क्षण time
लेखक :- प्रितम मणचेकरदि. ०१/०९/२०१८
१९९४ -९५ साल असेल त्या वेळेस बदलापूर म्हणजे खेडेगावच होत. मकर संक्रांतीचा सण होता. मला आज ही तो दिवस आठवतो. आणि अंगावर काटा येतो. मी प्रितम अंगात मस्ती पण शांत मी आणि माझे मित्र अमित म्हणजे आमचा मजबूत रांगडा गडी भीती काय हे माहीतच नाही त्याला आणि तुषार म्हणजे हुशार आणि प्रसंगावधान तिघे तीळगुळ वाटत फिरत होतो. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्या मुळे रात्री उशिरापर्यंत फिरून शेवटी सरांच्या घरी निघलो म्हटलं हे शेवटचं घर मग घरी जाऊ. पण सारंच घर म्हणजे तस थोडं लांबच होत. अमित पटकन म्हणाला रानाच्या वाटेनं जाऊ लवकर पोहोचू माझ्या अंगावर काटा आला तुषार पण नको नको म्हणू लागला पण अमित ऐकायला तयार होईना. आम्हाला घबराट फट्टू बोलायला लागला मग नाही हो म्हणत आम्ही तयार झालो. रस्त्यात महादेवाचे मंदिर होत. बाहेरून दर्शन घेऊन चालायला सुरुवात केली थोडे पुढे गेल्यावर झाडी दाट होत होती अंधार वाढत होता. रस्त्यावर रेती- वाळु पडली होती त्या मुळे चालायला त्रास होत होता मी दोघांना म्हटल वाळू काशी आली असेल
त्यावर अमित म्हणाला
आरे पुढे काम चालू असेल कोणाच्या तरी घराचं चल उगाच नाटक नको करू.
पुढे वाळू कमी होत जाऊन भुसभुशीत मातीचा रस्ता सुरु झाला पाय अडकू लागले आणि अचानक हवेत जास्तच गारवा जाणवू लागला भीती पण वाटू लागली इतक्यात झाडीतून कुत्रे विव्हाळण्या चे आवाज येवू लागले. माझी आणि तुषार ची जाम टरकली. दुर पर्यंत कोणी दीसत नव्हत रस्त्यावर आम्ही तिघेच. मागे बघणे तर दूरच बाजूला बघयची सुद्धा हिम्मत होत नव्हती. आम्ही तिघे एकमेकांचे हात पकडून भरभर चालु लागलो. कुत्र्यांचा आवाज वाढत होता आणि भीती जास्त वाटु लागली आता आम्ही पळू लागलो. मातीत पाय अडकत होते. आणि अचानक माझा पाय आसा अडकला की माझा हात सुटला हे अमित आणि तुषार ला कळलं पण नाही. ते वेगात पळत होते. मी जीवाच्या आकांताने ओरडत होतो पण जणु माझा आवाज त्यांच्या पर्यंत पोहोचत नव्हता. मी पार घाबरून गेलो होतो माझा पाय कोणी तरी धरून ठेवलाय आस वाटत होत. तिकडे तुषार च्या लक्षात आल त्याने लगेच अमित ला थांबवल आणि मागे बघितलं मी पाय वरती खेचत होतो पण पाय काही वर येत नाही हे बघून मला रडू यायचं बाकी होत. आता तर मला स्पष्ट जाणवत होते की कोणी तरी माझा पाय पकडून ठेवलाय. तुषार आणि अमित ला थांबलेल बघुन मी त्यांना हात वारे करू लागलो लगेच ते उलट फिरून माझ्या कडे पळत आले. अमित जवळ येताच बडबडु लागला काय रे काय झालं भीती मुळे थर थर कापत होतो माझ्या तोंडातुन शब्द निघत नव्हते.
मी त... म..म.. ते. पा.. इतक्यात तुषार च लक्ष माझ्या पायाकडे गेल आणि तो एकदम ओरडला याचा पाय बघ मी कसाबसा सगळा प्रकार सांगितला. आता तर सगळेच खूपच घाबरलो डिसेंबर महिन्याच्या थंडीत पण आम्ही घामाघूम झालो होतो. अमित ने सरळ माझा पाय पकडला आणि वर खेचू लागला.
तुषार ला मात्र काही तरी सुचलं तो शर्टाच्या आत हात घालून जानव पकडून काही तरी बोलू लागला मी आणि अमित पूर्ण ताकदीने पाय खेचत होतो अमित ने तुषार कडे बघितलं आणि शिवी देत म्हणाला अरे तिकडे काय करतोय इकडे ये मदत कर तुषार माझ्या जवळ आला त्याने हात लावला आणि आम्ही तिघांनी एकत्र जोर लावला त्याच क्षणी आम्ही विजेच्या झटका लागल्या सारखे फेकले गेलो. माझा पाय बाहेर आला.
मग मात्र कशाचाच विचार न करता आम्ही जीव मुठीत धरून सुसाट निघालो ते सरळ सरांच्या घरा बाहेर थांबलो हळूहळू श्वासा वर नियंत्रण करत काही झालं नाही असं दाखवत सरांच्या घरी जाऊन आलो. पुढे जवळच माझ्या आत्याच घर होत. आम्ही तिघेही आत्या च्या घरी गेलो. आम्हाला पाहून आत्या ला आनंदा पेक्षा जास्त आश्चर्य वाटल तिने तस काही न दाखवता आम्हाला खाऊ पिऊ दिल आणि तिच्या मोठ्या मुलाला रिक्षा घेऊन आम्हाला घरी सोडायला सांगितले. घरी पोचताच मी सरळ झोपुन घेतल. सकाळी उठता येत नव्हत ताप भरला होता अंगात. संध्याकाळी थोडं बर वाटल तो पर्यंत आत्या आली होती घरी तिने आई ला सांगितले की हा नक्कीच घाबरलाय कुठेतरी आई ने लगेच आजीच्या कानावर घातलं आणि दृष्ट काढली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन तुषार आणि अमित येण्याची वाट बघत बसलो. ते दोघे येताच आमच्या तिघांच्या तोंडून एकाच वेळी निघालं काय झालं होत त्या दिवशी पण या प्रश्नाच उत्तर कोणा कडेच नव्हत.
आज कदाचित तुषार आणि अमित ही गोष्ट विसरले असतील पण मी नाही मी कधीच विसरू शकणार नाही तो क्षण .
- प्रितम मणचेकर
बदलापूर ( ठाणे )
बदलापूर ( ठाणे )