भाग चौथा
तिसऱ्या भागाची लिंक👇👇👇👇👇
अर्जुनने वरच्या आगीच्या गोळ्याकडे बघितले जो विक्टर च्या इशाऱ्यावर त्याचा अंत करायला तयार होता...मानवी शक्ती काळ्या शक्तीपूढे हरली होती....विक्टर त्याच्याकडे बघून हसला..कसला तरी मोठा आवाज झाला...विक्टर इकडे तिकडे बघू लागला....हॉल मध्ये इमर्जन्सी जनरेटर वर लाईट लावली होती ती अचानक चालू बंद होऊ लागली...विक्टर च्या मागे असलेली काच अचानक फुटली आणि त्या काचेतून त्या दोघांचे डोळे दिपवत एक वीज कडाडत अर्जुन वर कोसळली. त्या विजेचा प्रकाश प्रचंड होता त्यापुढे दोघांच्या डोळ्याला अंधारी आली....त्या प्रकाशाने त्यांनी डोळे घट्ट मिटून ठेवले होते.....त्या विजेच्या प्रहारामुळे अर्जुन मागचे दोन तीन सिमेंटचे जाड खांब फोडून मागे पडला......विक्टर आणि राहुल ह्या धक्क्यातून सावरले त्यांची नजर समोर मोडलेल्या खांबावर होती.... प्रचंड धूळ उडाली होती...आजूबाजूला विटांचे तुकडे पडले होते... त्या धुळीत अर्जुन कुठेच दिसत नव्हता....राहुल थरथर कापत होता.....त्याने विक्टर कडे बघितले आणि कापऱ्या आवाजात बोलला
"क...क.....काय होत हे???"
विक्टर सुद्धा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता....आगीचा गोळा तसाच हवेत तळपत होता त्याला तसेच ठेवून...तो काय झाले बघण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागला...त्याने लावलेली इमर्जन्सी लाईट अचानक चालू बंद होऊ लागली....राहुल घाबरून विक्टर जवळ आला...दोघांनी आपल्या मोबाईल मधील टॉर्च ऑन केली...त्या धुळीत अर्जुन कुठेच दिसत नव्हता फक्त मोडून पडलेल्या खांबाचे तुकडे दिसत होते अचानक कसला तरी आवाज झाला त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने छतावर टॉर्च फिरवली...दोन तीन खांब मोडून पडल्यामुळे छताला तडे जात होते...ते बघून राहुल आणि विक्टर मागे सरकले....आधीच मोडकळीस आलेल्या त्या हॉल ची निम्मी छत खाली कोसळली....पौर्णिमेचा चंद्र आणि त्या चंद्राचा उजेड त्या हॉल मध्ये पसरला.....विक्टर आणि राहुल क्षणभर गोंधळले.....अचानक चालू बंद होत असलेला इमर्जन्सी लाईट पूर्ण क्षमतेने पेटला त्याचा उजेड परत पसरला....त्या पडलेल्या छताच्या ढिगाऱ्यातून धूर निघत होता....त्या दोघांना आश्चर्याचे धक्यावर धक्के बसत होते....राहुलने विक्टर चा हात पकडला....काळ्या जादूमध्ये महारथ असलेल्या विक्टर ला काहीच समजत नव्हते..हे त्याने आधी कधीच बघितलं नव्हतं...हा प्रकार म्हणजे त्याच्या शक्तीला एक प्रकारे आव्हानच होते..अचानक त्याने ज्या बरणीत आत्मे कैद करून ठेवले होते त्या बरण्या हलू लागल्या.....त्या दोघांचे लक्ष त्या ढिगाऱ्यावर होते....त्यातला धूर वाढतच होता....अचानक एक जोराचा आवाज झाला ढिगाऱ्यात सगळ्यात वरती जो भला मोठा सिमेंटचा ब्लॉक पडला होता तो दूर जाऊन पडला....दोघांनी त्या ढिगाऱ्याकडे बघितले एक हात वर आला होता....त्या हाताला एक वेगळीच चमक होती......त्या हाताच्या बोटातून विजेचे स्पार्क बाहेर पडत होते.....तो ढिगारा बाजूला होऊ लागला....समोरचं दृश्य बघून राहुल खाली बसला तो पायाने मागे फरफटत जाऊ लागला....विक्टर सुद्धा काही पाऊले मागे सरकून आपल्या हातातील राक्षसाच्या टॅटू वर हात ठेवून मंत्र म्हणू लागला..पहिल्यांदा त्याला कसली तरी भीती वाटत होती..राहुल किंचाळला
"विक्टर साहेब बघा....काय हे....वाचवा आता"
हळू हळू त्या ढिगाऱ्यावर पडलेले मोठं मोठे सिमेंटचे भाग बाजूला होत होते...ढिगाऱ्यातून बाहेर येऊन अर्जुन त्या ढिगाऱ्यावर होता त्याने मान खाली केली होती....त्याच्या पूर्ण अंगातून छोट्या छोट्या विजा निघत होत्या...एक अजब शक्ती त्याने सामावून घेतली होती.....त्याची पॅन्ट जळत होती अंगावरचा शर्ट आधीच जळून खाक झाला होता.....त्या चंद्राच्या उजेडात त्याच्या अंगातून निघणाऱ्या विजा आणि धूर एका अद्भुत शक्तीची अनुभूती करून देत होती......विक्टरच्या काळ्या जादूमुळे हात पाय मोडून पडलेला अर्जुन त्यांच्या समोर एका वेगळ्या शक्तीनिशी उभा होता....त्याने अचानक मान वर घेतली आणि आपले डोळे खाडकन उघडले.....त्याचे डोळे सुद्धा त्याच्या अंगातून निघणाऱ्या विजेच्या सारखे चमकत होते....त्याचे ते चमकणारे डोळे बघून.....विक्टर ने आपला हात हवेत उंचावला बाजूला पेटलेल्या आगीतून त्याने एक मोठा आगीचा गोळा बनवून तो अर्जुनवर सोडला...आगीचा गोळा अर्जुनवर धडकतात एक मोठा स्फोट झाला...सगळीकडे धूळ,धुराचे साम्राज्य....राहुल आणि विक्टर ची नजर अर्जुनला शोधू लागली.....समोर कुणीच दिसत नव्हतं.....विक्टर हसू लागला
"जळून मेला वाटतं...साला"
हे ऐकून राहुल खोटं हसू चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करू लागला....त्याची नजर त्या धुरावर होती...प्रचंड आगीच्या गोळ्यापूढे राख झाली असेल ह्या विचाराने त्याने आपल्या कपाळावर आलेला घाम पुसला....विक्टरकडे बघून तो समाधानाने हसत होता....अचानक थंड असलेलं वातावरण गरम जाणवू लागलं.....मागे मिट्ट अंधार होता....त्या अंधारातून प्रचंड ऊब बाहेर पडत होती.....राहुलची नजर त्या अंधारात गेली.....अचानक त्या काळोखात दोन डोळे चमकले तो ओरडू लागला....विक्टर घाबरून पळत सुटला.....राहुल सुद्धा त्याच्या मागे धावू लागला.....मागे अर्जुन चालत येत होता...पळता पळता एका दगडाला पाय लागून राहुल खाली कोसळला....अर्जुन रागाने त्याच्या दिशेने येत होता....त्याच्या अंगातून विजेचे स्पार्क निघतच होते....तो राहुल जवळ येऊन उभा राहिला...राहुलच्या पायात सळी घुसली होती....अर्जुनचे रूप बघून तो घाबरला आणि तसाच लडखडत त्याच्या समोर उभा राहिला....अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत होता.....घाबरत घाबरत राहुलने अर्जुनवर हात उगारला...अर्जुनने त्याचा हात पकडला...त्याचा हात पकडताच राहुल तडफडू लागला....अर्जुनच्या हातातून निघणाऱ्या विजांमुळे एक जबरदस्त विजेचा झटका त्याला बसत होता....काही वेळातच राहुलच्या अंगाने पेट घेतला.....अर्जुन त्याच्या पेटत्या शरीराकडे रागाने बघत होता....राहुलची राख झाली....राखेचा ढीग त्याच्या समोर पडला अर्जुनने रागाने लाथ मारून ती राख हवेत उडवली....आणि त्याची नजर विक्टर कडे वळली तो त्या हॉल मध्ये कुठेच दिसत नव्हता.....अर्जुनने त्या आगीकडे बघितले...पुष्पाचा जीव कैद केलेली बाहुली जळून खाक झाली होती....हे बघून अर्जुन जोरात किंचाळला....त्या आवाजाने पूर्ण परिसर शहारला....विक्टर जिवाच्या आकांताने धावत होता...त्याने मागे वळून बघितले....वेगाने धावत अर्जुन येत होता....मागे बघत धावत असताना....त्या अंधाऱ्या रात्रीत विक्टर एका पाण्याच्या मोठ्या टाकीत पडला....तो स्वतःला सावरत सावरत बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला....कठड्यापर्यंत येताच त्याने वर बघितले...वरती अर्जुन उभा होता....त्याला बघून विक्टर हाथ जोडू लागला
"माफ....माफ कर....मला माहित नव्हतं ती तुझी बायको आहे....मी मी....तुला हवं ते देतो...माफ कर"
अर्जुन गुडघ्यावर बसला आणि त्याने आपल्या हाताकडे बघितले त्याच्या तळहातावर विजा सळसळत होत्या....त्याने एकनजर विक्टर कडे बघितले....त्याची ती लकाकणारी नजर बघून विक्टर त्या थंड पाण्यात थरथर कापत होता...अर्जुनने तो हात खाली पाण्यात घातला.....
"आता माफी तुझ्या सैतानाकडे मागायची"
अस बोलून त्याने आपला विजांनी चमकणारा हात पाण्यात घातला....त्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरला आणि विजेच्या प्रचंड झटक्यांनी विक्टर तडफडू लागला...काही वेळातच त्याने आपले प्राण सोडले....त्याच बरोबर त्याने कैद केलेल्या आत्मा हवेत उडाल्या....अर्जुनचा हात अजूनही त्या पाण्यातच होता....ताठून पडलेल्या विक्टरच्या शरीराकडे तो बघत होता....त्याच्या डोळ्यातून अश्रू आले....पाणी उसळत होत अचानक विक्टरच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या....टाकीतील पाणी रक्ताने लालभडक झालं.....अर्जुन तिथून उठला....त्याने डोळे बंद केले...त्याचा राग विक्टरचे रक्त बघून शांत झाला होता....त्याने डोळे उघडले ते सामान्य झाले होते त्याचं तापलेलं अंग थंड झालं होतं....तो चालत तट फॅक्टरी बाहेर पडला....त्याच्या डोळ्यातून पुष्पासाठी अश्रू वाहत होते....त्याने एका घराबाहेर वाळत असलेला शर्ट उचलला आणि तो अंगात चढवून हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागला....काही वेळातच तो धावत धावत हॉस्पिटलमध्ये आला.....कित्येक किलोमीटर धावून सुद्धा त्याला जरासुद्धा थकवा आला नव्हता...फॅक्टरीमध्ये अचानक काय घडलं??एक वेगळीच भयानक ताकत आपल्या अंगात कशी आली??हे सगळे विचार त्याच्या मनात येत होते...पण महत्वाचा प्रश्न...पुष्पा?? .....तो सरळ पुष्पाच्या वार्ड मध्ये शिरला....समोरचं दृश्य बघून त्याच्या डोळ्यातून अश्रू आले....पुष्पा बेड वर बसून सूप पित बसली होती....बाजूला अर्जुनची आई,पुष्पाची आई आणि बरेच लोक जमले होते.....अर्जुन धावत तिच्याजवळ गेला आणि तिला मिठीत घेतले....दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते....त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिचे डोळे पुसत तिला कापऱ्या आवाजात म्हणाला
"कशी आहेस"
ती काही बोलायच्या आतच अर्जुनची आई म्हणाली
"अरे अचानक बरं वाटू लागलं हिला...काय चमत्कार झाला काय माहीत??..डॉक्टरांनी सुद्धा सगळ्या टेस्ट केल्या सगळं काही नॉर्मल आहे बघ"
हे ऐकून अर्जुनने परत तिला मिठी मारली तिचा हात हातात घेतला त्याची नजर पुष्पाच्या टॅटू कडे गेलं...तिच्या हातावरील कोमेजलेलं फुल अचानक टवटवीत झालं होतं....अर्जुन खूप आनंदात होता आणि आता तो हा त्रास देणाऱ्या टॅटूवालीला शोधणार होता...............(क्रमशः)
शशांक_सुर्वे
(खाली वापरण्यात आलेलं "अव्हेन्जर--इन्फिनिटी वॉर" चित्रपटातील थॉरचा फोटो फक्त प्रतिकात्मक आहे याची नोंद घ्यावी🙏🏼🙏🏼