सर्पमानव बनण्याच्या बेतात असलेल्या दिराचा फणा छाटला गेला. पण त्याचे शरीर मात्र कितीतरी वेळ वळवळत होते. अर्धवट मानवी आणि अर्धवट सर्पाचे मिश्रण असणारा तो भाग गळ्यातून अनवरत बाहेर पडणाऱ्या विषाने भरून गेला होता. तो विचित्र दर्प कोणालाही शिसारी आणणारा होता. पण सुडाने बेभान झालेली वृंदा मात्र ते दृश्य जणू डोळ्यात साठवून घेत होती.
सूड... होय, सूडच होता तो ! आजवरच्या अन्यायाचा सूड उगवण्यास तिने सुरवात केली होती. लग्न करून त्या वाड्यात प्रवेशताना उमललेल्या नवयौवनाच्या भावना तिथल्या अंधाराखाली कुस्करल्या गेल्या होत्या. त्या अंधारालाच जीवन मानून जगणारे हे हिरव्या डोळ्यांचे जीव.. त्यांच्या नजरा सतत वृंदाचा पाठलाग करत होत्या. सुरवातीला ती अस्वस्थ व्हायची. नंतर सवय झाल्याने दुर्लक्ष करू लागली. पण त्यांचा नेमका कावा तिच्या ध्यानी आला नव्हता. सासूने ते भीषण रहस्य सांगितले आणि त्या सर्वांविषयी तिच्या मनात कमालीची घृणा निर्माण झाली होती.
आणि म्हणूनच....त्याच्या गळ्यावरून खंजिराचे ते लखलखते पाते फिरवताना तिला काहीच वाटले नाही.

खंजिराचे पाते पदराने पुसून ती पिशवीत टाकू लागली. तेव्हढ्यात खोलीच्या अंधाऱ्या कोनाड्यातून कोणीतरी सरसरत बाहेर आले. मात्र वृंदा थोडीशीही दचकली नाही. तिला ते अपेक्षितच होतं...
तिच्यापुढे सुभाष उभा होता..तिचा नवरा..घामाने डवरलेला चेहरा घेऊन! त्याचे हिरवेगार डोळे तिच्यासमोर नम्र झाले होते. तिची तडफ पाहून तोही थक्क झाल्याचे स्पष्ट जाणवत होतं. ओठ काहीतरी बोलण्यासाठी थरथरत होते.
त्याच्याकडे पाहून वृंदा हसली. थोडी वेडसरपणेच ! हाच का बाई तो...आपल्याला नजरेतल्या जुगलबंदीत गुंतवणारा ? आज असा शरणागत होऊन शुंभासारखा उभाय...तिच्याकडे पाहून त्याच्याही चेहऱ्यावर समाधान पसरू लागले.
वृंदा...ही कामगिरी तू पार पाडतेस की नाही म्हंणून मला शंका होती. किती घाबरलो होतो मी? तो म्हणाला.
मग...आता काय वाटतंय ?..हातातली पिशवी खेळवत तिने विचारलं.
अग..काय बेफाम आणि क्रूर झालीस तू..माझा तर डोळ्यांवर विश्वासच बसेना...तो खूषमस्करी करीत बोलला.
तर, तर...अहो बाईमाणसाची कुठली हिंमत असलं काही करायची? तुम्ही पाठीशी होतात म्हणून केलं धाडस ! ती खुशीत येऊन म्हणाली.
वृंदा..तुझ्या पोटात माझा अंश वाढतोय. तुझा जीव कसा घेऊ देईल मी कुणाला ? म्हणून तुझ्या पाठीशी उभा राहिलो.. तो भरलेल्या गळ्याने म्हणाला.
वृंदालाही भडभडून आले. खरंच, तो पाठीशी नसता तर आज काय घडलं असत ? मी ही सासूबाईसारखीच...छे..तिला कल्पनाही करवली नाही.
सासूला शोधत तिच्या खोलीत गेलो. तेव्हा ती पूड कपाटापर्यंत ओतून ठेवण्याची कामगिरी त्यानेच केली होती. या सर्पकुलाच्या संहाराच सामर्थ्य असलेला तो खंजीर, ते पवित्र भस्म ठेवलेली जागा त्याने संकेतांने दाखवली. हे आयुध बाळगण्याचा कानमंत्र देणारा स्वरही त्याचाच ! मला रात्री जागे राहण्याची तंबी देऊन स्वतः राखण करीत बसला.. अशी कशी ही माणसे..यांच्या विषभरल्या हृदयात अचानक माया कुठून निर्माण होत असावी? शेवटी तो कुंकवाचा धनी...त्याला नाहीतर कोणाला आपली दया येणार ?
तिला धन्य धन्य वाटू लागलं. तिने दोन्ही हात सुभाषच्या गळ्यात टाकले. तोच तो म्हणाला...
थांब वृंदा..माझ्यातल विष कित्येक पटीने वाढलंय...तू ते सहन करू शकणार नाहीस. शिवाय याचीही विल्हेवाट लावायची आहे..
दोघांनी मिळून त्या निपचित पडलेल्या शरीराची खांडोळी केली. त्यावेळचा वृंदाचा त्वेष पाहून सुभाष गारच पडला..त्याला नकळत चिंता वाटू लागली. पण ती वेळ विचार करण्याची नव्हती. सर्व काही साफसूफ करणे गरजेचे होते. सकाळी सर्पकुलात प्रचंड गहजब माजणार होता.

पहाट उजडायला थोडाच अवधी शिल्लक होता. गेले काही तास झालेल्या अविश्रांत दगदगीमुळे त्यातही एका दैत्याचा बळी घेण्याची अपूर्व कामगिरी बजावल्याने वृंदा थकून गाढ झोपली होती. तिने त्या पांघरुणात स्वतःला गुंडाळून घेतलं होतं. आपल्यावर कोणाचीही नजर पडू नये अशीच जणू तिची इच्छा होती.
ते दार पुन्हा करकरले. पण यावेळी वृंदाला कसलीच शुद्ध उरली नव्हती. ते जे कोणी होतं, ते मूळ रूपातच आलेलं होतं. शेपटीच्या आधारावर डोलत पांघरुणातील वृंदाच्या डौलदार आकाराला न्याहाळत ते ध्यान उभे होते.
तू कितीही चलाख असलीस तरी शेवटी मर्त्य मानवजातीचीच ना ? तुला सर्पकुलाची माया कशी आणि कधी समजणार ? दीड दमडीची बाई तू..एक खंजीर आणि राख हातात आली म्हणून तुझी मिजास! अग मूर्ख मुली...तो सुद्धा या सर्पकुलाचा एक डाव होता. त्या बावळटाला बक्षीस मिळवायची भलतीच घाई लागली होती. त्याने सर्पकुलाची शिस्त मोडली. इथे त्या सर्वश्रेष्ठ विषधराच्या हुकमाशिवाय कुठलंच शेपूट वळवळू शकत नाही..हरामखोर.. गद्दारीची सजा भोगावी लागली त्याला....तुझ्यासारख्या क्षुद्र स्त्रीच्या हातून मरण पत्करावे लागले त्याला....ती चूक आता होणार नाही. आता गाठ माझ्याशी आहे...

संपूर्ण ताकद एकवटून त्याने वृंदावर फण्याने प्रहार केला. कमालीची ताकद होती त्या दंशात! पांघरुणाच्या चिथड्या झाल्या. त्याचे ते महाभयंकर विषदन्त तलम पांघरुणाच्या सुतात अडकले. ते सोडवण्यासाठी हिसके देत असतांनाच त्याच्या फण्यावर वेगवान प्रहार झाला. आलेली भोवळ निस्तरण्यापूर्वीच त्या फण्यावर जाडजूड वस्त्र गुंडाळले गेले. डोळ्यासमोर काळोख दाटल्याने तो चलबिचल झाला असतांना धारदार हत्याराचे वार त्या वस्त्रासह फण्याच्या चिरफळ्या करीत गेले. सप्प...सप्प..एव्हढा एकच आवाज त्या खोलीत उरला...काही वेळाने शांत झाला. वळवळ निमाली..
कर्म कितीही वाईट असले तरी आपल्या मृत्यूला कोण कारणीभूत ठरलंय हे जाणून घेण्याचा नैसर्गिक हक्क प्रत्येकाला असतो. पण फणा आणि डोकं या दोन अवस्थांच्या मधोमध असलेल्या भागाची शकले झालेल्या सुभाषला ते उत्तर मिळू शकले नव्हते. त्याच्या डोळ्यातले प्रश्नचिन्ह कायम होते !
(क्रमश:)
(क्रमश:)