💃बारीची पारी💃
भाग::- दुसरा
बारीची पारी-Marathi Best story -Part2 |
किसना पहाटे साडे चारच्या लावलेल्या अलार्म ने दचकून उठला.तो घामानं ओलाचिंब झाला होता.त्यानं त्रागानंच अलार्म बंद केला.आताही त्याला तेच स्वप्न ,तोच आवाज जाणवत होता.पण उठल्यावर अलार्मचा आवाज होता यानं तो थोडा शांत झाला.हे स्वप्न त्याला स्वजाणीव आल्यापासुन पिच्छा सोडतच नव्हतं.कुणीतरी अंगावर लक्तर लेवून जिवाच्या आकांताने ढोलकी वाजवतोय व आपल्याला खुणावतोय.त्याचा आटापिटा व ढोलकीच्या घुमाऱ्यानं आपल्या आतड्याला पिळ पडतोय,आपण जाण्यासाठी तडफड करतोय पण आपले पाय जमिनीवरून हालतच नाही.मग तो माणूस पुन्हा ढोलकीच्या घुमाऱ्यानं आर्त साद घालतो.तोच जाग येते.का वारंवार पडतंय हे स्वप्न आपणास?कोण माणुस तो?पाठमोरा का दिसावा?आपण प्रयत्न करून ही चेहरा का दिसतच नाही?आता ही तेच स्वप्न दिसलं होतं .पण मिना आज तिच्या गावाला जाणार होती व तिनं दादरला सोडण्यासाठी सांगितलं असल्यानं आपण अलार्म लावला होता व तोच खणखणत होता.किसना उठला ब्रश करत फ्रेश झाला व त्यानं आपली अॅक्टिवा काढत लेडीज होस्टेल गाठलं. मिना तयारच होती.मिना मागे बसताच गाडी दादर स्टेशनाकडं लागली.
वातावरणात कमालीचा गारठा होता.ढोलकीच्या स्वप्नाच्या धुंदीत त्यानं स्वेटरही घेतलं नव्हतं.मिना त्याला खेटत होती.दोन वर्षांपासून सोबत संगित महाविद्यालयात शिकत असल्यानं जिवलग मित्रत्वाचं नातं तयार झालं होतं.आज ती गावाकडं चालली होती तसं ती कालच बोलली होती.त्यानं आज मनात खिन्नता दाटून ती ही शांत भासत होती पण ती खेटून बसली होती.
"मिने कधी परत येशील?"
"किसना,काहीच सांगता येत नाही.बापुनं फक्त फड आज दौंड मुक्कामाला येणार आहे लवकर ये इतकंच कळवलंय.फडात काही तरी बिनसलंय."
"पण किसना का रे माझी आठवण येईल का?
"मिने बस कर तसं काही नाही पण लवकर ये."
स्टेशन येताच गाडी उभी करून मिनेला उतरायला लावलं.धुंदीतनं उठल्यागत ती उतरली.तिकीट घेत तिला गाडीत बसवलं तोच तिनं समोरच्या स्टाॅलवरून बिस्कीटचा पुडा आणावयास लावला.बिस्कीटपुडा घेऊन गाडीकडं परतणार तोच जवळच्या फ्लॅटफाॅर्म वरील नळावर एक युवती आपला चेहरा धुत होती जवळच एक ढोलकी पडलेली होती.ढोलकी पाहताच किसना जागच्या जागी स्तंभीत होत उभा राहिला.स्वप्नात दिसणाऱ्या ढोलकीसारखीच.विद्यापिठातच तो सर्व संगीत साहित्य पाही त्यात सर्व प्रकारच्या ढोलक्या पाही.पण स्वप्नातल्या व आता समोर दिसणारी ढोलकीची बनावट काही औरच आहे हे त्याच्या लक्षात आलं.तोच समोरच्या युवतीनं चेहरा पुसत ढोलकीकडे वळताच त्याला आणखीनच धक्का बसला.व तो जागच्या जागी खिळला.तीच युवती जिला त्यानं पैठणच्या घाटावर ढोलकी वाजवतांना तीन वर्षापुर्वी पाहिलं होतं.तिचं किसनाकडं लक्ष जाताच ती हा का डोळे फाडून फाडून पाहतोय तिला कळेना.ती ही कोण असावा हा पाहिल्यासारखा वाटतोय पण आठवत नाही अशा आविर्भावात उभी. तिकडे गाडीनं शिटी दिली तरी हा उभाच मिनानं आरोळी दिल्यावर हा भानावर आला व इच्छा नसतांना गाडीकडं पळाला व मिनाकडं पुडा दिला.
मिनाच्या पापणकडा ओलावल्या होत्या पण याचं तिकडं अजिबात लक्ष नव्हतं. तो सारखा ढोलकी व त्या युवतीकडेच पाहत होता ती आता स्टेशनाच्या बाहेर निघण्याच्या बेतात होती.गाडी सुटतांना मिनानं भावुकतेनं पाहत निरोप घेतला नी मग हा पळतच बाहेर निघाला पण तो पावेतो ती युवती त्याला दिसेना. तो चहु बाजुस धुंडू लागला पण व्यर्थ.कदाचीत टॅक्सीनं गेली असावी म्हणुन त्यानं गाडीला किक मारली व रस्त्यानंही इकडे तिकडे पाहू लागला.शेवटी नाराज होत होस्टेलला आला व बेडवर पडला.पडल्या पडल्या ती युवती व तो प्रसंग त्याला आठवला.औरंगाबादला ए.टी.डी. करत असतांना आपण पहाटेच्या वेळी दिसणारा गोदा काठ व घाट चितारावा म्हणुन पैठणला मुक्कामाला गेलो होतो.पहाटे लवकर उठून घाटावर खांब्यावरील लाईटीच्या मिण मिणत्या उजेडात आपण कॅनव्हासवर घाट, शांत वाहणारी नदी, नदीकाठ व साऱ्या आसमंताचं चित्रे अधाशागत काढत होतो . तोच दूर अंतरावर गोदा काठावर ढोलकीचे स्वर घुमु लागले.आपले हात आपोआप थांबले व कान आवाजाच्या दिशेने टवकारू लागले.पाय आपसुक वळले. ठराविक अंतरावरुन आपण ती ढोलकी ऐकू लागलो आपले ही हात सरसरू लागले.आपलं वाजवणं व यात बरीच तफावत आहे हे कळून चुकलं.युवतीजवळच एक बाई बसलेली होती व तिनं मध्येच वाजवणं थांबवावयास लावुन काही सुचना दिल्या व ती बाई चालती झाली.ती किसनास दिसलीच नाही.आता एक माणुस व ती युवती थांबली व नंतर पुन्हा ती युवती वाजवावयास लागली.आता ढोलकी आपण वाजवतो अगदी तशीच वाजत होती पण त्यात चुका होत होत्या.आपण जवळ सरकू लागलो.जवळ जाताच चाहुलीमुळं त्या युवतीनं ढोलकी थांबवली.
"बेनझीर!"इतकंच आपल्या तोंडून निघताच त्या युवतीनं आपल्या कडं पाहत चालू लागली.पण जातांना तिचं मागं पाहणं; तिच्या ढोलकीच्या निनादापेक्षा ही घायाळ करणारं होतं आपण मागं मागं जाऊ लागताच घाटावरून दोन माणसं आली व आपल्याला दटावत माघारी पाठवलं.त्या दिवशी आपण पुर्ण दिवस पैठणमध्ये फिरलो पण त्या दिवशीच काय पण नंतरही ती युवती ,ते सूर व घायाळ करणारी भेदक पलटवार नजर दिसलीच नव्हती.ती आज स्टेशनवर भेटली व पुन्हा गायब.
आज मुंबई विद्यापीठाच्या संगीत काॅलेजात 'पारो संगित बारी 'च्या मालकीण व ढोलकी सम्राज्ञी पारो बाई गेस्ट लेक्चरर म्हणुन येणार होत्या.कालच मणचेकर सरांनी तशा सुचना दिल्या होत्या.त्यांचं वैयक्तिक काहीतरी काम काॅलेजात होतं ही संधी साधत काॅलेजनं त्यांचं लेक्चर व ढोलकी वादन ठेवलं होतं.आज महाराष्ट्रात त्यांची बारी दिमाखानं फड गाजवत होती.नामांकित फडात त्याच्या फडाची गणना होत होती.
किसना तयार होत अकराला काॅलेजात पोहोचला.त्यानं अजुन पारोबाईंना पाहिलंच नव्हतं.ढोलकीसम्राज्ञी म्हटल्यावर त्यालाही उत्सुकता होतीच.कारण आईनं कायम नकार देऊन ही ढोलकीची आवड त्याला स्वस्थ बसु देत नव्हती.म्हणुन ए.टी.डी केल्यानंतर वादन स्पेशीलायझेशन ठेवत त्यान या काॅलेजात पदवीसाठी प्रवेश घेतला होता.आईचा विरोध मोडीत काढत.
हाॅलमध्ये प्रचंड गर्दी होती.मणचेकर सरांनी किसनाला बोलवत "किसना तु नशीबवान आहेस! पारोबाईसमोर ढोलकी वादनासाठी काॅलेजनं तुला सिलेक्ट केलंय."सांगितलं.संधी मिळतेय म्हटल्यावर किसना खुश झाला.आधी पारो बाईचं लेक्चर झालं त्यात वाद्य ढोलकी, पखवाज, संबळ, ढोल इतर बाबत माहिती देत तमाशा -ढोलकी तमाशा,संगीत बारी,खडी गंमत ,नांदी, गण, गवळण, बतावणी, वग याबाबत माहिती देत त्या क्षेत्रातील मान्यवराबाबत त्या भरभरुन बोलल्या.नंतर त्यांच्या ढोलकी वादनाचा कार्यक्रम झाला.त्यांनी अप्रतिम अशी नजाकतीची ढोलकी वाजवली.सारा हाॅल मंत्रमुग्ध झाला.टाळ्याच्या गजरात सारे उभे राहिले.पण तरी किसणास खोल कुठं तरी जाणवत होतं की त्या येत असुनही हातचं काही दडवुन ठेवून वाजवत होत्या.
नंतर कुणास काही विचारायचं असल्यास संधी देण्यात आली.त्यात किसनानं सरळ उभं राहत "मॅम आपल्या कलेनं आज उभा महाराष्ट्र न्हाऊन निघतोय .आमचं भाग्य की आम्हास आपल्या दर्शनाचा लाभ मिळाला व वादन ऐकता आलं.पण तरी या कलेतील एक रसीक म्हणुन मला असं वाटतंय की आपण काही तरी दडवत ढोलकी वादन करत असाव्यात?"
साऱ्यांच्या नजरा वक्र झाल्या.बाईंनी कपाळावरचा घाम पुसत.प्रमुखाकडं पाहिलं.प्रमुखानं बाईंच्या कानात काहीतरी कुजबुजले.तोच बाईंनी माईक घेत "त्याच काय असतं कलाकार कितीही मोठा असला तरी त्याला फडावर, प्रेक्षकासमोर जे धुमारे फुटतात ते एरवी कमी . कदाचित यामुळं ही असावं.ही बाब केवळ तु ओळखली म्हणजे तू खरच एक उच्च कलाकार असावा.त्याशिवाय तुझं धारीष्ठ्य ही मला आवडलं.मला आताच सरांनी सांगितलं की तुझ्या वादनाचा कार्यक्रम ही होणार होता पण मला पोरीचं अॅडमिशन घेऊन लगेच जायचं असल्यानं मीच तो रद्द करावयास लावला होता पण आता तुला मी संधी देतेय व आमंत्रण ही देतेस की तुला जे दडवलंय असं वाटतंय ते ऐकण्यासाठी फडावर नक्की ये"
बाई खुशीत बोलल्या व वादनास सांगितलं.किसना ढोलकी वादनासाठी स्टेजवर चढला व हाॅलमधल्या पोरा-पोरीवर नजर फिरवली.तोच त्याला दुसऱ्या रांगेत कोपऱ्यात तीच पहाटे स्टेशनवर भेटलेली मुलगी दिसली.त्याच्या सर्वांगावर एक लहर दौडली व कपाळावर घर्मबिंदू उमटले.पण क्षणात तो भानावर आला.मध्येच त्यानं पारोबाईकडं पाहिलं.ढोलकीवर थाप मारली. 'टिंग टिंग टिंग टिंग झिंगीनांघ चिकीनांघ झिंगीनांघ चिंकीनांघ......ढोलकी घुमू लागली.घुमत राहिली नी साऱ्या मुलांनी हाॅल आरोळ्या,शिट्या,नाचानं डोक्यावर घेतला.पाच-दहा मिनीटात सारा आसमंत दणाणला.पारोबाईला घाम फुटला.तिला बाविस- पंचवीस वर्षापुर्वीचा गणा सौंदणकरांचा फड आठवला. ती बारकाईनं ऐकू व पाहू लागली.तोच बाज तीच लकब तोच अरेराव,आवाजातला तोच शौर्याचा व करारी बाणा.....तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं क्षणात विणलं गेलं.
ढोलकी थांबताच एकच खदका, हुल्लळ माजली व 'वन्स मोअर', 'वन्स मोअर' आवाज पारव्याच्या झुंडीगत घुमु लागला.किसन खाली उतरत त्या पोरीकडं पाहु लागला.तीच भेदक नजर पण ती नजर आता किसनाचा वेध घेत होती.
पारोबाईंनं पुन्हा स्टेजवर बोलवत,"पोरा नाव काय तुझं? " विचारलं.
"क्रिष्णा गणेश विहारी"
बाईच्या चेहऱ्यावरील भाव विहारी ऐकल्यावर झरझर उतरले.खुश होत "काय जादू हाय पोरा!,भविष्यातील ढोलकीसम्राट होऊ शकतोस"म्हणत
"सना बेटा ती ढोलकी आण गं"त्या दुसऱ्या रांगेतल्या पोरीकडं पाहत आवाज दिला तोच ती मुलगी तीच ढोलकी घेऊन स्टेजवर आली.
'सना' नाव ऐकताच किसना भान हरपला .
"पोरा! ही माझी लेक 'सना 'हाय आणि आजपासून याच काॅलेजात तिसऱ्या वर्षाला शिकणार आहे".पुन्हा धक्का .
"पोरा तुझ्या बोटातली जादूनं तु मला जिंकलंस .ही ढोलकी गेल्या पंचवीस वर्षापासुन माझ्याकडं कुणाची दुखरी सल म्हणुन आहे.हल्ली ती माझ्या सनाकडं असते पण आज ती मी तुला देतेय इतिहास घडवण्यासाठी"
किसनानं आदरपुर्वक ढोलकी घेतली.
"बाईजी हा चित्रही अतिशय सुंदर काढतो.अनेक नामवंत व्यक्तीची चित्र यानं काढलीय"मणचेकर सरांनी माहिती पुरवली.
"अरे व्वा कधी तरी मग आम्ही ही आमच्या सनाचं चित्र काढून घेऊ याच्याकडंनं.पण अजुन त्या वेळेस अवकाश आहे."बाई खुश होत म्हणाल्या.पण किसनचं सारं लक्ष ढोलकी व सनाकडंच होतं.
अशीच ढोलकी आपल्या स्वप्नात येणाऱ्या माणसाकडं असते.म्हणुन तो ढोलकीच न्याहाळत होता.
बाई निघाल्या.जातांना त्यांनी सनाला बाजुला बोलवलं व कानात काही गोष्टी सांगतांना बजावलं,"या बेन्याशी सलगी वाढव तयारीचं व वेगळं पाणी दिसतंय.पण चुकुनही तुला येत असलेली जन्मजात कला दर्शवू नको.त्यानं सवालात बरोबर नस पकडली होती.पण पोरी आपली कला असल्या काॅलेजात वाटत बसलो तर आपलं फड, बारी व पुढचे मनसुबे कसे पार पडतील!.म्हणुन जितकं शिकता येईल तितकं शिक पण अंगभुत कला उघड करु नकोस.यासाठीच तुला मध्येच शिमला संगीत महाविद्यालय सोडायला लावली.कारण महाराष्ट्रातील मातीतल्या कलेला देशात काय जगातही तोड नाही."
पारोबाईस गाडीत बसल्या व त्यांना गणा सौंदनकर पुन्हा पुन्हा आठवू लागला.गणेश विहारी व सौंदणकर काहीच संबंध नाही पण त्याच्या ढोलकीत गणाचीच छाप का??????

क्रमश:
✒वासुदेव पाटील.