पिशाच्च - भाग 04
"रघु मरण पावला तर मला भेटायला आला तो कोण होता?"
"त्याने तुला नाव सांगितले!"
"नाही..."
"मग कशावरून तो रघु होता? "
खरच त्याने मला नाव सांगितले नव्हते.
"तो बाबू होता!" चांदलेकरच म्हणाले.
"कोण बाबू ? "मी गोंधळलो.
" मला आधी सांग बाबूने तुला स्पर्श तर नाही केला ना?" त्यांनी श्वास रोखून विचारले.
"नाही..."
मला काहीच कळेना.
त्यांनी एक सुस्कारा टाकला.
त्यांनी एक सुस्कारा टाकला.
"हे चाललंय काय ? एकदा सांगितले तर खरच खूप उपकार होतील,चांदलेकर !"
मी वैतागून म्हणलो. मला आता हे सहन होईना .
"बस इथे ,काल रात्री मी तुला अर्धवट कहाणी सांगितली.आता तुला सर्व सांगायलाच हवं! जी चूक रघुच्या बाबतीत झाली ती व्हायला नको!"
चांदलेकर खुर्चीवर बसले, मी त्यांच्या समोर बसलो. त्यांनी सांगायला सुरुवात केला.
" रघु जॉईन झाला त्याच्या आसपासच बाबू या गावात अचानक आला.गावातील परसुच्या शेतात तो सालकरी म्हणून कामाला राहिला.तो कुठून आला हे कुणालाच सांगता आले नसते. पोट भरायला आला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्याकडे एक निरुपद्रवी म्हणून दुर्लक्ष्य केले. त्याचे खरे रूप गावात कुणालाच माहिती नव्हते. पण त्याचा खरा उद्देश वेगळाच होता. तो साध्य करायला तो खारवडीत आला होता. तो 'कालावश' संप्रदायातील एक मांत्रिक आहे. या संप्रदायातील काळ्या-अघोरी शक्तींची पूजा करून त्यांना वश करून घेतात आणि हवे ते इप्सित साध्य करतात. त्यासाठी त्याला पिशाच्चाला जागे करावे लागणार होते. त्यासाठीचा विधी हा अमावस्येच्या रात्री योग्य त्या अक्षांश रेखांशाला असणाऱ्या ठिकाणीच करावा लागतो. हे ठिकाण नेमके खारवडीत येत होते. तुला आश्चर्य वाटेल पण त्यासाठीची योग्य जागा नेमकी आपल्या परसातील विहीरीजवळ होती. मी आणि रघु येथे राहत होतो.जर हा विधी करायचा असेल तर मला किंवा रघुला विश्वासात घ्यावे लागणार होते.रघुला या गोष्टींचे आकर्षण होतेच. बाबूने ते हेरले. बाबूने रघुला या कृष्णकृत्यात सामील करून घेतले.पिशाच्चाला आपल्या ताब्यात ठेऊन हव्या त्या गोष्टी करता येतील अशी लालूच बाबूने त्याला दाखविली होती.ररघु भुलला. रघुने त्याला हव्या त्या वस्तू पुरवायच्या नि बाबूने तो विधी पार पडायचा असे त्यांचे ठरले होते.
रघु या घरात राहायला लागल्यापासून काही दिवसांनी मला विचित्र भास व्हायला लागले,आसपास काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव व्हायला लागली आणि मग मी ध्यान लावले ! मला सर्व गोष्टींची जाणीव झाली! कारण मला सुध्दा या विषयात गती आहे.पण ह्याचा कर्ता कोण हे मला तेंव्हा समजले नाही. "

मी चमकून चांदलेकरांकडे पाहिले. ते पुढे म्हणाले,
"ज्याप्रमाणे निसर्गात पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे.पॉझिटिव्ह एनर्जीला आपण देव मानतो तर निगेटिव्ह एनर्जीला आपण भूत -पिशाच्च मानतो ! सर्वसामान्य माणसाला या लहरी जाणवत नाहीत. ही एनर्जी जर ओळखायची असेल तर आपल्याला आपल्या मनाचा तो विशिष्ट भाग जागृत करावा लागतो. तरच त्या संवेदनांची स्पंदनं आपल्याला जाणवू शकतात. थोडक्यात या संवेदना रिसिव्ह करायला आपल्या मनाची रिसेप्टर ऍक्टिव्ह असावी लागतात आणि अभ्यासाने प्रयत्नपूर्वक ते साध्य करता येते. मी ते साध्य केलेले आहे."
थोडं थांबून त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली,
" पण विश्वास ठेव याचा वापर मी माझ्या फायद्यासाठी कधी केला नाही. जर या शक्ती मोकळ्या झाल्या तर गावावर मोठे संकट येणार होते ! मला काहीतरी करावं लागणार होतं ! आता संघर्ष होणार होता.मी विरुद्ध ते ! मी कामाला लागलो. सद्गुरुंच्या नावे जप सुरू केला. एक लक्ष वेळा जप करून जल अभिमंत्रित करून ठेवले.
न जाणो केव्हां गरज पडेल!
" दिवसेंदिवस त्याची तब्येत कशी खालावत गेली हे मी तुला सांगितले आहेच.त्यादिवशी अचानक मला रघुभोवती काळी वलय दिसू लागली. ही वलय मृत्यूची होती. मला शंका आली. मी त्याला या विधिविषयी बोललो तर तो गडबडला. 'आता माघार नाही येणार! तो जागा होतोय !' एवढेच बोलला.मला त्याच्यावर लक्ष्य ठेवावे लागणार होते कारण त्याचा जीव धोक्यात होता. मी बरेच दिवस त्याच्यावर नजर ठेवून होतो. मला काहीच थांगपत्ता लागला नाही. पण त्या रात्री मी रघुचा पाठलाग केला. तो आणि बाबू स्मशानात भेटले. त्याने काही वस्तू बाबूला दिल्या. खरा सूत्रधार कोण ?हे मला समजले.
बाबू खूप धूर्त होता. ती अमानवी शक्ती जागी झाल्यावर तिची तहान भागविण्यासाठी मानवी रक्त लागणार होते.त्यासाठी बळी लागणार होता याची बाबूला जाणीव होती पण त्याने याची रघुला कल्पना दिली नव्हती !
सर्व साहित्याची जुळवाजुळव करून मागच्या अमावास्येला मध्यरात्री ते दोघे गुपचूप मागच्या विहिरीजवळ आले नि त्यांची उपासना सुरू केली. मी घरात झोपलो होतो.अचानक मला अस्वस्थ व्हायला लागले. मी उठून परसात गेलो.समोर पाहतो तर रघु आकाशाकडे पाहून हात वर करून गोलगोल फिरत होता. बाबूने पूर्णपणे त्याला वश केले होते. बाबू जोरजोराने मंत्रोपचार करून सैतानाला आवाहन करत होता. मी तिथे आल्याचे भानच त्या दोघांना नव्हते. बाबूच्या समोर काळी केसाळ बाहुली होती. तिच्यात येण्याचे पिशाच्चाला आवाहन तो करत होता. पिशाच्च अवतरल्यावर मानवी बळी देऊन त्याचे रक्त तिला पाजायचे की काम फत्ते.रघु बेभान होऊन गोल गोल फिरत होता. बाबूने रघुचीच निवड केली होती बळी म्हणून...

आणि ती वेळ आली ! ती बाहुली हालचाल करू लागली.तिच्या भोवती एक चक्रवात तयार होत होता. मी काय ते समजलो! मी वेगाने घरात धावलो...अभिमंत्रित करून ठेवलेल्या पाण्याचा तांब्या उचलला... इकडे बाबूने रघुचा गळा कापण्यासाठी सुरा उचलला... तो मानेवर वार करणार तोच...मी सद्गुरूंचे नाव घेत ते पाणी रघुवर शिंपडले...माझ्या अचानक एंट्रीने बाबू बिथरला...काय करावे त्याला सुचेना...रघु भानावर नव्हता पण त्याचा जीव वाचला होता त्यावेळेपुरता तरी. बाबूने सर्व गोष्टी जुळवून आणल्या होत्या फक्त मला ओळखण्यात तो चुकला. त्याचा विधी अर्धवट राहिला.तो ती बाहुली घेऊन पळून गेला. कुणालाच दिसला नाही.तो आता इतका पिसाटला आहे की त्याला कशाचे भान नाही."
बाबूच्या गाठोड्यात काय असावे त्याची मला कल्पना आली.मी सुन्न बसून राहिलो.आता पुढे काय?
चांदलेकर डोळे मिटून शांतपणे पुढे बोलू लागले.
"मी रघुला गावी सोडले पण त्याला जबर मानसिक धक्का बसला होता.त्याने आत्महत्या केली...बाबूने त्याच्याकडून करवली असेही म्हणू शकतो."
मला आता माझी काळजी लागली होती कारण बाबूने मला स्पर्श केला होता.
"चांदलेकर, बाबूने काल मी फाट्यावरून येताना माझ्या खांद्यावर हात टाकला होता!"
"माहिती आहे मला! तो तुझा पाठलाग करत आला होता इथे!तुला स्पर्श करून त्याने तुझ्यात आणि त्या पिशाच्चात संबंध प्रस्थापित केला आहे. काल अमावस्या होती.त्याचे पुढचे टार्गेट तू आहेस जयदीप, त्याने त्याच्या विधीची पुन्हा सुरुवात केली आहे."
क्रमशः
(ही कल्पनिक कथा आहे, केवळ मनोरंजन हाच हेतू आहे. ह्या भाग छोटा झाला आहे...पुढील अंतिम भाग लवकरच टाकतो...आणि हो comments लिहायला विसरू नका....धन्यवाद! )