सर्पकुल -भाग 6- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
अजस्त्र शेपटीवर शरीर तोलून तो उभा होता. त्याचे शक्तिशाली बाहू हवेत पसरले होते. कित्येक वर्षे महाभयंकर विषाचा साठा धारण करून त्याचे संपूर्ण शरीर हिरवेनिळे पडले होते. पण त्या शरीरावर रंगांचे सौंदर्य निश्चितच नव्हते. असूच शकणार नव्हते....भीती निर्माण करणे हाच त्याच्या जगण्याचा हेतू होता... मृत्यूशिवाय आणखी काही दान त्याला ठाऊक नव्हते...वेगवेगळ्या आणि अधिकाधिक क्रूर पद्धतीने आयुष्ये उध्वस्त करणे हेच त्याचे मनोरंजन होते..आणि भोवताली वावरणाऱ्या त्या सर्पकुलाच्या फुत्कारातून निघणारा उष्मा हेच त्याच्या जगण्याचे साधन होते ! अशा त्या जीवाला सौंदर्य कुठून लाभणार ?
आज मात्र तो बेहद्द खुश होता. त्याला आव्हान देऊ पाहणाऱ्यापैकी एकीचा खेळ संपला होता. ती सर्पकुलाच्या धसक्याने गेली नाही याचे त्याला कोण कौतुक वाटत होते. ती तशी गेली असती तर या कुळाच्या पाईकांना त्यांच्या क्रूरपणाचा नमुना कसा दाखवता आला असता ?
या रे माझ्या बाळांनो ! आज तुम्ही पांग फेडलेत माझे...आपल्या कुळाला धोक्यात आणू पाहणारी ही दुर्बळ स्त्री...बघा, तिच्याकडे बघा...कशी तडफडून मेली...तिच्या शरीरात रक्ताचा एक थेंबही शिल्लक नाही. पाहिलंत..ही क्षुद्र मानवजात...हीच ती जात. तुम्हाला पकडून खेळ करणारी..अंगांगात विष घेऊन फिरणाऱ्या आदिम दैवतांना तुच्छ मनोरंजन म्हणून वागवणारी....यांची लायकी तरी काय? एका दंशात ही नष्ट होतात. हीच भीती आपल्याला या पृथ्वीवर निर्माण करायची आहे. ही जमीन यांच्या अशक्त पावलांखाली दबून कलंकित होण्यासाठी नव्हे, तर ताठ फणा ठेऊन तिच्याशी समांतर सरपटणाऱ्या आपल्या सर्पकुलासाठी तयार झाली आहे याची जाणीव त्यांना व्हायलाच हवी...आणि जे त्याला नकार देतील त्यांची अवस्था या बाईच्या कलेवरासारखी होईल हे ही त्यांना सांगा.....तो निर्धाराने बोलत होता. त्याच्या मुखातून शब्दागणिक विष बाहेर सांडत होतं. ते प्रसादासारखं शोषून घेण्याची स्पर्धाच तिथे लागली होती. त्याच्या ध्वनिलहरी ते सर्पकुल तन्मयतेने ग्रहण करत होते.
पत्नीचा मृतदेह हातात घेऊन उभ्या असलेल्या त्या सर्पमानवाकडे त्याने अभिमानाने पाहिले. धन्यता वाटून त्याने फणा झुकवला...तो गरजला.
अशा निष्ठावन्त परंपरेमुळेच सर्पकुलाच्या विस्तारासाठी मी ही जागा निवडलीय.. धन्य आहेस तू आणि तुझे कुल....ऐहिक मोहमाया त्यागून तू प्रत्यक्ष पत्नीचा बळी दिलास...तुला पुरस्कार द्यायला हवा!
शेपटी आणि कंबर जोडणारी जागा त्याने हातानेच फाडली. तिच्यात खोलवर हात घालून बाहेर काढला. त्याच्या मुठीत एक रत्न होते. ते सर्पमानवाच्या हातात देऊन तो म्हणाला...
हे तुला घे..त्याचा उपयोग कसा करायचा ते ऐनवेळी सांगेन !
सर्पकुलासाठी पत्नीचा बळी दिल्याबद्दल मिळालेला तो पुरस्कार त्याने अभिमानाने स्वीकारला. त्याच्या भोवतालचे सर्पकुल भयंकर फुत्कार टाकत त्याचे अभिनंदन करत होते.

वृंदा सैरभैर झाली होती. रात्रभर मिळालेल्या अशुभ संकेतांनी तिची तगमग वाढली होती. कुठेतरी काही अघोरी, अमानवी घडतेय असे तिला राहुनराहून वाटत होते. म्हणून पहाटेच उठून ती सासूच्या खोलीकडे धावत गेली. तिथे कोणीच नव्हते. पलंगावरची गादी ठिकठिकाणी दंश केल्याप्रमाणे उसवून कापूस बाहेर आला होता. त्यावर रक्त सांडल्याने कापसाचे ते बोळे मांसाच्या गोळ्यासारखे दिसत होते. जमिनीवर हिरवट काळ्या द्रवाचा सडा पडला होता. तिथे काय भयंकर घडलं असावं त्याची पुसटशी जाणीव तिच्या अंतर्मनाला झाली..
मानवी मन मोठं विचित्र असतं. समोर कितीही सत्य परिस्थिती उभी असली तरी स्वतःला हवं ते, दिलासा देणारे चित्र कुठेतरी आढळेल ही वेडी आशा पाठ सोडत नाही. वृंदाही काही वेगळी नव्हती. सासू कुठंतरी दिसेल अशाच ओढीने ती वाड्यातल्या या खोलीतून त्या खोलीत भिरभिरत राहिली.

ते तिघे एका बाजूला उभे राहून तिची धावपळ बघत होते. सुभाष तर विशेष उत्साहात होता. तो एकसारखा जीभ आतबाहेर करत होता. त्याचा धाकटा भाऊ मात्र विचारात गुंतला होता. काल रात्री बापाला मिळालेले पारितोषिक त्याच्या डोळ्यात सलत होते. एका क्षुद्र बाईच्या मृत्यूपोटी इतकी मोठी देणगी मिळू शकते ?? या अर्धवट, विक्षिप्त आणि सदानकदा हिडीसफिडीस करणाऱ्या म्हाताऱ्याला ते बक्षीस देण्याची खरेतर काहीच गरज नव्हती..असो.. तसलेच रत्न आपल्यालाही मिळाले पाहिजे...मिळवायलाच हवे ते!!
सगळीकडे शोधूनही सासूचा पत्ता न लागल्याने वृंदा रडवेली झाली. तिचं काहीतरी बरेवाईट झाले असावे आणि त्यामागे या वाड्यातली माणसेच असावीत हे तिच्या मनाशी बिंबवलं गेलं. स्फुंदतच ती सासूच्या खोलीत शिरली. रक्ताचा सडा पडलेल्या त्या पलंगावर बसून तिचा विलाप सुरू झाला. प्रारंभापासून अबोल, कठोर असलेल्या सासूची माया आपल्या गर्भारपणात कशी उमलली, तिने जीव धोक्यात घालून आपली सुटका कशी केली...आणि त्यापायीच जीव गमावला हे आठवून ती अधिकच रडू लागली..
दुःखाचा आवेग ओसरल्यावर तिने खोलीत पाहिले. पलंगापासून एक पातळ पांढरा राखेसारखा दिसणारा थर कोपऱ्यातल्या जुनाट, काळपट कपाटापर्यंत गेला होता. तशा अवस्थेतही तिची उत्सुकता चाळवली गेली. ती पलंगावरून उतरून तिकडे चालत गेली. हलक्या हाताने तिने कपाट उघडले.
साड्यांच्या भाराखाली त्या थराचा काही भाग होता. तिने बलपूर्वक तो भारा वर केला.
भगव्या रंगाची एक पिशवी तिथे ठेवली होती. ती राखेने माखली होती. तिला हात लावू की नये अशा दुविधेत असताना वृंदाच्या कानाजवळ कुणीतरी पुटपुटल...
घे ती...तुझ्यासाठीच आहे !
यंत्रवत वृंदाने ती हातात घेतली..आणि खोलीकडे परतली. दोन हिरवेगार डोळे तिचा पाठलाग करीत होते.

मध्यरात्रीचा प्रहर उलटण्याच्या बेतात होता. तोंडावर पांघरूण घेतलेली वृंदा मात्र टक्क जागी होती. आज काहीतरी घडेल असे तिला राहून राहून वाटत होते.
तिच्या खोलीचे दार करकरले..तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पांघरूण गच्च धरून ती झोपून राहिली. कोणीतरी आत आलं..
तिने हळूच पाहिले. तिचा दीर उभा होता. सर्पकुलासाठी दुसरा बळी घेण्याच्या तयारीत...! तोच अघोरी पवित्रा आणि प्रचंड लालसा....
मानेच्या जागी त्याचा फणा खांद्यातून बाहेर पडू लागला. चेहरा आणि शरीरावर काळे ठिपके तयार झाले. दोन टोकाची जिव्हा वळवळू लागली.

आणि तीच संधी साधली वृंदाने....
पांघरुणात दडवलेल्या त्या पिशवीतलं भस्म मुठीत घेऊन त्याच्या किळसवाण्या शरीरावर उधळले.. प्राणांतिक वेदनांनी तो विव्हळू लागला. त्याचे हात वारंवार फण्याकडे जाऊ लागले. वृंदाने पवित्रा घेतला..
मुठीतल्या खंजीराचे धारदार पाते नुकत्याच बाहेर पडलेल्या त्याच्या फण्याच्या मुळाशी फिरवलं!
सर्पकुलाच्या अतिविषारी वारसांपैकी पहिला धारातीर्थी पडला होता....
तो खंजीर आणि फणा तुटून पडलेलं ते ओंगळवाणे शरीर आळीपाळीने न्याहाळत वृंदा कितीतरी वेळ बसून राहिली...
(क्रमशः)