कथेचे नाव:- सख्खी बहीण पक्की वैरी
लेखिका :- ज्योती पवार.
ही कथा आहे दोन बहिणींची.
सायली 23 वर्षाची तरुणी आपल्या लहान बहीण साक्षी सोबत राहत होती.
साक्षी लहान असतानाच आई वडील एका अपघातात गेले.
आई वडिलांनंतर सायली च साक्षी ची सर्व काही झाली.आई वडील दोन्ही भूमिका ती बजावत होती.स्वतःच शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करून तीने साक्षी ला लहानाची मोठी केली .दिवस कसे मजेत जात होते.साक्षी ही आता मोठी झाली होती.
शिक्षण पूर्ण करत होती.
साक्षी च इंजिनिअर च पाहिलं वर्ष चालू होतं .
आणि सायली च्या आयुष्यात तिचा शाळेतील मित्र विहान आला.विहान हा अगदी शाळे पासून चा जवळ चा मित्र.विहान हा श्रीमंत घरातील मुलगा. आई वडील मोठ्या पदावर कार्यरत होते.त्यामुळे घरात सगळ्या सुखसोयी होत्या.विहान जरी लाडात श्रीमंतीत वाढलेला असला तरी. त्याच्यावर संस्कार खूप चांगले झाले होते.सगळ्यांना आवडेल असा विहान मीळून मिसळून राहायचा .खूप स्मार्ट हँडसम असलेल्या विहान ला पाहून खूप पोरी त्याच्या मागे होत्या.पण विहान च मात्र वेगळंच त्याला लहानपणी पासून च सायली आवडत होती. सायली ही दिसायला होती तशी कोणालाही सहज भुरळ पाडेल अशी देखणी.
विहान तर पूर्ण तिच्या प्रेमात पडला होता. पण 10th झाल्यानंतर त्याच्या वडिलांची बदली अमेरिकेला झाली .त्यामुळे त्याला तिकडे जावं लागणार होतं .सायली चा निरोप घेऊन तो पुढील शिक्षणासाठी अमेरिके ला गेला काही वर्षांनी तो भारतात आला.अमेरिकेत गेल्या पासून त्याला सायली ची खूप च आठवण येत होती.कधी एकदा सायली ला मनातलं सांगतो याची तो वाट पाहत होता .आणि एक दिवस तो भारतात आला आणि त्याच्या आशा पल्लवित झाल्या.
सकाळी सगळ आवरून तो सायली ला भेटायला गेला.सायली ही त्याला पाहून खूप खुश झाली.साक्षी कॉलेज ला गेलेली असल्याने तिला यायला खूप वेळ होता.त्यामुळे दोघेही मस्त चहा घेत गप्पा मारत बसले होते.सायली ला ही मनातून विहान आवडत होता .पण मैत्री तुटेल या भीतीने तिने मनातच ठेवायचं ठरवलं .बोलता बोलता विहान ने तिला विचारलं, सायली तुझ्याशी काही बोलायचे आहे उद्या बाहेर जाऊ या का.सायली ने ही होकार दिला. आणि दोघेही दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले.थोड्या वेळाने साक्षी घरी यायची वेळ झाली.तशी सायली जेवणाच्या तयारी ला लागली. विहान ला ही बोेलली आता आलाच आहेस तर जेऊन च जा पण विहान तिला उद्या येतो असे सांगून निघून गेला.विहान गेल्यावर सायली ने काम आवरून घेतली.आणि साक्षी ची वाट पाहता पाहता ,विहान चा विचार करू लागली. की काय बोलायचे असेल याला आपल्याशी.खरच तो ही प्रेम करत असेल का आपल्यावर. अशा एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. साक्षी आल्यावर दोघींनी पण जेवण केले.सगळं आवरता आवरता संध्याकाळ झाली.रात्र झाली तरी सायली च्या मनातील वादळ काही केल्या कमी होईना.
दुसरा दिवस उगवला.साक्षी कॉलेज ला गेले जाताना सायली ने तिला कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले व यायला पण उशीर होईल तू जेवण करून घे.असे सांगितले .व दोघीही एकमेकिंचा निरोप घेऊन आपल्या वाटेने निघाल्या. इकडे विहान आला व सायली ला घेऊन बाहेर गार्डन मध्ये जाऊन बसले.
थोडा वेळ दोघेही शांत च कोणाला काय बोलावे कळत नव्हते. नंतर सायली ने च बोलावं म्हणून विचारलं विहान काय बोलायचं होत माझ्याशी तेव्हा मात्र विहान थोडा बुचकळ्यात पडला हिला मनातलं सांगावं की नाही,असा विचार करत असताना ,परत सायली बोलली अरे बोल ना काय झालं,असा गप का? तेव्हा कसा तरी धीर करून विहाने तिला प्रेमाची कबुली दिली,त्याच बरोबर लग्न ही करायचं वचन दिले,सायली थोडी लाजली आणि लाजतच तिने ही प्रेमाची कबुली दिली.इथून सुरुवात झाली खऱ्या प्रेमाची, हळूहळू भेटी वाढू लागल्या,असेच दिवस जात होते विहान च येणं जाण वाढलं सायली ने साक्षी ची ओळख करून दिली,पण विहान ला पाहताच साक्षी त्याच्या प्रेमात पडली, मनातून साक्षी ही विहान वर प्रेम करू लागली होती, पण सायली वर विहान च खूप प्रेम असल्याने ती काहीच करू शकत नव्हती,
एक दिवस सुट्टी असल्याने दोघींही घरीच होत्या,सायली बाहेर फुलझाडांना पाणी घालत,विहान हळूच मागून येऊन सायली ला मिठी मारतो आणि सोबत आणलेली रिंग तिच्या बोटात घालतो हे पाहून साक्षी च्या तळपायाची आग आग होते, काही करून तिला विहान ला मिळवायचं
साक्षी आता सायली चा राग राग करत होती.पण विहान नेहमी सायली च्या सोबत असल्याने ती सायली ला विहान पासून दूर करू शकत नव्हती. साक्षी मध्ये झालेला बदल सायली च्या ही लक्षात आला नाही.
असच एक दिवस विहान ला अमेरिकेत जावं लागणार होते .तसा त्याला फोन आला तो लगेच जायला निघाला,अमेरिकेत जाऊन आई वडिलांना सांगून लवकर च आपण लग्न करू असे वचन देऊन तो निघाला.इकडे सायली विहान चा निरोप घेऊन जड अंतःकरणाने घरी आली.
आज तीच कशातच मन लागत नव्हतं. असेच दोन दिवस
गेले साक्षी आता तीच रंग दाखवू लागली, आणि बोलू लागली की मी विहान वर खूप प्रेम करतेय तू त्याच्या आतुष्यातून जा, अस बोलून भांडू लागली. सायली साक्षी ला समजवायाचा प्रयत्न करू लागली पण साक्षी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती,तिला फक्त विहान दिसत होता.आतापर्यत आपल्या साठी आपल्या बहिणीने जे काय केलं याची तिला थोडी पण फिकीर नव्हती.ती प्रेमात पूर्ण आंधळी झाली होती.तिला फक्त काही करून विहान यायच्या आत सायली ला संपवायचं होत.तिने कसला ही विचार न करता जवळ च असलेल्या चाकू घेतला आणि सपकन सायली चा गळा चिरला,सायली ने एक आर्त किंकाळी मारून प्राण सोडले,पण मरताना मात्र तिचे डोळे उघडेच होते जणू काही ते डोळे विहानचीच वाट पाहत होते.
इकडे साक्षी ला आपली मोठी बहीण आपल्याच हातून मेली याच काही सोयर सुतक नव्हतं तिने लगेच एक पोत्यात भरून तिला बाहेर असलेल्या मोगऱ्याच्या झाडाखाली पुरून टाकलं.
आणि जस काही झालंच नाही अशा अविर्भावात राहू लागली.
इकडे विहान आपलं काम संपवून भारतात आला.
दुसऱ्या दिवशी सायली ला भेटायला गेला.साक्षी एकटीच होती .विहान ला पाहून तीला खूप आनंद झाला.विहान ने आल्या आल्या सायली कुठे आहे म्हणून विचारलं.साक्षी ने त्याला खोटंच सांगितलं की सायली दीदी ला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे तिने तुला लेटर लिहून ठेवले आहे ते वाच मग खर समजेल त्याचा ही नाईलाज होता. सायली ला खूप शोधून ही ती सापडली नाही,शेवटी नाखुषीने त्याने काही दिवसानी साक्षी सोबत लग्न केले पण मनातून सायली वरच प्रेम काही केल्या कमी झालं नाही तो रोज सायली चा विचार करत असे आणि एकांतात तिच्या आठवणीत रडत असे.
असे काही महिने जातात.साक्षी सायली ला पूर्ण पणे विसरून गेली होती.पण विहान काही केल्या सायली ला विसरू शकत नव्हता. लग्न झाल्यापासून विहान ने साक्षी का थोडं सुद्धा जवळ येऊ दिल नाही त्यामुळे साक्षी मनातून नाराज होती, काही महिन्यांनी साक्षी ला सायली च्या आत्म्याने साक्षी ला त्रास द्यायला सुरुवात केली,सायली च्या आत्मा साक्षी च्या शरितात राहून साक्षी ला इजा करून विहान पासून दूर ठेऊ पाहत होती,असच काही दिवस गेले विहान ला साक्षी चे वागणं वेगळं दिसू लागले खूप उपचार केले पण काही उवयोग नाही झाला,
असच एक दिवस रात्री ,विहान विचार करत बसला असतांना, त्याला door बेल वाजवल्याचा आवाज आला,
त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे 12 वाजले होते ,इतक्या रात्री कोण आलं असेल बर या विचारात च तो हॉल मध्ये आला आणि door उघडले पाहतो तर काय समोर सायली.
तिला पाहून त्याला अश्रू अनावर झाले,पण दोघांनीही भावनांना आवर घातला,आणि फक्त हँडशेक करून smile दिली. त्याने सायली ला आत मध्ये बोलावली, सोफा वर बसले तिला पाणी देऊन कॉफी आणली,आणि दोघे ही बोलत बसले,विहान ने साक्षी बद्दल सगळं सांगितलं पण सायली ला सगळं माहीत असल्याने ,तिने मुद्दाम सोंग घेतलं,आणि एक नारळ मंतरुन दिला आणि साक्षी च्या उषा जवळ ठेवायला सांगितलं ,विहान ने तो नारळ घेतला आणि बेडरूम मध्ये जाऊन साक्षी च्या उशीखाली ठेऊन आला. पाहतो तर सायली बाहेर मोगऱ्याच्या झाडाजवळ उभी होती,तो तिथे गेला ,दोघांनाही भूतकाळातील आठवणी आठवू लागल्या,
असे 2दोन दिवस गेले.सायली भेटल्याने विहान खुश होता.साक्षी ची तब्येत बिघडली असल्याने,
दोन दिवस साक्षी ला हॉस्पिटलमध्ये admit केले होते,तिथेही सायली विहान सोबत होती,विहान साक्षी च्या रुम मधून बाहेर येऊन सायली जवळ बोलत होता.आजू बाजूचे लोक त्याला एकट्याने बदबडताना पाहून हसत होती,करण सायली फक्त विहान ला च दिसत होती.बाकी कुणालाही दिसत नव्हती,हे विहान ला कळत नव्हतं,लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता. तो सायली जवळ बोलू लागला.
दोन दिवस गेले,आमावस्या ची रात्र,सगळीकडे भयाण अंधार,कुत्री दूरवर भेसूर आवाजात भुंकत होती.
सायली विहान ला घेऊन बंगल्यात आली आणि आणि हॉल मध्ये बसून काहीतरी मंत्र बोलू लागली. ती नक्की काय बोलतेय हे मात्र विहान ला कळत नव्हतं.रात्री चे 12 वाजले आणि सायली ने साक्षी च्या शरीरात प्रवेश करून तिला बंगल्या पर्यत घेऊन आली, जशी साक्षी दरवाजा जवळ आली तशी सायली ने तीच शरीर सोडून दिले,साक्षी दरवाजा वाजवू लागली विहान ने दरवाजा उघडताच,साक्षी आत आली आणि सायली ने साक्षी च्या शरीरात परत प्रवेश केला ओरडू लागली सोडणार नाही तुला,विहान फक्त माझा आहे.मी विहान ला कोणाचा होऊ देणार नाही.तू फसवस आम्हाला,अस बोलून तिने साक्षी चे शरीर सोडून दिले,विहान ला काही कळत नव्हते,तो फक्त वेड्यासारखा काय होतंय ते पाहत होता.
साक्षी समजून गेली की सायली परत आलीय,ती आता सोडणार नाही मला,साक्षी ला केलेल्या चुकीची जाणीव झाली,तिने विहान समोर आपली चूक कबूल केली. विहान हे ऐकून तिथेच साक्षी च्या कानाखाली दिली,आणि विचारलं का अस केलंस,का मरालास सायली ला,त्यावर साक्षी बोलली माफ कर विहान,मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते म्हणून मी दीदी ला मारलं रे,
अस बोलुन रडू लागली,तेव्हा त्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला,की सायली सोबत बोलत असताना लोक का आपल्या कडे बघत होती, त्याला समजून चुकलं मेल्यानंतरही सायली ने त्याची साथ सोडली नाही,
इकडे सायली चा आत्मा बाहेर मोगऱ्याच्या झाडाजवळ येऊन उभा राहिला,
जिथे तिला पुरल होत ,विहान ला सायली ची आठवण होताच तो धावत च बाहेर आला आणि कुदळ घेऊन मोगऱ्याच्या झाडाजवळ खोदू लागला, तेवढ्यात सायली तिथे आली आणि रडू लागली,तिला जवळ घेण्यासाठी विहान पुढे झाला आणि तिचे डोळे पुसून माफी मागू लागला,
तेवढ्यात साक्षी तिथे आली,आणि ओरडू लागली,की जशी तिला मारली तसच तू ही मरणार आता,अस बोलून ती हातात लोखंडी सळई घेऊन विहान ला मारायला धावली,आनि लोखंडी सळई विहान ला मारणार, तोच सायली च्या आत्म्याने विहान ला बाजूला ओढले,विहान बाजूला होताच साक्षी चा तोल गेला आणि ती मोगऱ्याच्या झाडाजवळ असलेल्या कुदळी च्या टोकदार भागावर पडताच कुदळ पोटात घुसले, साक्षी ने एक किंकाळी मारून तिथेच प्राण सोडला,इकडे सायली चा आत्मने त्याचा बदला घेतला होता.आता सायली चा आत्मा मुक्त झाला होता. विहान सायली कडे पाहून रडू लागला.सायली ने त्याला मिठी मारून सांत्वन केले आणि वचन दिले,की या जन्मात मी तुझी नाही होऊ शकले पण पुढच्या जन्मी मी फक्त आणि फक्त तुझीच असेन.एवढं बोलून ती हवेत विरून गेली.
तिची धूसर होणारी सावली
पाहत विहान रडून व्याकुळ झाला.त्यालाही त्याच्या प्रेमाचा झालेला दुःखद अंत तो सहन करू शकला नाही, त्याने ही देवाजवळ या जन्मी आम्ही एक नाही होऊ शकलो पण पुढच्या जन्मी मात्र नक्की एक हाऊ अस बोलून त्यानेही तिथेच प्राण सोडला....
टीप:-
प्रेमासाठी भुकेलेले सगळेच असतात ,पण प्रत्येकाला च खर प्रेम मिळेल अस नाही,
प्रेमात आंधळे झालेल्या, आणि वासनेने भरलेल्या डोळ्यात कधीच अश्रू नसतात.😔
समाप्त.......