🙏🙏मसन्या आड🙏🙏
🙏🙏भाग :-- तिसरा🙏🙏
राधी ला नाल्यात पाटलानं पाहताच तिच्याच ओढणीनं हात पाठीमाग बांधावयास लावले.व तोंडावरही दुसरा रुमाल बांधला .तिला मागुन दांडक्यानं टोचत नाल्यानं पुढं नेण्यात येत होतं.राधीही फक्त पुढं चालत होती.नाल्याच्या दोन्ही उतारावर दुधी भोपळा गोल भोपळा व कोहळ्याचे वेल पसरले होते व त्यांना दुधी गोल भोपळे व कोहळ्याची मोठ मोठी फळं लागली होती.अंधारात राधी हात बांधल्यानं त्यांना ठेचाळताच दोनेक वेळा तोल जाऊन पडली.पण सोबतच्या छगन्या व बबन्या रामोीे तिला उचलत पुढे नेत होते.इच्छीत स्थळ येताच पाटलानं आधीच लपवलेल्या ड्रमातुन गावठी काढुन दोघांना पाजली व स्वत: ही मजबूरीनं थोडी मारली.राधी नाल्याच्या धपाडीला चिकटुन उभी राहत नुसती पाहत होती.आपलं पुढे काय याचा विचार करुनही तिला काहीच समजत नव्हत.
मळ्यातुन किसना वाड्याकडं निघाला तर भरवाड वाड्याकडुन तपास करुन मळ्याकडं निघाले होते.त्यांची गाठ बांधकाम होत असलेल्या शाळेजवळ पडली.किसनाला पाहताच राधीचा चुलत भाऊ लाछा भरवाड नं हातातल्या दंड्यानं(सोट्यानं) किसनाच्या पाठीवर वार केला.तो सहन न झाल्यान बोंबलतच किसना खाली कोसळला पण तितक्यात बाकी लोकांनी तोंडावर हात दाबत त्याला बाजुला घेत." राधीबाबत विचारणा केली. पहिलाच वार इतका जबरा होता की पाठीमागची बरगडीचं कामच झालं होतं त्यामुलं किसना पोपटागत सारं बोलु लागला. मग लाछा नं सोबतच्या दोन लोकांना सोबत पाठवत मळ्यातुन राधीला घ्यायला पाठवलं.व बाकी तिथंच थांबले.
किसना सुजणारी पाठ व दुखणारी बरगडीची कळ सोसत मळ्यात झोपडीपाशी आला व तान्या मामाला राधी कुठं म्हणुन विचारु लागला.सोबतच्या भरवाडांना पाहताच मामला आता पुरता बिघडला हे तान्या मामानं ताडलं व त्यानं सत्य सांगण्यातच भलाई आहे है ओळखुनही " मालक, राधीला तर आबासाहेब वाड्यावर घेऊन गेलेत" अशी बतावणी केली.सोबतच्या भरवाडांनी तान्याच्या पोटऱ्यावर एक मजबूत दणका देत " इसमे झुठ निकला तो तेरी खैर नही" सांगत तिथुन शाळेकडे किसनाला घेऊन आले.तान्या विव्हळत तेथेच पडला.लाछाची राधी न दिसताच नस तडकली.पन सोबत आलेला लछमन कायम या भागातच जनावरं घेऊन रहायचा.म्हणुन त्यानं सबूरी धरायला लावली.व किसनाला तिथच थांबवत दोघांना राधीला पहायला वाड्यावर व दुसऱ्यांना परत मळ्यातच शोधायला पिटाळलं.लाछा लछमन व किसना तिथच थांबले.
वाड्यावर राधी मिळालीच नाही म्हणुन ते खाली हातानं माघारताच लाछा बेभान झाला.किसना समोरच उभा होता.लाछानं पायाचा गुडघा मागं दुमडुन किसनाच्या दोन्ही पायामध्ये गुडग्यानं ठोसा लगावला .किसनाच्या वर्मावरच तो काठेवाडी दणका बसताच किसना गडबडा लोळत बोंबलु लागला.लछमन नं तोंड दाबलं.व आवाज थांबवला.लाछानं आपला मोजा काढुन त्यात माती भरली व तो किसनाच्या तोंडात काठींनं जबड्यात कोंबत फसवला.आता किसनाचा आवाजच बंद झाला.लाछानं डोक्यावरच्या शेल्यानं हात पायही बांधले नी मग दंड्यानं बेदम मार देऊ लागला.किसना जागेवरच डुकरागत हु हु करत मार खाऊ लागला.वर्माचा भाग तर केव्हाच सुजला.बरगडी मोडलीच होती.पन लाछा थांबायला तयार नव्हता.किसना अर्धमेला झाला.
खंडु पाटलानं छगन्या व बबन्या अमलात येताच त्यांना थोडं दुर नाल्याच्या काठावर उभं केलं.व राधीचा ताबा घेतला.अंधार जरी असला तरी पाटलाच्या डोळ्यात आता वासनेनं सुडाची भावना किंवा सुडानं वासनेची भावना नक्कीच उतरतेय हे राधीला जाणवू लागलं.पाटलाच्या श्वासाची वाढती गती तिला जाणवू लागली.आता मात्र ती सावध झाली व आपणापुढं काय वाढुन ठेवलयं हे आता तिनं पुरेपुर ओळखलं.पाटील अंगाशी येताच तीनं बांधलेल्या हातानच आपली काठेवाडी दुधाची ताकद दाखवत जोरात ढोसा मारला व लांब झाली.तितक्यात लंगडत लंगडत तान्या आला तसे बबन्या व छगन्या ही नाल्यात खाली उतरले." मालक भरवाड हिच्या शोधात आलेत व त्यांनी किसना दादाला पकडुन वाड्यावर गेलेत सावध असा" असं सांगत तो तेथुन निघाला.आता पाटील पुरता संतापला.त्यान रामोश्याच्या मदतीनं राधीला हरनीगत आवळली व जोरानं गालावर तोंडावर रपाटे घालु लागला.राधीचा जोर कमी झाला.व पाटलासही धाप लागली.रामोश्यांनी परत गावठी मारली.
लाछा किसनाला राहुन राहुन डुकराला मारावं तसं ठेचत होता आता किसनाचा हु हु चा आवाजही क्षीण होत चालला होता.हे पाहुन लछमन ने ओळखलं कि किसना काही आता वाचत नाही.त्यानं लाछाला आवरतं घेतलं.व बांधलेल्या किसन्याला डुकरागत उचलत मसन्या आडाकडं आली.आड दिसताच तोंडातुन मातीनं भरुन घातलेला मोजा काढला व आडात वरुन फेकलं.बबन्या आडात पडताच क्षीण आवाजात "आई गं मेलो, राधी" ओरडला.भरवाड मळ्यात गेलेल्यांची वाट पाहत पुढे मसनवटीत थांबली.
पाटलात आता सुडानं पेटलेला हैवान संचारला होता.तोच नाल्याच्या वर केळ बागेत कुणीतरी आलय हे बबन्यानं सांगितलं तोच छगन्यान राधीला शोधत भरवाड अाल्याचं सांगताच राधी जोरात उठली व नाल्याच्या वर जाऊ लागली.पण वेलात पाय अडकुन कोसळली.ही संधी साधत पाटलानं झडप घालत तिला खाली कवेत घेतली.पन राधी बांधलेल्या तोंडानही हुंहुं चा आवाज करत भरवाडाना इशारा करु लागली.पाटलानं तोंडावर गच्च हात दाबला.त्या झटापटीत राधीच्या बांधलेल्या हातात दुधी भोपळा सापडला.तिनं तो झटक्यात तोडत पाटलाच्या कानशिलात लगावला.पाटील तिरमिरत कुत्र्यावाणी केकटत खाली लोळू लागला.राधी उठुन नाल्याच्या वर भरवाडाकडं झेपावणार तोच एकेकाळी पहेलवानकी गाजवत भल्याभल्यांना धुळ चारणाऱ्या पाटलानं चित्याच्या वेगानं
धोबीपछाड मारावा तसं राधीला मागं खेचत वेलानं मानैला फास घातला.राधी बांधलेल्या हातानं वेल काढण्याचा प्रयत्न करु लागली.पण फास आवळतच गेला.व भरवाड पुढे निघुन गेले.त्याही परिस्थीतीत राघीनं निकरानं पाय आवरत पाटलाला खालुन लाथेनं उडवलं व पाटलाला काठेवाडी दुध आठवलं.राधीनं कोंडलेला श्वास सोडला.तितक्यात मागुन पाटलानं राधीची मान एका झटक्यात पिरगाळली व राधी लाथा झटकत पायानचवेल तोडु लागली.लगेच पाटलानं बबन्या व छगन्या ला "
उचला रं नी फेका हिला आडात" असं फर्मान सोडलं.व राधी त्याच मसन्या आडात घपकन पडली जिथं किसना ही शेवटच्या अवस्थेत आला होता.तरी आवाज येताच भ्रमित अवस्थेत किसना राधी राधी करत होता तर राधीनं आधीच दम तोडला होता.किसनाच्या हातात आकस्मिकपणे राधीचा हात सापडला व त्यानं शेवटचा आचका देत दम सोडला.पाटलानं नियोजनाप्रमानं दिवसाच तिथं माती टाकुन हत्यारही ठेवलीच होती.त्यांनी बबन्या व छगन्या च्या मदतीनं आड पुरवायला झपाटुन सुरुवात केली.पण त्यांना कुठं माहित होतं कि आपण राधी बरोबर किसना ला ही पुरतो आहोत.पहाट होण्यापुर्वीच आधीच गळानं भरलेला आड तिघांनी पुरला.परत पाटलांन दोघांना गावठी पाजुन लास केलं व शाळेच्या बांधकामाजवळ आणताच नशेत असणाऱ्या दोघाच्या ही माना कोंबड्यागत मुरगाडल्या व बाधलेल्या चौथऱ्याच्या पायात टाकलं व वरुन मुरुम टाकला.मग तिथं झोपलेल्या मजुरांना लगेच उठवत मुरुमाच्या भरावाला जुपलं.त्या खोलीचा भराव झाला नी पुर्वेला तांबडं दिसलं नी पाटील घराकडं निघाला.तान्या तर लंगडत लंगडत आधीच फरार झाला होता.
तान्यानं हे सांगुन जोराचा उसासा टाकला.तोच नाग्यानं " आता माझ्या ध्यानात डिके सर व सरला मॅडम ची केस लक्षात आली " असं सांगत पुढे तान्याला तो सांगु लागला.
पाटील घरी पोहोचताच मालकिणीनं रात्री भरवाड आल्याचं व किसना नसल्याचं सांगताच.पाटलाच्या छातीत किसनाच्या बातमी न जोराचीं कळ निघाली व त्यातच पाटील गेले. नंतर पाटलाच्या दोन्हीही पोरी व जावईनी किसनाचा दोन तीन महिने शोध घेतला पन सुगावाच लागेना.मग त्यांनी मळा भावसाराला विकला व शाळा सुरु केली.मालकिनीला त्यांनीच नेली.
तान्या तुझ्या सांगण्यावरुन किसनाला त्यानीच मारलं .कारण डिके सरांनी टायलेट च्या शोषखड्ड्याकरिता आड कोरला त्यात दोन सांगाडे सापडलेत.म्हणजे ते किसना व राधीचेच असावेत.
नाग्या समजुन चुकला कि आडात किसना व राधी एकत्र होते तोपर्यंत त्यांनी कुणालाच छळलं नाही पण डिके व सरलानं आड कोरुन किसनाचा सांगाडा लॅब मध्ये आणला तर राधीचा मोडतोड झालेला सांगाडा मळ्यात टाकला.म्हनजे त्यांची ताटातुट झाली.म्हणुनच किसना सरला मॅडमला दिसतोय तर राधी डिके सरांना दिसतेय.आपण आता मंतरलं तरी अमावस्येपर्यंत त्यांना एकत्र नाही कैलं तर ते दोघांना सोडणार नाही.
मग नाग्यानं आपल्या पोरांचा आबही जायला नको म्हणुन नाम्याला ही कहाणी पुर्ण समजावुन दिली मग अमावास्येला नाम्यानं विधीवत दोन्ही सांगांडे पुन्हा आडात मळ्यातल्या गाळासहित पुरले व मसन्या आड ही पुरला.डिकेसर व सरला मॅडम मुक्त झाली पण लगेच लग्नाच्या बंधनात अडकली.तर इकडे साऱ्या सुनसगावात 'नाग्या भगता प्रमाणच पोरगं नाम्या भगत ही मरिआईचा जागती ज्योत चेला हाय ' अशी ख्याती झाली.