अमेरिका आणि युरोपच्या काही भागात, paranormal science हे पूर्वी पासूनच एक वैज्ञानिक शास्त्र म्हणून मानले जाते. अर्थात तिथेही त्याला मानणारे, न मानणारे लोक आहेतच. यात मानणाऱ्या लोकांना आलेल्या अनुभवावरूनच सिद्धता जन्माला आलेली दिसते. एखादा शाप, एखादी करणी, एखादी वास्तू किंवा वस्तू कीती शापित आहे, आणि त्यावर इलाज काय, हे प्रश्न तो पर्यंत अनुत्तरित राहतात, जो पर्यंत आपण त्याच्या उगमशी असलेल्या घटनेचा, सत्याचा आणि त्याच्याशी निगडीत व्यक्तीच्या इतिहासाचा शोध घेत नाहीत. अशीच एक कर्म-कहाणी आहे Annabelle या बहुलीची. या बाहुली च्या जोरावर, तब्बल ६ भयपट तयार झालेले आहेत, ज्यांनी भयापटांच्या मालिकेत प्रचंड धुमाकूळ माजवला आहे. तसेच हे भयपट एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन रिटा वॉरेन यांच्या research आणि त्यांनी सेडावेल्या काही केसेस च्या आधारावर निर्मित आहेत.
१. The Conjuring - 2013
२. Annabelle - 2014,
३. The Conjuring 2 - 2016
४. Annabelle Creation- 2017
५. The Nun- 2018
६. The Curse of LIrona- 2019
७. Annabelle Comes Home- 2019
१. The Conjuring - 2013
२. Annabelle - 2014,
३. The Conjuring 2 - 2016
४. Annabelle Creation- 2017
५. The Nun- 2018
६. The Curse of LIrona- 2019
७. Annabelle Comes Home- 2019
हे सगळे चित्रपट थोड्याफार प्रमाणात एकमेकांशी जिडले गेलेले आहेत. त्यात २०१९ साली आलेल्या The Curse of Lliron सोडला, तर बाकीचे सगळे चित्रपट Annabelle या बाहुलीच्या आजूबाजूला फिरताना दिसतात. The Conjuring Universe चा आपला एक प्रेक्षक वर्ग असून , हे सगळे भयपट , कोणत्या न कोणत्या खऱ्या घटनेशी संलग्न असल्याचा दावा होतो.
कोण होती Annabelle? -
या सगळ्याला सुरुवात फार पूर्वी, म्हणजे १८६३ साली झालेली असते. बाथशिबा नावाची एक बाई, demon ला प्रसन्न करण्याच्या नादात, आपल्या एकुलत्या एक बालकाचा बळी देते. आणि त्यात नंतर स्वतःही मृत्यू पत्करतो. पण मरता-मरता, ती संपूर्ण जागा शापित करून जाते.
१९४३ साली एक बाहुलीकार सॅम्युएल मुलींस, त्याची पत्नी ईस्थार आणि त्यांची सात वर्षीय कन्या Annabelle हे प्रवासास जात असताना, एका अपघातात Annabelle चा अंत होतो. मुलींस दाम्पत शोकात असताना, कोणत्या न कोणत्या प्रकारे, आपल्या दिवंगत मुलीच्या आत्म्याशी संपर्क करू पहातात. पण तिच्या जागी एक घातक शक्ती जागृत होते, जी मुलींसना , Annabelle असल्याचे भासवते. पण खरी हकीकत समजे पर्यंत खूप उशीर झालेला असतो. चर्च च्या मदतीने मुलींस त्या बहुलीला आणि तिच्यातील सैतानाला Annabelle च्याच खोलीत कोंडून घालतात, आणि त्या खोलीत बायबल ची काही पाने ही चिकटवली जातात. हा तोच सैतान असावा ज्याने बाथशिबा आणि तिच्या मुलाचा बळी घेतला असतो. १२ वर्षांनी, मुलींस कुटुंबीय, हेच घर सिस्टर शेवरले आणि सहा अनाथ मुलींना देतात, त्यातील एक जेनेस ही पोलिओ ने अधू असते. सक्त ताकीद देऊन सुद्धा जेनेस Annabelle च्या खोलीत जाते, आणि त्या बाहुलीला मुक्त करते. Annabelle तब्बल १२ वर्षाने पुन्हा जागृत होते, आणि सगळ्यांनाच त्रासदायक ठरते. लिंडा नावाची एक गोंडस मुलगी सॅम्युएल ला ही हकीगत सांगते. पण या सगळ्यात सॅम्युएलचाही बळी जातो. Annabelle आता जेनेस चा पूर्ण ताबा घेते. ती (सॅम्युएल च्या मुलीच्या) खोट्या रुपात येऊन ,जेनेस कडे तिचा आत्मा मागते.
सिस्टर शेवरले मुलींना घेऊन तिथून निघतात, पण त्याआधी ईस्थर मुलींन त्यांना Annabelle च्या उगमाची कहाणी सांगतात. लिंडा अजूनही मध्येच असते. सिस्टर शेवरले तिची सुटका करतात, आणि Annabelle बाहुली आणि जेनेस ला पुन्हा कपाटात बंद करतात. जेनेस तिथून भिंतीला भगदाड पाडून नकळत निघून जाते, आणि सेंटा मोनिका येथील अनाथालयात Annabelle या नावाने वास्तव्य करून राहते.
हिग्गीन्स कुटुंबीय या Annabellle लाच दत्तक घेतात, आणि ते योगायोगाने मुलींस ची हत्या झालेल्या घराशेजारीच येऊन राहतात. पुढे १२ वर्षांनी Annabelle आणि तिचा मित्र, एक सैतानी Cult च्या आधाराने, हिग्गीन्स कुटुंबीयांचा बळी घेतात, आणि शेजारी राहत असलेल्या डॉ. जॉन आणि त्याची गरोदर पत्नी मिआ च्या मागे लागतात. या सगळ्यात पोलीस अन्नबेळले च्या मित्राला मारतात, आणि मिआ ची मैत्रीण एलविन Annabelle ला आपल्या आत्म्याचा बळी देते.
ही सगळी कहाणी Annabelle Creation ( 2017) आणि Annabelle (2014) या चित्रपटात स्पष्ट दाखवली गेली आहे. मुलींस कुटूंबाने चुकून आपल्या मुलीच्या आत्म्याला बोलावण्या ऐवजी, एका सैतानाला या जगात बोलावले असते. हा सैतान Annabelle च्या मदतीने त्या घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक त्रास देतो, आणि प्रसंगी त्यांचा बळी घेतो. The Conjuring Universe चा प्रत्येक चित्रपट एडवर्ड आणि लावरेन्स वॉरेन यांच्या reeasrch वर येऊन थांबतो.

क्रमशः
ही माहिती The Conjuring Universe , युट्युब आणि तत्सम माहितीच्या आधारावर संकलित केलेली आहे.