मध्यंतर (भाग एक )
एक मोठा हॉर्न वाजवत रेल्वगाडी स्टेशनवर येऊन थांबली.दहा मिनिटं झाली तरी गाडी जागची हलेना म्हणून मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर बाहेर कुणीच नव्हतं.दुपारच्या रखरखत्या उन्हात निर्जीव पडलेला जीर्ण, निस्तेज फलाट नजरेस दिसत होता.बाहेर एक चिटपाखरू दिसत नव्हतं.फक्त एक मोडकळीस आलेला बेंच,गंजलेला पाण्याचा नळ आणि धुळीत माखलेली स्टेशनच्या नावाची पाटी.स्टेशनच नावंही अगदी शोभेल असं होतं.आडगाव....स्टेशनच्या आसपास कुठेही वस्ती दिसत नव्हती की एखादं झाड .फक्त उन्हात उघडा झोपलेला जमिनीचा लांबच लांब तुकडा दिसत होता.अगदीच आडबाजूला स्टेशन होतं.रेल्वेचे पत्रे उन्हात तापल्यामुळे आत प्रचंड उकडत होतं.तहानही खूप लागली होती.फलाटावरचा पाण्याचा टाकीचा नळ सुकलेला होता.फेरीवाल्यांचाही काही मागमूस नव्हता.आणि कुणाकडे पाणी मागावे तर डब्यात माझ्याशिवाय कुणीच नव्हतं.खिडकीच्या बाहेर बघून बघून नुसता कंटाळा आला होता आणि त्यात सकाळपासून अचानक मान खूप दुखत होती.घामाने ओला झालेला अंगावरचा शर्ट काढत मी सीटवर डोळे बंद करून जरा वेळ शांत पडून राहिलो.आणि अचानक कुणाची तरी मला चाहूल लागली, टप टप असे बुटांचे आवाज ऐकू आले तसे मी माझे डोळे उघडले आणि पाहतो तर माझ्या बाजूच्या सीटवर एक माणूस उभा होता.हातातली जड bag वर ठेवून आपल्या जाडजूड मानेवरचा घाम रुमालाने दोन्ही हातांनी घासत पुसत होता.आम्ही दोघांनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला आणि तो मला बघत बघतच सीटवर बसला.तर मी त्याला बघत बघत उठत सीटवर बसलो.त्याचं ते चपटे नाक , साडेचार फूट उंचीत शरीरभर गेंड्यासारखं साचलेलं मांस, गोल चेहऱ्यात घट्ट बसवलेले बटाट्या सारखे डोळे आणि त्यात त्याचा गौर वर्ण .उन्हात तापल्यामुळे त्या कातडीचा रंगही तांबडा पडला होता.एकंदरीत कधीही न विसरणार त्याचं ते शारीरिक वर्णन होतं.आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहत स्मित केलं आणि बोलू लागलो.अर्थातच बोलायला सुरुवात त्यानेच केली.कारण मला जास्त बोलायला जमत नाही.मला शांत रहायला आवडत. का ते माहित नाही.मी असाच आहे .पण मला गप्पा ऐकायला खूप आवडतात.पण लोकांना वाटतं मला बोलायला आवडत नाही.शांत लोकांच्या बाबतीत जे पूर्वग्रह असतात तेच माझ्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात आहेत. जास्त बडबड करणाऱ्या लोकांच्या मते शांत हा स्वभाव नसून एक विकृती आहे .खरं तर अश्या लोकांचा मला राग कमी आणि कीवच जास्त येते....
तर ...आपलं स्वतःच नाव शुभांकर गोगटे सांगत त्यान माझ्याशी सरळ गप्पा मारायला सुरवात केली.जेव्हा त्याने त्याच नाव सांगितलं तेव्हा खरं तर मला मनातून खूप हसू आलं कारण जेव्हा आपण अनोळखी माणसाला पहिल्यांदा भेटतो , बघतो तेव्हा आपण त्याच्या बाह्यरूपावरून काही तर्क लावतो.आणि त्यात महत्वाचा तर्क असतो तो म्हंजे त्या व्यक्तीच आडनाव....तसंच मीही काही अस्सल पुणेरी , कोकणस्थ आडनावं गृहीत धरली होती.आणि माझा तर्क जवळ जवळ बरोबर ठरला...
त्याच्या सदाशिव पेठी मराठीला मुंबईच्या राडेबाज नाक्याची किनार होती.त्याला कारण म्हंजे शुभांकरचे मूळ पुणं असलं तरीही त्याची शारीरिक, बौध्दिक आणि वैचारिक वाढ गिरगावातल्या नाक्यावर झाली होती.आणि अर्थातच हा सर्व इतिहास स्वतः त्यानेच गहन केला तेव्हा मला तो कळला.कदाचित यामुळेच त्याच्या व्यक्तिमत्वात बेदरकारपणा एक दरारा दिसत होता.
भुकेला माणूस जसा अधाशा सारखा जेवतो तसा शुभांकर माझ्याशी असंबध्द बोलू लागला.हा ,पण स्वतःबद्दल सांगताना तो माझीही अधून मधून माहिती विचारत होता आणि मीही कसले आडेवेडे न घेता स्वतःबद्दल सगळं खरं सांगत होतो.माझ्या मोकळ्या अंगठी बोटाकडे बघत तूम्ही अविवाहित आहात का असं विचारलं तेव्हा मला त्याच खूप कौतुक वाटलं.एकंदरीत माझी शुभांकर बरोबर गट्टी चांगली जमली होती.
गेली तीन वर्षे झाली घरातले माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत असं जेव्हा मी त्याला म्हणालो तेव्हा त्याने ऑ करीत विचारलं,शोधत आहेत म्हंजे ?तुम्हांला अजुन मुलगी भेटली नाही की पसंत पडली नाही?त्यावर मी त्याला म्हटलं "अहो मला भेटलेली प्रत्येक मुलगी मला आवडली.
शुभांकर -मग ?
मी -पण मी त्यांना आवडलो नाही ना असं म्हणताच आम्ही दोघं जोरजोरात हसू लागलो.
शुभांकर- स्वतःच हसू आवरत बोलू लागला.म्हंजे एकंदरीत तुमचं पण माझ्यासारखेच आहे.
मी -माझ्यासारखे?म्हंजे तूम्ही पण अजुन अविवाहित....
शुभांकर- (बोटातली अंगुठी दाखवत)नाही ओ, माझा पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालाय आणि उद्या संध्याकाळी माझं लग्न आहे.
मी -ohhhh कंग्रेजुलेशन्स mr गोगटे.
शुभांकर-अहो मला सुद्धा तुमच्यासारखी तीन वर्षे लागली.मी तर बाशिंद बांधून तयारच होतो पण मला कुणी पसंदच करत नव्हतं.शेवटी संपदाला मी आवडलो आणि आमचं लग्न ठरलं.
मी -चला म्हंजे तुमची गाडी रुळावर आली
शुभांकर -तुमची पण येईल.नियती आहे ना.नियतीने नक्कीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी ठरवलं असणार.असं नाहीतर तसं .वेळ आली की तुमचीपण गाडी रुळावर येईल
मी -हो,पण वीस मिनिटं झाली तरी आपली गाडी काही रुळावरून हलत नाहीए.
शुभांकर -मला वाटलं होतं बहुतेक मला गाडी मिळणार नाही पण एसटीतून उतरून पाहतो तर गाडी स्टेशनवर नुकती येत होती कसंबस ओझं घेत track वरून धावत आलो.ही गाडी चुकली तर दुसरी गाडी उद्या दुपारची होती.आणि त्यात उद्या माझं लग्न.म्हटलं कठोर तपश्चर्या नंतर माझं लग्न जुळतंय त्यात आता आणखी खोडा नको.कसंही करून ही गाडी पकडायचीच.आयुष्यात पहिल्यांदा एवढं धावलो असेन.
मी - अच्छा..पण मला सांगा तूम्ही या गावात ?नाही म्हंजे उद्या तुमचं लग्नय आणि तूम्ही इथे काय करताय ?
शुभांकर -अहो त्याच काय झालं माझी मावशी इथून पन्नास किलोमीटर आत टेंबे गावात राहते.तिला पत्रिका द्यायला गेलो होतो.मी पण इथे पहिल्यांदा आलोय.त्याचं कसंय वडील लहान असतानाच वारले त्यावेळी घरची परिस्थिती खूप बेताची होती.त्यावेळी मावशीन खूप मदत केली होती म्हणून आईनं सांगितलं की कसंही करून सुलभा मावशीला घरी जावून पत्रिका दे.बिचारीला लकवा मारल्यामुळे सध्या ती बिछान्यावर पडून असते .एकुलता एक मुलगा आहे तो घेतो तिची काळजी.
मी -म्हंजे एकंदरीत तुम्हांला लगीनघाई झालेली आहे.
शुभांकर -हा हा हा असंच समजा हवं तर ......अरे हो मगासपासून आपण एकमेकांबद्दल एवढं बोलतोय पण मी तुमचं नावच विचारलं नाही.मघापासून मी अहो अहो करतोय .
मी-अहो,अहो हे नावही चांगलंय.नाहीतरी आजकाल छोटी नावं असतात.त्यात हेही ...
दोघंही हसू लागलो ..
मी-माझं नाव राघव पंडित .
शुभांकर -पंडित ?
मी -का .काय झालं ?आडनाव आवडलं नाही का ?
शुभांकर -अरे नाही तसं नाही.सॉरी हा
मी -अरे शुभांकर its ok .अहो जाओ करायला आपण काही वार्धक्याकडे झुकलो नाहीए.चांगले तरुण आणि समवयस्क आहोत.मला एकेरी बोलणंच खूप आवडतं त्यामुळं आपण अरे तू रेच बोलूया.....बोल
शुभांकर -म्हंजे मला म्हणायचं होतं की तुला पंडित आडनाव शोभत नाही.
मी -haaaaaa haaa i know कारण मला भेटलेला प्रत्येक व्यक्ती असं बोलतो.
शुभांकर -म्हंजे ?
मी -हेच की मी मराठी वाटत नाही.
शुभांकर -हो हो अगदी बरोबर.चेहऱ्यावरन तू ख्रिश्चन दिसतोस.म्हंजे तुझ्या व्यक्तिमत्वाला पंडित हे आडनाव शोभत नाही
मी-डिमेलो चालेल का ?किंवा फर्नांडिस ?..
शुभांकर -उत्तम ...haaa haa haaa मी तर म्हणतो तू रोज आडनावं बदल .फ्रायडेला फ्रान्सिस , मंगळवारी मेंडोंसा.आठवड्यातले सात दिवस वेगवेगळे आडनावं लाव .कुणीही डोळे मिटून विश्वास करेल ......
प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी खास मित्र असतोच.पण माझ्या आयुष्यात तसं कुणी नव्हतं.म्हंजे तसे मित्र मैत्रिणी होते पण ते कधी खास नव्हते.पण त्यादिवशी केवळ तीस मिनिटात आमच्यात एक छान घट्ट मैत्री झाली.त्यादिवशी मला एक खास मित्र भेटला ...
शुभांकर-नाही,माझं ठीकय म्हंजे मी दिसायला हा असा त्यामुळे मला पाहून मुली 180च्या कोनात नाक फिरवत नापसंती दर्शवीत होत्या.पण तुझं तसं नाहीए.राजबिंड्या नसलास तरी चांगला देखना आहेस,शिक्षित आहेस, स्वतःच घर आहे , माझ्यासारखा एकुलता एक आहेस आणि सर्वात महत्वाच म्हंजे फिट आहेस आणि तरीही तुला अजुन मुलगी भेटली नाही?
मी -hmm खरंय .पण तू म्हणतोस तसं नियतीनं माझ्यासाठी काही ना काही ठरवलं असणारच .कदाचित यासाठीच आपली भेट घडवून आणली असेल....
शुभांकर -पण मी नियती वगैरे असं काही मानत नाही.
मी -अरे, पण तूच तर मघाशी म्हणालास
शुभांकर -अरे ते मी सहज बोलून गेलो.
मी -ok
शुभांकर -कसंय ना राघव हे नियती,योगायोग हे फक्त पुस्तकात असतात खासकरून त्या गूढकथांमधे.आणि काय आहे ना हे असले शब्द या गूढकथा लेखकांनीच जन्माला घातले आहेत.मुळात असं काही नसतंच रे.
मी-अच्छा म्हंजे आम्ही गूढकथा लिहिणारे निष्क्रिय लेखक आहोत तर ..
शुभांकर -एक मिनिट.आम्ही म्हंजे?म्हंजे तू लेखक आहेस ? गूढकथा लेखक ?
मी शुभांकरकडे पाहत होकारार्थी मान हलवली तसं तो मोठ्याने हसू लागला..
शुभांकर-haaaaaaa आयला कसला भारी योगायोगआहे.नै,आता माझा विश्वास बसला की योगायोग असतात .आणि तो साक्षात माझ्या समोर बसलाय माझ्याशी गप्पा मारतोय haaaa haaaa आवडलं आपल्याला ....म्हंजे तूही ते तसंच लिहितोस का ?
मी - तसंच म्हंजे ?
शुभांकर -अरे म्हंजे ते कातर वेळ , लुकलुकणारे दिवे ,काळोखी रात्र ,पानांची सळसळ,वाऱ्याचा घुघू आवाज, आणि काय ते"हा" जाळीतून सूर्यकिरण आत येत होते.खिडकीत नक्षीदार वेली असं बरंच काही (हे सर्व सांगतांना शुभांकरला हसू आवरत नव्हतं )
मी - नाही, मी असं जुन्या पद्धतीच लिहीत नाही.मी वाचकाला डायरेक्ट कथेत घेऊन जातो.कारण तसं विस्तृत वर्णन वाचायला मलाही खूप कंटाळा येतो माझ्यामते कथा काय घडतेय हे महत्वाचं असतं.ते जुन्या पद्धतीच लिखाण मी मानत नाही.माझ्या कथेत भूत हे ओशाळलेल,रक्तानं माखलेले,नखं वाढलेलं विद्रुप नसतं.
शुभांकर -मग लिहितोस तरी काय ? नाही म्हंजे भयकथा म्हटलं की हे सगळं आलंच.
मी - मी भयकथा लिहीत नाही, मी गूढकथा लिहितो.
शुभांकर -हो, पण दोन्ही एकच झालं ना..
मी - नाही.माझ्या मते भयकथा म्हंजे त्यात फक्त भीती
असते तर गूढकथेत भितीच्या सावटाखाली अतर्क्य गोष्टीं घटनांचा घेतलेला मागोवा असतो.
शुभांकर -बरं.अच्छा मला सांग जेव्हा तुझा कांदे पोहेचा कार्यक्रम असतो
मी - काय ?
शुभांकर -अरे जेव्हा तू मुली बघायला जातोस तेव्हा तू सांगतोस का की तू लेखक वगैरे आहेस म्हणून
मी - हो अर्थातच.का काय झालं ?
शुभांकर -मग तर तुझं खूप कठीण आहे
मी - कशाबद्दल ?
शुभांकर -लग्नाबद्दल ..
मी - काय ?
शुभांकर -हो खरं तेच सांगतोय.अरे राघव एक वेळ नटाच,संगीतकाराच,इतकच काय तर चोर,दरोडेखोराच,अट्टल दारुड्याच लग्न होईल आणि होतात ही पण लेखकाचं? खूप कठीण आहे.
मी - मी हसून म्हणालो )पण का ? म्हंजे लेखक हा एवढा निरुपयोगी आणि टाकाऊ आहे का ?
शुभांकर -एकवेळ तू वृतपत्रासाठी फुटकळ लेख लिहिणारा असतास तरी काही हरकत नव्हती पण तू तर कथा लिहिणारा आणि त्यात गूढकथा लेखक तरी बरंय सरकारी नसली तरी नोकरी आहे.
मी -नाही ,माझा नोकरी सोडायचा विचार आहे.जवळ जवळ सोडली आहे म्हण.उद्या तसं मी ऑफिसात लेटर देणार आहे
शुभांकर -काय ? ए बाबा एकतर तू तिशी पार केली आहेस त्यात नोकरी नसेल तर कोण मुलगी तयार होणार लग्न करायला? हा,एकवेळ तुझ्या सोज्वळ चेहऱ्याकडे पाहून एखादी तयार झालीच पण तिच्या बापाचं काय?तो तैयार व्हायला हवा ना.
मी - खूपच निगेटिव्ह आहेस तू.माणसानं कसं नेहमी आशावादी असायला पाहिजे.
शुभांकर-आशावादी ?
मी - होय
शुभांकर -तुला सांगू का कोकणस्थ माणसाने फक्त आंबे, काजू,फणस आणि पावसाच्या बाबतीत आशावादी असायला हवं.पोरींच्या बाबतीत नाही.
मी - का ?
शुभांकर - अरे का म्हंजे काय ?
मी -कोकणात कांदेपोहे बऱ्याच ठिकाणी खाल्ले बहुतेक
शुभांकर -हो तर, रत्नागिरी पासून ते अगदी दोडामार्ग पर्यंत फिरलो.पण कुणालाच पसंत पडलो नाही.
मी - का ?पुण्यात काय प्रॉब्लेम होता? हा.तिथं तर तुला उभंही केलं नसणार.N R I नाहीयेस ना तू म्हणून.पुण्यात बहुतेक मुलींना नवरा हा N R I हवा असतो.तोही बिसिनेसमेन....अच्छा मला सांग ही मुलगी कुठे भेटली ?
शुभांकर -ते,ते आपलं हे
मी - हा हा तेच विचारतोय कुठे?ते ते काय करतोयस
शुभांकर - अरे ते इथे चिपळूणला
मी - काय? म्हंजे आपल्या कोकणात ?
शुभांकर लहान मुलासारखा होकारार्थी मान हलवू लागला तसं मी जोरजोरात हसू लागलो
मी -पाहिलंस शेवटी आमच्या कोकणातलीच मुलगी तुझ्याशी लग्न करायला तैयार झाली.शुभांकर खरंच कमाल आहे तुझी क-मा -ल.असो ..पुढे तुझ्या सोबत कुणीतरी आहे हे चांगलं नाहीए का? मग ते पुणे नाहीतर कोकण का असेना? आयुष्याचा पुढचा प्रवास तुला एकट्याला करायचा नाहीए हे तरी माहितीये तुला.माझ्यासारखे अधांतरी नाहीए आयुष्य.शुभांकर,कितीही एकटं रहायचं ठरवलं तरीही अंधारातल्या प्रवासात आपला हात आपोआप कुणाचा तरी हात शोधतोच
शुभांकर - ए आता तू निगेटिव्ह होतोयस.माणसानं कसं आशावादी असलं पाहिजे.
मी- हे तू बोलतोयस ? ग्रेट ....
शुभांकर -बोलावं लागतंय मला .
मी -अरे मी काही निराशावादी नाहीए.पण मुळातच मला लग्नसंस्था मान्य नाहीए.
शुभांकर-मग तीन वर्षापासून तू लग्नासाठी स्थळ का शोधतोयस? एवढा खटाटोप कशासाठी?
मी - माहित नाही.
शुभांकर-अरे माहित नाही म्हंजे काय ? मला सांग तुला नक्की काय करायचंय? एका बाजूला तुला लग्न करायचंय तर दुसरीकडं तू लग्नसंस्थाच मानत नाही.मला काही कळत नाहीए.जरा नीट सांगशील.
मी - मला ते सौंदर्य बघून ,आर्थिक बाजू बघून,तडजोड करून ठरवलेलं लग्न मान्य नाहीए.आणि याच निकषांवर हल्ली प्रेमविवाह ही होतात.नाही म्हंजे आर्थिक बाजू ही महत्वाची असतेच पण वैचारिक बुद्धिमत्तेच काय ?आर्थिक सुबत्तेवरून माणसाची बौद्धिक पातळी श्रेष्ठ ठरत नाही ना.जिथं भौतिक सुखं ही फक्त आर्थिक निकषांवर आधारित असतात तिथं वैचारिक स्वातंत्र्याला काही किंमत नसते.तिथं असते ती फक्त घुसमट,कुरघोडी,आणि चढाओढ.इथे फक्त एकमेकांचे विचार,मतं एकमेकांवर लादले जातात.आणि यांतून नात्यात जी खोल पोकळी निर्माण होते ती कधीच भरून निघत नाही.आणि शुभांकर मी हे सगळं पुस्तकी बोलत नाहीए तर मी हे पाहिलंय.माझ्या आजूबाजूला , आमच्या परिवारात अशी बरीच उदाहरणं पाहिलीयत.फक्त आर्थिक बाजु बघून भौतिक सुखाची कल्पना करत योग्य वयात जोडीदाराची निवड केलेल्या सगळ्याच नाही पण बऱ्याच मित्र मैत्रिणींची घुसमट पाहिलीय मी.मला हे असं घुसमटलेल गढूळ आयुष्य नकोय.
शुभांकर-hmm तू बोलतोयस त्यात तथ्य आहेच कारण वैचारिक स्वातंत्र्य हे असायलाच हवं.आणि एकमेकांच्या विचारांचा,मताचा आदर असायलाच हवा.मग तो विचार आपल्याला कितीही चुकीचा आणि निरर्थक वाटला तरीही.कारण आपली वयक्तिक मतं,विचार हे सगळ्यांनाच पटतात असं नाही.दुसऱ्याची मतं,विचार हे आपल्याला नेहमीच तकलादू वाटतात.आणि आपण तसं बोलून गेलो की समोरचा आतून दुखावला जातो.नात्यात विश्वासार्हता टिकवायची असेल तर एकमेकांबद्दल आदरभाव असायला हवा.थँक्स
मी -कशासाठी ?
शुभांकर -अरे थँक्स यासाठी की उद्या माझं लग्नय आणि आज मला तुझ्यामुळे सुखी संसाराचं सूत्र सापडलं.
मी -सूत्र वगैरे काही नाही रे.खूप सोप्पं, सरळ आहे.पण तेवढंच कठीण.
शुभांकर -हम्म खरंय....बरं मला सांग तुला कशी बायको हवीय.नाही म्हंजे तूही काही ठरवलं असशील ना ..
मी -होय...शुभांकर मला अशा मुलीशी लग्न करायचंय जी मी काही म्हंजे काही नसताना माझ्याशी विवाह करायला तयार होईल.
शुभांकर-काय ?
मी- होय..
शुभांकर -काही नसताना म्हंजे ?तुला म्हणायचंय काय ?
मी -मला असं म्हणायचंय की आज माझी आर्थिक बाजु थोडी कमकुवत आहे पण पाच वर्षांनंतर किंवा एक वर्षानंतर ती तशीच राहणार नाही ना.हे बघ शुभांकर प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायची असते.बरोबर ?
शुभांकर -हो बरोबर .
मी - तसंच मलाही माझी प्रगतीच करायचीय,मलाही पुढं जायचंय.आणि मी जे क्षेत्र निवडलय ते चुकीच किंवा अनैतिक नाहीए ना.हा हे क्षेत्र बेभरवशाच आहे.पण मी या क्षेत्रात पुढं जावू शकतो हे मला माहितीये.आणि मला पुढेच जायचंय.हाच विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी काही नाही.सुरुवातीची काही वर्षेतरी थोडी कठीण असतील पण त्याही कठीण परिस्थीतीत तिला मी आनंदी ठेवू शकतो हे मला माहित्येय.हाच विश्वास तिलाही माझ्याबद्दल असायला हवा.
शुभांकर -राघव मग तुझं खरंच खूप कठीण आहे.
मी - का ?
शुभांकर -तुला अशी मुलगी भेटणं म्हंजे कठीणच आहे
मी - का कठीणय ? नै आता तुझंच उदाहरण घे.
शुभांकर -माझं?
मी -हो तुझं.गेल्या तीन वर्षात तुला कितीतरी मुलींनी नकार दिला कारण तू त्यांना आनंदी ठेऊ शकशील याबद्दल त्या साशंक होत्या.मुळात त्यांना स्वतःवरच विश्वास नव्हता की त्या तुझ्याबरोबर आनंदी राहू शकतील.पण आता ज्या मुलीनं तुला होकार दिला...मगाशी काय नाव सांगितलंस तिचं?
शुभांकर -संपदा,संपदा जोगळेकर .
मी -हा,संपदा.तुला भेटल्यावर,तुझ्याशी बोलल्यावर संपदाला आतून कुठंतरी एक तीव्र जाणीव झाली असेल की मी शुभांकर बरोबर आनंदी राहू शकते.किंवा हा मुलगा मला सुखी,आनंदी ठेऊ शकतो.मग भलेही तू आज गिरगावात 1bhk मधे राहत असशील पण कुठंतरी तिला विश्वास वाटला असेल की पुढं तू कार्टर रोड, पाली हिलला 2bhk flat घेऊ शकतो.
शुभांकर -राघव,गिरगावातला मराठी माणूस एकतर डोंबिवलीत नाहीतर बदलापूरला शिफ्ट होतो.
मी -बरं ..मग तूही बदलापूरला 2bhk flat पुढं घेशीलच.
शुभांकर -मी का जावू गिरगाव सोडून?अरे मी अस्सल गिरगावकर आहे मी,गिरगावकर.मी गिरगाव सोडून कार्टर रोडला पण जाणार नाही.
मी -बरं नको जावू.पण तू पुढे स्वतःची आणखी प्रगती करशील यावर संपदाचा ठाम विश्वास आहे म्हणून तिने होकार दिला.पटतंय का मी काय सांगतोय ते ?
शुभांकर-हो,हो,हो.राघव तू अगदी बरोबर बोलतोयस.पटलं मला.आता मलाही तुझ्याबाबत विश्वास वाटतोय की तुलाही लवकरात लवकर संपदा सारखी चांगली समजूतदार मुलगी भेटेल.मी तर म्हणतो तुला ती मुलगी आज भेटली असं समज.चल,आपण मस्त तांदळाचे लाडू खाऊन आनंद साजरा करूया.आज सकाळीच मावशीच्या सुनेनं बनवून दिले.खूप छान बनवते.आणि राघव मी योगायोग वगैरे काही मानत नाही पण आपल्या भेटण्याचा हा जो योग जुळून
आलाय ना मला तो खूप आवडला.माझ्याकडून तुला लाख लाख शुभेच्छा.
तांदळाचे लाडू खात खात आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरूच होत्या पण अजुन गाडी काही चालू होत नव्हती.आणि माझं मानेतल दुखणं ही कमी झालं नव्हतं.गप्पा मारता मारता आमचा मोर्चा पुन्हा गूढ गोष्टींकडे वळला.आणि अर्थातच तो मीच वळवला कारण मला गूढ गोष्टी घटनांवर चर्चा करायला,बोलायला खूप आवडतं...
.. क्रमश .
भाग १ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_18.html
भाग २ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_79.html