-टॅटू- भाग 5
भाग पाचवा
चौथ्या भागाची लिंक पुष्पा पूर्णपणे बरी झाली होती.....तिला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला होता....काही दिवसांपूर्वी दवाखान्यात विव्हळणारी पुष्पा....ती जळणारी बाहुली...हे सगळं अर्जुनच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं...रात्री त्याला झोपेत वेगवेगळी भयानक राक्षसाची स्वप्न पडत होती....अनेकदा तो झोपेतून उठायचा...पण आता त्याचं प्रेम त्याच्या जवळ होत..पुष्पा आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच त्याच्या डोळ्यातून पाणी आणणारी होती.....ते आलेलं पाणी पुष्पा प्रेमाने पुसायची आणि त्याला धीर द्यायची....पण पुष्पाचे झालेले हाल तो कधीही विसरणार नव्हता.....आता जिथे सुरवात झाली तिथेच विषय संपवून टाकायचा असा निश्चय त्याने केला....त्या दिवशी आपल्यात आलेल्या अलौकिक शक्तीबद्दल आणि त्या शक्तीने स्वतःचा आणि पुष्पाचा जीव वाचवल्याबद्दल अर्जुनने देवाचे आभार मानले...आणि तो जिथून ह्या सर्वांची सुरवात झाली तिथे म्हणजे देवीच्या मंदिरात पोचला....त्याची नजर त्या टॅटू काढणाऱ्या विचित्र मुलीला शोधू लागली..तो आपसपासच्या व्यापाऱ्यांना त्या मुलीबद्दल विचारू लागला..तो सगळीकडे शोधू लागला त्याची बैचेनी काही लोक बघतच राहिले....मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला करून तो सगळीकडे शोधत होता.....अचानक समोर ती त्याला दिसली.....जीन्स आणि फुल्ल शर्ट घातलेली पण ह्या वेळी तिच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच तेज होत....पहिल्या भेटीत तिच्या विस्कटलेल्या केसांमुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता....पण आता तिने केस मागे बांधले होते तिच्या कपाळावरची चंद्रकोर त्याला स्पष्ट दिसत होती...बैचेन झालेला ...क्षणभर चिडलेला अर्जुन तिच्याकडे बघून शांत झाला ...तिने एकटक त्याच्याकडे बघितलं आणि आपली मान तिरपी करून त्याच्याकडे बघितलं...तो जणू काही वेळासाठी तिच्या आधीन झाला..तिला बघून तापलेलं त्याचं अंग थंड पडू लागलं...पण लगेच तो भानावर आला अर्जुन ला बघून ती हसली आणि एका छोट्या गल्लीत शिरली....तो सुद्धा तिच्या मागे धावू लागला...छोट्या मोठ्या गल्ल्या ओलांडून ती एका शाळेच्या प्ले ग्राउंड वर उभी होती....अर्जुन धावत तिथे आला.....ती हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत उभी होती...अर्जुनचे लक्ष तिच्या हातावरच्या राक्षसाच्या टॅटू कडे गेलं तो प्रचंड चिडला त्याने आपले डोळे बंद केले आणि खाडकन उघडले त्याने आपल्या आवळलेल्या मुठ्या सैल केल्या त्याच्या हातातून विजेचे स्पार्क निघत होते त्याचे डोळे सुद्धा विजेच्या प्रकाशासारखे चमकू लागले...तो वेगाने तिच्याजवळ आला ....पुष्पाला इजा पोचवणारी कुठलीही गोष्ट त्याला या जगात नको होती...आणि अर्जुनने ..तिच्यावर हाथ उगारला......तिने तो हाथ पकडला तिच्या हाताचा स्पर्श होताच त्याच्या अंगातील शक्ती निस्तेज होऊ लागली....त्याचे अंग थंड पडू लागले त्याचे डोळे पूर्ववत झाले होते त्याला काही समजेना...बर्फ गोठावा तसा त्याचा तळपणारा हात गोठला होता....अर्जुनला चक्कर येऊ लागली....तो खाली पडला....ती त्याच्याकडे बघून हसली....अर्जुन धापा टाकत जमिनीवर पडला होता.......ती जरा वाकली आणि गुडघ्यावर हात ठेवून त्याला बोलली
"खूप ताकतवान आहेस तू.....पण माझ्या इतका नाही"
अस बोलून तिने आपल्या शर्टाची बाही हळूहळू वर घ्यायला सुरुवात केली....अर्जुन त्याच्याकडे बघत होता...तिच्या हातावर कवट्या गोंदवल्या होता त्या कवट्यावर राक्षसाचे चिन्ह....ते चिन्ह तसेच होते जसे विक्टर च्या हातावर होते....त्याने एकदा त्या टॅटू कडे बघितलं आणि रागाने त्या मुलीकडे बघितलं....तिने आपल्या शर्टाची बाही अजून वर घेतली....अर्जुन चकित झाला त्या राक्षसाच्या मस्तकावर पाय देऊन हनुमान उभा होता.....हा पूर्ण टॅटू बघून अर्जुन चकित झाला...हा काय प्रकार आहे..टॅटू,मिळालेली शक्ती आणि आता ही वेगळ्याच रुपात भेटलेली मुलगी......हे सगळं विचार करीत असताना अचानक तिचा हात पुढे आला....तिची नाजूक स्माईल त्याला एक वेगळीच फिल देत होती तो तिच्या हाताकडे बघत होता....तिने तो हात अजून जवळ नेला
"कॉफी???"
ह्या अनपेक्षित प्रश्नाला अर्जुन जवळ काहीच उत्तर नव्हतं.....त्याने तिला हात दिला आणि उठून उभा राहिला....ते दोघे जवळच्या एका कॉफी शॉप मध्ये गेले...तिने कोल्ड कॉफी ची ऑर्डर दिली....कॉफी येताच अर्जुन त्या ग्लास कडे बघत स्ट्रॉ ने ती कॉफी हलवत काहीतरी विचार करत होता....मोबाईल चेक करणाऱ्या तिच्याकडे बघून तो म्हणाला
"का??? म्हणजे मला काही समजलं नाही...मीच का??आणि काल जे झालं ते??"
तिने आपला कॉफीचा ग्लास संपवला आणि अर्जुनला म्हणाली
"हे बघ मला माहित नाही तुझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की नाही पण सत्य तुला स्वीकारावेच लागेल....जग कितीही आधुनिक विज्ञानवादी बनले तरी देव दानव हा खेळ पूर्वी पासून चालू आहे आणि आता सुद्धा आहेच....तुला भेटलेला तो विक्टर... तो तर ह्या खेळाचा एक प्यादा होता जो सैतानाची कामं करतो आणि सैतान त्याच्या इच्छा पुरवतो...चांगल्या शक्तींनी गाडलेला सैतान आता जागा होऊ पाहत आहे आणि त्याला हवी आहे त्याची सेना... ह्या पाताळात अनेक रहस्य आहेत जे तुझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत आणि पूर्ण मानव जातीला हानिकारक आहेत....आता मानव जातीचे रक्षण करण्यासाठी ह्या कलियुगात विविध शक्तींनी परिपूर्ण एक सेना आहे ती.....
हे वाक्य ऐकून अर्जुन मध्येच बोलला
"म्हणजे माझ्या शरीरात जी शक्ती आहे ती??...आणि मीच का?? मी तर एक सामान्य"
अर्जुनची बैचेनी बघून तिने त्याला थांबवलं
"हे बघ अर्जुन....सामान्य तर मी पण होते आणि आहे....पण ही जबाबदारी मी स्वीकारली कारण वाईट शक्ती जोर धरू लागल्या आहेत....भविष्यात ते तुझ्या किंवा माझ्या कुटुंबाला....समजतो आहेस ना मी काय बोलते ते??......आणि ह्या शक्ती फक्त त्यांनाच मिळतात ज्याची कुवत आहे....लहानपणापासून आमच्या संघटनेचे लोक तुझ्यावर आणि माझ्यावर लक्ष ठेवून होते.....त्यांनी माझी पारख करण्यासाठी एक परीक्षा घेतली त्यात मी पास झाले जसा काल तू झालास.....तुझा आणि माझा जन्म एका विशिष्ट नक्षत्रात झाला आहे जसा एका राक्षसी शक्तींना नष्ट करणाऱ्या योध्याचा होतो.....तुला अनेक प्रश्न पडले।असतील की....ते टॅटू....तुझी बायको वाचली कशी वैगेरे.....सुरवात जेव्हा मला कळलं की तुझ्या बायकोवर कुणी काळा जादू केला आहे तेव्हा मी समजले की प्रत्येक दैवी योध्याच्या आयुष्यात जी परीक्षा असते तो क्षण हाच आहे.....त्यावेळी तुझ्या बायकोला मीच संमोहित केलं होतं....तीच माझ्याजवळ आली होती...मीच हे दिशादर्शक टॅटू तुझ्या हातावर गोंदवले होते.....तुझ्या बायकोला आम्ही काही होऊन दिलं नसत कारण जेव्हा तू फॅक्टरी कडे निघालास तेव्हा आमच्या एक एजंट ने...जो त्याच दवाखान्यात डॉक्टर आहे...त्याने तुझ्या बायकोला दैवी मंत्राने पूर्णपणे बरं केलं होतं....पण मला परीक्षा तुझी बघायची होती....आणि तू त्या विक्टरच्या काळ्या शक्ती विरुद्ध लढलास ही.....त्या राक्षसी शक्ती पुढे एखादा सामान्य माणूस 5 मिनिटं सुद्धा टिकला नसता.....तिथे तू कित्येक वेळ जिवंत होतास आणि बायकोच्या जीवनासाठी प्रयत्न सुद्धा करत होतास.....मी तेव्हा तिथेच होते....मीच ती दिव्य ताकत तुझ्यात सोडली होती.....प्रत्येक दिव्य शक्ती आपला मालक स्वतः निवडत असते तुझ्या अंगात जी हजारो विजांची ताकत आहे ती आतापर्यंतच्या सगळ्या दिव्य ताकतीमध्ये सगळ्यात अफाट आणि ताकतवाण आहे....कुणालाही सहजासहजी मिळत नाही ही....मागील 200 वर्षात तरी ह्या ताकतीचा मालक जन्मला नव्हता.....आता सगळं तुझ्यावर आहे तुला असामान्य योध्याची जिंदगी जगायची की सामान्य अर्जुनची"
अस बोलून ती तिथून उठली...अर्जुन तिला बघून ताडकन उठला
"थांब...थांब....मला खूप काही विचारायचं आहे...आधी माझे आणि माझ्या बायकोचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद.....तुझं नाव काय?? कळेल का?"
त्या मुलीने एकनजर अर्जुन कडे बघितले....
"मी जास्त काही सांगायची गरज नाही मला माहित आहे ह्या युद्धात तू सहभागी होशीलच....आणि हो माझं नाव "अनामिका" आहे पण तू मला "बॉस" म्हणायचं....सगळे असच म्हणतात.. आणि मी बेस्टच आहे.....आठवतेय ना सकाळी मैदानात लोळवले होते तुला....त्यामुळे बॉसच..."
तिच्या ह्या वाक्याने दोघेही हसले....ती तिथून निघून गेली अनेक प्रश्न अर्जुनच्या मनात होते.....पण त्याने हे प्रश्न दाबून टाकले ...काही महिने असेच गेले....अर्जुनच्या शरीरात बदल होत होते तो ज्या जिम मध्ये जात होता तिथे 100-100 किलो वेट तो आरामात उचलत होता...त्याचे मित्र फक्त त्याच्याकडे बघत होते...अर्जुनमध्ये हा बदल कसा झाला?? हा प्रश्न तिथल्या जिम ट्रेनर आणि अनेकांना पडला होता...काही महिन्यातच एखाद्या प्रोफेशनल बॉडिबिल्डरची जशी पर्सनॅलिटी असते तशी त्याची झाली....अर्जुनला सुद्धा हा बदल अनपेक्षित होता....हे अस का होतंय हे उत्तर त्याला सापडत नव्हते....तो त्या मुलगीच्या शोधत अनेक वेळा त्या मंदिराभोवती फिरत होता पण ती त्याला दिसत नव्हती....एकदा जिम मध्ये व्यायाम झाल्यावर त्याने आपला शर्ट काढला....आपले फुगलेले स्नायू तो आरश्यात फुगवून बघत होता अर्जुनचा एक मित्र मागे उभा होता....तो झटकन पुढे आला
"अरे अर्जुन हा पाठीवर कसला विचित्र टॅटू काढला आहेस?? आणि ह्याचा अर्थ काय??"
अर्जुन मान वळवून मागे बघू लागला...तो एका आरश्या समोर गेला आणि त्याने घामाने भिजलेल्या आपल्या पाठीकडे बघितले....एक विचित्र षटकोनी चिन्ह त्यावर वेगवेगळे आकडे होते आणि वरती संस्कृत मध्ये एक मंत्र दिसत होता....मित्राची प्रश्नार्थी नजर चुकवत अर्जुनने अंगात टी शर्ट घातला आणि मित्राला काहीच उत्तर न देता जिम बाहेर पडला...तो पाठीला हाताने चाचपून बघत होता तो जिमच्या पायरीवर बसून विचार करू लागला...अचानक त्याची नजर आपल्या हाताकडे गेली हातवरील बाणाच्या टॅटूचे टोक फिरले होते त्याने चटकन गाडी काढली आणि आपल्या हातावरच्या टॅटू कडे बघत बाणाच्या टोकाकडे बघत तो गाडीवरून शहराबाहेरच्या जंगलात आला ....रस्ता संपला होता समोर एक जुने मारुतीचे मंदिर होते....बाणाचे टोक त्या दिशेने होते...तो मंदिरात शिरला मंदिर रिकामं होतं....फक्त एका मंत्रोच्चाराचा आवाज त्याच्या कानावर पडत होता तो त्या दिशेने गेला....एक साधू डोळे मिटून मंत्र म्हणत बसला होता...समोर अर्जुन उभा होता अचानक साधूचे मंत्र बंद झाले आणि त्याने डोळे उघडले तो अर्जुन कडे बघून गालात हसून त्याचे स्वागत केले आणि त्याला नमस्कार केला.....आपल्या झोळीतून त्याने एक पुस्तक काढले आणि एक एक चिन्ह अर्जुनला दाखवू लागला....एका चिन्हावर अर्जुनने हाथ ठेवला तसेच चिन्ह अर्जुनच्या पाठीवर उमटले होते.....त्या खालचा इतिहास आणि माहिती अर्जुन वाचू लागला...त्या साधूने आपल्या झोळीतून एक ताईत काढले आणि डोळे मिटून मंत्र म्हणू लागला....ते ताईत त्याने अर्जुनच्या हातात दिले आणि आपल्या गंभीर आवाजात त्याला म्हणाला
"एक अजय आणि महान योद्धा बनशील तू....बजरंगबली आहे तुझ्या पाठीशी"
अर्जुनने साधूला आणि मारुतीला नमस्कार केला....एक वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं...घरी येताच तो बूट काढत असताना किचन मधून पुष्पाचा आवाज आला
"अहो...किती वेळ...आणि कसलं तरी पार्सल आलं आहे तुमच्या नावे...बघा जरा"
हॉल मध्ये एक मोठा बॉक्स ठेवला होता....पुष्पा आत जेवण करीत होती....अर्जुनने तो बॉक्स फाडला आत एक लाकडी जुन्या पद्धतीचा लाकडी बॉक्स होता त्यावर तेच चिन्ह होते जे अर्जुनच्या पाठीवर अचानक उमटले होते.....अर्जुनने स्पर्श करताच खाडकन तो बॉक्स उघडला आत एक तलवार होती...त्या तलवारीचे तेज अर्जुनचे डोळे दिपवत होते...त्याने ती तलवार हातात घेतली...त्या तलवारीवर संस्कृतमध्ये कसले तरी मंत्र कोरले होते....तलवार हातात उचलताच त्याने त्यावरची नक्षी पहिली पात्यावर लिहलेले संस्कृत मंत्र तो वाचू लागला...मंत्र पूर्ण होताच अर्जुनचे डोळे मिटले...त्याच्या हातातील तलवार वितळू लागली वितळणार्या तलवारीचे थेंब खाली पडण्याऐवजी वर सरकून अर्जुनच्या हातात शिरून अदृश्य होत होते बघता बघता पूर्ण तलवार अदृश्य झाली.....ती आता अर्जुनच्या शरीराचा एक भाग बनली होती....अर्जुनने डोळे उघडले त्याबरोबर मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली अर्जुनने मोबाईल उघडला त्यात एक न सेव्ह केलेल्या "बॉस" नावाच्या माणसाचा मेसेज होता....तो समजून चुकला होता की हा बॉस कोण आहे....त्याने मेसेज उघडला त्यात एका विचित्र राक्षसाचे चित्र होते सोबत एक लोकेशन.....अर्जुनने डोळे बंद केले....डोळे उघडताच ते चमकत होते त्याने आपल्या हातावरील टॅटू कडे बघितले....बाणाचे टोक दक्षिणेकडे फिरले होते.....त्याने आपली मूठ आवळली त्याच बरोबर त्याच्या हातातून सर्रकन तलवार त्याच्या मुठीत आली....त्याने त्या तलवारीकडे बघून स्मितहास्य केले....किचन मधून पुष्पाचा आवाज आला
"अहो जेवण झालं आहे.....जेवून घ्या"
अर्जुनने टॅटू मधील बाणाकडे बघितले आणि म्हणाला
"तुम्ही जेवून घ्या.....मला एक नवीन काम मिळालं आहे"
(समाप्त)
शशांक_सुर्वे