The Conjuring Universe - भाग २
Horror Marathi stories, Marathi Information of The Conjuring Universe, The Conjuring Universe,
The Curse of Llronna Or
The Curse of Weeping Woman.
The Curse of Weeping Woman.
संपूर्ण The Conjuring Universe हे एकमेकांशी थोड्या फार प्रमाणात गुंफलं गेलंय. काही लोकांच्या मते या दंत कथा आहेत, तर The AmityVille चा किस्सा डोळ्याने पाहिलेली लोकं सुद्धा हयात आहेत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू या दंत कथा पूढे चालवताना दिसतात. प्रत्यक्ष दर्शींचे दुजोरे, श्रद्धा-अंधश्रद्धा, अंदाज, आराखडे, यातच या कथा मोठया होतात.
मेक्सिको मध्ये अशीच एक दंतकथा प्रसिद्ध आहे. The Llrona ची. ही लरोना , अज्ञात ठिकाणी एकटं असलेल्या लहान मुलांना पळवते, आणि मग ही पोरं सापडत नाहीत. तिला बऱ्याच लोकांनी पहिल्या सारखं पण सांगितलंय, पण याला काँक्रेट असे पुरावे नाहीत.
१६६३- मेक्सिको-
एका खेड्यात जन्माला आलेली मारिया दिसायला खूप सुंदर असते. गावातील बरीच पोरं तिच्यावर सगळं ओवाळून टाकायला तयार असतात. अगदीं प्राण सुद्धा. एक दिवस एक श्रीमंत तरुण हिला लग्नासाठी मागणी घालतो, आणि मारिया सुद्धा त्याला होकार देते. मारिया च्या घरचे देखील आपली संमती दर्शवतात. पण त्या तरुणांच्या वडिलांना हे मान्य नसतं. मारिया आणि तिचा नवरा, आपला नवा संसार थाटतात. पुढे त्यांना दोन गोंडस पोरं ही होतात. कामानिमित्त मारिया चा नवरा सारखा बाहेरगावीच असतो. लग्नाला इतकी वर्षे झाल्यावर, त्याचे मारिया बद्दलचे प्रेम कमी होते. घरीं आला, तरी तो मुलांनाच जास्त वेळ देतो. एक दिवशी अघटित घडतं. आपला नवरा , दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडलाय, हे मारियाला कळत.
राग आणि द्वेषात माणूस कधी कधी अशे निर्णय घेतो, जे त्याला आयुष्यभर एखाद्या शापासारखे भोगावे लागतात. त्याच्या या करणीत, काही निष्पाप लोक हकनाक बळी जातात. मारिया रागाच्या भरात आपल्या पतीच्या सगळ्यात लाडक्या मुलांचा पाण्यात बुडवून बळी घेते. आपण काय करून बसलो, हे लक्षात आल्यावर, मारिया समोर पशच्यातापाशिवाय काहीच उरत नाही. त्याच तळ्यात, ती स्वतःला संपवते ( एका कथेत तिला फाशी झाल्याची नोंद आहे. ) पण स्वर्गाच्या दारात तिला तिच्या कर्माचा जाब विचारला जातो. आणि परत जाऊन आपल्या मुलांना आणायला सांगितले जाते. जन्म आणि मृत्यच्या दारात झुळणारी मारिया अधिक भयावह बनते, आणि आपल्या मुलांच्या शोधात फिरू लागते.

सुमारे ३०० वर्षांनंतर, ऍना नावाच्या एका समाजसेविका , पॅटरशिया नावाच्या एका महिलेची दोन मुलांच्या शोधात निघते. तपासात तिच्या लक्षात येते, की पॅटरशियानेच कार्लोस आणि टॉमस या आपल्या दोन मुलांना घरातच एक खोलीत बंद केले आहे. त्यांना सोडवण्याच्या नादात, ऍना वर पॅट हल्ला करते पण पोलिस पॅट ला ताब्यात घेतात, आणि दोन्ही मुलांना ऍना ला सोपवलं जातं. दोन्ही मुलं एका वेगळ्या भीतीत वावरत असतात. पॅट ला ही तीच भीती असते, पण ऍना मात्र पूर्ण अनभिज्ञ असते.
एका तलावात सापडलेली दोन लहान मुलांची मृतदेह, त्याची आक्रोश करणारी माता, याचा तपास करायला गेलेली ऍना आणि यात ऍना च्या लहान मुलांना एका अज्ञात शक्तीने दिलेला त्रास. हे सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं. पॅट ची दोन्ही मुलं मरतात, आणि त्याच्या थेट आरोप पॅट ऍनावर लावते. टॉमस आणि कार्लोस चा मृत्यू तलावात बुडून झालेला असतो. गाडीत बसून राहण्याची ताकीद मोडत, ऍना चा मुलगा ख्रिस बाहेर येतो आणि त्याचा सामना होतो थेट लरोना शी...! लरोना दोन्ही लहान मुलांना घाबरवते. यात ख्रिस च्या हातावर काही जळल्यासारखे वण उमटतात. दुसऱ्या दिवशी फादर पेरेझ ( जे The Conjuring - 2 मध्येही दिसलें होते , आणि हीच एकमेव कडी आहे, ज्यात The Curse of Llrona हा भयपट, The Conjuring Universe मध्ये गणला जातो) ऍना ला लरोना ची सगळी कर्म कहाणी सांगतात.
पॅट ऍना समोर चौकशीत सांगते, की कार्लोस आणि टॉमस चा बळी लरोनानीच घेतला आहे. आपली मुलं सुरक्षित राहावी म्हणून, पॅट नीच त्यांना आपल्याच घरात बंद करून ठेवले होते, जे ऍना नी बाहेर आणले.
आता पॅट नी आपली मुलं परत जिवंत व्हावीत म्हणून पॅट लरोनाला , ऍना ची दोन मुलं कबूल करून येते. त्या रात्री पहिल्यांदा ऍना आणि तिच्या मुलांचा सामना लरोनाशी थेट होतो. त्यांच्या मदतीला राफेल येतो. राफेल हा कोण आहे, कुठून आलाय हे कोणालाच समजत नाही. पण त्याच्याकडे दोन वास्तु अश्या असतात, ज्या लरोनाला थांबवू शकतात. एक म्हणजे तिचे अश्रू, आणि दुसरं म्हणजे तिने ज्या तळ्यात आपली मुलं बुडवली, त्या तळ्याकाठी उगवलेल्या एका अगबाबळीच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेला क्रॉस. आपल्या मुलांना मिळवण्यासाठी आंधळी झालेली पॅट, ऍना च्या विरोधात उभी राहते. पण नंतर ती ऍनाला मुक्त करते. मागे एकदा लरोना आणि राफेल चा सामना होतो, तेव्हा तिच्या गळ्यातला ताईत राफेल लॅबवतो, आणि ऍना च्या लहान मुली कडे देतो. त्या ताईताने लरोना काही काळासाठी "मारिया" या आपल्या मूळ स्वरूपात येते. पण बाजूच्या आरश्यात पुन्हा तिला आपलं विभत्स रुप दिसत. राफेल नी दिलेला क्रॉस लरोनाच्या काळजात शिरतो, आणि ऍना आणि तिच्या मुलांची सुटका होते.

चित्रपटात गुंफलेली ही कथा खूप रंजक जरी असली, तरी भय-दृश्यांनी भरलेली आहेत. काही ठिकाणी ही दृश्ये नित्याची झालेली दिसतात. पण मारिया ची कहाणी , जरी दंतकथा असली, तरी तिच्यावर कुठेतरी दया येतेच.