![]() |
| Marathi Horror Story-Bhitidayak katha-bhutkatha-rahasykatha |
!! भाग ::---पाचवा!!
निलेशा महाजन जरी पहाटे आर्णेवाडीत पोहोचल्या.परंतु त्या बाराच्या गाडीनं येणार म्हणुन शिवदे मास्तर त्यांना घेण्याकरिता आठ वाजेलाच पाटलाकडं हजर झाले.पाटलाकडं भंडाऱ्याचा झणझणीत मटनाचा रसा वरपला.पाटलाची जीप लेकीच्या गावाला आधीच गेली असल्यानं व अमावास्या असल्यानं आज कुणीच वाहन देणार नाही हे माहित असल्यानं पाटलानं महादुला बैलगाडीच खळ्यातुन आणावयास लावली.कारभारणीनं ताजन वल्ली शाह दर्ग्याहुन आणलेला ताईत शिवदे गुरुजीच्या कमरेस आईच्या मायेनं बांधला.तितक्यात खळ्यातुन महादुही गाडी घेऊन आला.त्याच्याकडे बाबांनीच मंतरुन दिलेले भस्म व काळे उडदाचे दाणे असलेली पुडी देत कारभारणीनं पाटलाकडे खुण केली.पाटलाने महादु व गुरुजीला बसवत प्रेमानं सांगितलं.पोरांनो वल्ली शाह दर्ग्यातील बाबा एक सिद्ध पुरुष पीर आहेत.कालच त्यांच्याकडं जाऊन आलो आम्ही.त्यांनी ताईत दिलाय तो कुठल्याही परिस्थीतीत कुणी कितीही सांगितलं तरी सोडायचा नाही नी महादु तु गुरुजीचा हात सोडायचा नाही म्हनजे ताईत तुझंही रक्षण करेल.उडीद व भस्माची पुडी जवळच गाडीत वा खिशात ठेवा.ताईत सोडायचा नाही तसच काही विचीत्र भासलं तर वाहनातुन खाली उतरायचं नाही.अशा सुचना देत पावसाचे कपडे छत्री देत त्यांची रवानगी केली तोपावेतो दहा वाजायला आले हेते.महादु नं भंडाऱ्याचा रस्सा वरपण्यापुर्वीच मव्हाची मारली होती व एक सोबत ही घेतली होती.बारा -एकला ही उतरली कि मारायला बरी.गाडीत कडबा त्यावर झोऱ्याची पट्टी टाकली होती त्याखाली बाटली भस्माची पुडी व परत कारभारणीनं दिलेली गोमुत्राची बाटलीही ठेवली व गुरुजीला बसवत महादु नं बैलास इशारत केली.
पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता.गाडी शाळेजवळच्या चौक ओलांडुन स्टेशनाच्या रस्त्याला लागली.पंधरा मैल स्टेशन.वाडी टाकताच पावसाचा जोर आणखी वाढला .नभात ढगाची गर्दी झाली तशी त्याच्यात जणु झुंबडच उडाली व धोधो करत ते पाणी ओतु लागले.रानातुन सुयसुयसुय थंडगार वारा वाहत होता.मध्येच डोंगरातुन येणारा नाला लागला. गाडी पाणी चिरत रेतीतुन पुढे जाऊ लागली.महादु नं उभ्या उभ्याच बैलांना पाणी पाजलं.तेवढ्यात टिटीव टिव टिटीव टिव असा रान भेदनारा आवाज टिटवीनं काढला.त्या क्षणी गुरुजीला आपल्या आईचे शब्द आठवले कि टिटवीस रातीच्या वक्ताला वंगाळ काही दिसलं की ती वरडती.मास्तराचे ठोके वाढले.सारं रान त्या आवाजाने थरारलं.महादु नं गाडी दामटायला सुरवात केली.तितक्यात डाव्या बाजुचा बैल एकदम बिथरला व रस्त्याच्या कडेला जोरात शिंगानं डोकं फिरवू लागला.जणू त्याच्या बाजुला कुणी चालतय व तो त्यास डोक्यानं उचलतोय .महादु दोर ताणत त्याला रस्त्यावर चालवण्याचा प्रयत्न करु लागला.तितक्यात चमचमाट व कडकडाट करत विज कडाडली व कानठळ्या बसवनारा आवाज घुमला.महादु नं चपळाईनं त्या उजेडात काही दिसतं का त्याचा कानोसा घेतला पन त्याला काहीच दिसलं नाही.तितक्यात दुसरा बैल पहिल्या बैलासारखा करु लागला."महादु बैलास्नी बिथरायला काय झालं रे?"काय नाय काही पावसाच्या झडीनं रानातली जनावरं बाहेर पडत्यात.ते दिसत असतील म्हणुन बिथरल्यात"..असं सांगत महादु नं कल्टी मारली. खाली बैलगाडी पळत होती तर वरती आकाशात आभुट पळत होतं.रानातल्या शेतात महिन्याची पिकंं गुडघ्यापर्यंत आली होती.एका शेतात रानडुक्करं मक्याचे हिरवे तोटे खात होते अंधारात त्याचे भेसुर डोळे चमकत होते. आता अकरा वाजण्यात आले होते.बैलाचं बिचकणं चालुच होतं.महादु त्यांना थोपवत गाडी दामटतच होता.पुन्हा दुसरा नाला लागला .त्याचं पाणी गाड्याच्या साठलीपर्यंत आलं.तिकड्चा काठ गाठताच रानातुन अगदी हाकेच्या अंतरावर कोल्हेकुई झाली.त्याची नक्कल वाटेल तशीच कोल्हेकुई विरुद्द बाजुनंही झाली.महादु आता सावध झाला.जरी मव्हाची मारली होती तरी जंगलात फिरुन त्याचे काळ्याचे पांढरे झाले होते.त्यानं पुन्हा कानोसा घेतला व गाडी दामटली.कुनीतरी गाडीचा पिच्छा तर करतय पन लांबुनच हे त्यानं जाणलं.गुरुजीला मात्र हे कळालं नाही.महादुनं गाडी उभी करुन लघुशंका केली व आजुबाजुला पाहत खाकरला.गाडीच्या पुढं पांढरं पाढरं काहीतरी थांबलय हे त्याला जाणवलं.लगेच गाडीवर बसत त्यानं गोमुत्र सिंपडलं व निघाला.थोडा वेळ बैल व्यवस्थित चालले.विजाचं चमकणं _ढगांचं गडगडणं सुरुच होतं .आता स्टेशन मैला दोन मैलावर असेल.आधी फाटक लागेल तिथुन अर्धा पाऊण मैलावर स्टेशन .पण बोगद्यातुन वाहणारी आणई नदी खळाळुन वाहत असेल ती उतरु देनारच नाही गाडी फाटकाजवलच सोडुन पटरी वरणं चालत जावं लागेल हे महादु मनोमन आखु लागला व गाडी हाकु लागला.फाटक आता अर्धा मैल असेल तितक्यात कुणीतरी गाडीला जोराचा हिसका देतय असं लक्षात आल्यान महादु बैलाची वेसन ताणतोय तो पावेता गाडीच्या चाकाची धाव गरंगळत निघाली व चाकाची पुटं कडकड वाजु लागली.मोठ्या शिताफीनं महादुनं गाडी थांबवली.बैलं सोडुन गाडीलाच बांधली.गुरुजी धाव निघाली. गाडी आता पुढं जाणं शक्य नाही. तुम्हाला मी स्टेशनात आधी सोडतो मग येऊन धाव शोधुन बसली तर बसवतो.खाली उतरताच महादुनं भस्माची व ुडदाच्या पुडीचे दान भाग करुन एक भाग स्वत:च्या व दुसरा भाग गुरुजीच्या खिशात ठेवला मव्हाची व गोमुत्राची बाटली ही घेतली.दोन्ही जण हातात हात धरुन चालु लागली.मागं बैल एकसारख्या डिरकाळ्या फोडत पायाच्या खुरेनं चिखलउडवत होते.महादुनं तिकडं सोईस्कर दुर्लक्ष केलं.
साडे अकराला ते स्टेशनात आले.रेल्वेला अजुन अर्धा तास अवकाश होता.महादुनं गुरुजीला"तुम्ही गाडी येई पर्यंत थांबा व बाई उतरल्या कि त्यांच्यासोबत इथंच बसा. तितक्यात मी धाव बसवण्याचा प्रयत्न करतो.बसली कि मी लगेच येतो.समजा तीन पर्यंत मी नाही आलो तर तीन च्या गाडीची शिटं घेऊन कासारवाडी मार्गे फिरुन जाणाऱ्या कोणत्याही जीपनं वा बैलगाडीनं तुम्ही निघुन जा.पण या मार्गानं बिलकुल पायी येऊ नका.असं सांगुन सोबत आणलेली मव्हाची पिऊन महादु निघुन गेला.
गुरुजी स्टेशनाच्या वेटींग रुम मध्ये बसुन महाजन बाईची प्रतिक्षा करत होते व निलेशा बाई आठच्या गाडीनं येऊन कासारवाडीच्या घाटात फिरत होत्या.हे न महाजन बाीला माहित होतं न शिवदे गुरुजीला.बरोबर बाराला गाडी आली तसे मुळातच कमी असलेले प्रवाशाची चलबिचल सुरु झाली.स्टेशनला जणु जाग आली.प्रवासी उतरले.शिवदे गुरुजी छत्री उघडुन उतरणाऱ्या बाया स्टेशन वरिल बल्बच्या पिवळ्या प्रकाशात निरखु लागले.दोन तीन बाया ुतरल्या पन त्या वयस्कर होत्या.तालुका मास्तरनं तर बाई नविनच नोकरी स्विकारत आहेत म्हटल्यावर जे वय.हवं त्या वयाची बाई उतरलीच नाही.गाडी सुटली.कदाचित रात्रीचं येनं रद्द कैलं ्सावं किंवा वाडीचा इतिहास समजल्यानं आदेशही फिरवला असावा हा विचार मनात येताच.गुरुजीच्या चेहऱ्यावर नैराश्याची छटा उमटली. कारण सोबत कुणीतरी बाई शाळेत येणार म्हटल्यावर तारुण्यसुलभ गुरुजींच्याही मनात धुमारे फुटले होतेच.नी आता बाई नाही उतरली म्हटल्यावर पीन लागुन फुग्यातली हवा फस्सकन निघुन जावी तशीच अवस्था त्यांची झाली होती.तसल्या नैराश्यातच त्याचं लक्ष दुर खांबाखालील फलाटावरच्या बाकावर कुणीतरीतरुनी बसलीय िकडे गैलं तीच तर नसावी महाजन बाई. पन आपन उतरणाऱ्या बाया तर पाहिल्याच मग ही बया तर दिसली नाही.पन जाता जाता चौकशी करुनच जाऊया निर्धाराने त्यांचे पाय आपसुक तिकडे वळले."आपण........?"अडखळत असतांना लगेच "आपण शिवदे गुरुजी?" .प्रतिप्रश्न येताच गुरुजीचा चेहरा फुलला.होय मी सिवदे गुरुजी.मी निलेसा महाजन .नागपुरवरनं.येतेय.मला तालुका मास्तरांनी तुमचं नाव सांगितलं होतं कि त्यांना पाठवतो.घ्यायला असं. लगेच बाई चिटकोरं प्रवासात हरवलं हो, सांगताच गुरुजींनाही आपल्याकडं कुठं चिटकोरं शिल्लक आहे हे लक्षात येताच "बाई बाकीचं नंतर बोलु " असं म्हणत त्यांनी सुटकेस हातातुन घेतली. बाई इथं या वक्ताला काहीच मिळणार नाही पण थंडीचं निदान चहा तरी घेऊ.दोघानी जवळच एक टपरं होतं तिथं चहा सांगितला.चहावाल्यानं बत्तीच्या उजेडात पाणी दिलं.महाजन बाईनं चेहऱ्यावर पाणी मारलं व नेसलेल्या लिंबु कलरच्या साडीच्या पदरानं गुरुजीला चेहरा दिसेल या बेतानं पुसु लागल्या.गुरुजीनी उजेडात प्रथमच महाजन बाईचा चेहरा पाहिला नी पाहतच राहिलं.मराठवाड्यातल्या आपल्या गावात असं रुप आपण कधीच पाहिलं नसावं हे त्यांनी मनातल्या मनात ताडुन पाहिलं.विस एकविस वयाचं एक रुप लावण्य समोर बसलंय.आपल्या चाफेकळी बोटांनी दिलखेच नरमाई अदानं लटा बाजुला करतय.हे ते भान विसरुन पाहू लागले.समोर चहा आला तरी बावचळल्यागत मास्तर आपल्याकडंच पाहतय हे एव्हाना बाईला समजलंय हे लक्षात येताच गुरुजी खजील झालै.चहा घेतल्यावर "गुरुजी इथनं वाडी किती लांब ?कशानं जायचं ?"असी सरबत्ती बाईनं सुरु गेली. त्याबरोबर गुरुजीनं" वाडी पंधरा मैलावर असुन बैलगाडी आणलीय पण तिच्या चाकाची धाव निखळलीय.सोबत आलेला महादु बसवेल .तो आला तर ठिक नाहीतर मी पाहतोच काय करायचं ते. बाई लगेच म्हणाल्या चला ना मग गाडीकडं पायी पायी जाऊ.पण पाटलानं व महादुनं सांगितल्या प्रमाणं कोणत्याही परिस्थीतीत पायी जायचंच नाही हे गुरुजीनं पक्क ठरवलं होतं.त्यांनी बाईला थोडं थांबा इथच मी पाहतो काय वाहन मिळतं का असं म्हउुु ते स्टेशनच्या मागं आले.तिथं दोन जीप उभ्या होत्या एकीत ड्रायव्हर बसुन जोपत असल्याचं त्यांनी पाहिलं.हात लावुन उठवत गाडी कुठं जाणार? म्हणुन चौकशी कैली.पुर्णेवाडीस जाईल पण तीनच्या गाडीन पाहुणी येणार मग जाऊ.आम्हाला आर्णेवाडीला जायचय.दोन जण आहोत बसवणार का,असं विचारताच "तीन पर्यंत थांबावं लागेल ,घेऊन जाऊ. ड्रायव्हर ने हो म्हटल्यावर थांबतो आम्ही वरती स्टेशनात घेऊन चलायचं असं सांगत गुरुजी बाईकडं परतले.
" बाई तीनची रेल्वे आल्यावर जीप निघेल मग जाऊ तोपावेतो इथच थांबु"परतल्या परतल्या गुरुजीनं माहिती दिली.ठिक आहे पन तो पर्यंत आपण निदान बाहेर तरी गप्पा मारत फिरु असा आग्रह धरला.बाहेर पाऊस पडतोय व स्टेशन सोडुन सारा अंधार काय करायचं पण बाईला नाही म्हणनं ही त्यांच्या जिवावर गेले.व ते सामान जीपवर ठेवुन आलै व फलाटाच्या दिशेनं निघाले.
लगेच बाईनं दोघातलं अंतर कमी करुन चालता चालता बोलायला सुरुवात केली ."गुरुजी वाडी कशी हाय? शाळा कशी?तुम्ही कुठं राहता?मला तुमच्याच खोलीत राहू द्याल का?असं विचारताच गुरुजीला धक्का बसला.नाहीतरी इतक्या रात्री पावसात वयानं जवळजवळ सारख्याच तरुणीसोबत फिरण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग.तितक्यात वाऱ्याची जुळुक येताच बाईचा पदर फडफड करत गुरुजीच्या अंगावर लपेटला.बाईनं सुवासिक अत्तर मारलं असावं.पदराचा सुगंध कि नवतीचा सुगंधाचा भास पन गुरुजी ही नशाळले.बाईनं कुठलीच घाई नाही असा भावात हळुवार पदर सावरला.आता स्टैशनाचे दिवैही खुपच लांब पडले.तसं बाई मागं फिरुयात का?गुरुजीनं विचारलं.पण तिकडं सोईस्कर दुर्लक्ष करत "गुरुजी लग्न झालय का?" असा अनपेक्षीत प्रश्न आला नी समोर दुर दिसणाऱ्या मंदिरात जोराने अनेक घंटा वाजतायेत असच गुरुजीला वाटु लागलं.
इकडे महादु बैलगाडीजवळ आला.नी खाली झाडोऱ्यात गरंगळलेली धाव चाचपु लागला.धाव दिसताच ती ढकलत ढकलत गाडीजवळ आणली व पाचर शोधु लागला पन अंधारात पाचरासारखं लाकुड मिळणार नाही हे लक्षात घेऊन चपटा दगड अडकवुन चाकावर धाव जशीतशी बसवली.व चाक गाडीच्या आसात घालण्याचाअयशस्वी प्रयत्न करु लागला.एका हातानं साठली उचलत दुसर्या हातानं चाक आसात सरकवु लागला.पण दोन्ही गोष्टी एकट्याने शक्यच नव्हत्या.घामाघुम होऊन प्रयत्न करत होता तितक्यात मागुन कुनीतरी हात लावुन गाडी उचलली. "उरकव घाल चाक " महादुनं चाक घालत वर पाहीलं तर लंगडा फणसे.महादु त्या ही स्थितीत पटकन उडी मारुन गाडीवर बसला.खिशातुन भस्म काढुन भोवतीनं रिंगन केलं.तसं इतका भितोस रं!म्हणुन फणसे महादु ला डिवचु लागला.तसा अंगात मव्हाची ्सल्यानं महादुला आयतीच किक बसली."अय लंगडा ! म्या कशाला भिऊ!" मग चल ये खाली जवलच डोह आहे पाण्यात कुस्ती खेळू.
शिवदे गुरुजीनं पक्क ठरवलं होतं कि आपण पायी कुठं जायचंच नाही पन ज्वानीच्या मदमस्त सुंगधी माऱ्यात ते पुरते विसरले.व पुढे पुढे दिसत असलेल्या मंदिराच्या दिशेनं चालु लागले.तशी महाजन बाई ही हळुच जवळ येत मुलायम हाताचा स्पर्श गुरुजीला गोंजारु लागली.त्यान भर पावसात पाण्यात आग लागावी तसच विदर्भात पुरता मराठवाडा विलीन होण्यासाठी सज्ज झाला."आपण मंदिरात जाऊ यात का!"गुरुजीनं विचारताच महाजन बाई लाडीक हसत" मास्तर बेत काय नी घैऊन चाललात कुठं! त्यापेक्षा खालदरीच्या रानातच चला ना!" "खालदरी" ऐकताच गुरुजी एकदम दचकले.बाई या भागात नविनच नी इथल्या भागातलं नावं कसं माहीत?गुरुजी खर्रकन भानावर आले.पण त्या ही स्थितीत सारा जोश आवरत "चला आपण मंदिरातच जाऊ" असं ऐकताच व समोर शिवालय दिसताच महाजन बाईच्या डोळ्यात रुधिरावर्णीय लाली पसरली मुठी आवळल्या गेल्या.व तसा विळखा गुरुजीच्या कमरेत पडु लागला.कमरेत ताईतचा स्पर्श होताच झटका बसुन दुर फेकला जावा तसा हात मागे सारला.
अंधारात मात्र विळखा खेरीज कोनताच बदल गुरुजीला जाणवला नाही.गुरुजीनं ही बाई जाऊ द्या बराच उशिर झाला .तीनची गाडी येऊन आता जीप निघायचा ही वखुत झालाय.चला परत.
गुरुजी नं खिशात हात घालुन भस्म व उडदाचे दाणै हातात घेतले व परत फिरले."मास्तर तुम्ही मास्तर ना!तरी कमरेत ताईत हाय तुमच्या!तुम्हीच असं वागले तर मुलांना काय विज्ञान शिकवणार.तोडुन फेका तो ताईत"बाई चला परत उशीर होतोय" असं म्हनत गुरुजी माघारी फिरलेही ."मास्तर तुम्ही माझ्या सौंदर्याचा अपमान करता आहात .या वळणावर आणलं नी काहीच न करता इथुन परत फिरत आहात"महाजन बाई फणकाऱ्यांन म्हणाली.बदललेला आवाज मास्तरांनी ओळखला व स्टेशन कडं धुम ठोकली.
फणसे तुझा कावा मी ओळखतोय पण याचा अर्थ तुज्याशी कुस्तीला घाबरतोय असं मुळीच नाय.मग ये कि जाऊ डोहात.महादु तरी खाली उतरेना .तसं पणसे जास्तच डिवचु लागला.काय रं महाद्या लेकाचा लंगड्यासी कुस्तीला घाबरतो तर मग काय कामाचा रंतु! हे ैकल्या बरोबर मव्हाची मारल्यानं महादुचा पारा भडकला व तो पणसेच्या अंगावर धावुन गेला.तसा फणसे पुढे चरकला.पाटलानं सांगितलेलं महादु विसरला.पन भस्म असल्यानं व प्यालेला असल्याने फणसे महादुला हात न लावताच नुसती हुलकावणी देत डोहाकडं नेत होता.महादुही आता इरेला पेटला व वेड्यागत त्या पकडु लागला.असा पकडापकडी करत फणसे फाटकाजवळच्या पुलावरच उभा राहिला महादुनं एकदम झेप घेतली तसं फणसेनं अंग चोरुन घेतलं व महादु जोरात खोल नदीत आपटला .भस्माची व उडदाच्या पुडीसहीत तो आणई नदीतुन वाहत वाहत आर्णेवाडीच्या थडीलगतच्या विहीरीजवळच्या काठावरच लागणार होता.कारन फणसे काठाकाठानं हुलच तसा देणार होता.
मास्तर जिलाच्या आकांताने स्टैशनकडं पळत होता.तिकडं खालदरीत ढोलकीचा ताल ही टिपेला पोहोचत होता.व महाजन बाईच्या रुपात सुलेखाची हाताची पकड मास्तराची मानगुट आवळण्याकरिता मास्तरामागोमाग धावत होती.पण ताईत असल्यानं ताजन वल्ली शाह बाबाची भस्म पुडीनं सुलेखाच्या हाताची पकड मास्तराची मानगुटभोवतीच धावत होती पण स्पर्श करत नव्हती. मास्तराच्या तोंडातुन फेसाचा झेंडु फुटेस्तोवर धावतच होता."हे मास्तर पाव्हणं किती रं धावणार बस ना उलीकं." मागुन सुलेखा दमकावत होती.तीनची रैल्वे फलाटावर लागत होती नी तिकडे मास्तर जीपमध्यै चढत होता.तशी सुलेखा लालबुंध होऊन ताईत फेकुन बघ मग मी कसा ओढते तुला असं म्हणत रागानं गाडी हालवत होती.गाडी फलाटावरुन सुटली तशी नरम पडत "मास्तर माझं गणा राऊत चाललं रे बघ.दया येऊ दे पाणी पाज ना!मी गरती हाय ना रं"
पाणी पाज ना रे मेल्या! गळा कोरडा पडतोय रे".
मास्तरानं तिकडं दुर्लक्ष करत खिशातुन भस्म व उडदाचे दाणे काढुन तिच्यावर फेकताच सुलेखाची आकृती हळुहळु धुसर झाली.नी ड्रायव्हर पाहुणीला घेऊन आला.मासातराला पाहिल्याबरोबर "तुम्ही दोन जण येणार होते ना !मग एक जण बोलवा पटकन गाडी काढतोय मी". बाबा चालु दे दुसरी येत नाही तेच बरं.
पहाटे कासारवाडीच्या फेऱ्याच्या रस्त्यानं आर्णेवाडीत यायला मास्तराला चार वाजले तोवर वाडीतलं..पाटलाचं व मानाजी राऊत यांचीच घरं जागी होती.पाटलानं मास्तराचे फाटलेले कपडे व भेसुर अवतार पाहताच " मास्तर पोरा वाचलास बाबा पण माझा महादु कुठाय! नविन मास्तरणी कुठाय!". मास्तरालाही आताच महादु आठवला.महादुचं काय हे त्या्लाही कुटं माहित होतं.मास्तरानी रडता रडता सारी हकीकत कथन कैली.कारभारणीनं तेवढ्या पहाटेही मास्तराची ढेप ,अंड्यानं नजर उतरवली.कोरा चहा पाजला. व बाकी नंतर असं सांगत झोपवलं.
मास्तराला झोपवायला तास दोन तास होत नाही तितक्यात माना राऊत पाटलाच्या भल्या पहाटेच पायऱ्या चढु लागला.माना राऊतांनं पाटलाला व पाटलानं माना राऊतांना झालेला प्रकार कथन करताच दोन्हीही सुन्न झाले.त्यांनी काही ठरवलं व दहा वाजेला पुन्हा भेटण्याच.ठरवत कामाला लागले.
पाटलानं ताजन वल्ली शाह पीर बाबास बोलवायला माणुस रवाना केला.तर माना राऊतांनी ाठ दहा बेरड व रामोशी माणसं जमवत दहाला महाजन बाई ला घेऊन पाटलाकडं हजर झाले तेवढ्यात गुरुजी ही उठले .राऊतांनी गुरुजीची व महाजन बाईची ओळख व झाला प्रकार सांगितला. .पुढे करायचं काय ते सांगु लागले.गुरुजी व महाजन बाईस आपण मागच्या जन्मी वाडीच नक्कीच काही तरी बिघडवलं असणार म्हणुन या जन्मी वाडीच आपल्याला ऋण फेडावं लागतय असंच मनात येत होतं.माना राऊत उठले व त्यांनी सांगायला सुरुवात केली.पोरांनो गैल्या तीन चार वर्षापासुन सारी वाडी हादरली.त्यात चुक कोन बरोबर कोण हे नंतर पाहु पण आधी यापासुन सुटका कशी करायची हे महत्वाचं. कारण आज हे मास्तर मास्तरणी मृत्युच्या कराल दाढेतुन कसे बचावले हे त्यांनाच माहीत पण पुढचं संकट टाळण्याचा मार्ग दिसतोय.पोरी तु रात्री जिथं थांबली कासारवाडी घाटात ती जागा ओळखुन फक्त दाखव.तेथुन गनाच्या अस्थी घेऊन पुढं काय करायचं ते पीर बाबा आल्यावर सांगतीलच.
सर्व ताफा महाजन बाई ला घेऊन कासारवाडी घाटात गेले. बाईनं सखाच्या रुपातला गणा रातीला जिथं उतरला ती जागा थोड्या शोधाशोधीनं बरोबर ओळखली.ती स्वत: उतरली ती जागाही ओळखली. मग पाटलांनी व मानाजींनी.बेरड व रामोशींना घाटात दरीत उतरवलं.जागा घनदाट जंगलातली व जिथुन आणईचा उगम होत होता त्या धबधब्याच्या बाजुलाच होती.बेरड हातातील कुऱ्हाडींनी व कोयत्यांनी झाडोरा कापत वाट करत खाली उतरु लागले तसे मागोमाग इतर सर्व उतरु लागले.बऱ्याच अवधीनंतर खोलखोल उतरल्यावर गणाचं मुटकुळ पडलं हौतं त्या जागी झाडोऱ्यात हाडं दिसली .बाकी मांस गोनपाट सारंसारं काहीच नाही.गणाच्या शर्टास सोनेरी बटणं लावलेली होती.ती शर्ट सडुनही तिथच पडलेली दिसताच मानाजी रावाचा संयमाचा बांध सुटला व ते ढसाढसा रडु लागले. पाटलांनी त्याना शांत केलं.रात्रीचं भेदरलेले शिवदे गुरुजी तर सारं जीव मुठीत धरुन बगत होते.साऱ्या अस्थी व बटणं सोबत आणलेल्या गाडग्याच्या कलशात भरुन सारी वाडीत परतली तौच पीर बाबाही वाडीत दाखल झाले नी पाटलांनी सकाळीच पाठवलेल्या माणसांनी पाटलाच्या कानात महादुचं प्रेत फणसे मेलेल्या विहीरीजवलच नदी काठावर लटकलेल दिसल्याच सांगितलं.गणाचं जेवढं दुख:मानाजी रावांना झालं तैवढच महादु गेल्याच पाटलांना झालं.कारन महादु जरी गडी होता पन पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम पाटलाचं त्याच्यवर होतं.
पीर बाबांनी सर्व प्रकार समजुन घेतला.महाजन बाईनं रात्री आणलेले गणाचे दागिने महादुच्या अंगावर चढवायला लावुन सुलेखाचे दागिने अलग करुन त्याची पिशवी महादुच्या हातात द्यायला लावली.व ज्या ठिकाणी फाटकाजवळ सुलेखानं गणा गणा करत मान टाकली होती त्याच.ठिकाणी गणाच्या रुपातल्या महादुचं विधीपुर्वक दुसऱ्या दिवशी दहन करावयास लावलं.व गणाच्या अस्थीही त्याच चितेत टाकुन दहन करण्यास सांगितलं.फवसेच्या विहीरीचीही पीर बाबांनी विधीवत पुजा कैली.सारी वाडी पंधरा मैलावरिल त्या फाटकाजवळ जमुन सकाळी नऊ दहा वाजताच महादुच्या रुपात गणाचं दहन करण्यात आलं.चितेला भडाग्नी देताच जवळुनच एक मोर लांडोर नाचतच रानात जातांना लोकांना दिसली व श्रावणाची सर बरसली.
शाळेत महाजन बाईच्या साथीनं शिवदे गुरुजी नव्यानं डवरलेल्या आंबा चिंचैच्या पालवी प्रमाणंच डवरुन रंगुन गेले.