" नवरात्रीचे नऊ दिवस "
लेखिका - सौ पुनिका सोरटे
हि कथा माझ्या एका मित्राने मला सांगितली होती. तेव्हा नवरात्र चालू होती. नवरात्रीमध्ये म्हणे देवी - देवता बसलेले असतात म्हणजेच बंधनात असतात आणि म्हणून नऊ दिवस भुतं मोकळी सुटलेली असतात. म्हणूनच या दिवसात मांसाहार वर्ज्य केला जातो. आणि नऊ दिवस देवीची पूजा - अर्चना केली जाते. याच काळात घडलेली हि घटना आहे.
एका झोपडपट्टी मध्ये ही घटना घडली होती. मुद्दामहून मी या ठिकाणी कुणाच्याही नावाचा उल्लेख करत नाही. झोपड्यामध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी बहुतेक मुलं मैदानात किंवा फुटपाथवरच झोपतात. अशाच त्या झोपडपट्टीला लागूनच एक छोटीशी बाग होती आणि त्या बागेला लागूनच असणाऱ्या फुटपाथवर त्यावेळी काही मुलं झोपली होती. फुटपाटला लागून असलेल्या रस्त्यावर ३० पावलांच्या अंतरावरच महानगरपालिकेचा कचऱ्याचा मोठा डब्बा होता. त्या दिवशी नवरात्रीचा चौथा माळ होता. म्हणजे नवरात्रीचा चौथा दिवस. झोपलेल्या मुलांपैकी एका मुलाला ठीक रात्रीच्या १ ते २ च्या दरम्यान जाग आली. बहुदा कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली होती. तो डोळे चोळत जागेवरच बसून इकडे - तिकडे पाहू लागला. रस्त्यावर अंधार असल्यामुळे नीटसं दिसत नव्हतं. दूरवर रस्त्याच्या कडेला खांबावर असलेल्या लाईटच्या दिव्याचा मंद प्रकाश अंधुकसा दिसत होता. त्याने पाहिलं कि एक उघडा बंब माणूस त्या कचऱ्याच्या डब्याजवळ उभा राहून इकडे - तिकडे पाहून जागेवर वेड्या सारख्या उड्या मारत होता. त्याला पाहून गल्लीतल्या कुलुंग्या कुत्र्यांनी एकच गलका केला. पण त्या माणसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्या मुलाला त्या माणसाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून तो त्याच्या जागेवरच उभा राहून नीट न्याहाळू लागला. त्याला वाटले कुणीतरी चोर असावा. म्हणून तो जोराने चोर - चोर म्हणून ओरडला. त्या कचऱ्याच्या डब्याजवळील माणसाने त्या मुलाला पाहीले आणि तो विरुद्ध दिशेला पळत सुटला. मुलाच्या आवाजाने झोपलेली दोन - तीन मुलं देखील जागी झाली. तोवर तो मुलगा त्या माणसाला पकडण्याकरिता त्याच्या मागे धावू लागला. तो का धावतोय म्हणून इतर मुलं त्याच्या मागे धावू लागली. खूप अंतर धावत गेल्यावर नाक्याजवळील तीन रस्त्याच्या चौकात तो वेड्यासारखा दिसणारा माणूस अदृश्य झाला. आणि हे त्या मुलाने स्पष्ट पाहिले. त्यामुळे त्याच्या काळजात धडकी भरली. तो पुरता घाबरून गेला. त्याला हुडहुडी भरली. त्याचे अंग तापाने फणफणले.डोळे लाल झाले आणि भोवळ येऊन तो तिथेच खाली पडला.
त्याच्या मागे धावत आलेल्या मुलांनी त्याला त्याच्या घरी पोहचविले. कुणालाच ठाऊक नव्हते कि नक्की काय झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामुलाला त्याच्या घरातील डॉक्टरकडे घेऊन गेले. पण त्याला काहीच फरक पडला नाही. त्याचे डोळे बंदच होते. आणि तो झोपेतच काहीतरी बरळू लागला. त्याचं अंग आणि डोकं विस्तवासारखं गरम होतं. कुणी काही तर कुणी काही बोलू लागले. कुणी म्हणाले त्याला बहुतेक बाहेरील बाधा झाली आहे. कुणीतरी कुठल्यातरी मांत्रिकाचं नाव सुचवलं. त्या मुलाला घेऊन ते त्या मांत्रिकाकडे दाखविण्यास गेले. पण मांत्रिकाने नवरात्रीमध्ये आम्ही काही पाहत नाही असे सांगितले. खूप विनवण्या करून त्याने कसलातरी अंगारा त्याला लावायला आणि खायला दिला. आणि नवरात्र संपल्यावर या असं सांगितलं.
आज माळेचा सातवा दिवस होता. मुलामध्ये काहीच बदल नव्हता. त्याच्या आत्याने त्याच्या कपाळाला त्या मांत्रिकाने दिलेला अंगारा लावला. आणि ती थोडा अंगारा त्याच्या तोंडात घालण्याकरिता तिने त्याचे तोंड उघडले आणि अंगाऱ्याचे बोट त्याच्या तोंडात घातले. तसा त्याने तिच्या बोटाचा करकचून चावा घेतला. आणि तिच्या बोटाचा तुकडा पडला. आत्याने एक मोठी जीवघेणी किंकाळी फोडली. आणि चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. त्याचं तोंड रक्ताने माखलं गेलं.आणि मोठे डोळे करून तो विकृतपणे मोठमोठ्याने हसू लागला. आत्याच्या बोटातून रक्ताची धार लागली. कुणाला काय करावे ते सुचेनासे झाले. ताबडतोब आत्याला दवाखान्यात पळविण्यात आले. तिथे ज्या कुणी हा अघोरी प्रकार पाहिला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. झालेल्या प्रकारामुळे सगळेजणंच हादरुन गेले होते. कधी एकदा नवरात्र संपते असं सगळ्यांना झालं होतं.
आणि शेवट नवव्या माळेचा दिवस आला. त्यादिवशी तर तो मुलगा खूपच त्रास देऊ लागला. म्हणून शेवट त्याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले. पण जसजसा दिवस पुढे जात होता तशी त्या मुलाची तब्बेत आणखी बिघडत होती. त्याला जोराची उचकी सुरु झाली. आणि शेवटी रात्री १० च्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. शेवटी ते पिशाच्च त्याला आपल्या सोबतच घेऊन गेले. म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसात खूप जपायचे असते असं म्हणतात.