बरखा बेलदारीण
क्रमश:....भाग२
Marathi Horror Story-Bhitidayak katha-bhutkatha-rahasykatha |
💃 बरखा बेलदारीण -1
💃
💃
शिवदे गुरुजीनं शिक्षण खात्याकडुन प्राप्त झालेला तालुक्यावरिल आर्णेवाडीचा आदेश तालुका मास्तरकडुन घेतला व वाडीला कसं जायचं, बस कोणती व कितीला ? असे अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत होते.आज एकच्या गावगाडीनं जा व तिथल्या शिणकर गुरुजी कडनं चार्ज घ्या व ते तुमची सर्व सोय लावतील अशी चिठ्ठी लिहुन देतो.अशा तालुका मास्तरच्या सुचना ऐकुन शिवदे गुरुजी स्टॅंडवर आले.पोटात ओरडणाऱ्या कावळ्याची जाणीव होताच थौडसं च्याऊ-माऊ करुन दुपारच्या बाराला आर्णेवाडीच्या करिता असणाऱ्या फलाटावर येऊन बसले. घरघर करत व धुराडा उडवत बस लागली तसे शिवदे गुरुजीनं आईनं दिलेला बाडबिस्तरा घेऊन गर्दीतुन वाट काढत गाडीत बसले. मृग लागला व पावसाच्या खाणाखुणा दिसुनही जुन निम्मा उलटुनही पाऊस न पडल्यानं उकाळ्यानं हैराण प्रवाशी गाडी केव्हा सुटेल याच विवंचनेत आवाजाचा गिल्ला करत होते.घंटी वाजली हवेची झुळुक आली तसा गलका कमी झाला.हळुहळु गाडी तालुक्याच्या ठिकाणाहुन बाहेर धावु लागताच बोडके डोंगर दिसु लागले.शिवदे गुरुजीच्या डोळ्यांची झापडं रात्रभरच्या रेल्वेप्रवासानं व थकव्यानं आपसुक लागु लागली.कंधार सोडायला आता जवळजवळ अठरा तास लोटले होते त्यांना.
जि.प.चा शिक्षक नेमणुकीचा आदेश पोष्टमन ने घरी आणुन देताच प्रवीण शिवदेच्या नावापुढं 'गुरुजी' ही बिरुदावली लडिवाडपणे आली व कदाचित आयुष्यभर राहणार होती.घरची परिस्थीती हलाखीची असल्यानं सहाशे किमी लांब जिल्हा तरी त्यांनी कसलाही विचार न करता मोठ्या हारिखानं नोकरी स्विकारली.
कुठली तरी वाडी आली असावी उतरणाऱ्या प्रवाशाच्या किचमिचीनं शिवदे गुरुजी अर्धवट झोप व विचारतंद्रीतुन बाहेर आले. गाडी पुन्हा धावु लागली.वाडी मागुन वाडी गावं मागं पडु लागली.आता डोंगरावर गर्द झाडी दिसु लागली.नदी नाले चढ-उतार वळणं लागली.व दुर डोंगरात पाऊस झाला असावा त्यामुळे दमटपणा जाणवायला लागला.व हळुहळु रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात चहासारखं आटणार पाणीही दिसु लागलं.पाणी पडुनही उलट उष्मा अधिकच वाढल्यानं केव्हाही पुन्हा जोराचा मृग कोसळल्याची चिन्हे दिसु लागली.
शेजारी बसलेल्या बाबास 'बाबा,अजुन आर्णेवाडी किती लांब?' अशी पृच्छा करताच बस्स आलच कि आठेक मैलावर.असं सांगुन पोरा कुणाकडं जायचं म्हणुन चौकशी करु लागला.त्यावर बाबा, तुम्ही तिथलेच का? मला मास्तर म्हणुन नेमणुक मिळालीय तिथली.व्हय व्हय का.लई बेस पोरा.वाडी आमची लई चांगली पोरा.पण..,काय सांगु जाऊ दे ! तु आजच येतोय गावात कळेल तुला किंवा शिनकर गुरुजी सांगतीलच.
अडीच वाजता आर्णेवाडीत गाडीनं शाळेजवलच असलेल्या चौकात शिवदे गुरुजी उतरले समोरच शाळेच्या नावाची पाटी व पोरांचा गलका ऐकु आल्यानं शाळा कुठाय अशी विचारण्याची गरजच आली नाही .चौक जवलच तारेचं कंपाऊंडला लोखंडी गेट, मघ्ये शाळा व प्राथ. आरोग्य उपकेंद्र दिसत होतं. जवळच भलं मोठं आब्याचं,चिंचेचं व कडुनिंबाचं झाड.आंब्याचा बहार संपला होता.शेंड्यावर चारदोन टपोऱ्या कैऱ्या देठावर झुलत होत्या तर निंबाच्या झाडाखाली निंबोळ्यांचा खच पडलेला होता.पंधरा-विस मुलं झाडाखाली खेळत होती कदाचित मधली सुटी झाली असावी.दोन माणसं छतावरिल कौलं चाळत होती व खालुन पन्नासीला टेकलेला पण रुबाबदार माणुस त्यांना कामाबाबत सुचना देत होता. शिवदे गुरुजीनं त्याच माणसाजवळ शिनकर गुरुजींना भेटायचय म्हणुन विचारताच , बोल काय काम आहे मीच शिनकर गुरुजी . शिवदे गुरुजीनं मला या शाळेत नेमणुक मिळालीय, रुजु व्हायला आलोय, असं सांगताच शिनकर गुरुजींचा चेहरा एकदम खुलला .कारण आता आपली इथुन सुटका होणार व आपण स्व तालुक्यात जायला मोकळं झालोत .पण पोरसवदा गुरुजीकडं पाहिल्यावर या पोराचं पुढं कसं होणार या जाणिवेनं भितीदायक लहरही त्यांच्या काळजात उमटली.तरी चेहऱ्यावर निर्विकारता ठेवत, "या कार्यालयात" म्हणत लगेच दोन चिमण्या पोरांना घरी चहाकरिता पिटाळले.
शिवदे गुरुजीनं आपला बाडबिस्तरा एका कोपऱ्यात ठेवुन मैदानातल्या हापशावर हात-पाय तोंड धुऊन शिणवटा घालवला.तजेलपणा जाणवल्यावर त्यांनी आदेश गुरुजीकडं सोपवला.शिनकर गुरुजींनी टेबलात ठेवत कुठुन आलात ? व इतर वास्तपुस्त केली.तेवढ्यात चहा आला .तो सर्वांनी घेतला.आज तुम्ही प्रवासानं थकला असाल बाकी चार्ज देव घेव व इतर सर्व कामकाज मी तुम्हास उद्या समजवुन देईन.तितक्यात कौलं चाळणाऱ्यापैंकी एकजण चहा पित पित "गुरुजी नवं गुरुजींना गावची हालहवाल सांगा कि.....! "महाद्या लेकाचा गपगुमान चहा पी व कामाला लाग. शहाणपणा पाजळु नको",शिनकर गुरुजी फणकाऱ्यात म्हणाले व लगेच विषयाला बगल दिली .हे शिवदे गुरुजीच्या लक्षात आलं पण आपल्याला काय घेणं असा विचार करत त्यांनीही शांत बसणंच पसंद केलं.
त्या रात्री शिवदे गुरुजीची मुक्कामाची सोय शिनकर गुरुजीच्या घरीच झाली . जेवनानंतर गुरुजींची पत्नी आवळा आक्कानं प्रेमळ एकेरीतच सारी चौकशी केली.लग्न ,घर, पुढं राहण्याचं काय? सारी आस्थेवाईक चौकशी केली.व पोरा आम्ही राहिलो असतो तर आमच्या कडंच राहिला असता.पण यांचीही बदली झाली असल्यानं व तु आल्यानं आता ही वाडी आम्ही सोडणार मग तु काय ठरवलंय?. लांबचा प्रवास म्हणुन काहीच आणलं नाही पण जुजबी सामान व किराणा येथुनच करीन व शाळेतच राहीन , असं म्हणताच आवळा आक्काच्या काळजात धस्स झालं व दिव्याच्या मिणमिणत्या उजेडातही तिच्या चे७ऱ्यावरिल काळजीच्या छटा शिवदे गुरुजीनं बरोबर टिपल्या.तितक्यात शिनकर गुरुजीनं चाणाक्षपणे "आवळे त्यांना आता झोपु दे ,दिवसभराचा थकवा आहे". असं म्हणत झोपायला अंगणात आले.
पुढच्या दोन दिवसात शिनकर गुरुजीनं सारा आर्थिक चार्ज व इतर चार्ज शिवदे गुरुजींना सोपवला, शालेय कामकाज समजावुन दिलं,गावातील खास असामींशी गाठभेट घडवुन दिली.व मग स्वत: च्या तालुक्यातील शाळेवर रुजु व्हायला निघुन गेले. शिवदे गुरुजीनंही आवळा आक्काच्या मदतीनं किराणा व लागणारी भांडी जवळच्या गावाला जाऊन आणली व शाळेत आपलं बिऱ्हाड थाटलं व आवळा आक्का नाही सांगत असतांनाही रात्री शाळेतच मुक्कामाला थांबले. रात्री अंथरुणात पडल्या पडल्या त्यांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता कि गाडीतला बाबा, कौलं चाळणारा माणुस, आवळा आक्का आपणास काहीतरी सांगत होती .पण का कुणास ठावुक अडखळले.या विचारात रात्रीचे साडेअकरा वाजुन गेले.घराचे विचार ,नविन गावाचे विचार डोक्यात थैमान घालत होते .शिवदे गुरुजी उठुन पाणी प्याले व बाहेर व्हरांड्यात आले .जेष्ठाचा दुसरा पंधरवाडा चालु असल्यानं रात्र अंधारी होती. वाडी गार झौपलेली डोंगरातुन गार हवा जाणवत होती.सु सु करत वारा वाहत होता.अचानक गुरुजीचं लक्ष समोरच्या प्राथमिक उपकेंद्राकडे गेलं.व काही तरी भेसुर भकास जाणीव झाल्यागत झालं. झपकन काही तरी वेगानं क्षणात हलतय असंच काही भास. गुरुजीनं विचार झटकले व आत झोपायला आले.
. शिनकर गुरुजी रुजु होऊन एक दिवस शाळा करुन आवळा आक्कास व आपलं सामान घेण्यास आले.सर्व सामान वाहनात भरुन पाठवल्यावर निवांत शिवदे गुरुजींना भेटायला आले .त्यानी मनात विचार केला कि आता या पोर सवदा मास्तरास सावध केलेलं बरं कारण आपण आधीच सांगितलं असतं तर कदाचित हे पोर घाबरुन सरळ गावालाच निघुन गेलं असतं तर मग पुन्हा आपन इथच अडकुन पडलो असतो.आता कसं रुजु होऊन आलोत आता गेलं तरी शासन आपसुख दुसऱ्या कोणाची नेमणुक करेल.पण याला आपण सावध केलच पाहिजे.
शिनकरांनी शिवदेला जवळ बसवत सांगितलं "बघा गुरुजी शक्यतो वाडीतच खोली पहा.शाळेत राहु नका.शाळेत रहायचंच असेल तर अमावास्येच्या रातीला काहीही झालं , कोणी कितीही बोलवलं तरी बाहेर पडु नकोस.समोरच्या प्राथ.आरोग्य उपकेंद्राकडं रातीला ढुंकुनही पाहू नका.दिवटी अमावास्येच्या रातीला तर अजिबात नको.वडिलाच्या नात्यानं सांगतोय पक्क लक्षात ठेव." बराय ठिक! पन गुरुजी नेमकं का नाही ?हाच प्रश्न मलाही पडलाय ते सांगा ना. ती खुप मोठी कहाणी आहे यथावकाश कळेलच तुला.बरं निघतो मी असं म्हणुन शिनकर गुरुजीनं निरोप घेतला.जाता जाता शिवदे गुरुजीलाही भरुन आलं व एकाकी वाटु लागलं.गाडीत बसेपर्यंत शिवदे गुरुजी चौकातच थांबले.पाच सहा दिवसापासुन या नवख्या भागात एकच आधार होता तो ही दुर जात होता.
शिवदे गुरुजीनं मुलांशी लगेच जुळवुन घेतले.रिकाम्या वेळेत शाळैमागच्या डोंगराला लागुन असलेल्या बागेत ते मन रमवु लागले. तर कधी मुलांसोबत पालकांसी संपर्क वाढवु लागले.हुशारी व कष्ट करण्याची उपजत क्षमता या जोरावर ते लगेच वाडीत मिसळले. वाडी लहान असली तरी पाच वर्षापुर्वी वरच्या अंगाला नदीवर बांधलेल्या धरणामुळं झपाट्याने कात टाकत होती. प्रत्येकाच्या सातबाऱ्यावर आठ नऊ एकराचं रान हमखास होतं.रानात धरणाच्या पाण्यानं ऊस ,हळद, आद्रक घेतलं जात होतं साहजिकच हाती खेळणाऱ्या पैशासोबत उन्मादाचाही शिरकाव वाडीत शिवदे गुरुजी येण्या अगोदरच झाला होता.
जेष्ठ महिण्याची अमावास्या दोन तीन दिवसावर राहीली असता वाडीला पावसानं मजबुत झोडपलं .सारखी सततधार सुरु घराच्या बाहेर निघणं मुश्किल .तशात इरलं पांघरुण पाटलाचा महादु गुरुजीला बोलवायला आला. गुरुजी पाटलांनी तुम्हाला बोलावलय व सायंकाळचं जेवणही तिकडच सांगितलय.गुरुजी लगेच महादु सोबत निघाले.पाटलांनी जवळ बसवुन सारी विचारपुस केली.कसं चाललय गुरुजी. काही अडचणी असतील तर बिनधास्त सांगत चला.वाडी तुमचीच समजा.आणि हो.प्रतिक्षा यादीत आणखी एक मास्तरची मागणी जि.प. अध्यक्षांकरवी केलीय या आठ-दहा दिवसात तुम्हास सोबतीला नक्कीच जोडीदार मिळेल.आणि हो शाळेजवलचा तीन वर्षापासुन बंद असलेला दवाखानाही आता उघडेल .कारण एक नर्स येत्या दोन तीन दिवसात रुजु होईल.या बाबत अध्यक्ष साहेब स्वत: बोलले.बऱ्याच िकडच्या तिकडच्या गप्पा व जेवन आटोपल्यावर गुरुजी निघु लागले.तेव्हा पाटीलांनी गुरुजींना सांभाळुन रहा अमावास्या येतेय_ काळजी घ्या कारन शिनकर गुरुजींनी तुमचा भार मजवर सोपवलाय.
गुरुजीला रस्त्यात येतांना एकच प्रश्न सतावत होता कि हि सारी आपणास पुन्हा पुन्हा सावध करताहेत नेमकं या दवाखान्यात झालय तरी काय..काहीही असो जाऊ द्या.असं विचार झटकत ते आवारातही आले.पाऊस अजुनही पडतच होता.उपकेद्राजवळ आताही तशीच भेसुरता त्यांना जाणवली.ते लगेच शालेत येऊन झोपी गेले.
अमावास्येलाही रिपरिप सतत सुरुच राहीली.आज गुरुजींना घरची आईची खुपच आठवण येत होती सकाळपासुन. वातावरनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती.समोरचा आंबा चिंच निंबही जणु पडत्या पावसातही भकास भासत होते.एरवी प्रसन्न वाटत ्सतांना आज असं का वाटावं गुरुजी मनोमन विचार करत होते.कदाचित घरच्या आठवणीमुळं होत असावं असा विचार करत गुरुजीनं पुर्ण दिवस घालवला.
पावसानं विज पुरवठा ही खंडीत झाला होता रात्रभर सुरु होण्याची सुतराम शक्यता नसल्यानं गुरुजीनं दिव्याच्य उजेडात लवकर जेवण उरकलं.पाटलांनं महादुस गुरुजीजवळ झोपायला पाठवलं.तोही मोठ्या नाराजीनंच आला होता.

🙏💃बरखा बेलदारीण💃🙏
क्रमश:....भाग२
तो ही नाराजीनंच आला होता.त्यानं आल्या आल्या गुरुजीला दिसु न देता खिशातुन मव्हाची काढुन अधी बाटली मारली.'गुरुजी मला उठवल्या बिगर बाहेर जाऊ नका ' ,असा सज्जड दम देऊन सर्व खिडक्या व दरवाजा लावुन अंथरुणावर आडवा झाला व लगेच घोरु लागला.
बाहेर धोधो पाऊस कोसळतच होता विजा नागिणीगत चमकत असाव्यात कारण आवाज कान फोडत होता.गुरुजी च्या कानाजवळ डास व महादुच्या घोरण्याच्या आवाजाची सरमिसळ आपटत होती.तरी थंड हवेने अकराच्या सुमारास गुरुजीचा डोळा लागला . एक मस्त झपका खाऊन झाला असावा तोच डासाच्या चावण्यानं बाराच्या सुमारास गुरुजीचा डोळा अर्धवट उघडला.पडल्या पडल्या गोधडी पुर्ण अंगावर घेणार तोच खिडकीच्या फटीतुन तिव्र प्रकाशाची शलाका आत येतेय व सर्व खोलीत उजेड दाटतांना त्यांना दिसला.डोळे चोळत ते उठु लागले तोच सुंगंधीत अत्तराचा वासही त्यांना जाणवला.त्यानी उठुन खिडकीच्या फटीतुन बाहेरचा अंदाज व कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.समोरच्या प्राथ. आरोग्य केंद्रात लाईट लागल्याचं त्यांना दिसलं.त्यांनी लगेच दरवाजा उघडला व शाळेच्या ओट्यावर आले.उपकेंद्राच्या ओट्यावर एक नवतरणी स्री पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेली, केसात गजरा माळलेली दिसली.पाऊस कोसळतोय साऱ्या वाडीत अमावास्येच्या रातीचं अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतांना उपकेंद्राच्या ओट्यावर मात्र प्रकाशाचा झगमगाट होता.गुरुजी समोरच्या सौंदर्यवान स्री ला पाहत शाळेच्या ओट्यावरच उभे राहिले.त्यांना दोन दिवसापुर्वी नर्स येणार हे पाटलाचं बोलणं आठवलं.तरी इतक्या पावसाळी रात्री व तेही मध्यरात्रीला येणं त्यांना चमत्कारीकच वाटलं.तितक्यात समोरच्या त्या स्रीचं लक्ष आपल्याकडं गेलय हे त्यांच्या लक्षात आलं.ती स्री हासरा कटाक्ष आपल्यावर टाकतेय हे त्यांना स्पष्ट जाणवलं.तिच्या सौंदर्यात मादकता नजरेत लाघवता व हास्यात नजाकत त्यांना जाणवली व ते मंत्रमुग्ध होत वेड्यासारखं तिथेच उभेे राहिले.त्या स्री नं केस मोकळे करुन सुकवण्या करिता झटकतेय अशा बहाण्यानं झटकत गुरुजीकडं पाहु लागली.गुरुजीला आपल्याला काय होतय काहीच कळेना.ते खुळ्यागत तिथेच उभे राहुन मोहिनी पडल्यागत पाहु लागले."शिवदे गुरुजी" असं काय नुसतं पाहणं! या कि इकडे."गुरुजी या वाक्यानं सपाचट झाले व खाली उतरणार तितक्यात आपण काय करतोय कुणी पाहिलं तर! या विचारानं गुरुजी थबकले.ती स्री पुन्हा बोलवु लागली.तरी सावज खाली उतरत नाही हे पाहुन तिनं पवित्रा बदलला व पडत्या पावसात ती गुरुजीकडं येऊ लागली. जोराच्या पावसानं भिजताच तिच्या आरसपानी सौंदर्यात आणखीनच भर पडली व गुरुजी पुरते बावचळले.ती जवळ येऊन अंगणातुनच "गुरुजी कळसा भरुन पाणी पाजा कि जरा.घसा कोरडा पडला माझा." लाडात येत म्हणाली.गुरुजी उठुन खोलीत गेले व खोलीतल्या अंधारात कळसा शोधू लागले.त्या गडबडीत पायाच्या धक्क्याने जवळचं भांडं पडलं व दाणदिशी आवाज आला.त्या आवाजाने महादु उठला.व "कोण ? "म्हणुन विचारताच " अरं,महादु मी आहे रे समोरच्या उपकेंद्रात रहायला नर्स आलीया व ती पाणी भरुन कळसा मागतीया.तोच कळसा शोधत होतो.तोच तु उठलास.हे ऐकताच महादु जागच्या जागी दोन फुट उडाला.त्यानं पाहिलं दरवाजा उघडा.लगेच त्यानं दरवाज्यातुन बाहेर पाहिलं तर बरखा बेलदारीन!
महादुचं काळीज धडधड भात्यागत उडु लागलं त्याही स्थितीत त्यानं दरवाजा झपकन लावला.गुरुजी कळसा शोधुन पाणी भरत होते.आरं महादु दरवाजा लावु नको .एवढा पाण्याचा कळसा नर्सबाईला देऊ दे ना. महादु नं रात्री येताना पाटलाकडुन आणलेली गोमुत्राची बाटली काढली व गुरुजीवर गोमुत्र शिंपडलं. गुरुजी खुळे कि काय! गपचिप पडा ती नर्स नाय .इतक्या मरणाच्या पावसात व रातीला ती काय मरायला येईल.ती बरखा बेलदारीण हाय.आरं पण ती पाणी मागतीया.तितक्यात बाहेरुन " शिवदे गुरुजी,आणा नं लवकर कळसा!,माझा घसा कोरडा पडतोय.त्या येड्या महाद्याचं काय ऐकताय तुम्ही."अशी लाडिक विनवणी ती बाई करु लागली .महादु तहानी हाय बिचारी एवढं पाणी देऊनच येऊ दे.महादु नं आपली चोमड्याची चप्पल गुरुजीच्या पायात जबरी नं चढवली व "मास्तर खुळ्यागत काय करता!ती जर नविन नर्स म्हणता तुम्ही मग तिला तुमचं व माझं नाव कसं माहित?." व साऱ्या वाडीत लाईट नाही आपल्या खोलीत लाईट नाय मग उपकेंद्रातच कशी लाईट? विचार करा शुद्धीवर या.ती बरखा बेलदारीण हाय.गोमुत्र, चपलेचा परिणाम म्हणा वा महादुचं म्हणणंपटलं असावं पन मास्तर भानावर आला. नी मग पडत्या पावसात भिजावं तसा घामानं ओलाचिंब झाला.व महादुला बिलगला.महादुनं मास्तरास पाणी पाजलं व उशाशी चप्पल ठेवुन झोपावयास लावलं.
तितक्यात बाहेरुन पुन्हा " आर मेल्यांनो तुमच्या समोर गरती बाई तहानेनं व्याकुळ होतेय.पाणी तं पाजा" असा पुन्हा पुन्हा आवाज व रडणं ऐकु येऊ लागलं.पन महादु नं मास्तराला तिकडं दुर्लक्ष करून झोपायला लावलं. हाच चाळा पहाटे थंडी पावसानं कुडकुडलेलं कोंबडं आरवे पर्यंत चालु होता.शेवटी शेवटी बेलदारीण नं संतापात " पुढची दिवटी अमावास्या येतेय
,मास्तर पाव्हणं तयारीत रहा मी सोडणार नाही तुम्हास्नी" असं म्हणत हळुहळु आवाज बंद झाला. व पावसाचाही जोर कमी होऊन पुर्वेला डोंगरात तांबडी प्रभा फुटू लागली तसं शिवदे गुरुजी तापान गरम होऊ लागले.
सकाळी महादु सोबतच पाटलाच्या वाड्यात गुरुजी दाखल झाले.ज्योत्याच्या बाजटवर गुरुजी चिंताग्रस्त बसलेत तोवर पाटलाला व मालकिणीला रात्रीचा गुदरलेला सारा प्रसंग कथन केला.तसं मालकिण घरात गेली मिरच्या बिब्बा तुटलं चप्पल घेून आली व गुरुजीची धीट उतरवली व कपाळाला विभुती लावली व कडक चहा पाजला.
चहा पिऊन तरतरी आल्यावर "पाटील उपकेंद्राचं सारं प्रकरण काय आहे हे मला आताच सांगा.अन्यथा मी आजच राजीनामा खरडुन गावाला निघुन जातो.नोकरीच्या आधीही राबुन पोट भरतच होतं तसच आताही राबेल पण निदान या प्रकरणाचा ससेमिरा तर टळेल.
पाटलानं जोराचा सुस्कारा सोडला व सुलेखा बेलदार.......
बरखा बेलदार..........
मास्तर खुप मोठी कहाणी आहे.साांगावीच लागेल.
चार सालापुर्वीची गोष्ट. गावाच्या वरच्या अंगाला पुर्णेवाडीच्या आरोग्यकेद्राला फणसे डाॅंक्टर रुजु झाले.पण धरणामुळं आमची वाडी विकसीत झाल्यानं ती वाडी मोठी होती तरी दुर्लक्षित होऊ लागल्यानं फणसे डाॅं.नी आमच्या वाडीतील उपकेंद्रातच राहनं पसंत केलं..डॅाक्टराचं नुकतच सुलेखा बेलदार बरोबर लग्न झालेलं.सुलेखा ही काॅलेजला प्रथम येणारी अत्यंत हुशार मुलगी पण घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं बापानं सरळ नर्सिंग करुन फणसे चं स्थळ चालुन आल्यानं बोलणी घातली. फणसे डाॅं.एका पायानं अपंग होते व देहयष्टीहीय सडपातळ.तर सुलेखा ही अत्यंत देखणी हुशार.जोडा काही साजेना.पण इच्छा नसतांना विरोध करुनही गरिबीमुळं व वडिलाच्या आग्रहास्तव सुलेखाला विवाह करावा लागला.वरणभात असणारी ही जोडी निव्वळ मुलगा डाॅंक्टर म्हणुन जुळवण्यात आली.व सुलेखाच्या मनान बंड पुकारलं.
लग्न झालं व आमच्या उपकेंद्रात रहायला आले.महिना होत नाही तोवर डाॅंक्टरास क्षय जडला. व डाॅंक्टरास सहा महिन्याची ट्रिटमेंट व कडक पथ्यपाणी जिल्ह्यावरिल डाॅं.नी दिलं.आधीच नाराज सुलेखा यामुळं पुरती बिथरली.ती डाॅं. शी बोलेनाशी झाली.अबोल राहु लागली.पोटपाणी पिकलं नाही.त्यात कडक पथ्यपाणी. आपलं सौंदर्य काय कामाचं.त्यातच खटके उडु लागले.ज्या वडिलानं, समाजानं आपलं मन जाणलं नाही.त्या समाजाची यापुढे पर्वा करायची नाही.असं मनोमन ठरवलं.व ती वृच्छंखल वागु लागली.
धरणामुळं वाडीचं उत्पन्न वाढु लागल्यानं लोकही ऐशआरामी झाले होते.त्यात सुलेखाचं आरसपाणी सौंदर्य अनेकाच्या डोळ्यात खुपु लागलं व ते उपकेंद्राभोवती चकरा मारु लागले.डाॅं.पुर्णेवाडीला गेलेकि गावातील अनेक तरुण सर्दी ताप हगवण कशाचही निमीत्त करुन येत दवाखान्यात बसत.सुलेखानही नर्सिंग केलच होतं ती गोळ्या देई.दिवसेदिवस गर्दी वाढु लागली.पन खोट्या दुखणेवाल्याचीच.हे नित्याचच झालं.सुलेखा आता टवटवीत दिसु लागली.सुलेखा आता प्रत्येक पेशंट ला वेगवेगळ्या दिवसी बोलवु लागली.व साऱ्या वाडीत सुलेखा बेलदार बरखा बेलदार केव्हा झाली हे वाडीबरोबर डाॅं.ला च काय पन खुद्द तिला ही कळलं नाही.
त्यात भर वाडीतील श्रीमंत व दादा पार्टी म्हणुन प्रसिद्ध असलेले माना राऊत याचा मुलगा गणा हा मुंबईला शिपींगचा व्यवसाय सांभाळुन होता.तो आठ दिवसाकरिता हवापालट म्हणुन गावाला आला.व हे सावज त्याच्या नजरेस पडलं व गडी मुंबईला परतायचंच भुलला.सुलेखानं ही गावातल्या किरकोळ थंडीतापाच्या पेशंटकडे सरसकट दुर्लक्ष करुन गणा हिच इमरजंसीकेस या न्यायानं वागु लागली.एक महिना उलटुन ही गणा मुंबईला परतायचं नावच घेईना.गावातले लोक बावचळलै व ते या गोष्टी आडपडद्यानं फणसे कडं बोलु लागले.
गणा आता डाॅं.असतांनाही येऊ लागला व उपकेद्रातच अॅडमिट राहु लागला.डाॅं.ना शंका आली. पण माना राऊत ,गणा राऊत बडं प्रस्थ .शिवाय ताकदीचा गडी.आपण क्षयानं ग्रस्त काय करावं.त्यातच सुलेखा एक दिवस दुपारी कैऱ्या खाताना दिसली. डाॅं.काय समजायचं ते समजले.आपलं पथ्यपाणी तरी सुलेखा कैऱ्या? पन बोलावं कसं.त्यांना लोकं आपल्या मागं कुजबुजतात त्याचं कोडं उलगडलं.व आधीच क्षीण झालेला देह थरथर कापु लागला.त्यांनी मनाशिच काही निश्चय केला.
इकडे गणात सुलेखा व सुलेखात गणा इतके अडकले कि त्यांनी मुंबई पळुन जाण्याचं पक्क केलं.मुंबईला गणाचा शिपींग चा व्यवसाय होताच.वरुन बापानं ही सांगितलं ,"पोरा इथं राहण्यापेक्षा तिकडच.........
गणा व सुलेखानं पंधरा मैला वरिल रेल्वे स्टेशन जीप ने गाठायचं व तेथुन रात्री तीन च्या गाडीनं मुंबई ला पसार व्हायचं पक्क केलं .पण त्यांनी तीन दिवसानंतरची तारीख फिक्स केली.
मात्र हे सार बोलणं गुपचुप येऊन दवाखान्यात झोपलेल्या डाॅं.नी ऐकला व त्यांनी दिवटी अमावास्येचा अघट मुहुर्त निवडुन मनाशी काही पक्क केलं.
बदयोग असा कि सुलेखाची व गणाची तारीख आणि डाॅं.ची तिथी एकच होती.
दिवटी अमावास्येला मटनाचा भंडारा खाऊन सारी वाडी चुर झाली होती.रात्री नऊ वाजेला डाॅं. नी डिलेव्हरी केस असल्याने सकाळीच येईन असं सांगुन दवाखान्यातुन निघाले.सुलेखाला ही उलट तेच हवं होतं.डाॅं.निघुन ठरलेल्या ठिकाणी दडुन बसले.सारा अंधार.व दिवसाची रिपरिप वाढुन जोराचा पाऊस पडु लागला.बारा वाजेच्या सुमारास गणा राऊत घरुन निघुन दवाखान्याकडं निघाला पण पावसाचा जोर पाहुन थबकला.डाॅं.लपत लपत दवाखान्याच्या गेटजवळ आलै.ठरलेली माणसं अंधारात हजरच होती.यात सुलेखानं दुर्लक्षित केलेली किरकोल आजाराचे पेशंट ही होते कुजबुज झाली व शांत झाली.बऱ्याच वेळेनंतर पाऊस थांबत नाही व वेळ तर होत आली पाहुन गणा निघाला पण दवाखान्याच्या गेटजवळच काही कळायच्या आत कुत्रांनी कोंबड्याला फटकारावं तसच काही आवाज होऊ न देता झालं.निपचीत निस्प्राण. कोंबड उचलुन दुर दुर डोंगरातल्या दरीत जाऊ लागलं.
अंघार व पाऊस दाटत कि वाढतच चालला तशी सुलेखाची तगमग वाढतच होती.भविष्याच्या रंगीन मखमली स्वप्नात धुंद.....सुलेखा पडुन पडुन वाट पाहु लागली.डाॅं. हळुच मागच्या दरवाज्यानं दवाखान्यात प्रवेशित झाले.हातात उशी होतीच.सुलेखा पलंगावर खिडकी उघडी ठेवुन स्वप्नात धुंदीतच झोपली.मागुन उशी नाकाजवळ येऊ लागली.तसा गच्च गच्च दाब वाढु लागला.झटापट वाढु लागली.सुलेखाचे हात आवेगानै मागे जाऊन केस पकडु लागले.कदी दाबाचा जोर वाढु लागला तर कधी केसावरिल पकड.त्यात क्षयाणं बेजार शरिर हरलं व सुलेखान केस ओढुन डाॅंक्टराला पुढे खेचुन आपटलं.दाब सैल होताच धडपडत औरडत ती बाहेर आली.औरडण्यानं जवळचे लोक जागे झाले व गर्दी वाढली.डाॅं.नी पळ काढला ते समजुन चुकले अर्धा गेम फसला.तेथुन पळ काढताच जवळच असलेल्या विहीरीचा तळ गाठुन प्रवास संपवला.
लोकांनी सुलेखाला बसतं करण्याचा प्रयत्न केला.पा.........ण........ी तुटक आवाज निघु लागला.व मान एका बाजुला पडली.नाडी पाहुन जाणत्या लोकांनी जीप बोलवली.तिच जिप आली जी च्यावर सुलेखा पळनार होती .गाडी धावु लागली तालुक्याच्या दिशेनं..पंधरा मैलावर रेल्वे फाटक आडवं आलं रेव्ले गेल्याशिवाय फाटक उघडणार नव्हतं व जिप तालुक्याला जाणार नव्हती.सुलेखा पाणी मागु लागली.पण सोबत पाणीही नव्हतं.रेल्वे आली तिला रेल्वेत गणा दिसला.जिवाच्या आकांतानं तो आपल्याला बोलवतोयव आपण धावतोय.एक जोराचा गचका आला व सुलेखानं मान टाकली. सुलेखा...आर्णेवाडीची बरखा बेलदारीण गेली.

क्रमश;
____________________________________________________________________________________
🙏🙏बरखा बेलदारीण🙏🙏
क्रमश:-----भाग तीन
बरखाचं कलेवर तसच तालुक्यात नेलं एव्हाना सोबत असणाऱ्यांना बरखाच्या तुटक तुटक बोलण्यावरुन फणसेनच हे काम केलय निदान इतकं तरी कळलं होतं.पुढे पोलीसांचा ताफाच वाडीत आठ दिवस होता.बरखाची विल्हेवाट लागत नाही तोच तिसऱ्या दिवशी विहीरीत फणसे आढळला.व गणाची मिसींग केस नोंदवली गेली.ते वर्ष वाडीला खुपच त्रास झाला.पाटलांनं जोराचा सुस्कारा सोडला.
शिवदे गुरुजी सुन्न झाले.साऱ्या भावना गोठुन गेल्यात व आपण भावना शुन्य मांसाचा गोळा झालोय असंच त्यांना जाणवू लागलं.तरी भितीमुळं ज्या काही थोड्या फार भावना जागृत होत्या त्या एकवटुन त्यांनी पाटलांसमोर प्रश्न उपस्थित केला,*मी बरखाचं काय वाकडं केलंय कि तिनं मलाच गाठावं व पुढल्या दिवटी अमावास्येची धमकी द्यावी?".
मास्तर बरखा गेल्यापास्नं ही तिसरी दिवटी अमावास्या येतेय.प्रत्येक अमावास्येला शाळा दवाखाना व जवळचा चौक या परिघात जो कुणी येईल त्याला ती आपल्या अस्तित्वाची जाण करुन देते मात्र दिवटी अमावास्येला तर .........
शिवदे गुरुजीनं आवंढा गिळला व बाजटवर होतं तितकं गारठलेलं आपलं सारं अंग आक्रसुन घेतलं.पाटलानं पहिल्या वर्षीच्या दिवटी अमावास्येपासुन सुरवात केली.
हणमा पवार सोलापुरचा तर सदा शिंदे कोल्हापुरचा नुकतच मिसरुड फुटलेली पोरं. एकाच दिवसी आमच्या तालुक्याच्या आगारात चालक व वाहक म्हणुन रुजु झालेले.बऱ्याचदा सोबतच ड्युटी करायचे व सहसा लांब पल्ल्याच्या ठिकाणी.अमावस्येला रात्रीची मुक्कामाची आर्णेवाडीची ड्युटी पहिल्यांदाच मिळाली.सातला गाडी तालुक्यावरुन निघतांनाच हणमा पवारांनं , "जो कुणी आर्नेवाडीचा आसंल त्यानं कॅबिनमधी रस्ता दाखवण्याकरिता बसा" असा पुकारा केला.वाडीतलं एक जण कॅबिन मध्ये बसुन रस्ता दाखवु लागला. गाडी पावसामुळं व नविन ड्राॅयव्हर असल्यानं नेहमी पेक्षा अर्धा तास उशिरानं म्हणजे साडेनऊला शाळा व दवाखान्याच्या चौकाजवळ थांबली.डोंगर दरीतला धुवाॅधार पाऊस सर्द हवा व बराच प्रवास यानं हणमा पवार थकल्यानं जोराचा आळस देत खाली उतरला.दिवटी अमावास्येचा गावात सगळी कडं अंधार.वाडीत सालाबादाप्रमाणे भंडारा असल्याने सारी वाडी मव्हाची मारुन मटणाच्या रस्स्यावर ताव देऊन पावसामुळं झोपण्याच्या तयारीला लागली होती. महादुनं आमच्या कडचा मटनाचा डबा नेहमी प्रमाणे मुक्कामाच्या गाडीवर येणाऱ्या कन्डक्टर -ड्रायव्हर करता आधीच नेला होता.गाडी येताच तो खाली बादली, मग्गा ,वाकडी, मटणाचा डब्बा देऊन केव्हा निसटतो हिच वाट पाहत होता.
गाडीत कुणी प्रवासी वा कुणाचं सामान राहिलं नाही याची सदा शिंदे नं खात्री करुन मागचा दरवाजा लावुन तोही उतरला.मटणाच्या वासानं दोघाच्याही पोटात कालवा कालव झाली.पण हणमाला त्या वासानं दुसरीच तीव्र जाणीव झाली.व त्यानं सदाला "थोडं थोडं औषध घेवू मग जेवण करु" असं सुचवलं."आरं वाडी नवीन .कुठं मिळंल माहित नाही.गपगुमान जेवण उरकव व झोप .पहाटं सहाचा टाईम हाय गाडी सुटण्याचा". तरी हणमानं आग्रहच केला मग सदाचाही नाईलाज झाला.कारण आतुन त्याला ही घ्यायची ओढ वाटतच होती.मग दोघांनी महादुला जवळ बोलवुन "गडा कुठ मिळाली तर सांग कि , व तुही सोबत कर.महादु तेथुन लवकर निसटु पहात होता.पण हे आमिष पाहुन त्यानं " मी तुमास्नी घेऊन जातो पण मग तिथनं मी परस्पर घरी जाईन.इकडं येणार नाही.तुम्हास्नी तुमचं तुमचं जेवण करावं लागेल अशी अट घातली.मग डबा व सामान गाडीत ठेवुन ते वाडीच्या खालच्या अंगाला नदीकाठी असलेल्या लिला कलालच्या भट्टीवर गेले.तिघांनी मव्हाचं पेटतं फुल रिचवलं.महादु लगेच निसटला.पण मव्हाची अनेक दिवसात मिळाली व थंडी यानं हणमा व सदा बराच वेळ तिथच पित बसले .रात्री पावणेबाराच्या आसपास ते गाडीजवळ आले.जेवनाचा डबा बादली मग्गा घेऊन शाळेच्या हापश्या जवळ आले.हणमा हापसा हापसत होता व सदा हातपाय धुत होता.तितक्यात हणमाचं लक्ष समोर दवाखान्याकडं गेलं.त्याचं हापसणं बंद झालं व एकसारखा समोर पाहु लागला.सदाही पाणी पडणं बंद झाल्यानं अचानक काय झालं म्हणुन तोही मागं वळुन पाहु लागला.सर्व दुर अंधार मात्रदवाखान्याच्या ओट्यावर बाई व तिच्याभोवती उजेडाची प्रभा चमकत होती.दुरुनही तिच्या चैहऱ्यावरची लालिमा खिळवुन ठैवत होती.तिनं डोक्यावरच्या ढळणाऱ्या पदरानं आपला चेहरा पुसला व कमरेवर एक हात ठेवत दुसऱ्या हातातील पदरानं वारा घालु लागली.हणमा कामातुन गेल्या सारखा एकसारखा पाहत होता तर सदा कधी हणमाकडं तर कधी तिच्याकडं पाहतं होता.देवानं काय सौंदर्यांची लयलुट केलीय असाच दोघीजण विचार करत असतांनाच." अहो पाव्हणं एवढ्या वक्ताला जेवायला मोकळ्या जागेत काय बसता.या ना इकडे ओट्यावर." असा पुकारा तिनं केला.हणमानं लगेच आलो आलो म्हणुन रुकार भरला.पण सदा हनमाला गाडीतच जाऊ जेवायला म्हणुन सांगु लागला.आरं बिचारी एवढ्या रातीला बोलवतेय तर तु यडं गाजर नाही का म्हणतोय.चल गुपचुप.असं म्हणत त्यानं डबा उचललाही.ते पाहुन बाईच्या चेहऱ्यावर खट्याळ व विजयी छदमी हास्याचं चांदणं फुललं व त्यात हणमाची मव्हाची नशा उतरुन दुसरीच नशा चढु लागली.
दोघं ओट्यावर जेवण करु लागली.व बाई त्याच्या कडं कधी हासुन तर कधी नाजुक लाजुन पाहु लागली.हणमा मटण यंत्रवत खात होता पन बाईच्या नखशिखांत मोहरलेल्या रक्तिम सौंदर्यात पुरता झपाटुन तुटुन पडत होता.काय बाई कोण आपण? मध्येच हणमा विचारता झाला.मी नर्स हाय आजच आम्ही सामान पॅक केलाय आमचं गणा राऊत गाडी आणायला गेलय.मुंबई जातोय.व्हय का! लई ब्येस असं म्हणत "आमचं गणा राऊत' हे शब्द ऐकता हणमाच्या दातात आलेली हड्डी त्यानं त्वेषानं फोडली.
बाईचं पाहणं ,लाजनं, हळुच नाजुक बोटांनी पदराशी खेळणं चालुच होतं तितक्यात हळुच बाईनं हणमावर डावा डोळा चपळाईनं मारला नी हणमाची मव्हाची नशा कुठल्या कुठं पळाली व दुसरीच बेधुंद बेदरकार धुंदी चढु लागली.बर मी काय म्हणतेय पाव्हणं तुमच्याच गाडीवर न्या कि आमचं सामानं तालुक्या पर्यंत.तिथनं जाऊ आम्ही मुंबईला.हो म्हणालं तर गना राऊतानं आणलेली गाडी रद्द करु आम्ही.हनमाला तर आनंदाच्या उकळ्या फुटु लागल्या.व त्यान लगेच सामान नेण्याची हमी भरली.दोघांनी जेवण आटोपतं घेतलं.सदानं सहज सामान किती व काय काय हे जाणण्याकरिता दवाखान्यात डोकावुन पाहिलं तर मध्ये त्याला काहीच सामान दिसेना व सर्वत्र धुळ दिसत होती.जणु कि बऱ्याच महिन्यात कुणी स्वच्छता केलीच नाही.सदा चक्रावला.शंकेची पाल तायाच्या मनात चुकचुकली .तिकडे हणमाच्या हातावर बया पाणी टाकत होती व हणमा ओट्या खालुन उसळनारा सागर पाहत होता.बाई लाडीक पणे " काय हे पाहणं" म्हणुन आमंत्रण देत होती.सदा नं हळुच हणमाला खुण करुन गाडीवर चलण्यास सुचवलं.पण व्यर्थ.हणमा पुर्ण भ्ईसपाट झाला होता.हणमानं हात पुसण्या निमीत्तानं हात हातात घेऊन दाबला तशी बाई लाजुन दुर सरकली.
सदा नं डबा बादली घेऊन लवकर ये असं सांगुन गाडीकडं वळला.हणमानं तु चल मी आलोच नर्स बाईचं सामानं किती हाय बघुन !असं सांगुन त्यास चलतं केलं.बाईनं " हणमाचं सावज पुरतं कह्यात आलय हे जाणुन हळुच त्याला गोजारत म्हणाली.हे आमचं गणा राऊत अजुन आलं नाही केव्हाचं गाडी आणायला गेलतं.तुम्ही सामान नेणार मग गाडी करुन काय कामाची.त्याना गाठुन गाडी रद्द करावी लागेल.चला ना सौबत पाव्हनं त्यांना शोधायला.हणमाला वाटलं पाखरु जाळ्यात आलय.गाडी साईट देतेय चला गाडी दामटु .व्हय व्हय चला कि शोधुन आणु.
बाई पुढं हणमा मागं.सदा गाडीत गेला.प्रवासात फुल गर्दी असल्यानं तिकीटाच्या पैशाचा हिशोब तसाच होता.तो त्यानं केला .सीट भरली जुळवा जुळव करुन पत्र्याच्या पेटीत पैसे ठेवलै व ती पेटी घेऊन तो गाडीतच झोपायची तयारी करु लागला.तितक्यात नर्स हणम्याला बाहेर घेऊन जातांना सदानं पाहिलं.त्यानं हणम्याला आरोळी मारली.आरं ऐक मागं फिर.पण उपयोग झाला नाही.
बाईनं हणम्याला वाडीच्या बाहेरुन नदी काठाकाठानं डोंगराकडं नैलं.हणमा पायाला भिंगरी लागल्यागत सारखा पळत होता.काट्यातुन पाण्यातुन पाणंदीतुन.सारखा बाईच्या मागं दम फुटु लागला .आता हाताला लागली कि बस झालच.असं वाटुन रात्रीच्या तीन वाजेपर्यंत धावतच होता.वरुन पाऊस सारखा कोसळतच होता.रातकिड्यांच किरकिरणं,_ भसाड्या पिपाणीगत बेडकाचं डरावणं चालुच होत पन हणम्याला फक्त बाईच दिसत होती.सार रान ,पहाड चिंब चिंब असतांना हणमा आतुन भट्टीगत तापला होता.तितक्यात बरखा नं थांबुन "पाव्हणं आता नाही होतं पळणं गरती हाय मी.घशाला कोरड पडलीय, पाणी पाजा नं.आमचं गणा राऊत ही दिसत नाही" असं म्हणुन हणम्या जवळ आली.तसं हणम्यानं बाईला गच्च आवळण्याचा प्रयत्न केला.दाब.....दाब तोच वर्षापुर्वीचा चिरपरिचीत वाढत असल्याचं बरखाची तडफड वाढली.डोळ्यात लाल रुधीर गोळा होऊ लागलं.व तिनं मुठी आवळल्याव जोराची मिठी आवळली." गणा हे गणा चल ना रे !किती वाट पाहु रे..हणमा आता शुद्धीत आला. प्रकरण आपण वाचतोय ते नाहीच.काही तरी विपरीत आहे हे हणम्यानं ओळखलं.
इकडे सदा जेवण करुन गाडीत आला.त्यानं तिकीट व पैशाचा ताळमेळ केला.सीट भरलं व सर्व पेटीत ठेवुन पेटी उशाला ठेवुन गाडीतच झोपी गेला.मव्हाची अंगात असल्यानं हणम्या नर्ससोबत गायब आहे हे ही तो विसरला व घोरु लागला.अडिच तीनच्या सुमारास त्याला आपल्या उशीखालची पेटी वाजतेय म्हणुन त्याला जाग आली.पाहतो तर काय!दरवाजा त्यानं लावला तसाच बंद .परंतू मागच्या आपत्कालीन दरवाज्यातुन कोणी तरी हात घालुन पेटी ताणतोय. तो तसाच उठुन बाहेर निघंणाऱया पेटी मागे धावू लागला.आपत्कालीन दरवाज्यातुन बाहेर येताच कुणी तरी लंगडा मरतुकडा माणुस आपली तिकीटाच्या पैशाची पेटी घेऊन पळतोय.सदाला सरकारी पैसा असल्यानं भिंती वाटत होती.त्याला घामच फुटला.व तो जिवाच्या आकांताने मागोमाग पाठलाग करु लागला.पेटी पळवणाराही खुपच घाबरलेला होता.बराच उशिरा पाठलाग करुनही तो लंगडा त्याला सापडे ना.तो आता एका पाण्यानं तुडुंब भंरलेल्या बारवेजवळ आला.सदानं रागाने ,"बरंया बोलानं पैसे परत कर ,सरकारी. पैसा आहै तो"अशी धमकी दिली पण धमकीचा लंगड्या माणसावर काडीचाही फरक पडला नाही.उलट तो तुच्छ हसू लागला.सदाच्या अंगाचा तीळपापड झाला.बारवेच्या एका बाजुला लंगडा पेटी धरून तर दुसर्या बाजुला सदा.लंगडा बारवेभोवती गोल गोल फिरू लागला तसा सदा ही.असं करता करता त्यानं पेटीच बारवेत फेकली तसा सदा ही बारवेत झेपावला.लगेच वरुन लंगड्यानं-फणसे डाक्टरानं उडी घेतली व सदाला पार खोल खोल घेऊन गेला.
हणम्या प्राणांतिक झटका देत बाईच्या मिठीतून सुटला .किती तरी वेळ तो पळतच होता. जिकडे वाट दिसत होती तिकडे पळत होता.तरी त्याला जाणवलं कि ती बाई एकदम हळू चालत येतेय पण तिचे हात आपली मान पकडतील इतके लांबता आहेत. व त्याच हाताने आपली मानगुटीवर पकडलीय व आपल्याला रानातुन पळवत चौकातल्या गाडीजवळ आणलं. गाडीचा दरवाजा बंद.त्या ही स्थितीत हणम्या आपत्कालीन दरवाज्यातुन वर चढण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला.एका हाताने दरवाजा धरुन डोकं आत नेलं तितक्यात. तोच हात पुन्हा अचानक थांबला व वरुन दरवाज्याचा दाब.....तोच दाब ....हणम्याच्या मानेवर बसला.
"मेल्यांनो पहाट फुटली रे ,आता तरी कळसा भरुन पाणी पाजा ना." असं म्हणत बरखा दुर जाऊ लागली.पण आता हणम्याला तर पाण्याची ही गरज नव्हती व सदा तर फणसे सोबत पाण्यातच श्वासाकरिता झिम्मा खेळत होता..........

🙏🙏VSDV🙏🙏
चौथा व अंतिम भाग लवकरच.......
🙏🙏बरखा बेलदारीण🙏🙏
क्रमश: भाग चौथा
सकाळी आर्णेवाडीतील लोक तालुक्याला जाण्याकरिता चौकात गाडीजवळ येऊ लागले व हणमाला पाहताच साऱ्या वाडीत बोभाटा झाला.पाटलांनी लगेच वरती खबर दिली तसा पुन्हा पोलीसाचा ताफा वाडीत दाखल झाला.ड्रायव्हर हणमाचं कलेवर तर जाग्यावर आहे पण कन्डक्टर कुठाय? तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.दारुच्या नशेत वादावादी झाली असावी व सदा नं .....नी फरार झाला असावा.पोलीस चोरी व सदा या दोन्ही अॅंगल ने तपासाला लागली.पण दोन दिवस सुराग लागलाच नाही.तिसऱ्या दिवशी सदा विहीरीवर तरंगु लागताच पोलीसही चक्रावली.पट्टीचे पोहणारे विहीरीत उतरवल्यावर पेटी दिसुन आल्यावर चोरीची शक्यता ही मावळली.पोलीसांना भलेही समजलं नसेल पण वाडीला जे समजायचं होतं ते समजलं होतं.त्या दिवसापासुन आर्णेवाडीची मुक्कामाची गाडी आर्णेवाडीला न थांबता पुढच्या वाडीला थांबू लागली.
शिवदे गुरुजी थिजल्यागत गलित गात्र झाले.तितक्यात घरातुन महादु नं जेवनाची ताटं झाल्याचा निरोप दिला.पाटलांनी सुस्कारा टाकत "गुरुजी ,कोण बरोबर?, कोण चुक? हे नियतीलाच माहित!पण परिणाम मात्र वाडी बरोबर दुसऱ्यालाही भोगावे लागत आहेत.चला जेवन करु.जेवता जेवता पाटलानं दुसऱ्या दिवटी अमावास्येचा प्रसंग सांगितला.
उत्तर भारतातुन वाडीत रामलिला करण्याकरिता कलाकार आले व मुक्कामाचा तंबू वाडी नाही सांगत असतांनाही शाळेजवळच्या चौकातच टाकला.आधीचे आठ दिवस भरगच्च गर्दी झाली.पण दिप अमावास्येला पुर्ण तंबु खाली.त्या दिवशी शो झाला नाही.पण त्यात नायकाचं काम करणारा व अतिशय सुंदर ढोलकी वाजवणाऱ्या तरुण मुलाचा जिंदगाणीचाच शो बरखानं बंद केला.साऱ्या रानात त्या दिवशी पहाट होईपर्यंत ढोलकीचे रमणीय सुर ऐकु येत होते पण वाडीतलं कुणीच उठलं नाही.ढोलकी वाला मात्र कायमचा उठला.पण ते पर प्रांतीय गरीब कलाकार गपगुमानं निघुन गेले.लोक सांगतात कि मागच्या अमावास्येपासुन प्रत्येक अमावास्येला खालदरीच्या रानात ढोलकीचे सुर रातीला ऐकु येतात.
जेवण झालं तसं शिवदे गुरुजीला बरखा प्रकरण सारं स्पष्ट झालं व आता महिन्यानंतर येणाऱ्या दिवटी अमावास्येला आपणच बरखाचा मानाचा बोकड होऊ हेही दिसु लागलं.व त्यांची सारी काया थरथरु लागली.पाटलानं धीर देत गुरुजी एकच करा एकतर रातीचा शाळेतला मुक्काम हलवा किंवा अवसेला तरी मुक्काम गावात करा.किंवा् वसेला गावाकडं निघुन जात जा.बाकी इतर वेळी तुम्हास वा वाडीस कसलीच भिती नाही.हे ही मात्र तितकच खरं.
तुर्तास संकट नाही हा विचार करुन शिवदे गुरुजी जेवना नंतर शाळेत आले.शाळा होती तशीच शांत होती.हळुहळु गुरुजी सावरु लागले. त्यांनी मु्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यास शाळेस अजुन एक शिक्षक मिळावा असं विनंतीपर पत्र लिहुन पोष्ट केलं.जेणेकरुन सोबत तरी होईल. आषाढ लागल्यानं डोंगरातला पाऊस रंग दाखवू लागला.जिकडे तिकडे धो धो कोसळू लागला.झाडांनी ही कात टाकुन झपाटुन हिरवाई लपेटली.गवत माजु लागलं निरनिराळे पक्षी अवतरू लागले.लुसलुशीत गवत खाऊन खोंडं फुरफुरू लागली.नद्या नाले घडीचीही उसंत न घेता खळाळुन वाहू लागली.शाळेतली पोरं गुरुजीच्या साथीनं पाऊसगाणी गाऊ लागली.लता वेली झाडाच्या आधारानं उंच उंच वाढु लागल्या तसं कालचक्र ही झपाट्यानं पुढं सरकलं.
आषाढ पाच सहा दिवस बाकी राहिला तसे एके दिवशी तालुका अधिकारी व तालुका मास्तर जीप गाडीनं आर्णेवाडीच्या शाळेत आले.पावसाळ्यात शाळेवर आहार पुरेल कि नाही गरज आहे का ?ही शिवदे गुरुजी कडे चौकशी करुन पुढच्या वाडीला जायला निघाले.जाता जाता गुरुजीला तालुका मास्तरानं "कसं काय चाललं ? काही समस्या? आणि हो तुमच्या मागणी नुसार तुमच्या मदतीला प्रशासनानं आणखी एक शिक्षीका दिलीय.निलेशा महाजन असं काही तरी नाव आहे.कालच त्या तालुक्याला हजर झाल्यात.विदर्भातल्या आहेत.काल शाळेवरच येणार होत्या हजर व्हायला पण साहेबांनीच पावसाळा असल्यानं सर्व सामान वैगेरे आणण्याकरिता पाच सहा दिवस सवलत दिलीय",असं सांगितलं.त्यावर शिवदे गुरुजीना मनातल्या मनात हायसं वाटलं. अदिकाऱ्यांनाही दोन वर्षापासुन या वाडीत मास्तर यायला तयार नाहीत हे एव्हाना त्यांना ही माहित होतं.पोरसवदं मास्तर वाडीत तग धरुन राहतंय याचं त्यांनाही समाधान वाटलं. पुढच्या वाडीला जाण्यासाठी गेटजवळ उभ्या असलेल्या गाडीत बसतांना तालुका मास्तरांनी "शिवदे गुरुजीं ,येत्या तीन तारखेला त्या मॅडम रेल्वेनं येणार आहेत .नवख्या आहेत हा भाग त्यांनी पाहिला नाही तर तुम्ही त्यांना स्टेशन वर घ्यायला तेवढं जा.कारण मी त्यांना तसं सांगितलय.व त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही व तुम्ही त्यांना पाहिलं नाही म्हणुन ओळखी करिता माझ्या सहीचं चिटकोरं त्यांच्याकडं व त्याच्या सहीचं चिटकोरं घेतलय हे तुमच्याकडं ठेवा हे एकमेकांना दाखवा म्हणजे ओळख पटेल".बरं तीन तारखेला कोणत्या गाडीनं येणार?असं शिवदे गुरुजीनं विचारलं.पण त्याच वेळी गाडीत बसलेल्या साहेबांनी डायरीत पाहत तालुका मास्तराला पुढच्या आठ व बारा तारखेला याच भागात पुन्हा व्हिजीट ला यायचयं .तुम्हाला एक दिवस सोबत यावं लागेल.आठला कि बारा ला येनार? हा प्रश्व विचारला.तालुका मास्तरानीं शिवदे गुरुजीला आठची गाडी व साहेबाला बारा तारीख सांगितलं याच ठिकाणी शिवदे गुरुजीचा घोळ झाला त्यांनी रात्रीच्या बाराच्या गाडीवर मॅडम येणार हे समजलं .परंतु निलेशा मॅडम तर तीन तारखेेला रात्री आठ च्या गाडीनं येणार होत्या. मास्तरानं मॅडमच्या सहिचं चिटकोरं खिशात ठेवलं तितक्यात गेटजवळ अचानक जोराची वावटल उठली व गोल गोल फिरत शिवदे गुरुजीला ही फिरवू लागली.गुरुजीच्या खिशातलं चिटकोरं उडालं.पावसाळ्यात अशी अचानक वावटळ! जोराचा वारा ठिक पण वावटळीनंं गुरुजीच्या काळजात धस्स झालं.ती वावटळ झाडांना आपल्या कह्यात घेत उंच उंच जात रेल्वे-स्टेशन कडं झेपावू लागली.
गाडी गेली तशी शिवदे गुरुजी वर्गात आले व कॅलेंडर काढुन तीन तारीख स्मरणात रहावी म्हणुन त्यावर नोंद करु लागले.तोच तीन तारखेच्या चौकटीत लाल अक्षरात 'दिप अमावायस्या ' हे नाव पाहिला व पुन्हा त्यांना झटका बसला.तसं त्यांनी दिप अमावास्येला घरी जायचा बेत केला होता पण आता तोही रद्द करत त्यांनी अमावास्येलाच तीन तारीख आहे म्हणजे आपण निलेशा मास्तरीनला घेण्या निमीत्त रेल्वे स्टेशनवर राहु म्हणजे शाळा दवाखाना , चौक या परिघा बाहेर.तसं पाटलांनीही त्यांना या परिघाबाहेर बरखाचा त्रास नाही असचं म्हटलं होतं .पण नियती वेगळेच चक्र फिरवत होती जे पाटील वा मास्तर यांना माहित नव्हतं.पण ज्या गेटजवळ गणा राऊत ला घुसळलं होतं तेथेच वावटळीत शिरशिरी उठल्याची जाणीव त्यांना आठवली.
आर्णेवाडी पासुन पंधरा वीस मैलावर दक्षिणेला रेल्वे- स्टेशन होतं.लांब प्रवासाला जाणं येणं आर्णेवाडीचं याच स्टेशनातुन व्हायचं.पण स्टेशन ते वाडी हा प्रवास बैलगाडी जीपनेच करावा लागायचा .तसं तालुक्याला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या या स्टेशनापासुन एक मैलावरुन जायच्या पण रेल्वे व गाडीच्या वेळेत बरीच तफावत होती. म्हणुन वाडीतले लोक बऱ्याचदा खाजगी वाहनानंच स्टेशन वर ये जा करत.आज तीन तारीख दिप अवसेचा वाडीत सालाबादाप्रमाणे भंडारा होता व पाऊसही होता व त्यात भर म्हणजै काय वंगाळ घडणार ही अनामिक भितीपण होती.आठ वाजता वाडीतुन न निघालेली एक बैलगाडी रेल्वे स्टेशनात उभी होती.व तिच्यातुन सखा उतरुन निलेशा महाजन बाईची वाट पाहत उभा होता.गाडी येताच स्टेशनात मोजुन आठ दहा लोकं उतरले.व पळत पळत आपले सामान सांभाळत पावसापासुन बचाव करत फलाटावरनं स्टेशनाच्या शेडमध्ये आली.त्यात तीन चार बाया होत्या एक विसीतली बाई लिंबु कलरची साडी नेसुन आपलं बरच सामान सांभाळत चिंताक्रांत चेहऱ्यात दिसताच सखा जवळ सरकु लागला.तसं ती बाईही पुढे सरकली पण थबकली.तोच सखानं "आपण महाजन बाई का? ". तोच " होय आपण?"असा प्रतिसवाल केला.मी माना राऊताचा ड्रायव्हर सखा.मला शिवदे गुरुजीनं पाठवलं_गुरुजी गावाला गेलैत.असं म्हणत खिशातलं सहीचं चिटकोरं दाखवलं.बाईनं आपली स्टेशनावरच्या पिवळ्या प्रकाशात आपली सही पाहिली व तिनं ही तालुका मास्तरांनं सही करुन दिलेला कागद पुढे केला.पण सखानं तो न घेताच बाईकडुन सामान घेत बैलगाडीकडं चालू लागला.स्टेशनावरच्या दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात बाईनं सखाला पाहिलं व ती अचंबीत झाली .शिवदे गुरुजी येणार असं आपल्याला तालुका मास्तर नं सांगितलं होतं पण त्या जागेवर आलेला हा माणुस ड्रायव्हर सांगतोय पण कोणी उद्योगपती असावा असच याचं सौंदर्य दिसतय.उंचपुरा,हाडापेरात भरलेला,गौर वर्णाचा.कोण म्हणेल यास ड्रायव्हर!. सखा मात्र बाईकडं न पाहता बैलगाडीपर्यंत पोहोचलाही.छकडा गाडीवर गोलाकार टप असल्यानं पाऊस असला तरी ओलं होण्याचा धाक नव्हता.गाडी धुरवली व निघाली .बाहेर सर्वत्र अंधार दाटलेला होता.नदीला पुर आलाय त्यामुळं बोगद्यातुन जाता येणार नाही व फाटकही बंद असेल म्हणुन लांबच्या रस्त्यानं फिरुन जावं लागेल असं सखानं सांगितलं .पण पहिल्यांदाच वाडीला जाणाऱ्या महाजन बाईस जवळचा लांबचा कोणताच रस्ता माहीत नव्हता.तिला एकट्या माणसासोबत जाण्यात भिती वाटत होती पण दुसरा पर्याय नव्हता.गाडी रस्त्याला लागली.बैलाच्या घुंगुराचा आवाज.पायानं उडणाऱ्या चिखलाचा राबचिक चिकराब आवाज शांततेचा व अंधाराचा भंग करत होता.दुर कुठुन तरी कुत्र्याचा भेसुर भुंकण्याचा लयबद्ध आवाज येत होता.तशी पोरसवदा विसीची महाजन बाई सखाकडं सरकु लागली.सखा मात्र पुढं सरकत बाई घाबरायचं नाही.बरोबर वाडीला नेतो असा धीर(?)देऊ लागला.
आता स्टेशनाचे दिवेही दिसेनासे झाले.बैलं लईत पळत होते.सखानं "कुठुन आलात ?इतक्या लांब?घरी कोण कोण ", अशी प्राथमिक चौकशी गेली.मग बाईनही तुमची वाडी , शाळा व गुरुजी कसे?म्हणुन चौकशी केली.सखाला तर तेच हवं होतं.तर बाईला फक्त बोलत बोलत रस्ता कटैल इतकच हवं होतं." बाई वाडीचं लई हाल चालु आहेत तीन वर्षापासुन.शाळाचं बी तसच." सुलेखा गेली व वाडीला चक्रव्युवात अडकवुन गेली." कसं हो ?बाईनं सहज विचारलं.तसं "आता तुम्ही आज पहिल्यांदाच वाडीला येत आहात.सुरुवातीलाच घाबरवण्याचा माझा मुळीच हेतु नाही पण जागरुक करणंही तेवढच आवश्यक वाटतयं. नीट सांगा ना !काय घडलय?
सखाची गाडी धावतच होती.त्यान सांगितलं, बाई अवसेला शाळेत थांबू नका. लई मोठं कांड झालय आमच्या गावच्या शालेत.व त्यानं बरखाचं सारं प्रकरण उलघडुन सांगितलं आणि बाई काय सांगु तुमास्नी यात आमच्या माना राऊत मालकाच मोठं पोरगंं गणा राऊतही जिवास मुकलं.हे सांगत असतांना अंधार असुनही सखाच्या कडा वाहताहेत असं बाईला जाणवु लागलं. मी त्याच्याच गाडीवर ड्रायव्हर राहायचो.त्या रात्री ही मला त्यांनी एक पर्यंत गाडी तयार करुन चौकात आण.अशी सुचना देऊन ते दवाखान्यात जात होते.पण दुश्मनांनी डाव साधला.लंगड्या डाॅक्टरनं बाहेरुन मारेकरी मागवुन अंधारात दबा धरुन बसले होते.व त्यांना साथ गणा संपर्कात आल्यानंतर बरखानं ज्या किरकोळ असामीना वर्जित केलं होतं त्या ही होत्या.गणा व बरखा आज तीनच्या रेल्वेनं मुबई जाणार होते .त्यांनी बरखाला जोडवी ,पैंजन, बिंदी, कंठा ,बाजुबंद ,कमरपट्टा असे अनेक डाग असलेली पिशवी कमरेत खोसली होती.अंधारात शाळेच्या गेटजवळ येताच कुणीतरी तोंडाजवळ रुमाल दाबुन बाकी जणांनी गणाला गच्च धरलं. अंधारात कुणीच ओळखू येत नव्हतं.पण एक लंगडत आहे हे दिसतात गणानं तात्काळ ओळखलं.व तो जोरानं सुटण्याचा प्रयत्न करु लागला.व एक जोराची लाथ लंगड्या फणसेला घातली.झटापटीत आपल्याला गुंगी येतेय हे गणाला समजु लागलं तशा वरुन जोरजोराच्या लाथा बुक्क्या काठ्या बरसु लागल्या नाकावर दाबलेल्या रुमालातील क्लोरोफाॅर्मची गुंगी गणावर वाढु लागली तसा त्याचा प्रतिकार कमी होऊ लागला.आणि मग त्याच्या वर्मस्थळावरील मार वाढतच गेला.गणा कोसळला.त्याला झोप दाटु लागली.त्याला मजबुत घुसळल्यावर उचलुन बाहेरुन आणलेल्या मारेकऱ्यांनी सोबत आणलेल्या गाडीत गणाचं अर्धमेलं मुटकुळं टाकलं फणसे दवाखान्याकडं पळाला.वाडीतले वाडीत गेली व बाकींनी वाडीतल्याच एकाच्या मदतीनं कलालाची भट्टी गाठली व मव्हाची ठोसु लागले.गणाचं मुटकुळं मरणासन्न व गुंगीत गाडीतच पडलेलं.तिकडे बरखाच्या आरोळीनं धांदल उडताच त्या मारेकऱ्यांनी आपली जीप रेल्वे स्टेशनकडं पळवली.फाटक बंद पाहील्यावर गणाचं मुटकुळं पोत्यात भरलं व स्टेशनाकडं धावले.फलाटावर गाडी उभीच होती तिच्या टपावर पोतं चढवुन माघारी फिरले.व गाडीत बसुन परतीच्या रस्त्यानं वेगळ्याच वाटेने पसार झाले.गणाचं मुटकुळं ठेवलेली रैल्वेगाडी सुटली व फाटकाजवळुन जाऊ लागली तो पावेतो बरखाला घेऊन गणाचीच जीपगाडी तालुक्याला जाण्याकरिता उभी होती .गणाचं मुटकुळं "सुलेखा मी चाललो गं,तुज्या दागिण्याची पिशवी इतका मार खाऊनही मी तशीच आणली बघ.ये पटकन." तर इकडे बरखा "माझा गणा मला बोलवतोय.तो पहा असं म्हणत पाणी पाणी करत आचका देत मान टाकत होती.......
सखाची गाडी जात होती त्या रस्त्यांन पुन्हा पुन्हा तीच ती झाडं, स्टेशनं दिसत आहेत हे निलेशा बाईला भासु लागलं.गोल गोल फिरतांना जाणवतं तसं.आता सखा ही जडावला होता.त्यानं परत गाडी गणाचं मुटकुळं गाडीतनं जिथं पडलं होतं तिकडे दामटली.बाई, गाडीनं चार स्टेशनं टाकली व एक चढ असलेल्या घाटात आली.तिथं गाडीमार्ग थोडा वळणाचा आहे.कासारवाडीच्या पुढं. घाटाच्या दोनही बाजुला भरगच्च रान असलेल्या दऱ्या आहेत.या दरीत थेट सहसा कुणाला जाताच येत नाही.गाडी वळणाचा चढ चढतांना तिथच माझं मुटकुळं खोल दरीत गरंगळत पडलं."माझं मुटकुळं" ऐकल्यावर बाई चक्रावली.पण तितक्यात सखानं "माझं मालक गणाचं हो बाई !" असं सागतांना सखात काहीतरी विचीत्र हालचाल जाणवली.त्याच वेळी सखाची बैलगाडीही कासारवाडी जवळच्या नेमक्या त्याच दरीजवळ थांबली.बाई आमचं मालक याच खोल दरीत पडले होते हो.बाईच्या अंंगाचा थरकाप उडाला व त्या सखाला अहो ,चला लवकर म्हणुन विनवू लागल्या.थांबा बाई आलोच म्हणुन सखा खाली उतरला.बाईला वाटलं लघुशंकेला गेला असावा.सखा दिसत नाही तेवढ्यात बाईनं ही उरकलं व गाडीत बसल्या.सखा हातात काहीतरी पिशवी घेऊन परतला होता.लगेच गाडी सुसाट वेगानं आर्णेवाडीकडं जाणाऱ्या खऱ्या रस्त्याला लागली होती.
" बस आता थोडच !बाई ,आलीच वाडी." सखानं सांगताच बाईला हायसं वाटलं. बाई शिवदे गुरुजी गावाला गेलेत म्हणुन तुमची सोय आमचं थोरलं मालक माना राऊत यांच्याकडंच करायला सांगितलीय.मी तुम्हास्नी घरासमोर सोडुन तसाच रानातल्या शैतात जाणार आहे.एवढी पिशवी मात्र माना राऊत-आमच्या मालका कडं द्या.मला उशीर झालाय परतावच लागेल आणि हो इतका निरोप पण द्या कि गणाजी राव खोळंबलेत तसेच. दरीतुन ते सुलेखा ज्या फाटकाजवळ पाणी पाणी करत गेली तिथं यावसं वाटतयं त्यांना", असं म्हणत हातातली पिशवी बाईच्या हातात ठेवली व "उतरा आला वाडा मानाजी रावांचा !तो पहा".बाई हातातल्या पिशवी कडं पाहतं सखा काय बरबडतोय असंबंधपणेअसं विचारत खाली उतरतेय तोच उत्तर न देता सखा गाडी दामटत निघुन ही गेला.निलेशा बाईला काहीच कळेना.वाड्याच्या उंच ज्योत्याजवळ जात त्यांनी दरवाजा ठोठावला.पहाटेच्या समयी त्याचा जास्तच आवाज वाटु लागला.बऱ्याच वेळेनंतर मानाजी राव आले व दरवाजा उघडला.पहाटेच्या तीन -चारच्या सुमारास दरवाजा उघडायला त्यांना जिवावरच आलं पण ठोठावण्याचा सततचा आवाज ऐकुण त्यांना उघडणं भागच पडलं.समोर नवख्या पोरीच्या वयाच्या बाईला पाहताच" कोण पाहीजे?" म्हणुन विचारु लागले.बाबा मी महाजन मास्तरणी.तुमच्या सखा ड्रायव्हर सोबत आलीय.तुमच्या वाडीतील शिवदे गुरुजी गावाला गेलेत व तुमच्या कडं थांबायला सांगुन गेलेत असं सखा सांगुन आताच शेताकडं गेलाय व हि पिशवी पण तुमच्या कडं द्यायला लावलीय.बाई काय बोलतैय ते मानाजी रावांना काहीच कळेना.कोन सखा?आमचा ड्रायव्हर? पण शिवदे गुरुजी नाव ऐकल्यावर मात्र त्यांनी "पोरी आधी आत तर ये असं म्हणुन लाईट लावला व पार्वतीस हाक मारली.बाबा ही पिशवी घ्या.अस म्हणुन बाईनं पिशवी हातात दिली.कुणाची व कसली पिशवी? हे विचारणार तोच पार्वती आली.व कोण म्हणुन विचारायला लागली." अगं ही पोर मास्तरनी हाय व शिवदे गुरुजीनं मुक्कामाला आपल्याकडं पाठवली कुण्या सख्या सोबत" पण हा सखा कोण! तेच कळत नाही.बरं असु दे आधी पोरीला पाणी दे व तोंड धुूऊन झाल्यावर चहा दे.तितक्यात ते पिशवी परत करुन बाई हि आमची नाही म्हणु लागले.पण बाबा सखा नं तर तुमच्याकडंच द्यायला लावलीय.मानाजी रावांना काहीच कळेना व बाई ही पिशवी घेईना.का कुणास ठाऊक त्यांनी पिशवीत काय आहे हे तर आधी पाहु म्हणुन खोलुन पाहीली व जागेवरच थरथर कापुन उडायला लागले.त्यांना पिशवीतल्या इतर दागिण्यात उठुन दिसलं ते हातातलं कडे .ते विस्फारल्यागत पुन्हा पुन्हा चाळुन पाहू लागले मग तेच कडं ,तोच गोफ ,तीच अंगठी जे आपला पोरगा गणा घालायचा.व त्यात पैंजन जुडवी बिंदी बाकीचे ओळखीचे लागले नाहीत.त्यांनी जोराने टाहो फोडला तशी पार्वती पण आली व तिची तर शुद्धच हरपली तीन वर्षात गणा कुठ गेला काहीच तपास नाही व आज अचानक त्याचे दागिने घरी यावेत.ते हमसुन हमसुन रडु लागले.निलेशा महाजन ला काहीच समजेना.ती कावरी बावरी होऊन पाहु लागली तशातच तिचं लक्ष भिंतीवरिल तसबिरीवर गेलं.तसबिरीकडं बोट दाखवत ,"अहो बाबा , ह्याच सखा बरोबर मी आले व यांनीच ही पिशवी दिली. तुम्हाला द्यायला" .हे ऐकल्याबरोबर "पोरी तो सखा नाही गं!तोच आमचा लैक गणा हाय जो तीन वर्षापासुन लापता हाय व ह्यातलै बरेच दागिने त्याचेच आहेत". हे ऐकल्याबरोबर निलेशा महाजन कोसळलीच तिला आता" माझं मुटकुळं "हा शब्द आठवला व आपण रात्रभर कुणासोबत होतो हेही कळुन चुकलं व ती बेशुद्ध पडली.......
पहाटेचा कोंबडा आरवला खरं! निलेशा बाई आठच्या गाडीनं येऊन कशाबशा पहाटे वाडीत आल्याही .पण त्या बाराला येणार म्हणुन दहा वाजताच रेल्वे स्टेशनवर गेलेल्या शिवदे गुरुजीचं काय?............

पाहू या पाचव्या भागात(कथेचा विस्तार पाहता पुन्हा एक भाग ).