🙏🙏 मसन्या आड🙏🙏
💐💐 भाग. :- पहिला 💐💐
बारा वर्षानंतर आज तान्या मामा सुनसगावात पाऊल ठेवत होता.अमृतसर हून दिल्ली राजस्थान मध्यप्रदेश भुसावळ जळगाव करत करत तो रात्री आठ वाजता खंडू पाटलाच्या वाड्या समोर उभा होता येणारे जाणारे त्याच्याकडं भूताकडं पहावं तसल्या नजरेनं पाहून पुढं जात होती.तान्या मामानं वाड्या कडं पाहताच ओळखलं कि वाडा नक्कीच बऱ्याच वर्षापासुन बंद असावा मग पाटील सारजामाय कुठं गेली असतील? कृष्णादा ? कृष्णादाचं काय झालं असेल? याच विचारात आपण बराच वेळ उभे आहोत व येणारे जाणारे आपल्याकडं वेगळ्याच नजरेनं पाहत आहेत हे लक्षात येताच तान्या मामा तंद्रीतुन बाहेर आला व जवळुन जाणाऱ्या एका पोराला थांबवत " लेका या वाड्यातले लोक कुठं गेलीत?" प्रश्नानं पोरगं बावरलं व भिन्नाट पळालं.लगेच येत असलेल्या आपल्याच वयाच्या म्हाताऱ्यास थांबवत " काय हो या वाड्यातली सारी कुठं गेलीत?" विचारताच "भाऊ नविन आहेत का? पाटलाला जाऊन तप लोटलय.कोठुन आलात?" त्यावर तान्या मामा ला धक्काच बसला.पण त्यानं जास्त खोलात न शिरता नाग्या भगताकडंच जाऊ व सर्व काही जाणुन घेऊ असा विचार करत तो तिथुन चालता झाला.म्हातारा मात्र कुणी येडं असेल असं समजुन तोही चालता झाला.
अंधारातही गाव बरच बदललं असलं तरी बारा वर्षानंतर ही काही जुन्या खुणा जाणवत होत्याच त्यावरुन तान्या मामा आपली चुलत बहिण सुलीकडं म्हणजे नाग्या भगता कडं टेचकाळत टेचकाळत पोहोचला.जुन्या खोपटाजवळ नविन पक्क घर दिसत होतं पण शेजारच्या देवमढीवरुन हे नाग्या भगताचच घर हे ओळखायला तान्याला जास्त विचार करावाच लागला नाही.अंगणात तोहबा गर्दी जमली होती मढीत कुणा एकाला पक्क दोरांनी बांधलं होतं व तो " माझ्या सरला मॅडमला या पाप्यांनी मारलं हो! वेलांनी फासी लावुन मानच कोंबडीगत मुरगाडली या हरामींनी.,सोडा मला मी यांना सोडणारच नाही " असं म्हणत दोराला हिसके देत होता व चार चार मानसांनाही जुमानत नव्हता.तिथच एक पोरसवदा भगत कौल पाहण्याकरीता तयार होत होता.व दुसरा म्हतारा भगत त्याला सुचना करत होता.तो नाग्याच हे लगेच तान्यानं ओळखलं पण इतक्या तोहबा गर्दीत जाऊन त्याला भेटण्यापेक्षा आपण सुलाक्कालाच भेटु नी लगेच माघारी वळताच खोपटातुन सुलाक्काच बाहेर पडतांना दिसली.केस पिकले होते तरी त्यानं लगेच ओळखली.तो समोर जाऊन "आक्के ओळखलं! असं म्हणत आश्रु गाळू लागला.एकाएकीच्या सवालानं आवाज जरी कधीतरी ऐकलेला वाटतोय पण चेहरा मोहरा बदललेला अंगानं सुटलेला गोरापान माणुस आक्के म्हणनारा कोण असावा! सुला ताण देऊ लागली व तिला आपला बारा वर्षापुर्वी गायब झालेला भाऊ आठवला.व तिने हंबरडा फोडतच " तान्या तु! माझ्या भावा कुठं गायब झाला होता रं! नी आता तुला ही बहिन आठवली ?" म्हणतच त्याला धरुन खोपटात घेऊन गेली.व दोन्ही जण बिलगुन रडु लागले.ह्रदय थोडं मोकळं झाल्यावर आक्के हि गर्दी कसली गं? असं विचारताच " तुझा भाचा नाम्या आज पहिल्यांदाच मरिआईचा कौल मागणार आहे व तुझा दाजी आता मरिआईच्या सेवेतुन मुक्त होणार .पण तान्या पहिलाच कौलाला लई अवघड मामला हाय बघ.ते जाऊ दे तु चहा घे नी इतके वर्ष कुठं होतास रं बाबा ते सांग आधी.तितक्यात तिकडे देवमढीच्या मागच्या खोलीतुन एकच गलका उडाला व बोंबाबोंब झाली तसं तान्या व सुलाक्काही देवमढी कडं पळाली.
मागच्या खोलीतुन एक पंचविसीतल्या तरण्या बाईला आधीच्या युवकासारखच चारपाच लोक बांधलेल्या अवस्थेत धरुन आणत होते व ती बाई एका हिसक्यानं त्यांना तितरबितर करत जोरानं" माझ्या डिके सरांना मारतय रं कुणी तरी !तो विवळतच होता एकसारखा नी त्या आडात टाकलय त्याला काढा रे त्याला कुणीतरी ! मला काय धरता.?" वाचवा ना रे त्याला! मी पाया पडते तुमच्या" असं म्हणत दात ओठ खायला लागली.तिचे सारे केस विस्कटलेले कपडे जरी चांगले पन सारे मळलेले व चुरगाळलेल डोळे लालेलाल होते.पुन्हा दोन चार लोकांनी दोर ताणत रिंगणात उभी केली.तोच आधीच्या त्या तरुणानं जोरात उडी घेत घुमायच्या तयारीत असणाऱ्या नाम्या भगतालाच धरला व नाम्या भगताचं नरडं आवळू लागला." सुक्काळीच्या तिथं माझ्या सरलेला घुसडुन मान मुरगाडली नी तु मला काय धरुन ठेवलं या मढीत ढोलगं वाजवित." नाम्याचं सुरु होत असलेलं नाचणं बंद होऊन तो लाथा झटकू लागला.जीभ बाहेर निघू लागली.मामला हाताबाहेर जातोय .पोराचा पहिलाच कौल नी आपण हस्तक्षेप केला तर जणमाणसात त्याचा आब पडणारच नाही म्हणुन नाग्या शांत बसुन नुसता पाहत होता.पण नाम्याची बाहेर पडणारीं बुबुळं पाहताच आता आपण नाही उठलो तर नाम्याच उठेल दुनियेतुन मग कसला आब! लगेच नाग्यानं जागेवरच उभं राहुन अंगावरची पगडी हवेत भिरकावत "मरिमाय कि जय" अशी जोरात आरोळी ठोकली. सर्व भोप्यांनी आपापले ढोलके जोरात बडवले .नाग्यानं हात उगारताच हातात कुच्चा आला व थयथयाट करत तो झेपावला .तोच त्या माणसानं नाम्यावरची पकड ढिली केली.आता नाग्या त्याच्या अंगावर धावु लागला.नाग्यानं परवलीची खुण करताच भोप्यानं लगेच भंडारा व उडदाचे दाणे हातात दिले.दातओठ खात नाग्यानं त्या तरुणावर व तरुनीवर फेकुन "बा अदब रख नही तो खैर नही!म्हणताच ते दोघे मागे सरकु लागले.तिकडे नाम्या पाणी पाणी करत मोकळा श्वास घेऊ लागला.नाग्यानं दोघांच्या हाताला कडं घातलं .तोच ती बेशुद्ध गत झाली व नाग्याही थरथरत खाली बसला .भोप्यानं पगडी डोक्यावर ठेवली.
नंतर नाग्यानं सोबतीच्या लोकांना येणाऱ्या अावसेला यांना घेऊन या पण तोपर्यंत डिके सरांना मळ्यात फिरकू देऊ नका व सरला बाईला ही मसन्या आडाकडं जाऊ देऊ नका.आता तात्पुरतं बाधुन दिलय पण संकट अजुन अजिबात टळलं नाही लक्षात असु द्या.आता शुद्धीवर येतीलच ते .पाणी पाजा लगेच त्यांना.अशा सुचना देतानाच नाग्या भगताचं समोर उभा तान्याकडं लक्ष गेलं.याला आपण कुठ तरी पाहिलय पण लक्षात येत नाही कोण हा? ....कोण तान्या ? होय तान्याच .ओळखल्याबरोबर नाग्यानं बाकी सोपस्कार भोप्याकडं सोपवत तेथुन पाय काढला व तान्याला गाठुन खोपटाकडं आला.विस्मयाचा बहर उतरल्यावर दोघांनी गळाभेट घेत इतके दिवस कुठं होतास रं तान्या?नाग्यानं विचारलं पण तितक्यात सुलाक्कानं आधी जेवन करा मग रात्री निवांत गप्पा मारु असं सांगत ताटं केली.जेवन उरकल्यावर तान्यानं सुस्कारा सोडत थोडक्यात सांगावयास सुरुवात केली.
बारा वर्षापुर्वी त्या काळरात्री भरवाडाच्या कृष्णादा व खंडू पाटलाच्या धाकानं पळतच तालुक्याला गेलो व तेथुन समोरच उभ्या केळीच्या ट्रकच्या केबीनच्या वर झोपुन थेट पंजाबात पळालो.तिथं दोन तीन दिवस कुत्र्यागत भटकल्यावर एक ढाब्यावर लागलो व तिथेच काम करुन राहू खाऊ लागलो .ढाब्याच्या मालकाने हुनर पाहुन दोन वर्षात मला सर्व शिकवुन दुसरा ढाबा खोलुन दिला .मी ही ढोर मेहनत करुन तिथेच जम बसवत आज तो एक मोठा ढाबाचालक बनलो.पण इथं आपण टाकुन गेलेलो भूतकाळ रात्री झोपू देईना व सुलाक्काची याद यामुळं मनाचा हिय्या करुन पुन्हा भेटावयास आलो. पण दाजी खंडू पाटलाच्या वाडयावर कुणीच नाही .काय झालं हो दाजी नेमकं?
इकडं शुद्धीवर आल्यावर डिके सर व सोबत सरला मॅडम लाही कन्हैय्या भावसारकडंच आणलं.थोडं फार जेवण देऊन झोपवण्यात आलं.पण सरला मॅडम ला आता झोपच येईना सारखं रडु दाटुन आपलं जळगाव व अजिंठा सिमेलगतच फर्दापुर गाव ,आई आठवु लागली व त्या अधिकच रडु लागल्या.दोन वर्षापुर्वी आपण या गावात आलो तेव्हापासुन ते गुदरलेल्या प्रसंगापर्यंतच सारा पट त्यांच्या डोळ्यासमोर फिरु लागला.
सुनसगावच्या के. एम.पाटील माध्य.विद्यालयात बी.एस्सी बी.एड च्या दोन जागा निघाल्याची जाहिरात निघाली. मुलाखतीत तीस उमेदवारातुन फर्दापुरची सरला शिरसाठ व गावातीलच दिपक कन्हैया भावसार हे दोन उमेदवार सिलेक्ट झाले. शाळेची ओपनींग तशी फार जुनी नव्हती फक्त दहा वर्षापुर्वीची.शाळा सुसज्ज बांधलेली.समोर प्रशस्त मैदान .मैदानाला लागुन पुर्वेला आग्नेय कोपऱ्यात भावसाराचा मळा.व ईशान्येला मळ्याला लागुच गावाची स्मशान भूमीचं सात आठ परतनचं पडीक क्षेत्र.शाळेमागे गावाची विहीर .शाळेच्या उत्तरेला ज्याच्या नावावर शाळा त्या खंडू पाटलाचचं भलं मोठं खळं व त्यात मोठा भग्नावस्थेत ढासळायला टेकलेला गोडाऊन.गाववाले गप्पात सांगायचे कि शाळेची जागा भावसाराचा मळा खळं हा सर्व हाळी इनाम म्हणुन खंडू पाटलाच्याच मालकीचा होता.बाकी शाळेस दान व मळा भावसारानं घेतला.त्याच भावसाराचा मुलगा दिपक ही शाळेत सरलासोबत सिलेक्ट झाला.
शाळेत तीनशे च्या आसपास पोरं शिकत व शाळेची शिस्त ही छान.सरला मॅडम शालेत लगेच रमल्या.नी त्याच वर्षी बाॅडी नं वसतीगृहही सुरु केलं.त्या पोरापोरीसोबतच सरला मॅडम राहू लागल्या.दिपक भावसार सरांनी ही लागल्या लागल्या विज्ञानाची भव्य सुसज्ज लॅब बाकी स्वत:चा पैसा टाकुन उभारली.सारे जण त्याना डिके सर याच नावानं संबोधू लागली.बी एस्सी अॅग्री चं शिक्षण राहुरी वीद्यापिठात केल्यानं त्यांना शेतीचीही खुपच आवड होती.म्हणुन शाळेच्या वेळे व्यतिरिक्त वेळ ते शाळेजवळच्या आपल्या मळ्यात वेगवेगळे प्रयोग करत व विद्याथ्यांनाही प्रात्यक्षिक दाखवत नवनविन वाण खते पेरणी पद्दती परागीभवन असं सारं काही पौरांना सोप्या भाषेत समजावुन दाखवत.त्यामुळं पोरांसोबत सरला बाईदेखील बऱ्याचदा सोबत राहत व नकळत डिकेच्या अवती भोवतीच घुटमळत.कधी कधी लॅब मध्ये विद्यार्थ्यांसोबत तासनतास प्रयोग करत.साहजिकच विज्ञानात शाळेचा मागील वर्षाचा बोर्डाचा निकाल खुपच चांगला लागला.व ते दोघे पोरासोबत गावातही प्रिय झाले.
डिके नं शाळेसोबतच मळ्यातही राबत पपई केळ मिरची यांचे नवनविन वाण लावत भरघोस विक्रमी उत्पादन काढलं.व तो ही मनाच्या कोपऱ्यात मनोमन सरला कडं आकर्षित होऊ लागला.दिवसा मागुन दिवस जाऊ लागले तसे दोघेही जवळ येऊ लागले.रवीवार वा सुटीच्या दिवशी घरी जायचं नसेल तर सरला डिकेसोबतच मळ्याव वा घरी ये जा करी.गाववाल्यांनाही सारं कले पन दोघांचा स्वभाव व कर्तृत्वानं उलट ते यांना प्रोत्साहनच देत कारण दोघेही अवैवाहिक असल्यानं यांची जोडी जुळुन लग्न बंधनात घडावं असच सगळ्यांना वाटे.पण समजुन ही दोघांना सांगांवं कसं हेच कळत नव्हतं.सुरवात समोरुन व्हावी असच एकमेकांना वाटे.
शाळेची प्रगती पाहुन वसतीगृहात दुरदुरुन पोरं येऊ लागली.तसं शाळेनं व्यायामशाळा बांधण्याचं ठरवलं.त्याकरीता मैदानाच्या पुर्वैला मसनवटीच्या बाजुनं जागा निश्चीत करण्यात आली.या बांधकामासोबतच पोराचा वाढता पसारा पाहुन मोठं शौचालय बांधण्याचंही ठरवलं गेलं.दहा शीटच्या शौचालयाकरिता एक भला मोठा शोषखड्डा जेसीबी लावुन खोदण्याचं काम डिकेलाच सांगितलं.शोषखड्ड्याची जागा नेमकी मसणवटीतच आली.जेसीबीनं कोरण्यास सुरुवात झाली तर तिथं जुनं बांधकाम दिसु लागलं.बांधकाम पाहताच गावातले बघै म्हणुन आलेले म्हातारी लोकं" आरं इथं जुना आड आहे पुरलेला.स्वातंत्र्या आधी सारं गाव गावाच्या विहीरीवर पाणी भरत जी आता शाळेमागं आह ेव गावातली हरीजण मंडई या आडावर पाणी भरत.पण स्वातंत्र्यानंतर व बाबासाहेबाच्या पुण्यायीनं भेदाभेद कमी झाला तसं सारी एकाच गाव विहीरीवर पाणी पीऊ लागली व मसणवटीतला हा आड तसाच पडला.याच्याच मग लोक काहीही घाण टाकु लागले व अर्धा भरला याला.नंतर शाळा आली या जागेवर नी खंडू पाटलानं रातोरात अचानक पुरला याला.ही गोष्ट डिकेला हि माहित नव्हती.कारण त्याचे वडिल रेल्वेतुन रिटायर्ड झाले नी त्याच वेळेस खंडु पाटलाच्या जावयांनी हा मळा विकायला काढला.कन्हैया भावसारांनी मळा घेतला व ते या गावात रहायला आले.पण तो शिक्षणाकरिता बाहेरच होता.
डिके व सरला मॅडम नं मग जेसीबी वाल्याला याचं बांधकाम तुटणार नाही अशा रितीनं कोरायला लावलं. जवळपास तीन चार मीटर व्यासाचा हा आड काही फुट कोरल्यावर माणसं उतरुन खोदु लागली.दाहा बारा फुट कोरला असेल तोच खोदतांना हाडं निघु लागली.मग संवत: डिके उतरला व त्याने हळुवार कारलं तर एक पुर्ण मानवी हाडाचा सांगाडा निघाला.मात्र आधीच्या कोरणाऱ्यांनी पहिल्या सांगाड्याची हाडं हाडं मोकळी केली होती.जो चांगला होता तो जसाचा तसा वर काढला लगेच " डिके सर विद्यार्थ्यांना दाखवण्याकरिता लॅब मध्ये ठेवायचा का सांगाडा?" सरला मॅडम नं विचारताच." मॅडम मी त्याच उद्देशानं ह्या सांगाड्याला काढलंय .मानवी रचना सांधेव त्यांची रचना या बाबी तोंडी सांगुन उपयोग होत नाही आता आपणास प्रत्यक्ष दाखवता येतील" पण जुन्या जाणत्या लोकांचा थरकाप उडाला.तपापुर्वीच पुरलेल्या मसन्या आडात दोन सांगाडे आलेच कसे? व कुणाचे? नाहीतरी खंडू पाटलानं रात्रीतच हा आड पुरला होता.व नंतर खंडु पाटील छातीत कळ उठुन झटक्यान जातात काय नी पोरगा किस्ना दा गायब झाला त्याचा आजपर्यंत तपास नाही. पण जाऊ द्या जुनी मढी डिकेसर व मॅडमासारख्या जाणकारांनी उरकली तरी ते काम आपलं नाही ्सा वीचार करत ते परतली.
सरांनी तो सांगाडा व्यवस्थीत लॅब मध्ये आणुन ठेवला व आडातुन जी माती निगाली ती नक्कीच उत्कृष्ठ ह्युमस आहे हे त्यांनी ओळखुन तुटलेल्या दुसऱ्या सांगाडाच्या हाडासकट आपल्या मळ्यात ट्रक्टरनै टाकुन घेतली.
नंतरच्या दिवसात हा सांगाडा व ती हाडं काय मढी उकरनार होती ते येनारा काळच सांगणार होता.

🙏💐उर्वरीत क्रमश: दुसऱ्या भागात पाहू या! Link >> https://marathighoststories.blogspot.com/2019/08/by-vasudev-patil_28.html
💐🙏
💐🙏
🙏🙏VSDV🙏🙏