गायब भाग ४ था
लेखक : #अनुप_देशमाने
त्या दोघी चालत चालत निघाल्या पोलीस स्टेशन फारसे काही लांब नव्हते त्यामुळे त्या चालतच निघाल्या...एव्हाना त्या पोलिस स्टेशन मध्ये पोहचल्या देखील...
ठाणे अंमलदार : बोला ताई काय काम आहे??
सून : सर माझे सासरे घरातून काल गायब झाले आहेत अजून पण घरी पोहचले नाहीत.. वाट पाहून मग आम्ही येथे आलो.
ठाणे अंमलदार : बसा पाणी घ्या...म्हणत त्यांनी त्या दोघीना पाणी दिले... साहेब आताच बाहेर गेले आहेत महत्वाच्या कामानिमित्त, ते येतीलच आता मग त्यांच्याशी बोलून आपण FIR करू...तुम्ही येथे बसलात तरी चालेल...
सून : धन्यवाद सर आम्ही बाहेरच बसतो म्हणत त्या दोघी उठून बाहेर बसल्या...
….........................
मिसेस नेने : किती नशीबवान आहोत आम्ही तुझ्या सारखी सून मिळाली आहे आम्हाला म्हणत त्या रडू लागल्या....
सून : आई मी तुमची सून नसून तुमची मुलगी आहे ओ असे नका म्हणू.....
ह्या दोघी आता साहेब यायची वाट बघत होत्या तेवढ्यात सुनेने कामवाली ला फोन लावून सांगितले की रिंकू ला आज तिच्या घरी घेऊन जा म्ह्णून...
मिसेस नेने : का ग रिंकू ला कशाला पाठवले तिच्या घरी..
सून : अहो आपल्याला उशीर झाला तर नको ना म्हणून म्हणले आणि आपण लवकर गेलो तर रिंकू ला घेऊन जाऊ घरी..
तेवढ्यात साहेबाची गाडी आली आणि गाडीतून साहेब उतरले लागोलाग हवालदार आणि त्यांनी पकडलेले काही आरोपी... साहेब थोडे जास्तच रागात होते... म्हणून लगेच त्यांना जाऊन बोलावे बरे नाही वाटणार म्हणून त्या दोघी थोडावेळ तशाच बसल्या...आतून जोर जोरात साहेब त्या आरोपींना ओरडण्याचा आवाज येत होता... आणि अचानक काही हवालदार बाहेर येऊन त्यांनी गाडी काढली आणि पोलीस स्टेशन च्या बाहेर पडली...आजचा दिवस काही ठीक नाही वाटत असे मिसेस नेने म्हणू लागले पण मिस्टर चा शोध घेण्याचा हा एक शेवटचा मार्ग होता म्हणून त्या तशाच बसून राहिल्या...काही वेळ नंतर ते हवालदार आले आणि त्यांनी त्या भिकाऱ्याला उचलून आणले.... आता त्या भिकाऱ्याला बघून सून बाईच्या चेहऱ्यावरील भाव बदलले... तिला घाम फुटला तिला काहीच कळेना गेले आता काय होणार म्हणून... ती आता बोलणार एवढ्यात ठाणे अंमलदार यांनी त्यांना हाक मारून सांगितले की साहेब बोलवत आहेत म्हणून.... घाबरलेल्या अवस्थेत असणारी सुनेला नीट चालता येईना... कशी बशी ती साहेबाच्या केबिन मध्ये गेली तिच्या सोबत मिसेस नेने पण होत्या...
साहेब : या बसा कोण गायब झाले आहे आपल्या घरातले
मिसेस नेने : माझे मिस्टर रावसाहेब नेने कालपासून ते गायब आहेत घरातून गायब झाले आहेत.. आणि ते जेव्हा पासून गायब झाले तेव्हा पासून घरात एक विचित्र प्रसंगाशी आम्ही सामोरे जात आहोत...
साहेब : कसला विचित्र प्रसंग
नेने : कोणीतरी अमानवीय शक्ती आमच्या घरी आहे आणि तीच हे सर्व करत आहे असा भास होत आहे... त्या शक्ती मुळे आम्ही काल झोपलो देखील नाहीत...
साहेब : ह्यांचा काय परिचय... सुनेकडे बोट करत म्हणाले
नेने : ही माझी सून... सून कुठली मुलगीच माझी
साहेब : मग त्या एवढ्या का घाबरल्या आहेत
नेने : आम्ही कधीच पोलीस स्टेशन ची पायरी चढलो नाहीत ना त्यामुळे बिचारी घाबरली आहे...
हवालदार पळत आला आणि म्हणाला : साहेब तुम्ही म्हणल्याप्रमाणे तो भिकारी बोलता झाला त्याने त्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही कारण तो म्हणतो की ती व्यक्ती त्याचा जीव घेईल...
साहेब : त्याला आता माझ्या समोर आणा...
सूनबाईला ठसका लागला .... साहेबांनी त्यांना पाणी प्यायला दिले...
एवढ्यात हवालदाराने त्या भिकाऱ्याला साहेबाच्या समोर घेऊन आला... भिकाऱ्याकडे बघून सून आपले तोंड लपवू लागली पण भिकाऱ्याने तिला पाहिले होते.... आता राहिला प्रश्न भिकारी काय बोलणार याचा.... साहेब खुर्चीवरून उठले आणि तडक त्यांनी त्या भिकाऱ्याचा मुस्काटात दिली...भिकारी पोपटासारखा मिटू मिटू बोलू लागला... त्याने घडलेले सर्व प्रकार सांगितले, एक नाही दोन नाही तर त्याने चक्क 5 जणांना गायब करण्यात मदत केली होती, सर्व गुंता आता हळू हळू सुटू लागला होता... त्याने त्या व्यक्तीचे नाव सांगितले... रमेश कांनोज हे नाव ऐकताच सूनबाईने डोळे पांढरे केले... मघाशी आणलेल्या आरोपी पैकी त्यातील एक रमेश होता....त्याला समोर आनले गेले, साहेब त्याला काय विचारणार एवढ्यात सून बाई जागेवरून उठली आणि तिने त्याच्या मुस्काटात दिली... स्टेशन मधील सर्व जण चक्रावून गेले...
सून : रमेश तू एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतोस....शी आणि मी ही त्यात तुझी मदत केली, किती जणींना तू अश्या जाळ्यात अडकवलं आहेस... किती जणींचा सुखाचा संसार तू मोडला आहेस, अरे वेड्या सारख प्रेम केले तुझ्या वर तुझ्या साठी मी माझ्या सासऱ्याचा........??????? पुढे काय बोलणार इतक्यात तिच्या गालात मिसेस नेने जोरात वाजवली....
मिसेस नेने : काय कमी होते तुला सांग कुठे आहेत ते...
सुनबाई : आपल्या घरातील वरच्या रूम च्या कपाटात आहेत ते बेशुद्ध अवस्थेत😢😢😢😢
साहेब : ताई तुम्ही शांत व्हा... आम्ही यांची पूर्ण चौकशी करतो... तुम्हाला आमचे हवालदार घरी सोडतील,
हवालदार मिसेस नेने ना घेऊन घरी निघाले जाता जाता त्यांनी रिंकू ला घेऊन घरी गेले.... घरी गेल्यावर त्यांनी आधी नेने ना बाहेर काढून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले...
हिकडं साहेब.....
बोला रमा मॅडम काय मिळणार होते तुम्हाला सासऱ्यांचा जीव घेऊन...
रमा : मला पैशाचे अमिश दाखवण्यात आले होते, ह्याला आमचे घर हवे होते त्यासाठी त्याने मला प्लॅन सांगितला होता, त्याने त्या भिकाऱ्याकडून माझ्या सासऱ्याचा हिप्नॉटिझम चा प्रयोग करण्यात आला, मला इंजेक्शन दिले आणि सांगितले की हे इंजेक्शन सासर्याना दे सलग तीन दिवस इंजेक्शन दिल्याने ते कायमचे मृत होतील... आणि त्यानेच मला भुताटकीचा प्रयोग करण्यासाठी सांगीगतले जेणे करून घरातील लोकांना घाबरवून घर सोडण्यास भाग पाडावे म्हणून....😢😢😢
साहेब : पण तुम्ही त्यांना कपाटात कसे घातले...
रमा : मी त्यांना आमच्या कामवलीच्या मदतीने आत घातले...😢😢😢
सर्व प्रकार उघडकीस आला... रमेश ने अशा कित्येक बायकांना फसवून त्यांना गुन्हेगार बनवायचं ठरवलं होतं हे बाहेर आले...पण 5 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे याचा निकाल लागला होता, पण रमा ची यात चूक असल्यामुळे तिला शिक्षा म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी पोलीस स्टेशन ला येऊन हजेरी लावण्यास सांगितले.... साहेबानी घरी येऊन तुमची रमा निर्दोष आहे हे सांगितले.... पण मिसेस नेने नी तिला माफ केले नाही, पण मिस्टर नेने यांच्या काळजी पोटी त्यांनी तिला घरात स्थान दिले होते कारण मिस्टर नेने यांना याबाबतीत काहीच माहिती नव्हते .....
रमा आपली जिवंतपणी मरणयातना भोगत होती.... ती तिच्या डोळ्यात स्वता दोषी झाली होती......
समाप्त
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
(🙏🙏🙏