सायको भाग तिसरा
दुसऱ्या भागाची लिंक👇👇👇👇
शहरातील पोलीस स्टेशन चे फोन खणानु लागले.....सिनियर इन्स्पेक्टर रावसाहेब पाटील स्वतः ह्या केस कडे लक्ष देत होते......6 खून....तेही एकाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी....रावसाहेबांनी तातडीची मिटिंग बोलावली.......सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसत होती....."सायको किलर खतरनाक आहे मागच्या खुनाच्या वेळी गस्त घालणाऱ्या शिंदेंना एक वेड्यावाकड्या अशक्त चालीचा माणूस दिसला होता त्यांनी जास्त चौकशी केली असता तो विचित्र बडबडत होता...शिंदेंनी त्याचा हात पकडताच त्याने एका हाताने शिंदेंना दूर भिरकावले होते.....चर्चा ऑफिस मध्ये रंगली.....रुमालाने अर्धे तोंड झाकलेला तो सायको खूपच अचाट ताकतीचा आहे.....प्रत्येक जण घाबरला होता....
भुताटकीचा प्रकार वाटतोय
कॉन्स्टेबल राऊत यांचा सौम्य आवाज रावसाहेबांच्या पर्यंत पोचला
"शट अप राऊत......पोलिसच अश्या गोष्टीवर विश्वास ठेवू लागले तर कल्याणच आहे......ते काही नाही मिनिस्टर साहेब,मंत्री साहेबांच्या कडून वरून प्रेशर आलं आहे....काहीही करून त्या सायको किलर ला आज पकडलंच पाहिजे.....जास्तीची कुमक मागवली आहे.....लोक घाबरले आहेत.....पुरावा तर काहीच नाहीय आपल्याकडे.....त्या बेवारस भिकारी लोकांना,कामगारांना कश्याला कोण मारेल??.....आता तो कालचा श्रीपती......साधासरळ कामगार होता तो....त्याला सुद्धा.....शीट.... काहीच समजत नाही आहे......पुरावा म्हंटल तर"
अचानक रावसाहेब ताडकन उठले
"ओहहह हा ते त्या सायकोने रक्ताने भिंतीवर ज्या आकृत्या काढल्या होत्या.....त्याच काहीतरी लिंक लावू शकतील........साटम"
"ओहहह हा ते त्या सायकोने रक्ताने भिंतीवर ज्या आकृत्या काढल्या होत्या.....त्याच काहीतरी लिंक लावू शकतील........साटम"
साटम पुढे आले
"येस सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे एका एक्सपर्ट ला घेऊन आलोय....तेच माहिती देऊ शकतील"
"ग्रेट....साटम.....त्यांना लवकरात लवकर घेऊन या...काहीही करून पुढचा खून होता कामा नये....."
जगातील अनेक भाषा एक्सपर्ट उमेश लगेचच हजर झाले....त्यांना आशा होतीच की पोलीस आपल्याला लवकरात लवकर बोलावतील......कारण लुप्त झालेल्या प्राचीन भाषेचा त्यांनी नुकताच अभ्यास सुरू केला होता....त्या रक्ताळलेल्या आकृत्या ते अनोळखी शब्दच खुन्याची ओळख करवून देणार होते....रावसाहेबांनी रक्ताने लिहलेल्या त्या चिन्हांचे फोटो उमेश पुढे ठेवले.....काही वेळ उमेश सुद्धा बुचकळ्यात पडले....ती भाषा ते सुद्धा पहिल्यांदा बघत होते.....
"ईजिप्शियन भाषा वाटते....पण नक्की सांगू शकत नाही....काही शब्द प्राचीन ईजिप्शियन भाषेत आहेत....जसे की हा....ह्याचा अर्थ होतो...."जागे व्हा...जागे व्हा" वारंवार हाच शब्द जास्त वापरला गेलाय....तरी सुद्धा मी हे फोटो माझे अमेरिकेतले मित्र पॉल वॉल्टर यांच्याकडे व्हाट्सअँप करतो तेच ह्याबद्दल जास्त माहिती देऊ शकतील"
उमेश स्टेशन मध्ये बसून पॉल च्या रिप्लाय ची वाट बघत होता....अर्ध्या तासाने उमेशच्या फोन वर पॉल चा फोन आला.....रावसाहेब लांबूनच फोन वर बोलणाऱ्या उमेश कडे बघत होते.....त्यांना आशा होती की नक्कीच काहीतरी सकारात्मक गोष्ट ऐकायला मिळेल....उमेश खूप वेळ पॉल शी बोलत होता....त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. ..तो रावसाहेबांच्या जवळ आला....रावसाहेब मोठ्या आशेने त्याच्याकडे बघू लागले
"काय ......काय समजले उमेश??? काय लिहलं होत त्यात"
उमेश खाली बसला
"रावसाहेब माहिती नाही तुम्ही विश्वास ठेवाल की नाही.....पण पॉल ने जे सांगितलं ते सांगतो.....पॉल म्हणाला की ती एक प्राचीन ईजिप्शियन भाषा आहे ती भाषा एक वेगळा पंथ वापरतात जे सैतानाची उपासना करतात.....ही भाषा तशी निषिद्ध मानली जाते .....आणि ते जे लिहलं होतं.... तो सैतानाला जागृत करण्याचा मंत्र होता.....कुणीतरी आहे की जे सैतानाला खुश करण्यासाठी बळी देत आहे......पॉल ला मी फोटो दाखवले तो म्हणाला 6 आकडा हा सैतानी आकडा आहे आणि 6 बळी दिले गेले आहेत आणि आता अजून एक बळी दिला की सैतान नक्कीच खुश होईल ......आणि तो जो कुणी आहे तो सायको दक्षिण दिशेला आपला शेवटचा बळी देणार आहे...तसा उल्लेख हा बघा हा बाण करतो आहे ... ह्याद्वारे त्याला पकडता येईल"
रावसाहेबांनी आपल्या हातातील काठी जोरात आवळली
"काय दक्षिण दिशा???.....ठीक आहे तर सहाव्या खुना पासून दक्षिण दिशेला सगळी पोलीस फौज तैनात करतो..... शिंदे.... हत्यारबंद माणसे तयार करा......आपली हत्यारबंद माणसे रस्त्यावर वेष बदलून झोपवा..... काहीही करून त्या खुन्याला पकडलं पाहिजेच आणि आज शेवटचा दिवस......सगळे रस्ते.....निर्मनुष्य जागा आणि ते दक्षिण बाजूचे कब्रस्तान.....सगळ्या ठिकाणी आपली माणसं तैनात करा....काही पण करून तो खुनी पकडायचा आहे आपल्याला"
रावसाहेबांनी तयारी झाली होती......ते स्वतः भिकार्याचा वेष घेऊन रस्त्याकडेला झोपले होते....कॉन्स्टेबल ने सांगितलेल्या कहाणी मुळे सगळे जरा दबकूनच होते पण रावसाहेबांच्या निर्णय ठाम होता.....तोंडावर ओढलेल्या चादरीतुन एका छिद्रातून त्यांची नजर समोरच्या रस्त्यावर होती.....जवळपास 12 वाजत होते......सगळी पोलीस फोर्स त्या सायकोची वाट बघत होते....तास झाला तरी कोणीही दिसत नव्हते सोबत वायरलेस सुद्धा शांत होता त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता
कुत्र्यांचे भुंकने सुरू झाले......एक जण तोंडाला रुमाल बांधून जॅकेट ची टोपी डोक्यावर चढवून रस्त्याने चालत होता....मागून 10- 12 कुत्री एकसारखी त्याला भूकत होती.....आज त्यांचे भुंकने जरा जास्तच होते......प्रकाश मुख्य रस्त्यावर थांबला.....चहुबाजूंनी भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे त्याने एक नजर बघितले....त्याची ती भेदक नजर बघून कुत्री सैरावैरा पळू लागली..... कुत्र्यांच्या भुंकण्याने अशांत झालेले वातावरण अचानक शांत झाले......प्रकाशने आपले खांदे उंचावले....दीर्घ श्वास घेतला.....कसला तरी अनोळखी वास त्याला आला.....त्याने आपली नजर आजूबाजूला फिरवली.....एक मोठी बिल्डिंग आणि त्यावर उभा केलेला मोबाईल टॉवर...... प्रकाश ने कसले तरी मंत्र पुटपुटले आणि क्षणार्धात बिल्डिंग च्या कडा....बाहेर आलेले ac ह्यांचा आधार घेत सरसर तो बिल्डिंग वर चढला..... काही वेळातच तो मोबाईल टॉवर वर होता.....त्याने आपल्या जॅकेट ची टोपी मागे घेतली आणि घड्याळाकडे बघितले.....प्रकाश ची नजर दक्षिण दिशेला गेली.......त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले
" साल्यानो....अशी फिल्डिंग लावलीय तर......तुम्हाला किड्या मुंग्या सारखं चिरडून तुमच्या रक्ताची बळी मी सैतानाला दिली असती .....पण काही बंधने मला सुद्धा आहेत....ती पण काही वेळासाठी.....प्रकाश च्या देहाला इजा होणार नाही असं वचन दिलंय मी त्याला.....अजून थोडा वेळ.....महान शक्तींचा मालक होईन मी....तेव्हा तुमच्या हत्यारांचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही....."
प्रकाश ने जॅकेट ची कॅप वर घेतली आणि तो सर्रकन खाली उतरला.....त्याने खाली पडलेला एक दगड उचलला......काही अंतरावर दोन हवालदार पहारा देत होते....तो झपझप त्या दिशेने चालू लागला.....हवालदार चेहरा लपवलेल्या माणसाला बघून घाबरले.....त्याने त्याला थांबायला सांगितले.......पण प्रकाश त्यांच्या दिशेने चालतच होता....एकाने हात उगारला......प्रकाश ने आपल्या ताकतीने काडकन मोडून टाकला......दुसरा हवालदार जरा घाबरतच होता.....प्रकाशने त्याला एक जोराची लाथ घातली आणि त्याच्या छातीवर बसून आपल्या हातातील दगडाने नॉनस्टॉप त्याच्या चेहऱ्यावर वार करू लागला......प्रत्येक वाराबरोबर त्याच्या किंचाळी आणि ते रक्त प्रकाश ला आनंद देत होते..... मागे हाड मोडलेला हवालदार वायरलेस वरून खबर करत होता.....प्रकाश उठला तडफडणार्या हवलंदारकडे बघितले.....रक्ताने माखलेला दगडाला त्याने आपली जीभ लावली.....आपल्या ऐटीत त्याने दक्षिणेकडे आपली पावले वळवली......पोलीस सायरन ऐकू येत होते......सायको गांधी चौकात आहे याची खबर लागताच रावसाहेब पाटील आणि त्यांचे सगळे साथीदार गांधी चौकाकडे येऊ लागले.....प्रकाश ची पावले चालू लागली चालता चालता तो एका ठिकाणी थांबला....समोर मारुतीचं छोटंसं मंदिर होतं..... तो रक्ताळलेला दगड त्याने मारुती समोर ठेवला....आणि मारुती समोर लागलेला दिवा बघून तो आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल खाली घेत म्हणाला
"लवकरच भेट होईल"
सगळे पोलीस त्या हवालदाराच्या मदतीला धावले......शहराबाहेर एका टेकडीवर एक जुना वाडा दिसत होता...दक्षिणेकडे आल्यावर प्रकाश एका जुन्या वाड्यात शिरला.....भकास असा वाडा होता.....एक 60 चा बल्ब त्या हॉल मध्ये चमकत होता.....एवढा मोठा वाडा आणि एकच बल्ब.....होती सगळीकडे शांतता.....एक म्हातारा आराम खुर्चीत बसून काहीतरी वाचत बसला होता......प्रकाश त्या हॉल मध्ये जाताच तो बल्ब मिनमिनू लागला.....त्या म्हाताऱ्याने त्या चालू बंद होणाऱ्या बल्ब कडे बघितले......त्याची नजर समोर गेली.....
"कोण.....कोण हाइसं बाबा....चोरी करायला आलाईस काय??.....बघ बाबा घर हुडकून आणि काही सापडलं तर ह्या म्हाताऱ्याला सुद्धा दे"
पाठीत वाकलेला म्हातारा.....हळू हळू कपटाकडे जाऊ लागला.....त्याने आपल्या डोळ्यावर चष्मा चढवला.....तसा प्रकाश समोरच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागला....गंजलेल्या हिंदोळ्यातून कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज सगळ्या वाड्यात पसरला.....तसा प्रकाशचा भेसूर आवाज त्या खोलीत पसरला
"युद्धवीर........हेच नाव आहे ना तुझं"
तो भेसूर आवाज ऐकून त्या म्हाताऱ्याची हालचाल वाढू लागली.....
"माफ करा....माझं नाव युद्धवीर नाही आप्पासाहेब आहे....तुमचा काहीतरी गैरसमज होतोय"
"नाही नाही नाही.....युद्धवीर...... आप्पासाहेब हे सामान्य लोकांना सांगायला झालं......भूत पिशाच्च दुनियेत तुझं नाव युद्धवीर..... असा युद्धवीर ज्याला अनेक भूत पिशाच्च घाबरत होते....अनेकांना नरकात पाठवलंस.....अनेकांना कैद केलंस.....दैववादी लोकांचा रक्षक बनून राहिलास...खूप किस्से ऐकले तुझ्याबद्दल....पण आता..पण काय मिळालं?? पडका वाडा? ऐन तारुण्यात सोडून गेलेली बायको??मुलांनी तोंड तरी बघितलंय का तुझं???काय मिळालं लोकांची रक्षा करून??त्यापेक्षा आमच्या सैतानी गटात आला असतास तर"
आप्पासाहेब शांत ऐकून घेत होते....त्यांच्या हाताची हालचाल वाढत होती......त्यांची पाऊले हळू हळू मागे फिरू लागली त्यांच्या हातात एक तलवार होती.....त्यांचा हात थरथरत होता....ती तलवार बघून प्रकाश उभा राहिला.....
"वाह....वाह...वाह.....हात थकले पण जोश तोच आहे तुझा......पण आज नाही....आज मी तू मारलेल्या अनेक पिशाच्यांचा बदला घेणार.....आणि.... आणि माझा शेवटचा बळी देऊन सैतानाला प्रसन्न करणार"
हे ऐकून आप्पासाहेबांनी दोन्ही हातानी तलवार पकडली आणि प्रकाश वर वार केला....प्रकाशने तो वार चुकवला त्याने आप्पासाहेबांचा हाथ पकडला आणि ताकतीने पिरघाळू लागला....प्रचंड वेदनेने आप्पासाहेब तळमळत होते त्यांच्या हातातून तलवार खाली पडली.....प्रकाश ने त्यांना जोराची लाथ मारली....ते सरळ त्या खुर्चीवर जाऊन पडले....प्रकाशने पोटाला बांधलेली दोर काढली आणि आप्पासाहेबांना बांधून टाकले.....आप्पासाहेब थरथरत होते....अखेर थरथरत्या अंगातून एक कापरा आवाज बाहेर पडला
"तू येणार ते माहीत होतं....मी मरणार हे सुद्धा माहीत आहे....आणि हे सुद्धा की तुझ्यासारख्या सैतानाचा अंत सुद्धा जवळ आला आहे......"
आप्पासाहेबांच्या तोंडून कसले तरी मंत्र बाहेर पडत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मितहास्य होते ते मंत्र प्रकाशला बैचेन करू लागले....तो सारखं आपले कान झटकू लागला.....प्रत्येक वेळी ह्या अवस्थेत किंचाळी रडू प्रकाशला आनंद देत होते....पण आप्पासाहेबांच्या तोंडात तसे काहीच नव्हते....प्रकाश चिडला...त्याने आपला चाकू काढला आणि आप्पासाहेबांच बोट उडवलं.....रक्ताची धार वाहू लागली..... पण आप्पासाहेब स्थिर होते.....प्रकाश त्या रक्ताने समोरच्या भिंतीवर ईजिप्शियन शब्द रक्ताने लिहू लागला.....आप्पासाहेब स्वतःला सावरत होते.....प्रकाश ला अजूनही काहीतरी मिसिंग वाटत होतं.....सैतानाला खुश करण्यासाठी त्याला बळीच्या किंचाळीची गरज होती.....त्याने आपल्या चाकूने आप्पासाहेबांचे अजून एक बोट कापले......प्रचंड कळा पण आप्पासाहेबांच्या चेहऱ्यावर हसू होत.....सैतानी विधी साठी प्रकाशला ते कोणताही साथ देत नव्हते.....प्रकाश चिडला त्याने सपासप वार करायला सुरुवात केली......आप्पासाहेबांच्या छातीवरचे वाघाचे टॅटू रक्ताने माखले गेले....टीप टीप रक्त गळत होत..काही वेळाने आप्पासाहेबानी मान टाकली....वाड्यात सगळीकडे रक्त.....रक्त बघून प्रकाशला एक वेगळंच समाधान मिळत होते...प्रकाशने आप्पासाहेबांच्या रक्ताने एक सैतानी चिन्ह काढलं होत...त्याला तो नमन करू लागला....... त्याने घड्याळ बघितलं.....सौदा कधीच तुटला होता....चार च्या जागी पाच तास झाले होते.....पण प्रकाशच्या आतील सैतानाला त्याची फिकीर नव्हती.....त्याचे कपडे रावसाहेबांच्या रक्ताने माखले होते
दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोलीस आले....अत्यंत क्रूर पणे सायको ने आप्पासाहेबांचा खून केला होता....समोरच्या भिंतीवर परत तेच काहीसे वेगळे शब्द......पण आज जरा जास्तच लिहले होते.....भाषा तज्ञ उमेश ने लगेच त्याच्या फोटो अमेरिकेत त्याचा मित्र पॉल व्होल्टेर कडे पाठवले.....त्याचे भाषांतर वाचून उमेश थक्क झाला....त्याने आपला मोबाईल इन्स्पेक्टर पाटील त्यांच्याकडे दिला.....प्रत्येक शब्दाबरोबर त्यांचे डोळे विस्फारत होते
"हे सैताना.....तुझी साधना पूर्ण झाली.....मला शक्ती दे.....अशी की जिला कुठलेच बंधन नको.....असा ताकतवान बनव की तुझ्या राज्यात सगळ्यात महान योद्धा मीच असलो पाहिजे....ही सातवी आणि शेवटची....ज्याने आपले कार्य वाढवणाऱ्या आपल्या दैत्याना मारून टाकले होते.....असा माणसाची बळी तुला देत आहे.....जागा हो......जागा हो.......ये सगळी बंधने तोडून नरकातून"
उमेशने रावसाहेबांच्या हातातून मोबाईल काढून घेतला
"रावसाहेब हे प्रकरण हलक्यात घेऊ नका.....सैतानी शक्तींचा दुसरा भाग सुरू झाला आहे....ते आपल्या मालकाला जागं करत आहेत.....परिणाम सगळ्यांना भोगायला लागतील......हे पूर्वी घडून गेलं होतं.....आपल्यातीलच काही आस्तिक लोकांनी सैतानाला पराभूत केलं होतं....पण ह्यावेळी त्याचे उपासक आपल्या मालकाला ताकत देत आहेत तुम्ही ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करा"
(क्रमशः)
(क्रमशः)