुन उजेड बाहेर येत होता.तिला आठवलं कि डिके व आपण बाहेर निघतांना तर खिडकी लावुन लाईट बंद केलै होते मग? कोण घुसलं असाव? लाईट कसा सुरु? ती झपझप लॅबकडं गेली.जवळ गेल्यावर लॅबचा दरवाजा नुसता टेकलेला.तिनं ढकलताच दरवाजा सताड उघडला.मध्ये घुसताच खुंटीला हुक ने टांगलेला सांगाडा जोरात हलु लागला.तिला वाटला हवेनं हलला असावा.तिने परत खिडकी लावली व लाईट बंद करत दरवाजाकडं निघाली तोच अंधारात आपल्याजवळुन सरर्कन दरवाजाकडं काहीतरी पळाल्याचं तिला जाणवलं.तिनं दरवाजा बंद केला व आता मैदानात न जाता ती सरळ वसतीगृहात आली व झोपू लागली.तोच ओसरीवर कुणी तरी चालतय असा आवाज तिला जाणवला.यावेळेस शाळेत तर कुणीच येत नाही व पोरं गेली असती तर दरवाजा उघडुनच.मग कोण असेल? तिच्या अंगावर काटा उभा राहिला.पण त्याच क्षणी ' मळ्यातुन डिके तर आला नसावा ! कारण आपला मोघम इशारा व दरवाजा लावतांनाचा स्पर्श यानं तो ही आपल्या सारखाच ....' पण नाही तो नाही येणार एवढ्या रात्री.असा विचार करत ती तिकडे दुर्लक्ष करत झोपण्याचा प्रयत्न करु लागली.आता आवाज वसतीगृहाच्या शेजारच्या वर्गात येऊ लागला.आता मात्र तिनं बाहेर जाऊन पहायचं ठरवलंच. दरवाजा उघडुन पाहताच तिला सुखद धक्का बसला.डिकेच ओट्यावर दिसताच "डिके तु!" असं म्हणत ती त्याला बिलगलीच .डिके नुसता हसत होता.तर ती पुर्ण मधाळावं गंधाळावं अशी बिलगू लागली.डिके वर्गात जाऊ लागला. पण वर्गात जाता जाता त्याचै चेहऱ्यावर चे भाव बदलत होते.तो एकदम जोरजोरात रडु लागला पन तोंडात काहीतरी अडकलं असावं त्याच्यानं ावाजच निघू नये असा नुसताच हुंहुं आवाज काढत होता.सरलानं " कारे काय झालं अचानक! " विचारलं तोच त्याच्या पाठीत कुणी तरी मजबूत दणका टाकला असावा असेच अविभाव आणत तो वर्गात गडबडा लोळु लागला.सरला एकदम घाबरली .काय कराव काहिच समजेना.तिच्या आधीच्या मधाळलेल्या भावना कुठेच गायब झाल्या व भितीनं ती थरतर कापु लागली.तितक्यात वर्मावरच कुणी मारत असावा ्साच डिके पाय पोटात आवळत मुडपत लोळु लागला.आवाज मात्र गळ्यातच अडकल्या सारखा हुं हुं येत होता.सरला नुसती थरतर कापत अरे काय होतय ते तर सांग असं म्हणत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती.वरुन सतत मार बसत असावा तसाच डिके लोळतच अंग चोरत होता.
सरला चा निरोप घेऊन डिके मळ्यात गेला.मोटार सुरु करुन त्यानं पपईच्यां सरींना पाणी लावलं व स्वप्नात तरळतच तो विहीरीवरच्या झोपडीजवळ आला.आज त्याला सरलाच्या मिळालेल्या मोघम इशाऱ्यानं खुपच आनंद होत होता.त्याच धुदीत कडाक्याच्या थंडीतही तो झोपडीसमोरच्या विहीरीच्या कठड्यावर बसला.सारा मळा माघी थंडीनं कुडकुडत न्हावुन निघत होता. गावातुन कुत्री भुंकल्याचा आवाज येत होता.तितक्यात त्याच लक्ष मळ्याच्या पुर्वेला मरिआईचं ठाणं असलेल्या उंबराच्या बाजुलगत गेलं.जिथं त्यांनं आजच मसन्या आडातुन निघालेली माती टाकली होती. ती जागा ओढ्याच्या काठाला लागुनच होती.तिथंं त्याला पांढरी आकृती दिसली. इतक्या रात्री काय असेल म्हणुन तो उठुन तिकडं जाऊ लागला.जसजसा जवळ जाऊ लागला.तसं त्याला जाणवलं कि पांढऱ्या कपड्यात कुणीतरी बाई बरोबर त्या मातीच्या ढिगावरच उभी आहे.व त्यालाच हात करुन तिच्याकडं बोलवत आहे.तो ही पुढं सरकू लागला आता ेकदम जवळ गेल्यावर त्यानं लगेच ओळखलं अरे हि तर सरला आहे.मग ही शाळेतुन विहीरीकडं यायचं सोडुन अशी उलट्या दिशेनं का आली.तो जवळ जाताच "नाही राहवलं गेलं ना? म्हणुन आलीस ना मला भेटायला? त्यानं हसतच विचारलं.तिनं ही हसुन लगेच मी तिथं नी तु इथं कसं शक्य आहे मग आले भेटायला!" सांगितलं .डिके ला मनातल्या मनात उकळ्या फुटु लागल्या त्यानं विहीरीकडं चल म्हणुन सांगितलं तोच ती ओढ्याच्या काठानं जाऊ लागली व बघ रे हि माणस मला इकडच घेऊन जातायेत बघ ना. तोच ती ओढ्याच्या काठाकाठानं मसनवठीकडच्या बांधाकडं सरकु लागली .डिके हि तिच्या मागं मागं जाऊ लागला." किसना वाचव ना रे मला बघ लवकर ये हि मानस खुपच ओढाताण करता आहेत रे बघ.नी तिकडे केळीच्या बांधावर पण कुणी तरी उभा आहे ." किसना पळ वाचव.डिके आता धावतच होता पन त्याला हे कलत नव्हतं कि सरला त्याला किसना का म्हणतेय.पण त्यावर एकच धुंदी चढली होती कि सरला ला कुणीतरी घेऊन जातय तिला थांबवायची .सरला आता मसणवटीच्या बांधावर आली होती.किसना बघ रे इथं किती वैल आहेत धुधी भोपळा गोल भोपळा कोहळा बघ वेलच वेल पसरलेत.यात माझा पाय अडकला नी मी धपकन पडले बघ तितक्याय तो केळीच्या बांधावरचा माणुस आला नी मला जोरात घुसमटतोय बघ .किसना पळ ना रे लवकर पळ वाचव मला.डिके हि वेड्यासारखा पळतोय मागोमाग.सरला पुढं नी डिके मागं.मसन्या आडाकडच चाललीत ती.
वर्ग खोलीत डिके खाली गडबडा लोडतोय व सरला त्याला नुसती " अरे तुला काय होतय ते तर सांग आवाज का निघत नाही तुझा.?" म्हणुन सारखं विचारत होती.तोच डिके वर्गातुन मसन्या आडाकडं जाऊ लागला.सरला हि त्याच्या मागोमाग जाऊ लागली.डिके पळतच चालला व आडात धपकन पडला.थोडा वेळ निरव शांतता पन वर सरला सारखी ओरडते. डिके माझा डिके पडला रे आडात.तिकडनं मळ्यातली सरला ही तोच आडात पडली व मागोमाग डिके नंही बोंब ठोकली " आरं माझी सरला आडात पडली रं" काठावर दोन्ही समोर असुनही एकमेकांना न ओळखता रडत होती तर आडात किसना आता" राधी आली तु ये ना जवळ बघ मी पन आडातच आहे.हात लांबव ना." म्हणुन विनवत होता पुर्वेला तांबडं फुटलं तसी गावातली माणसं व वसतीगृहातली पोरही उठली व त्यांनी कालच कोरलेल्या आडाजवळ डिके सर व सरला मॅडमला ओरडतांना पाहिला.गावातल्या जाणकारांनं ओळखलं कि ाडातनं निघालेल्या सांगाड्याचीच यांना बाधा झाली .त्यांनी आधी भावसारच्या वाड्यात व नंतर दुपारी बांधलेल्या अवस्थेत दोघांना नाग्या भगताकडं नेलं.
कडं घालुन व भंडारा दैून शांत केलेल्या सरला ला आता मात्र सारं आठवत होतं.हे ापल्यावरच का असं घडावं? पण याचं उत्तर नाग्या व तान्या मामाकडंच होतं.
त्या रात्री नंतर डिके सर व सरला मॅडमला शांत झोप लागली.पन नाग्या व तान्या मात्र सारखे प्रश्नानं पछाडत होते .नाग्याला ' ते सांगाडे कुणाचे?' यानं तर तान्याला खंडुजी पाटलाचं काय झालं? या प्रश्नांनी झपाटलं होतं वत्यांच्या प्रश्नाची उत्तरंही एकमेकाकडंच होती.
तान्या "काल कोरलेल्या मसन्या आडात दोन सांगाडं सापडलीत रं! कुणाची असावीत याचं उत्तर सापडलं कि डिके ला व सरलाला वाचवणं सोपं होईल .नाहीतर मीच काय पण मरिआई त्यांना येणाऱ्या आवसेला वाचवु शकणार नाही" तान्यानं उत्सुकतेनं आड केव्हा कोरला काय निघालं हे सारं विचारलं.नाग्यानं ही सारा वृत्तांत सांगितला नी मग तान्याला धागा सापडला.तो एक तप मागे गेला.व नाग्याला त्यानं सारा पट सांगितला.
सुनसगावात खंडुजी पाटील एक बडी आसामी .जुन्या काळात कोल्हापुरपर्यंत कुस्त्याचे फड मारणारा.गावात भरपुर शेती.भरपुर केळी पिकवायचा.अंगातली ताकद व पैसा यामुळं जे ठरवलं ते करुनच दाखवायचे.गावात हाळी इनामात हायस्कुल काढायचं ठरवलं.व खळ्याच्या गोदामाला लागुल विहीरीमागंची हाळी इनामाची जागा मुकरर करण्यात येऊन काम सुरु झालं.पन त्याच वेळी राधी नावाचं एक वादळ आलं.खंडुजी पाटलाचा विस- बाविस वयाचा मुलगा कृषणाजीराव होता. सारं गाव त्याला किसनाच म्हणे.त्यावेळी सारं गाव भरपुर केळी लावत असत व पाडा पडला कि ट्रक्टर नं जिल्ह्याला रेल्वेस्टेशन वर नेत.किसनाही सिजन मध्ये रोज ट्रॅक्टर नेई व केळीखाली करुन आणी.सिजनात असा एक दिवस जायचा नाही कि वाघीणीत खंडू पाटलाची केळी गेली नाही.जिल्ह्यावरुन च्या वाटेवर केळीच्याच बागा.गावापासुन सात ाठ मैलावरच्या रानात काठेवाडचे भरवाड गाईगुरु घेऊन सालाबादाप्रमाणे पडलेले होते.किसनाचं ट्रॅक्टर रोज त्याच मार्गानं जाई.भरवाडकडं लग्न असल्यानं काठेवाड मधुन त्यांचे नातेवाईक आले होते व ते रानातच मुक्कामाला होते.यातच राधा भरवाड नावाची एक आनंद ला काॅलेजात जाणारी मुलगी पण आली होती.किसनाचं लक्ष तिच्यावर गेलं नी रोज येता जाता तो तिच्याकडं पाहू लागला.अतिशय आरसपानी बावनखणी सौंदर्य लाभलेल्या राधीला पाहताच किसना पुरता बावरला.काठेवाड दिवसा गुरामागं तर काही लग्नाच्या बजेटीत असल्यानं त्याचं याकडं लक्षच गेलं नाही.राधा व किसना दररोज पाहता पाहता एकमेकात गुंतली व त्यांनी लग्नाचाच बेत आखला. एका रात्री दुसऱ्या गावाच्या रानात लग्ना करिता भरवाडचं वऱ्हाड गेलं मात्र राधा काहिसं निमीत्त सांगुन जाण्याच टाळलं व त्याच रात्री केळी टाकुन परत येणाऱ्या ट्रॅक्टर वरच किसनान तिला उचलुन मळ्यात आणली. तान्या मामानं " किसना दा कोण ही?" विचारताच "मामा हि राधी भरवाड.हिला झोपडीत ठेवा व तुम्ही उंबराखाली मरिआईच्या वट्यावर झोपा" बाकी सवडीनं कळेल.किसना घरी गेला जेवन करुन डबा सोबत घेून मळ्यातच मुक्काम केला.ती लात्र दोघांनी उडदंग केला नुसता.दोन दिवसात घरुन पैशाचा बंदोबस्त करुन गायब होऊ असा त्यांचा बेत ठरला.सकाळी उठताच किसना नं मामाला दम भरला " मामा आज राधीला दिवस भर सांभाळ केळीच्या बागेत उसाच्या फडात कुठं ही लपव पण ही कुणाच्याच नजरेला पडायला नको.अगदी आबांच्या नजरेला ही नाही" नी किसना केळीचा पाडा पाडण्याकरिता ट्रक्टर घेऊन दुसऱ्या मळ्यात चालला गेला. मात्र ही गोस्ट मी लगेच खंडू पाटलाच्या कानावर घातली.कारण एकवेळ किसना परवडला पण खंडू पाटलाची नाराजगी नको.पाटलानं सारं नीस्तवारी ऐकुन घेतलं नी लगेच मळ्यात येऊन राधीची भेट घेतली.परत जाण्याकरिता राधीला समजावलं पैशाचं आमिष दाखवलं .धमकावलं.पण उपयोग झाला.उलट राधीनं स्पष्ट शब्दात किसनाशीच लग्न करेल असं सांगत पाटलालाच उडवुन लावलं.पाटलाला आपली सुन म्हणुन ही नक्कीच शोभेल पण जात! आपलं नाक शरमेनं खाली होईल तिकडं मुलाचा स्वभाव माहित असल्यानं त्याला सांगण्यात अर्थ नाही .हे पाटील ओळखुन होता.कारनमाणसस तीन दिवसा आधीच ट्रॅक्टर वर सोबत जाणाऱ्या माणसाकरवी हे प्रकरणाची कुनकुण त्यांना लागली होती व तसं त्यांनी किसनाला सावधही केलं होतं नी तरी आज हे घडलं.होतं .आता आपल्याला वेगळच पाऊल उच लावं लागेल असा मनोमन विचार करत त्यांनी राधी कडं भर नजरैनं पाहिलं.राधीला व तान्या मामाला ती नजर फारच चमत्कारीक वाटली.
पाटील शाळा बांधकाम चालु होतंतिथे आले.तिथल्या माणसांना उद्या पायाचा भराव करायचा आहे म्हणुन आजच ट्रॅक्टर ने मुरुम आणायला लावला व तिकडे मसन्या आडही पुरावा लागेल कारण शाळेत पोरं आल्यावर त्याचा वापर नसल्यानं तोही पुरावा लागैल .तिथही दुसरी माणसं सांगुन मुरुम आणावयाला सुरुवात केली व संध्याकाळपर्यंत आडाचा काही भाग पुरलाही.
वऱ्हाड परतल्यावर एकच बोभाटा उठला राधी नाही म्हणुन शोधाशोध सुरु झाली.बिऱ्हाडावर मुक्कामाला असलेल्यापैंकी एक आंधळी म्हातारी होती तिनं राधी व किसनाचं बोलणं व ट्रॅक्टर चा आवाज ऐकला होता.तिनं सारं सांगितलं पण ओळखायचं कसं.तितक्यात तिच म्हातारीनं जर ते ट्रॅक्टर परत याच वाटेवरनं आलं तर मी आवाज बरोबर ओळखीन.तो रस्ता जळगावलाच जाणारा असल्यानं बरपुर वाहनं जात.पण तरीही रात्री किसनाचं परत जाणाऱ्या कीसनाच्या फोर्ड ट्रॅक्टर चा आवाज म्हातारीनं बरोबर ओळखला व एकानं मागं मागं राजदुतनं पाठलाग करत सुनसगाव गाठलं.ट्रक्टर वरचा किसनाला अंधारातुन ओळखुन तो परत फिरला.व रात्री तगडे पाच सहा भरवाड उशिरानं सुनसगावात आले.
किसना नं जेवन करुन डबा घेतला व मळ्यात आली.राधी नं त्याला सर्व सांगितलं.तसा तो तान्या मामाच्या नावानं दात ओठ खाू लागला.आज रात्रीच घरातुन रक्कम घेऊन पोबारा करायचं पक्क केलं व तो घराकडं परतला.
इकडे तान्यानं इशारा करताच केळबागेतुन दोन जण निघाले व राधीला धमकावत बागेतुन जावु लागले राधीला नाईलाजानं मागोमाग जावच लागलं मरिआईच्या उंबरजवळुन नाल्यात उतरले तिथं खंडु पाटलाला पाहताच राधा समजुन चुकली कि दुपारची ती चमत्कारीक नजर...

क्रमश::::