वचन -काल्पनिक लघुकथा |
वचन
(काल्पनिक लघुकथा)
"आरं...ए...जा लवकर त्या म्हसोबाच्या देवळातल्या भगतबाबा ला बोलावं जा" तात्याने बाहेर उभ्या असलेल्या एका पोराला हाक दिली...तस ते पोरगं पळत पळत म्हसोबाच्या देवळाकडं निघालं
"काल पल्याड गावच्या जत्रेला गेलो होतो तवा धरण असा करतोय हा...आरं ए सदा शांत हो की"
त्याची आई डोळ्यात पाणी आणून बोलत होती....सदाचे वागणे विचित्र होते 50 भर माणसं वाड्यात जमली होती....सदा ने डोळे पांढरे केले होते...तो तडफडत होता...गरागरा मान फिरवत तो "मी माझ्या सदाला घेऊन जाणार" असं कर्णकर्कश आवाजात बोलत होता..10 ते 12 लोकांनी त्याला पकडलं होतं पण तो त्यांनाही आवरत नव्हता....तो भयाण आवाज ऐकून सगळ्यांची हवा टाईट झाली होती....तिकडून खबर मिळाल्यावर सदा चा भाऊ सुरेश आणि चुलत भाऊ अनिल धावत आले.....त्यांनी सदा ला पकडलं....सदा शांत झाला...सुरेश आणि अनिलचा स्पर्श होताच सदा चिडला....एका भयाण नजरेने सुरेश कडे बघत त्याने त्या कर्कश आवाजात सुरेश ला एक शिवी घातली......

"रांxxx आलास व्हय तू?"
आपल्या भावाच्या तोंडून शिवी ऐकून सुरेश बिथरला... आणि सुरेश ने सदाचा हाथ पकडला....त्या हाताकडे बघत त्या हातावर सदाने जोराचा चावा घेतला...प्रचंड वेदनेने सुरेश तडफडू लागला...सदा त्याला इतका जोरात चावत होता की सुरेश च्या हातातून रक्त वाहू लागल....हे बघून अनिल मदतीला आला..पण सडपातळ असलेल्या सदाने एक जोराचा प्रहार अनिल वर केला तसा तो दूर जाऊन पडला....लोकं हे सगळं बघत होते...सदाच्या जवळ जायचं धाडस कुणाच्यात नव्हतं....अनिल आणि सुरेश वेदनेने तळमळत होते.....तात्याने बाजूला असलेल्या पोराना इशारा केला
"आरं ए बघताय काय...लगीरलय ह्याला पकडा आणि त्यो भगत येईस्तोर त्या खोलीत टाका ह्याला"
तशी 10-20 पोरं पुढं आली आणि सदाला पकडलं..."मी सदाला घेऊन जाणार अस सदा कर्णकर्कश आवाजात म्हणत होता...तस पोरानी त्याला आत खोलीत ढकलायचा प्रयत्न केला पण सडपातळ सदा त्या 10 मुलांनाही भारी पडत होता....शेवटी सगळ्यांनी मिळून त्याला खोलीत ढकलले आणि बाहेरून कडी लावली...सगळे आता भगत यायची वाट बघू लागले....सगळे शांत आणि चिंताग्रस्त बसले होते...अचानक खोलीतून "धप धप" असा आवाज येऊ लागला....."आत काय चालू आहे??".....सगळे अजून घाबरले....तात्याने धाडस करून खोलीचे दार उघडले आणि समोर च्या जाडजूड भिंतीला पडलेलं भगदाड बघून आश्चर्य चकित झाले...सदा जुनी भिंत पडून बाहेर पळाला होता...तात्या बाहेर आला "आरं शोधा त्याला कुठं पळाला त्यो भिंत पाडून"
तशी लोकं ताडकन उठली आणि इकडे तिकडे शोधू लागली...तिकडून कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता...लोकांनी हातात कुऱ्हाडी, फावडे मिळेल ते घेतले आणि सदाला शोधू लागले...
"आरं त्यो बघा सदा" एक पोर वरडलं
लोकांनी बघताच त्यांचा थरकाप उडाला 4 कुत्री...एकाने सदाच्या पायाचा लचका तोडला दुसरे दुसऱ्या पायाचा चावा घेत होते..सदा तसाच गुरगुरत उभा होता...त्याने लोकांना बघितलं आणि चावणार्या एक कुत्र्याला उचलून त्याच्या नरडीचा घोट घेतला...त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला...कुत्रं मरून पडलं...तसा तो विचित्र हास्य करत माळरानाकडे पळाला...लोकं त्याच्या मागे धावू लागली....त्या शांततेत सदाचे भयाण हास्य लोकांचा थरकाप उडवत होते...चंद्राच्या उजेडात पाठलाग चालु होता...सदाची एक ढेंग आता इथे तर दुसरीकडे तिकडे...लोक त्याची कृती बघून हैराण झाले.......कसला प्रकार ह्यो?? कसली भुताटकी???....लोकांना मागे टाकून कितीतरी पुढे तो गेला...लोकं धावत होती...

सदाची ताकत वाड्यात लोकांनी बघितली होती.....त्यामुळे सगळे गावकरी सोबतच त्याला शोधत होते.....माळरानावर त्यांना समोर सदा बसलेला दिसला...मातीचा ढीग समोर पडला होता..सदाचे हाथ आणि कपडे मातीने मळकट झाले होते....सगळे लोक समोर होते...त्या खड्यातून एक सांगाडा सदाने बाहेर काढला...आणि तो घेऊन उकरलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसला...त्याने त्या सांगाड्याच्या कवटीवरून प्रेमाने हाथ फिरवून "आले मी माझ्या सोन्या" अस बोलू लागला....
"आरं ए आन्या ही तर तीच आहे वाटतं" सुरेश जोरात पुटपुटला
ह्या वाक्याने सर्वांची नजर सुरेश कडे वळली...जरा रागात तात्या म्हणाला "आरं काय भानगड हाय ही?"

सदा आता उभा राहिला आणि तात्याला म्हणाला "आरं त्यो काय सांगणार मी सांगते की...आठवतंय का तुझ्या शेतात काम करणारी रुपाली...जीच तुझ्या मुलावर प्रेम व्हत...पण तुला ते मान्य नव्हतं..गरीब होती नव्ह म्या आम्ही दोघ पळून जाणार होतो...पण ह्या दोघानी मला आधीच पकडून मला मारलं आणि इथं पुरून टाकलं..माझ्या आईबापाला मी आत्महत्या करते अशी चिठ्ठी दावली....ह्यो सांगाडा माझाच हाय...माझा सदा मला परत भेटलाय..मी ह्याला घेऊन जाणार"
रुपाली हे नाव ऐकून आणि आपलं पितळ उघडं पडलं हे बघून अनिल आणि सुरेश हादरले...
"कशी घेऊन जातेस बघतो साली माझ्या भावाला"
अस बोलून अनिल ने सदाच्या दिशेने काठीचा वार केला सदाने तो वार हवेत झेलला आणि त्याच्याकडे भयाण नजरेने बघून आपल्या हातातील सांगाड्याच्या बरगडी चे हाड मोडून सरळ अनिल च्या पोटात खुपसले....अनिल खाली कोसळला तसा तात्या रागाने सदा कडे आला पण सदाने एक जोराची लाथ तात्याच्या पोटात मारली...तसा तात्या विव्हळत दूर जाऊन पडला...सदा आता सदा राहिप नव्हता...सदा कोण आहे हे कळल्यावर सुरेश ने घाबरून जोराचा कुऱ्हाडी चा वार सदाच्या दिशेने केला...कुऱ्हाड सदाच्या डोक्यात बसली...रक्त वाहू लागलं...पण सदा अक्राळविक्राळ हसत होता
"स्वतःच्या भावाला मारतोस काय र भाड्या"
अस बोलून सदाने आपल्या डोक्यातील कुऱ्हाड उपसून काढली...तसा रक्ताचा पाट वाहू लागला...समोरच दृश्य बघून सुरेश घाबरला आणि धावू लागला...अक्राळविक्राळ हसणारा सदा 1,2 ढेंगा टाकून सुरेश च्या जवळ पोचला आणि त्याने जोराची कुऱ्हाड फिरवली....शिरच्छेद
डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताचा चेहऱ्याने सदाने लोकांच्या कडे बघितलं....लोकं घाबरून सैरावैरा पळू लागली तसा सदा हसू लागला

सदा आता चालू लागला त्याने आपला रक्ताळलेल्या हात बघितला त्याच्या आतली रुपाली आता शांत झाली होती
"आरं ए सदा आली तुझी रुपाली... .ह्या लोकांनी मारलं रे मला...बघ तुझी पण काय हालत केली यांनी....अरे किती छळले होते मला ह्यांनी....मला माहित आहे झाली नाही ह्या जन्मात आपली भेट...आठवतंय का ह्या तलावाजवळ आपण जीवनमरणाभर साथ राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या...जीवनात शक्य नाही झालं रे...पण आता मेल्यावर"

अस बोलून खळखळणार्या तलावात सदाने उडी घेतली
#शशांक_सुर्वे