bhutachi story in marathi |
सतीचा माळ (संपूर्ण कथा)
(आमच्या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आम्हाला सांगितली होती. तिला मी कल्पनेने कथारुप दिले आहे. तुमच्याही आयुष्यात असं काही घडू शकतं त्यामुळे 'सावधान'. )
सत्याने मला गदागदा हलवून उठवले.
"दिप्या... ये दिप्या… ऊठ... झोपलाय काय म्हशीसारखा...!"
मी डोळे किलकिले केले.
"झोपू दे रे... " मी त्रासिक चेहऱ्याने म्हटले आणि कुशी बदलून पुन्हा डोळे मिटले.
"अरे आपल्याला जायचंय ना दादयाच्या वाडीला, त्यो वाट पाहत असल की,ऊठ लवकर...नाहीतर ढुं××××वर लाथ घालतो तुझ्या...! "
सत्या बोलला तस करायला मागेपुढे बघणार नाही याची मला खात्री होती. उठल्याशिवाय गत्यंतर नव्हते.पडल्यापडल्याच अळोखेपिळोखे देत सत्याकडे पाहिले.गडी नटून थटून आला होता.
"किती वाजले...?"
मोठा आळस देत मी एकदाचा उठलो.
"चार वाजून गेले की भडव्या...मला वाटलं तुझं आवरलं असल..."
"जाऊ की एवढी काय घाई आहे..." सतरंजीचा गोळा करत मी म्हटलं.
"ओ साहेब !!! परत सुध्दा यायचे आहे आपल्याला, नाहीतर तो नाना आहेच तुझी बिनपाण्यानं करायला..."
मला नानांचा भरघोस मिशांवाला चेहरा आठवला. नानासाहेब शिर्के हे आमच्या वसतिगृहाचे रेक्टर आहेत.सगळे त्यांना नाना म्हणतात. एकदम कडक नि माणूस !
"अरे नाना कालच गेलाय गावाकडं ! त्याला कळणार सुध्दा नाही."
मी टॉवेल नि साबण पेटीतून काढला नि नळाकडे निघालो.
सहामाही संपून नुकतंच दुसरं सत्र सुरू झालं होतं.सतीश,दादा आणि मी दहावीला एकाच वर्गात होतो. इथं तालुक्याला शहरात शिक्षणासाठी आलो होतो. दादा नि मी शाळेच्याच वसतिगृहात राहायला होतो.सत्या आणि त्याच्या गावाकडील आणखी काहीजण बाहेर रूम करून राहत होती. सत्या एक नंबरचा वल्ली माणूस होता.वसतिगृहाचे नियम त्याला मानवले नसते.
दादाच्या वाडीवर त्याच्या घरी आज कंदुरीचा कार्यक्रम होता. तीन-चार बोकड होते. दादाने परवा शुक्रवारी रात्री आम्ही स्टडीला जात असताना निमंत्रण दिले. सत्याने पाचच मिनिटात प्लॅन फायनल केला. रविवारी मी नि सत्याने चार वाजता निघायचे असे ठरले होते.दादा शनिवारीच जाणार होता.
बटेवाडी दादाच गाव . इथून साधारण नऊ-दहा किलोमीटरवर होतं. आम्हां दोघांकडे सायकली होत्या. त्यामुळे वाहनाचा प्रश्न नव्हता. चारला निघालं म्हणजे पाच-साडेपाच पर्यंत पोहचू. जेवणखाणं उरकून परत आठ-साढे आठ पर्यंत आपापल्या रूमवर परत अस आमचं ढोबळ नियोजन होतं.
रविवार म्हणजे ना माझा दिवसभर लोळून काढायचा हक्काचा दिवस होता. दुपारी जेवण झाल्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या इतिहासचं पुस्तक हातात घेतलं. 'दुसरं महायुद्ध' वाचता वाचता जपानने तिकडे दोस्त राष्ट्रांपुढे नि इकडे आम्ही निद्रादेवीपुढे शरणागती पत्करली. मला डोळा लागला होता. सत्या आला नसता तर मी उठलोच नसतो.
आम्ही दोघचं होतो त्यामुळे एकच सायकल घ्यायला हवी होती पण सत्या ऐकेना .
"मधीच सायकल पंक्चर झाली मग ! एकाला दुसरी असलेली बरी !"
बॅटरी मध्ये सेल घालता घालता तो बोलला.त्याने ह्या दोन बॅटऱ्या कुठून पैदा केल्या काय माहित?
त्याचा युक्तिवाद बरोबर होता. बटेवाडीला जायला पक्का रस्ताच नव्हता.हायवेवर दोन किलोमीटरवर मारुतीचं छोटं देऊळ होतं तिथून बटेवाडीला फाटा फुटतो. तिथून सगळी पायवाट किंवा हवं तर बैलगाडीवाट होती म्हणा ना!
मारुतीजवळ पोहचलो तेव्हा सव्वापाच वाजले होते. थंडी चांगलीच पडायला सुरुवात झाली होती. सत्याने कानटोपी घातली.स्वेटर घ्यायला पाहिजे होतं असं मनात आलं पण आता उपयोग नव्हता. मारुतीरायाचे दर्शन घेऊन बटेवाडीच्या पायवाटेवर सायकली घातल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला येड्या बाभळीचं रान चांगलंच माजलेलं होतं. बैलगाडीमुळं रस्त्यावर दोन समांतर पायवाटा पडल्या होत्या. त्यावरून उत्साहात एकमेकांशी स्पर्धा करत सायकली पिटाळत आम्ही निघालो होतो.पण थोड्याच वेळात आमचा उत्साह ढेपळला. एकतर रस्ता खराब होत आणि आता चढ सुरू झाला होता. त्यामुळं एक एक पेडल मारायला चांगलाच जोर लागत होता. आपसूकच आमच्या गप्पा कमी झाल्या नि सायकल चालवण्यावर आमचं लक्ष केंद्रित झालं. थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधार पडायला सुरुवात झाली होती.
चढ चढून माळावर आलो त्यावेळी आम्ही दोघेही धापा टाकत होतो.
"हुश्श......बरं झालं बा...... आपण एका सायकली वर आलो नाय ते..." त्याचा श्वास फुलला होता.
मी मान डोलावली. माझी वेगळी परिस्थिती नव्हती.
थोडा वेळ दम खाऊन पुन्हा आम्ही निघालो.
माळावरून वाट पांदीत उतरत होती. उतार असल्याने वेग वाढला होता. बटेवाडीत पोहचलो तेव्हा साडेसहा वाजत आले होते.
थोडा वेळ दम खाऊन पुन्हा आम्ही निघालो.
माळावरून वाट पांदीत उतरत होती. उतार असल्याने वेग वाढला होता. बटेवाडीत पोहचलो तेव्हा साडेसहा वाजत आले होते.
थंडी प्रचंड पडली होती.बटेवाडी म्हणजे पन्नासेक घरांची वस्ती होती.वाडीत लाईट नव्हती. दोन तीन गॅस बत्त्याच्या प्रकाशात चाललं होतं.
दादाने आमचे स्वागत केले. उशीर का झाला म्हणून विचारले. सत्याने माझ्याकडे बोट दाखविले.
दादाने आमचे स्वागत केले. उशीर का झाला म्हणून विचारले. सत्याने माझ्याकडे बोट दाखविले.
"साहेब पसरले होते, बळचं उठवून आणलंय!"
दादा हसू लागला, त्याला माझी सवय माहिती होती.
जेवायला अजून वेळ दिसत होता.मला परत जायची चिंता लागून राहिली होती.एकतर रस्ता खूपच निर्मनुष्य होता.अधेमधे वस्ती किंवा कुणाचाच गोठा नव्हता. त्यामुळं जितक्या लवकर इथलं उरकल तितकं बरं! माझ्या मनात विचार चालू होता.सत्याही कदाचित तोच विचार करत असावा.

"बसा तुम्ही गप्पा मारत...आलोच मी..."
दादाने रजा घेतली. अंगणातील जराशा अंधाऱ्या भागात तळवटावर गप्पा मारत बसलेल्या घोळक्यात आम्ही घुसलो. थंडी तर मी म्हणत होती. खरचं स्वेटर मफलर आणायला पाहिजे होती. पुन्हा माझ्या मनात आले.गावकऱ्यांच्या गप्पा चालू होत्या. गप्पांचा विषय अर्थातच सर्वपसंतीचा म्हणजे भुताचा ! प्रत्येकजण ऐकीव,अनुभवलेली कहाणी पाणी लावून लावून सांगत होता. ती अंधारात बुडालेली वाडी,ते अनोळखे लोकं आम्ही प्रेक्षक होऊन मान डोलावत होतो.
जेवायला बसायला साडे-आठ वाजले होते. पटापटा आम्ही जेवण उरकले ! दादाच्या आई वडिलांना भेटलो.ते तर मुक्कामालाच थांबा म्हणत होते. दादालाही आम्ही रहावं असं वाटत होतं पण कितीही आग्रह केला तरी आम्ही राहणार नाही हे त्याला माहिती होते. खरं म्हणजे जेवण झाल्यावर सायकल चालवायची जीवावर आली होती.
"आर रहा आच्या दिस...अंधरा कुंधाराचं कूट जाता...फाटचं उठून जा की! "
त्याच्या वडिलांनी खूप आग्रह केला होता.
पण आम्ही जातोच म्हटल्यावर हळूच बोलले.
त्याच्या वडिलांनी खूप आग्रह केला होता.
पण आम्ही जातोच म्हटल्यावर हळूच बोलले.
"पोरानो माळावरून जाताना माज्या अडाण्याचं एक ध्यानात ठिवा,त्यो सतीचा माळ हाय!!! काई झालं तरी मागं वळून बघायचं न्हाय!!! तुमाला काहिबी जाणवलं तरी कोणत्याई परिस्तीतीत मग काई मागं वळायचं न्हाय !!!
"तात्या कशाला घाबरवता त्यांना ?"
दादा आपल्या वडिलांना म्हणला खरं पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता.
एकतर उशीर झालेला... त्यात भुतांच्या गप्पा... तो ओसाड रस्ता...खरं म्हणजे आता आमची जाम तंतरली होती. मी कुडकुडत होतो हे पाहून दादाने घरातून दोघांना दोन शाली आणल्या. सत्याने स्वभावाप्रमाणे शाल नाकारली त्याच्याकडे कानटोपी होती त्यावरच तो भागवणार होता.मी मात्र शाल माझ्याभोवती घोंगटुन घेतली.
बरोबर नऊ वाजता आम्ही बटेवाडी सोडली.दादाही जपून जा म्हणला होता.
आम्ही एकमेकांपासून दूर जायचं नाही एकत्रच राहायचं ठरवलं होतं.त्याप्रमाणे सायकल चालवत पांदीत आलो.आजूबाजूची झाडी त्या पांदीची भीषणता वाढवत होते.आधीच्या गप्पांमुळं मनात नाही नाही ते विचार येत होते.दोघेही निशब्दपणे सायकल चालवीत राहिलो.
पांद ओलांडून आम्ही माळावर आलो. इथून पुढे आता उतारचं होता त्यामुळे वेगात मारुतीपर्यंत जाता येईल असं मला वाटलं.एकदा हायवेला लागलं की मग काही अडचण नव्हती. 'सतीचा माळ' अचानक मला ते शब्द आठवले. मी शाल नीट केली.उताराला आमच्या सायकली सुस्साट निघाल्या ! सत्या माझ्यापुढं होता.
सायकलीने चांगलाच वेग धरला होता......
.....आणि अचानक मला हिसका बसला.....
सायकलवर कोणीतरी बसल्याची जाणीव झाली.........सायकल चालवायलाही आता जड लागू लागली........कोणीतरी सायकलला मागे ओढू पाहत होतं.........कोण ? तात्यांचे शब्द आठवले.........मागे वळून बघायचं नाही........मागे बघायची माझी हिम्मत होईना........
माझे अंग थरथर कापायला लागले..........गारठ्याने की भीतीने.......सांगता येणार नाही.........
मी जितक्या जोरात पेडल मारत होतो तितक्याच शक्तीने कोणीतरी मागे ओढत होतं.....
हृदय तर इतक्या जोरात धडधडत होत की तोंडातून बाहेर येणार असं वाटत होतं......
सत्या मात्र वेगात पुढे निघून गेला होता. मला तो दिसेना........आता कोणीतरी मला धरलं होतं........त्याच्या तावडीत मी अलगद सापडलो होतो........माझी सायकल लटपटायला लागली......

मला काही सुचेना घाबरून जोरजोराने मी ओरडू लागलो........मी काय ओरडत होतो......मला आता सांगता येणार नाही.....
तेवढ्यात समोर कोणीतरी येऊन थांबलेले दिसले.........सत्या!.........सत्याच होता तो.....!
तो दिसताच माझं उरलसुरलं अवसान गळलं..... मी सायकल सोडून ओरडत त्याला मिठी मारली.......
आणि रडू लागलो........सत्याला काही सुचेना......
तो लगेच सावरला......काय झाले त्याच्या लक्षात आले होते........
आणि रडू लागलो........सत्याला काही सुचेना......
तो लगेच सावरला......काय झाले त्याच्या लक्षात आले होते........
"दिप्या घाबरू नको......कोणी तुला धरलं नाही......हे बघ......!"
त्याने सायकलच्या मागे बोट दाखवले.
मी घाबरून तिकडे पाहिले तर काय......
मी अंगावर घेतलेल्या शालीचे एक टोक मागच्या चाकात अडकले होते......
काही क्षण मला कळलेच नाही.....आणि त्यांनतर मी खो खो हसायला लागलो......सत्याही माझ्या हसण्यात सामील झाला.....
माझ्या सायकलला पकडणारी भोकाडी कोण ते मला समजले होते.
समाप्त.